(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 18 ऑक्टोंबर 2016)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रार थोडक्यात स्वरुप अशाप्रकारे आहे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडून LCD T.V. चा संच दिनांक 9.6.2009 रोजी रुपये 21,000/- मध्ये विडीओकॉन 32 इंच ‘प्लाझ्मा मॉडेल’ LCD T.V. संच रोख रकमेत विकत घेतला. त्याबद्दलची पावती विरुध्दपक्ष क्र.1 यांनी दिलेली असून त्याचा पावती क्रमांक 1178 आहे. तसेच, टी.व्ही. संचाचा सिरीयल नं. 7612080-10130200454 असा आहे. विरुध्दपक्ष क्र.2 हे विडीओकॉन कंपनीचे कस्टमर केअर कार्यालय असून, विरुध्दपक्ष क्र.3 ही उत्पादक कंपनी आहे. तक्रारकर्त्याने टी.व्ही. चा संच खरेदी करतेवेळी त्याला एक वर्ष वॉरंटीचा कार्ड देण्यात आला.
2. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, दिनांक 20.8.2011 रोजी तक्रारकर्त्याच्या टी.व्ही. चा संचाचा रिमोट कार्य करीत नसल्यामुळे त्याने विरुध्दपक्ष क्र.2 यांचकडे दुरुस्तीकरीता टाकले. तक्रारकर्त्याला त्याचदिवशी रिमोट दुरुस्त करुन देण्यात आले व दुरुस्तीचा खर्च म्हणून तक्रारकर्त्याने रुपये 150/- आकारुन त्याची पावती देण्यात आली. त्यानंतर पुन्हा चार आठवळ्यानंतर तक्रारकर्त्याच्या टी.व्ही. संचाचा रिमोट पुनहा खराब झाला, तो व्यवस्थित कार्य करीत नसल्यामुळे विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडे गेले असता, त्यांनी तक्रारकर्त्याला नवीन रिमोट रुपये 600/- घेवून दिला. सदरचा रिमोट हा विभीन्न मॉडेलचा होता, परंतु तो रिमोट टी.व्ही. संचाला मदत करीत नव्हता. तब्बल दोन महिण्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर दिनांक 12.9.2011 रोजी तक्रार करुन ही बाब कळविली की, टी.व्ही. संचाचा रिमोट काम करीत नाही. त्या टोल फ्री तक्रारीचा क्रमांक AG1209110233 असा होता व तसेच, विरुध्दपक्ष क्र.3 यांनी दिनांक 19.10.2011 व 9.12.2011 रोजी तक्रारकर्त्याची तक्रार नोंदविली. तसेच तक्रारकर्त्याने सदर बाबत तक्रारीत ई-मेल व्दारे विरुध्दपक्ष क्र.3 यांना कित्येकवेळा कंपनीच्या वेबसाईटवर जावून कळविले. तब्बल चार महिण्यानंतर दिनांक 16.12.2011 रोजी विरुध्दपक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्त्याला डुब्लीकेट रिमोट रुपये 750/- घेवून तक्रारकर्त्याला पुरविला, तो रिमोट सुध्दा त्याचदिवशी काम करीत नव्हता. त्यामुळे पुन्हा कंपनीच्या टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदवून विरुध्दपक्ष क्र.3 यांना कळविले. सदरची तक्रार दिनांक 23.6.2012 रोजी दिला. परंतु, तारखेपासून आजपर्यंत तक्रारकर्त्याला कोणताही प्रतिसाद आला नाही. तसेच, बराच अवधी लोटल्यानंतर विरुध्दपक्षाने कळविले की, तक्रारकर्त्याने जे विडीओकॉन कंपनीचा LCD T.V. संच घेतलेला होता तो मॉडेल दोन वर्षापूर्वीच मॉडेल दोषपूर्ण असल्या कारणास्तव उत्पादन बंद केलेले आहे, तसेच त्या दोषपूर्ण मॉडेल टी.व्ही. संचाचे कंपनीने किंवा उत्पादकाने आपल्या सोयीने साठा ठेवून ताबडतोब विक्रीस काढले. सदरची ही कृती विरुध्दपक्ष यांची अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती आहे असे स्पष्ट होते. तसेच, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.3 याच्या टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदवून तक्रारकर्त्याच्या टी.व्ही. संचाचे रिमोट योग्य न दिल्यामुळे ते तक्रारकर्त्याच्या टी.व्ही. संचाला जुळत ( Support ) करीत नव्हते, अशा पध्दतीचे रिमोट तक्रारकर्त्याला पुरविले ही विरुध्दपक्षाची सवेते ञुटी दर्शविते. तसेच, सदरच्या विरुध्दपक्षाच्या कृतीमुळे तक्रारकर्त्याला अतिशय शारिरीक, मानसिक व आर्थिक ञास सहन करावा लागला. त्याकरीता सरते शेवटी तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालील प्रमाणे मागण्या केलेल्या आहेत.
1) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात यावे की, तक्रारकर्त्याचा टी.व्ही. संच बदलवून सध्याचे अस्तित्वात असणारे मॉडेल पुरवावा.
किंवा
योग्य रिमोट पुरावावा, ज्याने तक्रारकर्त्याचा टी.व्ही.संच सुरु राहून रिमोट जुळता असावा.
2) तसेच, विरुध्दपक्ष कंपनीला आदेशीत करण्यात यावे की, तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरुन लगेच तक्रारकर्त्याला सेवा पुरवावी.
3) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करावे की, त्यांनी दिनांक 20.8.2011 ते 18.6.2012 पर्यंत तक्रारकर्त्याच्या वारंवार तक्रारीनंतर सुध्दा त्याचे योग्य समाधान केले नाही करीता नुकसान भरपाई म्हणून रुपये 50,000/- व तक्रार खर्च म्हणून रुपये 10,000/- देण्याचे आदेश व्हावे.
3. तक्रारकर्तीचे तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली. त्यावर विरुध्दपक्ष क्र.1 यांना मंचाची नोटीस मिळून संध्दा मंचात येवून उत्तर न दाखल केल्यामुळे दिनांक 30.8.2012 रोजी विरुध्दपक्ष क्र.1 चे विरुध्द एकतर्फा आदेश निशाणी क्र.1 वर पारीत झाला.
4. विरुध्दपक्ष क्रमांक 2 व 3 यांनी निशाणी क्र.10 वर आपले लेखीउत्तर सादर करुन नमूद केले की, हे म्हणणे बरोबर आहे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्षाकडून एलसीडी. टी.व्ही. चा संच दिनांक 9.6.2009 रोजी घेतलेला होता. तसेच, कंपनीच्या नियमाप्रमाणे टी.व्ही. संचाची वॉरंटी ही एक वर्षाची म्हणजे दिनांक 9.6.2009 ते 10.6.2010 पर्यंत होती. तक्रारकर्त्याच्या टी.व्ही. संचाचा रिमोट हे तब्बल एक वर्षानंतर म्हणजे दिनांक 12.6.2010 रोजी खराब झालेला होता. त्यामुळे, तक्रारकर्त्याचा वॉरंटीचा अवधी निघून गेला होता, त्यामुळे तक्रारकर्ता हा कंपनीच्या अटी व शर्तीमध्ये बाध्य आहे. तसेच, तक्रारकर्त्याने लावलेले आरोप प्रत्यारोप हे खोटे आहे. तक्रारकर्त्याला वेळोवेळी सदर बाबत सेवा पुरविलेली आहे. तक्रारकर्ता हा मुद्दाम विडीओकॉन कंपनीचे अस्तित्व खराब करण्याच्या उद्देशाने व ञास देण्याकरीता सदरची तक्रार दाखल केलेली आहे. तसेच, तक्रारकर्ता यांनी टी.व्ही. संचा बरोबर दिलेला रिमोट हा वॉरंटीपिरेडच्या तत्वात बसत नाही, तमुळे तक्रारकर्त्याच्या सेवेत ञुटी झाली असे सिध्द होत नाही. तक्रारकर्ता स्वतः टी.व्ही. संचाच्या रिमोटचा वापर व्यवस्थित करीत नसल्यामुळे त्यामध्ये बिघाड झाला. तसेच, विरुध्दपक्ष क्रमांक 2 व 3 यांनी सदरचे रिमोटचा दोषपूर्ण करण्याकरीता अतोनात प्रयत्न केले. त्यामुळे, तक्रारकर्ता बरोबर अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला हे सिध्द होत नाही किंवा सेवेत ञुटी दिले असे दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने लावलेले आरोप दोषारोप मान्य नाही. करीता तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
5. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारीबरोबर 1 ते 7 दस्ताऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने कॅश मेमो, वॉरंटी कार्ड, जॉबशीट व तक्रारकर्त्याने उत्पादक कंपनीला पाठविलेला ई-मेल दिनांक 30.9.2011 ते 29.9.2012 पर्यंत पाठविलेल्या ई-मेलची प्रत दाखल केलेली आहे. तसेच, निशाणी क्र.10 वर तक्रारकर्त्याने उत्तराला प्रतीउत्तर सादर केलेले आहे.
6. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी आपला लेखी युक्तीवाद सादर करुन मंचासमक्ष दोन्ही पक्षाचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच दोन्ही पक्षाचे अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले. त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष पक्षांचा ग्राहक होतो काय ? : होय
2) विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारकर्त्या प्रती अनुचित व्यापारी : होय
प्रथेचा अवलंब किंवा सेवेत ञुटी झाल्याबाबत दिसून येते
काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
7. तक्रारकर्त्याची सदरची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 डिलर यांचेकडून विडीओकॉन 32 इंची एल.सी.डी. प्लाझमा मॉडेल टी.व्ही.चा संच दिनांक 9.6.2009 रोजी रोख रक्कम रुपये 21,000/- मध्ये विकत घेतला. परंतु, दिनांक 20.8.2011 रोजी टी.व्ही. संचाचा रिमोट काम करणे बंद झाले, त्याकरीता तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.2 यांचेकडे रुपये 150/- खर्च करुन त्याचदिवशी रिमोट दुरुस्त करुन घेतला, परंतु त्याचदिवशी रिमोट काम करीत नव्हते. करीता अवघ्या 4 दिवसानंतर तक्रारकर्त्याने रुपये 600/- खर्च करुन विरुध्दपक्ष क्र.2 कडून दुस-या मॉडेलचा रिमोट विरुध्दपक्ष क्र.2 च्या सल्यानुसार विकत घेतला. परंतु, तो रिमोट सुध्दा टी.व्ही. संचाला जुळत नव्हता. सरते शेवटी तक्रारकर्त्याने कंपनीच्या टोलफ्री नंबरवर तक्रार नोंदवून रिमोट संचाची मागणी केली. अवघ्या 4 महिण्यानंतर रुपये 750/- मध्ये तक्रारकर्त्याला टी.व्ही. संचाचा रिमोट पुरविण्यात आला. परंतु नंतर लगेच काही दिवसांनी दिनांक 16.12.2011 रोजी तो रिमोट पुन्हा खराब झाला. तक्रारकर्त्याने पुन्हा टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदविली. त्याचबरोबर तक्रारकर्त्याने बरेचवेळा ई-मेल व्दासरे सदरबाबत सुचना दिली व तक्रारकर्त्याला डिलरव्दार सांगितले की, दोन वर्षापूर्वीच सदरच्या टी.व्ही. संचाचे मॉडेल बंद झाले आहे, त्यामुळे उत्पादक कंपनीकडे असणारा साठा वेगवेगळ्या त-हेने ग्राहकाला विकण्यात आला. विरुध्दपक्ष क्र.2 व 3 यांनी आपल्या उत्तरात असे नमूद केले की, तक्रारकर्त्याला वेळोवेळी टी.व्ही. संचाचे रिमोट दुरुस्त करुन किंवा दुस-या मॉडेलचे रिमोट पुरविण्यात आले. तसेच, तक्रारकर्ता हा उत्पादक कंपनीची प्रतिमा समाजात कमी करण्यासाठी व विरुध्दपक्षास ञास देण्याकरीता सदरची खोटी तक्रार दाखल करीत आहे. तसेच, तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष कपंनीने वेळोवेळी सेवा दिलेली आहे.
8. उपरोक्त तक्रारीला अनुसरुन तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्ताऐजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे. तसेच, टी.व्ही. संच विकत घेतल्यानंतर एक वर्षा पर्यंत वॉरंटी पिरेड होता. परंतु, तक्रारकर्त्याचा रिमोट हा एक वर्षानंतर खराब झाला होता त्यामुळे असे म्हणता येत नाही की, कोणत्याही प्रकारचा वस्तुत बिघाड झाला असता कंपनीने फक्त वॉरंटी पिरेड संपली आहे म्हणून त्याची सेवा देण्याची जबाबदारी संपते. तक्रारकर्ता दोनवेळा टी.व्ही. संचाचे रिमोट स्वतःच्या पैशाने विकत घेतला, परंतु विशेष बाब अशी की, जो टी.व्ही. संच तक्रारकर्त्याने विकत घेतला त्याचे उत्पादन कंपनीने निकृष्ठ दर्जाचे मॉडेल असल्या कारणास्तव बंद केले. परंतु, उत्पादन झालेला माल वेगवेगळ्या त-हेने बाजारपेठेत डम करुन आलेल्या ग्राहकाला विकला. सदरची प्रक्रिया ही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी आहे, हे स्पष्ट होते. तसेच, सदरचे मॉडेल बंद झाल्यामुळे तक्रारकर्त्याला योग्य तो रिमोट पुरवू शकले नाही ही सेवेत ञुटी असल्याचे सिध्द होते. तक्रारकर्त्याने उत्तराला प्रतीउत्तर दाखल करुन ही बाब नमूद केली की, तक्रारकर्ताकडे दुसरा टी.व्ही. संच नसल्या कारणास्तव दिनांक 10.2.2014 रोजी नवीन टी.व्ही. संच विकत घेतला व विरुध्दपक्षाकडून विकत घेतलेला टी.व्ही. संच योग्य रिमोट नसल्यामुळे तसाच घरी पडून राहीला. या सर्व कारणास्तव तक्रारकर्त्याला अतिशय शारिरीक व मानसिक ञास झाला, ही बाब सिध्द होते. करीता तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांचेकडून नुकसान भरपाई घेण्यास पाञ आहे. सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई म्हणून रुपये 30,000/- द्यावे.
(3) तसेच, विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांनी मानसिक, शारिरीक ञासापोटी व तक्रार खर्च म्हणून रुपये 5,000/- तक्रारकर्त्याला द्यावे.
(4) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 18/10/2016