View 31 Cases Against Mercedes-benz
Dr.Ramakant S/o Haribhau Bembde filed a consumer case on 27 Feb 2015 against Mercedes-Benz India Pvt Ltd in the Aurangabad Consumer Court. The case no is CC/11/3 and the judgment uploaded on 12 Mar 2015.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद
________________________________________________________________________________________________
ग्राहक तक्रार क्रमांक :-3/2011
तक्रार दाखल तारीख :-03/01/2011
निकाल तारीख :- 27/02/2015
________________________________________________________________________________________________
श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष
श्रीमती संध्या बारलिंगे,सदस्या श्री.के.आर.ठोले,सदस्य.
________________________________________________________________________________________________
डॉ.रमाकांत पि. हरीभाऊ बेंबडे,
रा. 24, जय विश्वभारती कॉलनी,
जवाहर कॉलनी, औरंगाबाद …….. तक्रारदार
विरुध्द
1. मर्सीडीज-बेंझ इंडिया प्रा.लि.,
रजि.ऑफिस, ई-3,एमआयडीसी, चाकन फेस-3,
चाकन इंडस्ट्रीयल अेरिया, अकुर्डी अँड निघोजे,
ता. खेड, जि. पुणे – 410 501
2. मिलेनिअम मोटर्स प्रा.लि.,
दिपक, 41, एक्स-सर्व्हिसमॅन कॉलनी,
पैड रोड, कोथरुड पुणे – 411 038
आणि
शो-रुम सफिरे पार्क जेलेरीया-4,
पूणे-मुंबई रोड, वाकडेवाडी, पुणे – 411 005
3. मे.बी.यु.भंडारी प्रा.लि.,
101, बनेर, मुंबई-बेंगलोर रोड, पुणे-45 ........ गैरअर्जदार
________________________________________________________________________________________________
तक्रारदारातर्फे – अॅड. अनिल पी मालानी
गैरअर्जदार 1 तर्फे – अॅड.पी.बी पैठणकर व अॅड.सारीका मंडलीक
गैरअर्जदार 2 तर्फे – अॅड.वनिता पाटील
गैरअर्जदार 3 तर्फे – अॅड.डी.एल.खिंवसरा
निकाल
(घोषित द्वारा – श्रीमती. संध्या बारलिंगे, सदस्या)
तक्रारदार यांनी कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार ग्राहक मंचामध्ये दाखल केली आहे.
तक्रारदाराने मर्सिडिज बेंझ C 220 CDI ही गाडी 2010 मध्ये विकत घेतली. गैरअर्जदार क्रं 1 Mercedes Benz India Private Limited ही सदर कारचे उत्पादन करणारी कंपनी आहे. गैरअर्जदार क्रं 2 Millenium Motors Private Limited ही कंपनीचे पूर्वीची अधिकृत विक्रेता असून तक्रारदाराने त्यांच्या शोरूम मधून सदर कार विकत घेतली आहे. गैरअर्जदार क्रं 3 हे B U Bhandari Private Limited हे कंपनीचे सध्याचे अधिकृत विक्रेते आहेत.
तक्रारदाराने दि. 2/3/10 रोजी रु.30,93,512.00/- इतकी रक्कम देऊन Mercedes C-220 ही गाडी घेतली. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं 2 यांना गाडी विकत खरेदी करण्यापूर्वी गाडीच्या सर्विसिंग विषयी जी आश्वासने दिली होती, त्याची पूर्तता करण्याची मागणी केली. त्यानुसार गैरअर्जदार क्रं 2 याने गैरअर्जदार क्रं 1 यांच्या प्रतिनिधीसोबत दि.19/3/09 रोजी तक्रारदाराची बैठक घडवून आणली. त्यानंतर गैरअर्जदार क्रं 2 याने तक्रारदाराच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन देऊन 4 Free Service Coupon दिले. गैरअर्जदार क्रं 2 याने इतर सर्व मागण्यांची पूर्तता केली, परंतु 40,000 Km होईपर्यंत 4 Free Servicing ची मागणी पूर्ण केली नाही. गैरअर्जदार क्रं 2 याच्या म्हणण्यानुसार तो जोवर गैर अर्जदार क्रं 1 याचा अधिकृत विक्रेता होता तोपर्यंत त्याला कूपन प्रमाणे फ्री सर्विसिंग देण्याचा अधिकार होता. आता कंपनीने गैरअर्जदार क्रं 3 याला अधिकृत Dealership दिल्यामुळे गैरअर्जदार क्रं 2 आता फ्री सर्विस देऊ शकत नाही. गैरअर्जदार क्रं 1 याने फ्री सर्विसिंग देण्याच्या जवाबदारीतून स्वतःला अलिप्त ठेवले आहे. गैरअर्जदार क्रं 3 हे आता कंपनीचे अधिकृत विक्रेते आहेत. त्यामुळे फ्री सर्विस देणे हे त्यांचे दायित्व आहे. परंतु तो देखील ते देण्याचे टाळत आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं 1 यांना ई मेल आणि फोन करून अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. पहिल्या फ्री सेर्विसिंग च्या वेळेस गैरअर्जदार क्रं 3 याला बरेच समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्या सर्व गोष्टींना न जुमानता, servicing ची रक्कम दिली नाही तर गाडीचा ताबा देणार नाही असा पवित्रा गैरअर्जदार क्रं 3 याने घेतल्यामुळे तक्रारदारास नाईलाजास्तव मागितलेली रक्कम द्यावी लागली. तक्रारदाराकडून दि.2/2/10 रोजी रु.25,642/- ही रक्कम घेतली. दुसर्या सर्विसिंग च्या वेळेस दि.4/12/10 रोजी रु.23,704/- ही रक्कम घेतली. त्यानंतर देखील 2 वेळा केलेल्या सर्विसिंगची रक्कम तक्रारदाराने दिली. त्यानंतर तक्रारदाराने सर्व गैरअर्जदारांना कायदेशीर नोटिस पाठवली. गैरअर्जदार क्रं 2 याने फ्री सर्विसिंग कुपन्स दिलेले आहेत, त्याच्याशी आमचा संबध नाही असे इतर गैरअर्जदार क्रं 3 चे म्हणणे आहे. गैरअर्जदार क्रं 2 यांचे म्हणणे असे आहे की, त्यांच्याकडून फ्री सर्विस घेतली तर वारंटी समाप्त होईल. Dealership बदल्यानंतर गैरअर्जदार क्रं 1 यांनी 6 महिन्याची Extended Warranty दिली आहे . त्यामुळे गैरअर्जदार क्रं 3 हे फ्री सर्विस कुपन्स घेण्यास तयार नाहीत. तक्रारदाराने अनेक वेळा याबाबतीत पाठपुरावा केला. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तक्रारदार त्यांनी 4 फ्री Servicing असताना देखील रक्कम देऊन servicing करून घेण्याकरिता दिलेली रक्कम रु.1,24,828.10/- व्याजासकट परत मागत आहेत. तसेच नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्रं 1 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, कारचे उत्पादन करणे हे त्यांचे काम आहे. त्यांचे अधिकृत विक्रेते सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत. कारची विक्री आणि सर्विसिंग करणे त्यांचे काम नाही.
गैरअर्जदार आणि तक्रारदार यांच्यात कोणताही करार झाला नव्हता. त्यामुळे सदर अतिरिक्त लाभाकरीता गैरअर्जदार जवाबदार नाही. सदर करार गैरअर्जदार क्रं 2 व तक्रारदार यांच्यात झालेला होता. त्या करारात नमूद केलेल्या अटींनुसार सर्विसिंग चा लाभ तक्रारदारास घेता येईल. सदर करार गैरअर्जदार क्रं 2 व तक्रारदार यांच्यात झालेला होता. त्यामुळे गैरअर्जदार क्रं 1 ने सर्विसिंग ची रक्कम रिफंड करण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रं 2 यांनी त्यांचा जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार कार खरेदी करण्यासाठी आलेला असताना त्याला सर्व अटी व Policies समजाऊन सांगितल्या. दि.19/3/09 रोजी तक्रारदारासोबत जो करार झाला होता त्यातील सर्व बाबी तक्रारीत नमूद केलेल्या नाहीत. 40000 Km पर्यन्त 4 Free Servicing चा करार झाला नव्हता. गैरअर्जदार क्रं 2 हा ग्राहकाच्या हितसंबधाची दाखल घेऊन फ्री सर्विस देण्यासाठी तयार होता. परंतु गैरअर्जदार क्रं 2 यांनी Servicing दिली तर गैरअर्जदार क्रं 1 हे तक्रारदाराच्या कारला वारंटी देण्यासाठी राजी नव्हते. प्रस्तुत गैरअर्जदार कंपनीचे अधिकृत विक्रेते या Capacity मध्ये अटींनुसार Servicing देण्यासाठी राजी होते. परंतु गैर अर्जदार क्रं 1 यांनी दिलेल्या वारंटीच्या व्यवहारात त्यांचा काहीही संबध नाही. तक्रारदाराने गैर अर्जदारास अनावश्यक प्रतिवादी केलेले आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रं 3 यांनी त्याचा लेखी जवाब दाखल केला. त्याच्या म्हणण्यानुसार, ते गैरअर्जदार क्रं 1 यांचे अधिकृत विक्रेते आहेत. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीशी प्रस्तुत गैरअर्जदाराचा काहीही संबध नाही. प्रस्तुत गैरअर्जदार आणि तक्रारदार यांच्यात कोणताही करार झालेला नाही. सदर तक्रार कार्यक्षेत्र बाह्य दाखल केली आहे. गैरअर्जदार क्रं 1 यांच्या निर्देशाशिवाय गैर अर्जदार कोणताही लाभ देऊ शकत नाहीत. सदर करार गैरअर्जदार क्रं 2 यांच्याशी झालेला होता. गैरअर्जदार क्रं 2 यांच्याशी प्रस्तुत गैरअर्जदाराचा काहीही संबध नाही. प्रस्तुत गैरअर्जदाराविरुद्ध कोणताही कागदोपत्री पुरावा नाही. तक्रारदारास गैरअर्जदाराकडून Service हवी असेल तर त्यासाठी रक्कम द्यावी लागेल. तक्रारदाराने ज्या वेळेस गैरअर्जदाराकडे त्याची गाडी Servicing ला आणली होती (फेब्रुवरी 2010) त्या वेळेस गाडीचे रनिंग 10,144 Km इतके झालेले होते. गैरअर्जदाराकडून विकत घेतलेल्या गाड्यांकरिता गैरअर्जदार 6 महिन्यापर्यन्त किंवा 3000 Km करिता Free Inspection अशी सुविधा देतात. तक्रारदारासोबत प्रस्तुत गैरअर्जदाराचा कोणताही करार झाला नसल्यामुळे त्यांना Free Servicing न देता, गैरअर्जदारांनी दिलेल्या सेवेचा मोबदला घेतलेला आहे. तक्रारदाराने खोटी तक्रार केली आहे म्हणून ती खारीज करण्याची विनंती केली आहे.
आम्ही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराची तक्रार, सर्व गैरअर्जदारांचे लेखी जवाब आणि दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले.
तक्रारदाराने दि.30,93,512/- इतक्या किंमतीला मर्सिडिज बेंझ C 220 CDI ही गाडी गैरअर्जदार क्रं 2 यांच्या शोरूम मधून विकत घेतली. दि.6/4/10 रोजी गैरअर्जदार क्रं 2 यानी कारसोबत देणार असलेल्या सुविधाबाबत लेखी आश्वासन दिले. त्यातील दुसरा क्लॉज महत्वाचा आहे. त्यानुसार, ‘ A Service Coverage Of 40,000 Kms Which Will Include The Service Labour And The Cost Of Consumables As Required. Wear And Tear Items Such As Brake Pads, Brake Disc(S),Clutch Assembly , Tyres, Rubber Bushes, Mountings, Belts Etc. Will Not Be Included And Will Be At Cost.’ Also Accidental Repairs And Warranty Issues Are Not Included In This Service Coverage. If The Vehicle Does Not Report To Millennium Motors Workshop At Each Service Interval Of 10,000 Kms Then The Service Coverage Will Be Withdrawn And Further Service Will Be At Cost.’ गैरअर्जदार क्रं 2 याने कारची विक्री करताना जी आश्वासने दिली होती त्या सर्व बाबी लिखित स्वरुपात नमूद केलेल्या आहेत.
दि.24 जानेवारी 2010 रोजी तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं 1 कंपनीला पत्राने कळवले की, त्यांनी गैरअर्जदार क्रं 2 यांच्याकडे असलेले Authorized Dealership रद्द केली. गैरअर्जदार क्रं 2 यांनी केलेल्या दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेऊन तक्रारदाराने त्याच्या कडून सदर गाडी घेतली होती. त्या बाबतीत गैरअर्जदार क्रं 2 याने तक्रारदारासोबत केलेल्या कराराच्या पूर्तते विषयी तक्रारदार संभ्रमित होते. अशा परिस्थितीत त्यांनी गैरअर्जदार क्रं 1 यांच्याकडे खालील प्रमाणे मागणी केली. :-
त्यानंतर तक्रारदाराच्या पत्राला दि.29/1/10 रोजी गैरअर्जदार क्रं 1 यांच्याकडून उत्तर प्राप्त झाले. त्यानुसार गैरअर्जदार क्रं 1 यांनी तक्रारदारास कळवले की, गैरअर्जदार क्रं 2 हे त्यांचे अधिकृत विक्रेते नाहीत. तक्रारदाराची विनंती लक्षात घेता, तक्रारदाराची Warranty 6 महिन्यांनी वाढवून दिली आहे. त्यानुसार तक्रारदाराची Warranty दि.24/8/12 पर्यन्त वाढवली होती.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्याला गैरअर्जदार क्रं 2 याने आश्वासने दिली होती त्यामुळे त्याने त्याच्याकडून कारची खरेदी केली. पण तक्रारदाराने गाडीच्या सर्विसिंग गैरअर्जदार क्रं 3 यांच्याकडून करून घेतल्या आहेत. गैरअर्जदार क्रं 3 याने सदर करार केलेला नसल्यामुळे त्याने प्रत्येक Servicing चा मोबदला तक्रारदाराकडून घेतल्याचे दिसून येत आहे.
गैरअर्जदार क्रं 2 हा Free Servicing देण्यासाठी तयार होता. परंतु गैरअर्जदार क्रं 1 यांनी तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं 2 याच्याकडून Servicing घेतली तर Warranty संपुष्टात येईल असे कळवले. त्यामुळे तक्रारदारास गैरअर्जदार क्रं 3 याच्याकडून Servicing करून घ्यावी लागली. गैरअर्जदार क्रं 3 याने गाडीच्या servicing ची रक्कम दिली नाही तर गाडीचा ताबा देणार नाही असे म्हटल्यामुळे तक्रारदाराजवळ 4 free servicing coupons असताना देखील नाईलाजास्तव रक्कम देण्यावाचून दूसरा पर्याय नव्हता. गैरअर्जदार क्रं 3 याच्याकडून तक्रारदाराने गाडीला Servicing घेतलेल्या तारखा व दिलेली रक्कम खालीलप्रमाणे आहे.
(1) दि.14 मे 2009 ....रु.25,642/-
(2) दि.4/12/10 रोजी रु.23704.10/-
(3) दि.22/11/11 रोजी रु.18644/- व रु.9220/- /-= रु.27884/-
(4) दि.19/12/12 रोजी रु.15702/- आणि रु.31,896/- = रु.47,598/-
दि.19/12/12 रोजी म्हणजे चौथ्या servicing च्या वेळेस तक्रारदाराच्या गाडीचे Mileage 38150 Km झाल्याचे नमूद केलेले दिसून येत आहे.
वरील निरीक्षणावरून असे दिसून येते की, गैरअर्जदार क्रं 1 कंपनीने गैरअर्जदार क्रं 2 याची Authorized Dealership अचानक रद्द केल्यामुळे तक्रारदारास ज्या सुविधा व लाभ करारानुसार मिळायला हव्या होत्या, त्यापासून वंचित राहावे लागले. या गोष्टीची गैरअर्जदार क्रं 1 ला पुर्णपणे जाणीव असल्यामुळे त्यांनी तक्रारदारास 6 महिन्याची वारंटी वाढवून दिली. परंतु ज्या आश्वासनावर विसंबून तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं 2 याच्याकडून गाडी विकत घेतली होती त्याची पूर्तता होण्याच्या आत गैरअर्जदार क्रं 2 यांची Dealership रद्द झाली. गैरअर्जदार क्रं 2 याने ज्या वेळेस तक्रारदारासोबत सदर करार केला त्या वेळेस तो Authorized Dealer च्या Capacity मधून केलेला होता. त्यावेळेस गैरअर्जदार क्रं 1 हा ‘Principal’ होता आणि गैरअर्जदार क्रं 2 हा ’Agent’ होता. ज्या काही Assurances गैरअर्जदार क्रं 2 याने तक्रारदारास दिले असतील त्या गैरअर्जदार क्रं 1 कंपनीच्या Prior Permission शिवाय दिलेले नाहीत. Agent ने करारामार्फत दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेकरिता Principal हा Equally जवाबदार असतो. गैरअर्जदार क्रं 1 यांनी दाखल केलेल्या Dealer Agreement चे अवलोकन केल्यावर असे दिसून येते की, Servicing आणि Warranty च्या संबधित कोणतीही Facility ही Dealer च्या Capacity मध्ये असणारी व्यक्ति कंपनीची ‘Prior Consent’ घेतल्याशिवाय ग्राहकाला देत नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्रं 1 ने ते सर्व Assurances पूर्ण करणे ही त्याची Vicarious Liability राहील. गैरअर्जदार क्रं 1 याने गैरअर्जदार क्रं 2 याची Dealership रद्द केली आणि त्याने दिलेली आश्वासने गुंडाळून टाकली. गैरअर्जदार क्रं 2 हा कबुल केल्याप्रमाणे service देण्यासाठी तयार होता, परंतु गैरअर्जदार क्रं 1 याने गैरअर्जदार क्रं 2 याच्याकडून servicing करून घेतली तर गाडीची warranty समाप्त होईल, अशी अडचण निर्माण करून तक्रारदाराची अवस्था त्रिशंकु सारखी करुन ठेवली. एखादी वस्तु विकत घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाला अनेक प्रलोभने दाखवून नंतर ती पूर्ण न करणे, ही अनुचित व्यापारी प्रथा आहे. अशा रीतीने गैर अर्जदार क्रं 1 याने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. कंपनी स्वतःच्या मर्जीने केंव्हाही कोणाचीही Dealership रद्द करू शकते. पण तरीही कंपनी ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करून त्यांच्या हक्कांवर गदा आणू शकत नाही. कंपनीने डीलरशिप बदलण्याचा निर्णय सदर करार झाल्यानंतर घेतला आहे. त्याची झळ तक्रारदाराने सहन करण्याचे कोणतेही कारण नाही. गैरअर्जदार क्रं 1 कंपनीला स्वतः केलेली चूक पुर्णपणे ज्ञात असल्यामुळे 6 महिन्याची Warranty वाढवून तक्रारदाराचे दुबळे सांत्वन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावरून गैरअर्जदार क्रं 1 याची फसवणुकीची वृती लक्षात येते. त्यांच्या जुन्या डीलरने ज्या ग्राहकांसोबत व्यवहार केला असेल आणि त्यासाठी जर काही Assurances दिले असतील तर ते पूर्ण करणे कंपनीची जवाबदारी आहे. त्यामुळे डीलरने तक्रारदारास कबुल केलेल्या 4 Free Servicing करून देणे कंपनीची जवाबदारी आहे. कंपनीने नंतर ज्या डीलर कडे Dealership दिली त्याला पूर्वीच्या ग्राहकांना पूर्वीच्या डीलरने कंपनीची ‘ Prior Consent’ घेऊन दिलेले Assurances पूर्ण करण्याचे निर्देश देणे गरजेचे होते. तक्रारदाराने ज्या 4 Free Service ची रक्कम गैरअर्जदार क्रं 3 ला दिली आहे, ती रु.1,24,828. 10/- गैरअर्जदार क्रं 1 यांनी तक्रारदारास परत देणे आवश्यक आहे, यावर मंचाचे एकमत आहे.
गैरअर्जदार क्रं 1 यांनी सदर प्रकरणात Citations दाखल केले आहेत. परंतु सदर प्रकरणातील वस्तुस्थिती त्यातील वस्तुस्थितीपेक्षा वेगळी असल्यामुळे आम्ही ते विचारार्थ घेतले नाही.
गैरअर्जदार क्रं 2 व गैरअर्जदार क्रं 3 याचा सेवेतील त्रुटीशी थेट संबध नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणतेही आदेश पारित करत नाही.
वरील कारणामुळे हा मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
(श्रीमती संध्या बारलिंगे) (श्री.किरण.आर.ठोले) (श्री.के.एन.तुंगार)
सदस्या सदस्य अध्यक्ष
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.