ग्राहक तक्रार अर्ज क्र. 09/2009
दाखल दिनांक. 14/01/2009
अंतीम आदेश दि. 26 /03 /2014
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
1. महेंद्र नंदकिशोर गुजराथी, तक्रारदार
उ.व. 28, वर्ष, धंदा – कॉन्ट्रक्टर, (अॅड.राजेंद्र निकम)
2. नंदकिशोर नरसीदास गुजराथी,
उ.व. 71, धंदा – पेन्शनर,
रा. गुजराथी गल्ली, पारोळा, जि. जळगांव
विरुध्द
1. श्री. मर्चंट नागरी सहकारी पतपेढी मर्या.पारोळा, सामनेवाला
गुजराथी गल्ली पारोळा, ता.पारोळा, जि.जळगांव. (अॅड.विक्रम केसकर)
व इतर 4
निशाणी क्र. 01 वरील आदेश
मिलींद.सा.सोनवणे, अध्यक्ष – प्रस्तुत केसचे रेकॉर्ड पाहाता असे दिसून येते की, तक्रारदार व त्यांचे वकील तसेच सामनेवाले व त्यांचे वकील दि.11/11/2010 रोजी नंतर पासुन गैरहजर आहेत. तक्रारदाराने सामनेवाले यांच्या विरुध्द कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. त्या कामी नेमलेल्या प्रत्येक तारखांना ते सतत गैरहजर आहेत. आज रोजी देखील नेमलेल्या तारखेस तक्रारदार व त्यांचे वकील तसेच सामनेवाले व सामनेवाले वकील यांचा पुकारा केला असता ते आजही गैरहजर आहेत. उभयपक्षकारांची सततची गैरहजेरी पाहता उभयपक्षकारांना त्यांची तक्रार पुढे चालविण्यात काहीएक स्वारस्य राहीले नसल्याचे स्पष्ट होते. परिणामी, तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 13 (2) (सी) अन्वये त्याच्या अधिकारास बाधा न येता फेटाळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज तक्रारदाराच्या हक्कास बाधा न येता अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
2. खर्चा बाबत कोणताही आदेश नाही.
दि. 26/03/2014 (श्री. सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव