Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या) (पारीत दिनांक 12/05/2022) - तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
- तक्रारकर्ता क्र.1 ते 11 हे सि.टी.पी.एस. चंद्रपूर येथे नौकरीवर असून वर नमूद पत्त्यावर वास्तव्यास आहेत. विरुध्द पक्ष यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तक्रार, तक्रारीचे कारण व त्यातील मागणी ही एकाच विरुध्द पक्षासंबंधीत असल्याकारणाने आयोगाची परवानगी घेऊन दि.27/11/2018 चे आदेशान्वये, सर्व तक्रारकर्त्यांनी एकत्रीत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्ते क्र.1 ते 11 यांनी त्यांचे परिवारातील सदस्यांसह एकुण 44 व्यक्तींसाठी विरुध्द पक्ष यांचे टुर्स मार्फत दिनांक 1/6/2018 ते 16/6/2018 या कालावधीत चंद्रपूर ते दिल्ली, जम्मु काश्मीर व संलग्न भागातील प्रेक्षणीय स्थळांचे टुर पॅकेज प्रतिव्यक्ती रु.21000/- याप्रमाणे एकुण रु. 8,82,000/- रकमेस बुक केले व त्याकरीता दिनांक 1/6/2018 रोजी चंद्रपूर येथून प्रवास सुरु करण्याचे तसेच निर्धारीत प्रवासातील प्रवास, निवास, चहा नाश्ता, भोजन यांची सर्व व्यवस्था वि.प. करतील असे ठरले. तक्रारकर्त्यांनी वि.प. यांना त्यापोटी दि.29/12/2017 रोजी नगदी रु.1 लाख तसेच दि.3/1/2018 रोजी रु.2,85,000/- दिले. वि.प. यांनी दिल्ली येथील हॉटेल बुकींग करीता मागणी केल्यानुसार तक्रारकर्त्यांनी रु.40,000/- चंद्रपूर येथील कॅनरा बॅंकेतून वि.प. यांना ट्रांस्फर केले आणी दिनांक 3/5/2018 रोजी वि.प. चंद्रपूर येथे आले असता रु.1,85,000/- तक्रारकर्त्यांकडून घेवून गेले. वि.प. यांनी याबाबत तक्रारकर्ता क्र.1 चे नांवे पावत्या दिल्या आहेत. निर्धारीत शेडयुलप्रमाणे दिनांक 1/6/2018 रोजी तक्रारकर्ते व त्यांचे परिवार सदस्यांनी चंद्रपूर येथून प्रवास सुरु करण्यासाठी संपूर्ण तयारी केली परंतु विरुध्द पक्ष यांचेकडून त्याबाबत काहिही सुचना प्राप्त न झाल्यामुळे तक्रारकर्त्यांनी वि.प.शी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु विरुध्द पक्ष यांचा फोन बंद होता.
- तीन दिवस विरुध्द पक्ष यांचेकडून प्रवासाबाबत काहिही माहिती मिळाली नाही मात्र दिनांक 3/6/2018 रोजी वि.प. यांनी फोन करुन त्यांची तब्बेत ठिक नसल्यामुळे ते येऊ शकले नाहीत व आता पुर्वीच्या टुर कालावधीत बदल करुन तो दिनांक 1/6/2018 ते 16/6/2018 या कालावधीऐवजी दिनांक 5/6/2018 ते 21/6/2018 या कालावधीत करण्याचे सांगितले. यावर तक्रारकर्त्यांनी टुरचे बुकींग कॅंसल करुन रक्कम परत करण्याची मागणी केली असता, वि.प. यांनी परत चुक होणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे तक्रारकर्ते बदललेल्या शेडयुलनुसार टुरसाठी तयार झाले. त्यानुसार चंद्रपूर येथून सर्वांचा प्रवास दिनांक 5/6/2018 रोजी रेल्वेने सुरु झाला तेंव्हा वि.प.देखील सोबत होते तसेच त्याच टुरमध्ये वर्धा येथील आणखी 11 व्यक्ती नागपूरला सहभागी झाल्या. मात्र पुर्वीच्या शेडयुलनुसार आधी दिल्ली येथे जाण्याचे ठरले असतांना वि.प. यांनी सर्वांना आग्रा येथे उतरायला सांगून तेथे गोयल ट्रॅव्हल्सच्या नॉन एसी बसने हॉटेलमध्ये नेले. शेडयुल बदलाबाबत विचारणा केली असता आधीच्या शेडयुलमध्ये ठरलेल्या संपूर्ण साईटस् दाखवण्याची माझी जबाबदारी आहे असे सांगून वि.प.ने वेळ मारुन नेली. तेथील पर्यटनस्थळ बघून सर्वजण हॉटेलवर जेवणाकरीता गेले असता वाहनाच्या डिझेल तसेच हॉटेलचे जेवणाचे बिल चुकवण्याकरीता पैसे नाहीत असे सांगून वि.प.ने तक्रारकर्त्यांकडून रक्कम रु.1 लाख घेतली व त्याची पावती दिली. त्यानंतर दिनांक 8/6/2018 रोजी कुरुक्षेत्र परिसर पाहुन आल्यावर रात्री हॉटेलमध्ये जेवणानंतर वि.प. यांनी वाद घातला व पुन्हा रु.1 लाख न दिल्यांस पुढील प्रवास होणार नाही असे सांगितले. त्यामुळे तक्रारकर्त्याने परत रु.1 लाख वि.प.ला दिले मात्र वि.प. ने त्याची पावती दिली नाही. यानंतर दि.9/6/2018 रोजी कुल्लूमनालीतील रात्रीच्या मुक्कामानंतर दिनांक 10/6/18 रोजी वि.प.नी वाद करुन तेथील पर्यटनस्थळे दाखवण्यांस नकार दिला व त्यामुळे तक्रारकर्त्यांना स्वतःच्या खर्चाने पर्यटनस्थळे बघावी लागली. यानंतर परत दिनांक 11/6/2018 रोजी वि.प.ने एटीएम मधून रक्कम निघत नसल्याचे कारण सांगून तक्रारकर्त्यांकडून रु.50,000/- घेतले मात्र त्याची पावती दिली नाही व तक्रारकर्त्याने पेमेंट केलेले हॉटेलचे बिलदेखील स्वतःजवळ ठेवून घेतले आणी कटरा येथे पैसे परत करतो असे आश्वासन दिले. मात्र कटरा येथे वि.प.ने रक्कम परत केली नाही. उलट तक्रारकर्त्यांची इंडिया प्राईड हॉटेलवर रहाण्याची व्यवस्था करुन स्वतः वि.प. दुस-या हॉटेलवर थांबले. तक्रारकर्ते दिनांक 12/6/2018 रोजी वैष्णोदेवी दर्शन करुन दुपारी 12 वाजता परतले असता वि.प.ने उद्या म्हणजे 13/6/2018 रोजी श्रीनगरसाठी निघायचे आहे असे सांगितले त्यामुळे तक्रारकर्त्यांनी सदर प्रवासाची तयारी केली. मात्र ऐन प्रवासाचे वेळी वि.प. न दिसल्याने त्यांचे कुक व ड्रायव्हरकडे चौकशी केली असता वि.प. पैसे काढण्यासाठी एटीएमवर गेल्याचे सांगितले. मात्र ते परत न आल्यामुळे तक्रारकर्त्यांनी त्यांचेशी वारंवार फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मा्त्र फोन लागला नाही. वि.प. परत न आल्यामुळे संपूर्ण दिवसभर वाट बघून तक्रारकर्त्यांनी दिनांक 14/6/2018 रोजी कटरा पोलीस स्टेशन बसस्टॅंड क्र.1 व 2वर तसेच वैष्णोदेवी पानबाग पोलीस स्टेशन येथे वि.प. बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. वि.प. न सांगता बेपत्ता झाल्यामुळे तक्रारकर्त्यांना मानसीक त्रास झाला व आर्थीक नुकसान सहन करावे लागले. वि.प.ची किती दिवस वाट बघणार असा विचार करुन तक्रारकर्त्यांनी पोलीस स्टेशन कटरा यांना तोंडी सुचना देवून पुढील प्रवास स्वखर्चाने करण्याचे ठरविले. मात्र वि.प. यांना संपूर्ण रक्कम देवूनही ते बेपत्ता झाल्यामुळे काश्मीरला भेट देण्याच्या शेडयुलमध्ये तक्रारकर्त्यांना बदल करावा लागला व त्यांनी स्वखर्चाने अमृतसर, वाघा बॉर्डर, दिल्ली येथील स्थळ दर्शन केले. यादरदम्यान वि.प.शी सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याने संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांचे मित्राशी फोनवरुन संपर्क केला असता वि.प. दि.13/6/2018 रोजी वर्धेला परत आले आणी 17/6/2018 रोजी दुस-या बद्रीनाथ केदारनाथ् टुरवर गेले अशी माहिती मिळाली. त्यामुळे तक्रारकर्ते दिल्लीहून रेल्वेने दिनांक 21/6/2018 रोजी चंद्रपूर येथे परत आले. टुरची संपूर्ण रक्कम रु.8,60,000/- दिल्यानंतरही वि.प. अर्ध्या टुरनंतर बेपत्ता झाल्यामुळे तक्रारकर्त्यांना प्रवास शेडयुल बदलावे लागल तसेच स्वखर्चाने पुढील प्रवास करावा लागला. यात तक्रारकर्त्यांना मानसीक त्रास तसेच आर्थीक नुकसान सहन करावे लागले. परतल्यानंतर तक्रारकर्त्यांनी वि.प.ना फोनद्वारे पैसे परत मागितले असता वि.प.नी टाळाटाळीची उत्तरे दिली. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी वि.प.ला दिनांक 18/8/2018 तसेच 12/9/2018 रोजी पत्राद्वारे रकमेची मागणी केली, मात्र वि.प.ने दखल घेतली नाही. टुरबाबत हमी देवूनही वि.प.नी टुर पूर्ण न करता मध्येच बेपत्ता होवून तक्रारकर्त्यांप्रती अनुचीत व्यापार प्रथेचा अवलंब करुन सेवेत न्युनता केली आहे सबब प्रस्तूत दाखल तक्रारीत तसे जाहीर करुन तक्रारकर्त्यांनी वि.प.कडे भरलेल्या रकमेपैकी रु.6,25,000/- परत करण्याबाबत तसेच आर्थीक नुकसान रु.1 लाख, शारिरीक मानसीक त्रासाचे नुकसान भरपाईस्तव प्रत्येकी रु.1 लाख आणी तक्रारखर्चापोटी रु.10,000/- देण्याचे वि.प.ना आदेश व्हावेत अशी प्रार्थना तक्रारकर्त्यांनी केली आहे.
- विरुध्द पक्ष यांनी लेखी उत्तर दाखल केले व तक्रारकर्त्याचे तक्रारीतील सर्व कथन अमान्य करुन विशेष कथनात नमूद केले की, विरुध्द पक्ष हे वर्धा येथील निवासी असून तेथेच त्यांचा टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. ते पर्यटकांच्या मागणीनुसार त्यांचेकरीता टुर अरेंज करतात. टुरकरीता लागणारा नाश्ता, जेवण, चहापाणी, प्रवास व राहण्याची व्यवस्था करुन देण्याचे कामापोटी ते दररोज रु.1000/- मजूरी घेतात. तक्रारकर्ते हे दिनांक 29/12/2017 रोजी वर्धा येथे आले व त्यांनी त्यांचेसह त्यांचे परिवारातील एकुण 44 व्यक्तींसाठी विरुध्द पक्ष यांचे टुर्स मार्फत दिनांक 1/6/2018 ते 13/6/2018 या कालावधीत चंद्रपूर ते दिल्ली, अमृतसर, गोल्डन टेंपल, वाघा बॉर्डर, कुल्लू, रोहतांगपास, मनाली, कटरा वैष्णोदेवी, श्रीनगर व इतर प्रेक्षणीय स्थळ घेवून त्यानंतर दिल्ली मार्गे पुन्हा चंद्रपूर टुर पॅकेज प्रतिव्यक्ती नॉनएसी प्रवासाकरीता रु.22000/- याप्रमाणे एकुण रु.9,68,000/- रकमेस बुक केले. वि.प.ने आगाऊ रकमेपोटी रु.7 लाख ची मागणी केली, मात्र तक्रारकर्त्यांनी वर्धा येथे दोनदा येवून केवळ रु.6,10,000/- इतकीच आगाऊ रक्कम वि.प.ना दिली व उर्वरीत रु.3,58,000/- प्रवासादरम्यान देण्याचे आश्वासन दिले. प्रवासाकरीता दिनांक 1/6/2018 रोजी चंद्रपूर येथून प्रवास सुरु करण्याचे तसेच सर्व प्रेक्षणीय स्थळे करुन दिनांक 13/6/2018 रोजी चंद्रपूर येथे परतण्याचे ठरले तसेच निर्धारीत प्रवासातील प्रवास, निवास, चहा नाश्ता, भोजन यांची सर्व व्यवस्था वि.प. करतील असे ठरले.
- यानंतर तक्रारकर्त्यांनी पुन्हा दिनांक 10/5/2018 रोजी वि.प.कडे येऊन प्रवास हा थ्री टायर एसी ने करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर वि.प.ने याकरीता प्रतिव्यक्ती अतिरीक्त रु.2000/- याप्रमाणे रु.88,000/- द्यावे लागतील असे सांगितले. त्याला तक्रारकर्त्यांनी मान्यता देवून आधीची दिलेली रक्कम वजा जाता उर्वरीत रक्कम रु.4,46,000/- प्रवासादरम्यान देण्याचे मान्य केले व दिनांक 1/6/2018 ऐवजी दिनांक 5/6/2018 रोजी चंद्रपूर येथून टुर सुरु करुन सर्व प्रेक्षणीय स्थळे करुन दिनांक 20/6/2018 रोजी चंद्रपूर येथे परतण्याचे ठरले तसेच निर्धारीत प्रवासातील प्रवास, निवास, चहा नाश्ता, भोजन यांची सर्व व्यवस्था वि.प. करतील असे ठरले.
- निर्धारीत शेडयुलनूसार दिनांक 5/6/2018 रोजी तक्रारकर्त्यांसह 44 पर्यटकांचा चंद्रपूर येथून प्रवास सुरु झाला व त्याच टुरकरीता वर्धेहून बुकींग केलेले 11 व्यक्ती नागपूर येथे टुरमध्ये सामील झाले. तक्रारकर्त्यांसह सर्व पर्यटकांनी दिल्ली येथून पर्यटनाची सुरुवात न करता आग्रादर्शनाने करावी अशी विनंती केल्यामुळे वि.प. यांनी दिनांक 6/6/2018 रोजी आग्रा स्थळदर्शनाने टुर सुरु केला. दिनांक 5/6/2018 ते 20/6/2018 या संपूर्ण टुर कालावधीत तक्रारकर्ते व टुरमधील सहप्रवाशांचे दोन वेळचे जेवण, नाश्ता, चहापाणी, प्रवास तसेच रहाण्याची सुविधा वि.प.ने चोखपणे उपलब्ध करुन दिली व त्यांना कोणताही त्रास होवू दिला नाही. उलट टुरचे शेवटच्या दिवशी 20/6/2018 रोजी हॉटेलचे बिल आदी खर्चाकरीता उर्वरीत रक्कम रु.4,46,000/- ची मागणी केली असता तक्रारकर्त्यांनी केवळ रु.1 लाख वि.प.ला दिली व उर्वरीत रक्कम रु.3,46,000/- चंद्रपूरला परतल्यावर देण्याचे मान्य केले. त्यामुळे वि.प.नी टुरमधील तक्रारकर्त्यांसह सर्व पर्यटकांना दिनांक 20/6/2018 रोजी दिल्ली-चंद्रपूर प्रवासाकरीता रेल्वेत बसवून दिले. चद्रपूर येथे परतल्यानंतर वि.प.ने दिनांक 22/6/2018 ते 10/8/2018 या कालावधीत उर्वरीत रक्कम रु.3,46,000/- देण्याबाबत तक्रारकर्त्यांना वारंवार विनंती केली तसेच प्रतिसाद न मिळाल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्याचीदेखील सुचीत केले. तेंव्हा तीन महिन्याचे आंत उर्वरीत रक्कम देण्याचे तक्रारकर्त्यांनी आश्वासन दिले. मात्र रक्कम परत न करता तक्रारकर्त्यांनी आयोगासमोर प्रस्तूत खोटी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्यांनी उर्वरीत रक्कम परत करण्यांस टाळाटाळ केल्यामुळे वि.प.नी देखील सदर रकमेच्या वसुलीकरीता वर्धा येथील दिवाणी न्यायालयात दावा क्र.79/19 दाखल केलेला आहे. तक्रारकर्त्यांनी खोटी व निराधार तक्रार दाखल केली असून ती खारीज होण्यांस पात्र आहे.
- तक्रारकर्त्यांची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तिवाद तसेच विरुध्द पक्षाचे लेखी कथन,शपथपञ, लेखी युक्तिवाद आणि तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे...
1) प्रस्तूत तक्रार चालविण्याचे या आयोगास अधिकारक्षेत्र आहे काय ॽ होय - अनुचीत व्यापार
प्रथेचा अवलंब करुन न्युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ होय 3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे मुददा क्र.1 बाबत :- तक्रारकर्ते क्र.1 ते 11 यांनी त्यांचे परिवारातील सदस्यांसह एकुण 44 व्यक्तींसाठी विरुध्द पक्ष यांचे टुर्स मार्फत चंद्रपूर ते दिल्ली, जम्मु काश्मीर व संलग्न भागातील प्रेक्षणीय स्थळांचे टुर पॅकेज प्रतिव्यक्ती रु.21000/- याप्रमाणे एकुण रु. 8,82,000/- रकमेस बुक केले. तक्रारकर्त्यांनी वि.प.ना काही रक्कम रोख दिली तसेच दिनांक 31/1/2018 रोजी चंद्रपूर येथील कॅनरा बँकेतून नेटद्वारे रु.40,000/- वि.प.ना ट्रांस्फर केले व वि.प. यांनी त्याबाबत तक्रारकर्त्यांना पावत्या दिल्या असून त्या नि.क्र.4 सोबत दस्त क्र.अ-2 ते अ-6 वर दाखल आहेत. शिवाय तक्रारकर्त्यांचा सदर टुरचा प्रवास हा चंद्रपूर येथून सुरु झालेला आहे. यावरुन तक्रारकर्ते हे वि.प.चे ग्राहक आहेत तसेच तक्रारीचे कारण अंशत: चंद्रपूर येथे घडल्यामुळे कायदेशीर बाबींवर तक्रार चालविण्यायोग्य असून या आयोगांस ती चालविण्याचा अधिकार आहे या निष्कर्षाप्रत आयोग आले आहे. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे. मुददा क्र.2 बाबत :- प्रस्तूत तक्रारीत वि.प. यांनी निर्धारीत टुरच्या शेडयुलच्या तारखा बदलल्या तसेच ते टुर अर्ध्यात सोडून निघून गेले हा या प्रकरणी विवादीत मुददा आहे. प्र्करणात दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्यांचे वतीने तक्रारकर्ता क्र.1 श्री.नत्थु वाघ यांनी वि.प.शी व्यवहार केल्याचे निदर्शनांस येते व त्यांचेच नांवे वि.प. यांनी पावत्या दिलेल्या आहेत. दाखल जाहिरातपत्रक नुसार तक्रारकर्त्यांचा टुर हा दिनांक 1/6/2018 ते 16/6/2018 या कालावधीत निर्धारीत होता व दिनांक 1/6/2018 रोजी चंद्रपूर रेल्वेस्टेशनवरुन प्रवास सुरु करण्याचे ठरले होते. या कालावधीत चंद्रपूर ते दिल्ली, अमृतसर, गोल्डन टेंपल, वाघा बॉर्डर, कुल्लू, रोहतांगपास, मनाली, कटरा वैष्णोदेवी, श्रीनगर व इतर प्रेक्ष् णीय स्थळ घेवून त्यानंतर दिल्ली मार्गे पुन्हा चंद्रपूरला परतण्याचे ठरले होते. तसेच निर्धारीत प्रवासातील प्रवास, निवास, चहा नाश्ता, भोजन यांची सर्व व्यवस्था वि.प. करतील असेही ठरले होते. याबाबतचे वि.प. यांचे टुरचे पँप्लेट तसेच पावत्या देखील प्रकरणात दाखल आहे. सदर पॅंप्लेटमध्ये जरी प्रतिव्यक्ती रु.22,000/- असा दर नमूद केलेला असला तरीदेखील तक्रारकर्त्यांनी दिनांक 3/1/2018 रोजी सदर टुरपोटी आगाऊ रक्कम रु.2,85,000/- भरले असता त्याबाबत दिलेल्या पावतीत वि.प.ने प्रतिव्यक्ती रु.21,000/- आकारण्यात येतील असे नमूद केलेले असून सदर पावती प्रकरणात दाखल आहे. तक्रारकर्त्यांचा टुर हा दिनांक 1/6/2018 ते 16/6/2018 या कालावधीत प्रतिव्यक्ती रु.21,000/- या दराने निर्धारीत होता ही बाब स्पष्ट होते. प्रत्यक्ष प्रवासाचे दिवशी प्रवास सुरु करण्यासाठी तक्रारकर्ते व त्यांच्या परिवारजनांनी संपूर्ण तयारीदेखील केली, परंतु प्रत्यक्ष प्रवासाचे दिवशी वि.प. यांनी तक्रारकर्त्यांशी संपर्कच केला नाही व तब्बल तीन दिवसांनंतर 3/6/2018 रोजी संपर्क साधून तब्बेत बरी नसल्यामुळे येऊ शकलो नाही तरी आपण दिनांक 5/6/2018 पासून टुर करुन तो 21/6/2018 रोजी पूर्ण करु असे सांगितले. या बदलाला नकार देवून तक्रारकर्त्यांनी रक्कम परत मागीतली असता चुकीची पुनरावृत्ती न करण्याचे आश्वासन देवून वि.प.नी तक्रारकर्त्यांना टुरकरीता राजी केले. - त्यानुसार चंद्रपूर येथून सर्वांचा प्रवास दिनांक 5/6/2018 रोजी रेल्वेने सुरु झाला तेंव्हा वि.प.देखील सोबत होते तसेच त्याच टुरमध्ये बुकींग केलेल्या वर्धा येथील आणखी 11 व्यक्ती सहभागी झाल्या. मात्र निर्धारीत शेडयुलनुसार आधी दिल्ली येथे जाण्याचे ठरले असतांना वि.प. यांनी सर्वांना आग्रा येथे उतरायला सांगीतले. तक्रारकर्त्यांनी शेडयुल बदलाबाबत आक्षेप घेवून विचारणा केली असता आधीच्या शेडयुलमध्ये ठरलेल्या संपूर्ण साईटस् दाखवण्याची माझी जबाबदारी आहे असे सांगून वि.प.ने वेळ मारुन नेली. आणी तेथील पर्यटनस्थळ बघून सर्वजण हॉटेलवर जेवणाकरीता गेले असता वाहनाच्या डिझेल तसेच हॉटेलचे जेवणाचे बिल चुकवण्याकरीता पैसे नाहीत असे सांगून वि.प.ने तक्रारकर्त्यांकडून रक्कम रु.1 लाख घेतली. त्यानंतर दिनांक 8/6/2018 रोजी कुरुक्षेत्र परिसर पाहुन झाल्यावर रात्री हॉटेलमध्ये जेवणानंतर वि.प. यांनी वाद घातला व पुन्हा रु.1 लाख न दिल्यांस पुढील प्रवास होणार नाही असे सांगितले. त्यामुळे तक्रारकर्त्याने परत रु.1 लाख वि.प.ला नगदी दिले मात्र वि.प. ने त्याची पावती दिली नाही. यानंतर दि.9/6/2018 रोजी कुल्लूमनालीतील रात्रीच्या मुक्कामानंतर दिनांक 10/6/18 रोजी वि.प.नी वाद करुन तेथील पर्यटनस्थळे दाखवण्यांस नकार दिला व त्यामुळे तक्रारकर्त्यांना स्वतःच्या खर्चाने पर्यटनस्थळे बघावी लागली. यानंतर परत दिनांक 11/6/2018 रोजी वि.प.ने एटीएम मधून रक्कम निघत नसल्याचे कारण सांगून हॉटेलच बिल देण्याकरीता तक्रारकर्त्यांकडून रु.50,000/- घेतले मात्र त्याची पावती दिली नाही व तक्रारकर्त्याने पेमेंट केलेले हॉटेलचे बिलदेखील स्वतःजवळ ठेवून घेतले आणी कटरा येथे पैसे परत करतो असे आश्वासन दिले. मात्र कटरा येथे वि.प.ने रक्कम परत केली नाही व पावतीही दिली नाही. उलट तक्रारकर्त्यांची इंडिया प्राईड हॉटेलवर रहाण्याची व्यवस्था करुन स्वतः वि.प. दुस-या हॉटेलवर थांबले. तक्रारकर्ते दिनांक 12/6/2018 रोजी वैष्णोदेवी दर्शन करुन दुपारी 12 वाजता परतले असता वि.प.ने उद्या म्हणजे 13/6/2018 रोजी श्रीनगरसाठी निघायचे आहे असे सांगितले त्यामुळे तक्रारकर्त्यांनी सदर प्रवासाची तयारी केली. मात्र ऐन प्रवासाचे वेळी वि.प. न दिसल्याने त्यांचे स्वयंपाकी व ड्रायव्हरकडे चौकशी केली असता वि.प. पैसे काढण्यासाठी एटीएमवर गेल्याचे सांगितले. मात्र ते परत न आल्यामुळे तक्रारकर्त्यांनी त्यांचेशी वारंवार फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मा्त्र फोन लागला नाही. वि.प. परत न आल्यामुळे संपूर्ण दिवसभर वाट बघून तक्रारकर्त्यांनी दिनांक 14/6/2018 रोजी कटरा पोलीस स्टेशन बसस्टॅंड क्र.1 व 2 वर तसेच वैष्णोदेवी पानबाग पोलीस स्टेशन येथे वि.प. बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. वि.प. न सांगता बेपत्ता झाल्यामुळे तक्रारकर्त्यांना मानसीक त्रास झाला व आर्थीक नुकसान सहन करावे लागले. नाईलाजाने तक्रारकर्त्यांनी पोलीस स्टेशन कटरा यांना तोंडी सुचना देवून पुढील प्रवास स्वखर्चाने करावा लागला. मात्र वि.प. यांना संपूर्ण रक्कम देवूनही ते बेपत्ता झाल्यामुळे काश्मीरला भेट देण्याच्या शेडयुलमध्ये तक्रारकर्त्यांना बदल करावा लागला व त्यांनी स्वखर्चाने अमृतसर, वाघा बॉर्डर, दिल्ली येथील स्थळ दर्शन केले. यादरदम्यान वि.प.शी सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याने संपर्क झाला नाही. त्यामुळे तक्रारकर्ते परिवारासह दिल्लीहून रेल्वेने दिनांक 21/6/2018 रोजी चंद्रपूर येथे परत आले. टुरची बहुतांश रक्कम दिल्यानंतरही वि.प. अर्ध्या टुरनंतर बेपत्ता झाल्यामुळे तक्रारकर्त्यांना प्रवास शेडयुल बदलावे लागले तसेच स्वखर्चाने पुढील प्रवास करावा लागला. यात तक्रारकर्त्यांना मानसीक त्रास तसेच आर्थीक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे चंद्रपूर येथे परतल्यानंतर तक्रारकर्त्यांनी वि.प.ना प्रथमत: फोनद्वारे तसेच दिनांक 18/8/2018 आणी दिनांक 12/9/2018 रोजी पत्राद्वारे त्यांनी टुरकरीता दिलेली रक्कम रु.6,10,000/- परत मागितली, परंतु वि.प.नी टाळाटाळीची उत्तरे दिली. तक्रारकर्त्यांनी टुरकरीता रु.6,10,000/- भरले होते ही बाब वि.प.ने लेखी उत्तरात मान्य केलेली आहे. तक्रारकर्त्यांनी अनुक्रमे दि.29/12/2017 रोजी रु.1 लाख, दिनांक 3/1/2018 रोजी रु.2,85,000/-, दिनांक 30/1/2018 रोजी रु.40,000/-, दिनांक 3/5/2018 रोजी रु.1,85,000/-, दिनांक 7/6/2018 रोजी रु.1 लाख, दिनांक 9/6/2018 ला रु.1 लाख व दिनांक 11/6/2018 रोजी रु.50,000/- असे एकूण रु.8,60,000/- वि.प. यांना दिल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 9/6/2018 ला दिलेले रु.1 लाख व दिनांक 11/6/2018 रोजी दिलेले रु.50,000/- यांच्या पावत्या वि.प. यांनी दिल्या नाहीत तसेच तक्रारकर्त्याने चुकते केलेले हॉटेलचे बिल देखील स्वत:जवळ ठेवून घेतले व त्यामुळे सदर दस्तावेज दाखल करता आले नाहीत असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत कोणताही पुरावा प्रकरणात उपलब्ध नसल्यामुळे सदर आक्षेप सिध्द होत नाही.
- तक्रारकर्त्यांनी प्रकरणात जाहिरातपत्रक, वि.प.ने दिलेल्या पावत्या, त्यांनी हॉटेलच्या स्वत: चुकविलेल्या इंडिया प्राईड सह इतर हॉटेलच्या पावत्या, काढलेली रेल्वे तिकिटे, वि.प. अर्ध्या टुरनंतर गहाळ झाल्याबाबत पोलीस स्टेशनला नोंदविलेली तक्रार हे दस्तावेज प्रकरणात दाखल केले आहेत. यावरुन वि.प.नी तक्रारकर्त्यांचा दिनांक 1/6/2018 रोजी निर्धारीत असलेल्या टुरची तारीख बदलवून ती दिनांक 5/6/2018 रोजी केल्याचे सिध्द होते. शिवाय संपूर्ण टुर पूर्ण करुन कोणताही त्रास न होता तक्रारकर्त्यांना चंद्रपूरपर्यंत परत पोहचविले असे विरुध्द पक्षांचे म्हणणे असले तरीही विरुध्द पक्ष यांनी कटरा येथील स्थलदर्शन तसेच राहण्याची व्यवस्था व त्यानंतर केलेल्या खर्चाची देयके प्रकरणात दाखल करुन सदर म्हणणे सिध्द केलेले नाही. इतकेच नाही तर शक्य असूनही वर्धा येथील 11 सहप्रवासी पर्यटकांचे त्याबाबतचे शपथपत्र वा दस्तावेज दाखल करुन सदर म्हणणे सिध्द केलेले नाही. तक्रारकर्त्यांनी उर्वरीत रक्कम परत करण्यांस टाळाटाळ केल्यामुळे वि.प.ने सदर रकमेच्या वसुलीकरीता वर्धा येथील दिवाणी न्यायालयात दावा क्र.79/19 दाखल केलेला आहे असे वि.प.ने लेखी कथनात नमूद केले आहे. मात्र त्याबाबत कोणताही दस्तावेजी पुरावा त्यांनी प्रकरणात दाखल केलेला नाही. याचाच अर्थ विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्यांना कटरा येथे अर्ध्या टुरवर सोडून निघून गेले व त्यामुळे तक्रारकर्त्यांना त्यापुढील प्रवास स्वखर्चाने व तोही निर्धारीत शेडयुल बदलून पूर्ण करावा लागला. टुरबाबत हमी देवूनही वि.प.नी टुर पूर्ण न करता मध्येच बेपत्ता होवून तक्रारकर्त्यांप्रती अनुचीत व्यापार प्रथेचा अवलंब करुन सेवेत न्युनता केली असून त्यामुळे तक्रारकर्ते व त्यांच्या परिवारांस साहजीकच अतिशय शारिरीक व मानसीक त्रास तसेच आर्थीक नुकसान सहन करावे लागले आहे.
- मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने रिव्हीजन पिटीशन क्र.3235/2013 एंडेव्हर विरुध्द प्रबिरेंद्र मोहन मित्रा या प्रकरणात दिनांक 23/10/2019 रोजी दिलेल्या निवाडयातदेखील अर्ध्या टुरमध्ये पर्यटकांना सोडून निघून जाणा-या टुर ऑपरेटर्सला घेतलेली रक्कम परत करण्याचे तसेच त्यांना झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासाकरीता नुकसान-भरपाई देण्याबाबतचे खालील दोन्ही न्यायासनांचे आदेश योग्य ठरवले आहेत. सदर निवाडा प्रस्तूत प्रकरणी तंतोतंत लागू होतो.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ते व त्यांचे परिवारातील सदस्यांकरीता आगाऊ प्रवास बुकींग तसेच काही खर्च केलेला आहे ही बाब विचारात घेणे आवश्यक आहे. मात्र तक्रारकर्त्यानेदेखील वि.प.ला चुकत्या केलेल्या रु.6,10,000/- व्यतिरीक्त कटरानंतरच्या संपूर्ण प्रवास तसेच रहाण्याचा खर्च स्वतः सहन केलेला आहे व त्याबाबतची बिले तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केलेली आहेत. त्यामुळे दोघांनी केलेले सदर खर्च समायोजीत केल्यानंतर तक्रारकर्ते वि.प.कडून त्यांनी वि.प.ला टुरपोटी दिलेली रक्कम रु.6,10,000/- परत मिळण्यांस तसेच झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र आहे असे आयोगाचे मत आहे. सबब मुददा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुददा क्र.3 बाबत :- - वरील मुद्दा क्र.1 व 2 चे निष्कर्षांचे अनुषंगाने आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र.18/180 अंशत: मंजूर करण्यात येते.
- वि.प. यांनी तक्रारकर्त्यांना टुरपोटी घेतलेली रक्कम रु.6,10,000/- व
त्यावर निकाल दिनांक – 12/05/2022 पासून रक्कम अदा करे पर्यंत - व्याज दराने परत करावी.
- वि.प. यांनी तक्रारकर्त्यांना झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी
नुकसान भरपाईदाखल रु.30,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- -
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
(कल्पना जांगडे (कुटे)) (किर्ती वैद्य (गाडगीळ)) (अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष | |