Maharashtra

Nagpur

CC/819/2021

SHRI KRUSHNA DHONDUJI BARASKAR - Complainant(s)

Versus

METRO ORANGCITY INFRATEC THROUGH SHRI SURESH MALANNA SAMRTALWAR - Opp.Party(s)

ADV A T SAWAL

13 Apr 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/819/2021
( Date of Filing : 31 Dec 2021 )
 
1. SHRI KRUSHNA DHONDUJI BARASKAR
KHADGAON ROAD SONBA NAGAR LAVHA WADI NAGPUR 440023
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. METRO ORANGCITY INFRATEC THROUGH SHRI SURESH MALANNA SAMRTALWAR
PLOT NO 245, TAKKAL LAYOUT KATOL BYPASS ROAD WADI NAGPUR 440023 AND BRANCH OFFICEA AT KALAKUNJ APARTMENT GANPATI NAGAR CHOWK, NEAR SHIV KIRANA STORE,GODHNI ROAD NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV A T SAWAL, Advocate for the Complainant 1
 
Dated : 13 Apr 2022
Final Order / Judgement

आदेश पारीत व्‍दारा श्री. एस आर आजनेमासदस्‍य

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्‍या कलम ३५(1) नुसार दाखल केलेली आहे.
  2. वि.प.चा जमीनी विकत घेऊन त्यांचे विकसन करुन त्यामध्‍ये ले-आऊट टाकुन भुखंड विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने वि.प.चे मौजा-दाभा प.ह.नं.7, ता.जि. नागपूर येथील ख.क्रं.27/3 भोगवटदार वर्ग क्रं.1 आराजी 0.80 हेक्टर आर या जमीनीवर पाडलेल्या ले-आऊट मधील भुखंड क्रं.43, एकुण क्षेत्रफळ 114 चौ.मि.(1230 चौ.फुट) एकुण रुपये 8,48,700/- एवढया किंमतीत विकत घेण्‍याचा करार वि.प. बरोबर दिनांक 8.4.2016 रोजी केला. तक्रारदाराने वि.प.ला भुखंड खरेदीपोटी रुपये 5,000/- दिनांक 17.6.2016 ला अदा केले व कराराचे वेळी रुपये 1,30,000/- नगदी दिले व धनादेश क्रमांक 012743 आसीआयसीआय बॅकेच्या धनदेशाव्दारे रुपये 2,00,000/- असे एकुण 3,35,000/- वि.प.ला दिले व उर्वरित रक्कम रुपये 5,13,700/- प्रतीमाह रुपये 21,404/- प्रमाणे 24 महिन्यात अदा करावयाचे होते. तक्रारदाराने वि.प.सोबत मौजा-दाभा, ख.क्रं.47/2 मधील टाकलेल्या ले-आऊट मधील भुखंड क्रमांक 23 दिनांक 14.6.2016 ला आरक्षीत केला व तक्रारदाराने वि.प.ला दिनांक 14.6.2016 ते 2019 पर्यत वेळोवेळी धनादेशाव्दारे व रोखीने एकुण रुपये 2,50,000/- अदा केले. तक्रारदाराने वि.प.ला दोन्ही भुखंडाचे खरेदीपोटी एकुण रुपये 5,85,000/- अदा केले. तक्रारदाराने वि.प. ला दोन्ही भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्‍याबाबत विंनती केली असता वि.प.ने तक्रारदाराचे विनंतीची दखल घेतली नाही म्हणुन तक्रारदाराने वि.प.ला भुखंड खरेदीपोटी अदा केलेली रक्कम व्याजासह किंवा आजचे बाजारभावाप्रमाणे परत करण्‍याबाबत विनंती केली त्यावेळी वि.प.ने तक्रारदाराचे नावे प्रत्येकी रुपये 2,00,000/- एवढया रक्कमेचे तीन धनादेश दिले त्यापैकी दोन धनादेश अपु-या रक्कमेचे कारणास्तव अनादरीत झाले व एक धनादेश तारीख संपल्याने वटविण्‍यात आला नाही. त्यामूळे तक्रारदाराने वि.प.ला वकीलामार्फत दिनांक 16.10.2021 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु वि.प.ने नोटीसची दखल घेतली नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार या आयोगासमक्ष दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली आहे. 1. वि.प.ला निर्देशीत करण्‍यात यावे की, वि.प.ने दिलेल्या धनादेशाप्रमाणे रुपये 6,00,000/, 24टक्के व्याजासह परत करावे किंवा भुखंडाची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे परत करावी. तसेच तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
  3. विरुध्द पक्षाला आयोगामार्फत नोटीस पाठविण्यात आली असता सदर नोटीस दिनांक 15.01.2022 रोजी प्राप्त झाली परंतु सदर नोटीस मिळूनही वि.प. आयोगा समक्ष हजर झाले नाही म्हणुन सदर तक्रार त्यांच्या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 9.3.2022 रोजी पारित करण्‍यात आला.
  4. तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता व लेखी युक्तीवादाबाबत पुरसिस, तोंडी युक्तीवाद ऐकता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

         मुद्दे                                                                         उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                              होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकत्याला दोषपूर्ण सेवा दिल काय ?               होय
  3. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला काय?         होय
  4. काय आदेश                                                            अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तक्रारदाराने वि.प.चे मौजा-दाभा प.ह.नं.7,ता.जि.नागपूर येथील ख.क्रं.27/3 भोगवटदार वर्ग क्रं.1 आराजी 0.80 हेक्टर आर या जमीनीवर पाडलेल्या ले-आऊट मधील भुखंड क्रं.43, एकुण क्षेत्रफळ 114 चौ.मि.(1230 चौ.फुट) एकुण रुपये 8,48,700/- एवढया किंमतीत विकत घेण्‍याचा करार वि.प. बरोबर दिनांक 8.4.2016 रोजी केला.  तक्रारदाराने कराराचे वेळी रुपये 1,30,000/- नगदी दिले व धनादेश क्रमांक 012743 आयसीआयसीआय बॅकेच्या धनदेशाव्दारे रुपये 2,00,000/- असे एकुण 3,30,000/- वि.प.ला दिले व उर्वरित रक्कम प्रतीमाह रुपये 21,404/- प्रमाणे 24 महिन्यात अदा करावयाचे होते. तसेच तक्रारदाराने वि.प.सोबत मौजा-दाभा, ख.क्रं.47/2 मधील टाकलेल्या ले-आऊट मधील भुखंड क्रमांक 23 दिनांक 14.6.2016 ला आरक्षीत केला व तक्रारदाराने वि.प.ला दिनांक14.6.2016 ते 2019 पर्यत वेळोवेळी धनादेशाव्दारे व रोखीने एकुण रुपये 2,53,000/- अदा केल्याचे नि.क्रं.2 वर दाखल दस्तऐवजांवरुन स्पष्‍ट होते.यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे हे सिध्‍द होते. वि.प.ने तक्रारदाराकडुन दोन भुखंडाचे विक्रीपोटी एकुण रुपये 5,83,000/- स्व‍िकारुनही तक्रारदाराला त्यांचे विनंतीनुसार विक्रीपत्र करुन दिले नाही.  तक्रारदाराने वि.प.ला भुखंडाचे खरेदीपोटी दिलेल्या रक्कमेची मागणी केली असता वि.प.ने तक्रारदाराला रुपये 2,00,000/- चे तीन धनादेश दिले व सदर धनादेश अपु-या रक्कमेचे कारणास्तव वटले नाही हे अभिलेखावर दाखल दस्तावेज क्रं.6,7,8,9,6,7,8,9, वरुन दिसुन येते. त्यामूळे वि.प.व तक्रारकर्ता यांचेमधील भुखंड खरेदी विक्रीबाबत झालेला करारनामा रद्द झालेला आहे करिता तक्रारकर्ता वि.प.कडुन भुखंड खरेदीपोटी वि.प.ला दिलेली रक्कम व्याजासह मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे. वि.प.ने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्‍ट होते. मा. राष्ट्रीय ग्राहक आयोग यांनी दिलेल्या न्यायनिवाडयातील Soumitra Kumar Shaw  Vs. Lokhandwala Kataria Constructions Pvt.Ltd. ,2019 NCJ 517(NC) व Pratima Rajpal and Anr. Parsvnath Developers Ltd. 2019  NCJ  903 (NC)या न्यायनिवडयातील वस्तुस्थीती सदर प्रकरणात लागू होते.  तसेच विरुध्‍द पक्ष यांनी मिळकतीचे विकसन करुन भूखंड तयार करण्याचे वचन दिलेले आहे आणि त्यासाठी प्रस्तावित ले-आऊटचा नकाशा तक्रारदाराला दिलेला आहे. म्हणुन मा. सर्वोच्च न्यायालयाच्या M/s. Narne Construction P.Ltd. Etc. Union of India and Ors. II (2012) CPJ 4 (SC) या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्तुत प्रकरण चा‍लविण्याचे अधिकार आहे.   सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.ला आदेशीत करण्‍यात येते, तक्रारदाराकडुन भुखंड क्रं.43 चे विक्रीपोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 3,30,000/- तक्रारदाराला 18टक्के व्याजदाराने दिनांक 8.4.2016 पासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो अदा करावी.
  3. वि.प.ला आदेशीत करण्‍यात येते, तक्रारदाराकडुन भुखंड क्रं.27 चे विक्रीपोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 2,53,000/- तक्रारदाराला 18टक्के व्याजदाराने दिनांक 24.7.2019  पासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो अदा करावी.
  4. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- द्यावे.
  5. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत करावी.
  6. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.