Maharashtra

Nagpur

CC/12/19

Smt. Anita Ravindra Nikule - Complainant(s)

Versus

Medical Officer, Indira Gandhi Hospital - Opp.Party(s)

Adv. R.G.Somkuwar

17 Dec 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/12/19
 
1. Smt. Anita Ravindra Nikule
New Futala,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Medical Officer, Indira Gandhi Hospital
Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Medical Officer, Nagpur Municipla Corporation
Civil Lines,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
For the Complainant:Adv. R.G.Somkuwar, Advocate
For the Opp. Party:
ORDER

        (मंचाचा निर्णय : श्री. मनोहर चिलबुले - अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)

 

                          आ दे श  -

 

 (पारित दिनांकः 17/12/2014)

 

      तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केलेल्‍या तक्रारीचे संक्षिप्‍त विवरण येणेप्रमाणे...

 

1.          तक्रारकर्ती श्रीमती अनिता निकुले हिने गर्भारपणातील तपासणी व उपचारांसाठी वि.प.क्र. 2 संचलित वि.प.क्र. 1 च्‍या अधिपत्‍याखालील इंदीरागांधी रुगणालयात 2 रुपये नोंदणी शुल्‍क भरुन दि. 13.06.2009 रोजी आरोग्‍य तपासणी कार्ड काढले होते. वि.प.क्र. 2 च्‍या रुगणालयात प्रसृतिची तपासणी, उपचार व प्रसृतिची सर्व सुविधा असल्‍याचे आणि आवश्‍यक्‍ता भासल्‍यास बाहेरुन मदतीसाठी डॉक्‍टरांना बोलाविले जाते व त्‍यासाठी रु.5,000/- पर्यंत खर्च येवू शकतो असे वि.प.क्र.1 कडून तक्रारकर्तीस सांगण्‍यांत आले होते. त्‍याप्रमाणे प्रसुतितील आवश्‍यक तपसणीसाठी तक्रारकर्ती वि.प.क्र. 1 कडे दि.15.06.2009,17.06.2009, 25.08.2009, 02.09.2009, 19.09.2009 रोजी गेली आणि प्रत्‍येक वेळी 2 रुपये नोंदणी शुल्‍क  देखिल दिले आहे. वि.प.क्र. 1 च्‍या डॉक्‍टरांनी प्रसुतीची शेवटची तारीख 27.09.2009 तक्रारकर्तीस दिली होती.

     

2.          दि. 28.09.2009 रोजी सायंकाळी तक्रारकर्तीस अचानक पोटाचा त्रास होवू लागल्‍यामुळे ती वि.प. 1 कडे दाखल होण्‍याकरिता पतीसह आली असता वि.प.क्र. 1 ने दाखल करुन घेण्‍यास नकार दिला आणि ऐनवेळी दुस-या रुग्‍णालयात दाखल होण्‍यास सुचविले व मेडिकल मध्‍ये किंवा अन्‍य खाजगी रुग्‍णालयात दाखल करण्‍यासाठी पत्र दिले.

 

3.          तक्रारकर्तीला तिच्‍या पतीने धन्‍वंतरी हॉस्पिटल आणि संकल्‍प नर्सिंग होम धरमपेठ येथे दाखल करण्‍यास नेले असता त्‍यांनी सुरुवातीपासून त्‍यांच्‍याकडे उपचार घेतले नसल्‍याने ऐनवेळी दाखल करुन घेतल्‍यास नकार दिला. तक्रारकर्तीची प्रकृती खालावल्‍यामुळे तिला त्‍याच दिवशी रात्री मेडिकल हॉस्पिटल मध्‍ये भरती करण्‍यांत आले आणि तेथे दि. 29.09.2009 रोजी सकाळी 9.10 वाजता तक्रारकर्तीने मुलाला जन्‍म दिला.

 

4.          वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्तीस दि. 28.09.2009 रोजी सायंकाळी त्‍यांचे रुगणालयांत प्रसुतीसाठी दाखल करुन घेण्‍यास जाणीव पूर्वक व निष्‍काळजीपणे नकार दिला. वि.प.च्‍या सदर कृत्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या जिवाचे बरेवाईट झाले असते तर तिच्‍या मागे एक मुलगी व एक मुलगा यांचे अत्‍यंत  हाल झाले असते. तक्रारकर्तीस व तिच्‍या कुटूंबास जो मानसिक त्रास सोसावा लागला त्‍यास वि.प.क्र. 1 व 2 कारणीभूत आहेत.  वि.प.क्र.1 ने 13.06.2009 पासून प्रत्‍येक तपासणीचे वेळी तक्रारकर्तीकडून 2 रुपये सेवा शुल्‍क घेतल्‍याने तक्रारकर्ती ही वि.प.क्र. 1 व 2 ची ग्राहक आहे.

 

5.          तक्रारकर्तीने अधिवक्‍ता सोमकुंवर यांचेमार्फत दि.03.12.2009 रोजी वि.प.क्र. 1 व 2 ला नोटीस पाठवून सेवेतील निष्‍काळजीपणाबाबत रु.15,00,000/- व शारिरिक आणि मानसिक त्रासाबाबत रु.2,00,000/- नुकसान भरपाई आणि भविष्‍यातील खर्च रु. 25,000/- अशी रु. 17,25,000/- ची मागणी केली. सदर नोटीस मिळूनही वि.प.नी पुर्तता केली नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रारीत वरील प्रमाणे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.   

 

 

6.          विरुध्‍द पक्ष 1 व 2 नोटीस मिळून हजर झाले व  त्‍यांनी लेखीजबाब दाखल करुन तक्रार अर्जास सक्‍त विरोध केला आहे. तक्रारकर्तीने वि.प.क्र.1 च्‍या रुग्‍णालयांत गर्भारपणातील तपासणी व उपचारांसाठी कार्ड काढले होते व तक्रारीत नमुद तारखांना तपासणीसाठी आली होती हे वि.प.ने कबुल केले आहे. परंतु महानगर पालिका अधिनियमाच्‍या कलम 7 प्रमाणे सदर तक्रार मंचाकडे चालू शकत नसल्‍याने तक्रार खारीज होण्‍यास पात्र असल्‍याचे  म्‍हटले आहे.

      त्‍यांचे पुढे म्‍हणणे असे कि, दि.28.09.2009 रोजी सायंकाळी 6.00 वा. तक्रारकर्तीच्‍या पोटात दुखत असल्‍याची व बाळ कमी फिरत असल्‍याची तक्रार घेवून तपासणीसाठी वि.प.क्र. 1 कडे आली. तिची ताबडतोब तपसणी करण्‍यांत आली त्‍यावेळी तिची नाडी व रक्‍तदाब सामान्‍य होता, परंतु असे लक्षात आले कि, गर्भाच्‍या हृदयाचे ठोके स्‍टेथॉस्‍कोपवर जाणवत नव्‍हते. वि.प.क्र. 1 च्‍या रुग्‍णालयात अल्‍ट्रासाऊंड तपासणीची सोय व त्‍यासाठी लागणारे रेडिऑलॉजीस्‍ट उपलब्‍ध नसल्‍यामुळे शासकिय मेडिकल कॉलेज हॉस्पिटल नागपूर येथून तक्रारकर्तीची सोनोग्राफी करुन आणण्‍यास सांगितले आणि त्‍याबाबतचे पत्र तक्रारकर्तीस दिले. तक्रारकर्तीस खाजगी रुग्‍णालयात जाण्‍याचा सल्‍ला दिला नसतांना ती ताबडतोब सरकारी दवाखान्‍यात न जाता इतर दखान्‍यात गेली. वि.प.ने तक्रारकर्तीची प्रसुती करण्‍यास नकार दिलेला नाही किंवा प्रसुतीच्‍या कुठल्‍याही कार्यात व सेवेत त्रृटीपूर्ण व्‍यवहार केलेला नाही. तक्रारकर्तीची  मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्‍ये सामान्‍य प्रसुती होवून तिने सुदृढ बालकास जन्‍म दिला असून तिला किंवा तिच्‍या बाळाला कोणतीही हानी झालेली नाही. प्रसुती सुलभ व्‍हावी आणि बाळ व बाळंतीण सुखरुप राहावे याकरिता काही तपासण्‍या शासकिय मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मधून करुन आणावयास सांगणे ही सेवेतील त्रृटी या सदरात बसत नाही, म्‍हणून तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली आहे.

     

7.          वि.प.ने कोणताही निष्‍काळजीपणा केला नाही किंवा कोणतीही दोषपूर्णसेवा दिली नसल्‍याने तक्रारीतील आरोप खोटे व वास्‍तविकतेला सोडून असल्‍याने तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली आहे. तक्रारकर्तीने कल्‍पनाविलासाने तक्रारीची मांडणी केली असून वि.प.मुळे तक्रारकर्तीस कोणतीही नुकसान झाले नसतांना नुकसानभरपाईची मागणी केलेली आहे.

 

8.    तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्षाच्‍या परस्‍पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यांत आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा खालिल प्रमाणे...

 

 

 

            मुद्दे                                            निष्‍कर्ष

 

1)

व्‍यवहार केला आहे काय ?                      नाही.

 

2) तक्रारकर्ता  मागणी प्रमाणे दाद मिळण्‍यांस

 पात्र आहे काय ?                             नाही

3) अंतिम आदेश काय ?                          अंतिम आदेशाप्रमाणे  

                                              तक्रार खारीज.

 

  •  कारणमिमांसा  -

 

9.    मुद्दा क्र.1 बाबतः- सदरच्‍या प्रकरणात तक्रारकतीने वि.प.क्र.च्‍या रुग्‍णालयात प्रसुतीतील तपासण्‍या व उपचारांसाठी दि.13.06.2009 रोजी नांव नोंदविले व त्‍याबाबत तिला वि.प.क्र. 1 कडून देण्‍यात आलेले कार्ड तक्रारकर्तीने दस्‍त क्र. 2 वर दाखल केलेले आहे. त्‍यानंतर तक्रारकर्तीची एडस् बाबत तपासणी करवून घेतल्‍याचा रिपोर्ट दस्‍त क्र. 3 वर दाखल केला आहे. त्‍यानंतर तक्रारकर्ती वि.प.क्र.1 कडे दि.18.07.2009 व 12.09.2009 रोजी तपासणीस गेल्‍याबाबत डॉक्‍टरांच्‍या नोटस्च्‍या प्रती तक्रारकर्तीने दस्‍त क्र.4 व 5 वर दाखल केल्‍या आहेत. त्‍यानंतर तक्रारकर्ती पोटात दुखत असल्‍याने दि.28.09.2009 रोजी सायंकाळी तपासणीसाठी वि.प. 1 कडे गेली. वि.प.क्र.1 कडून तिची तपासणी करण्‍यांत आली त्‍याबाबतच्‍या नोटस् तक्रारकर्तीने दस्‍त क्र. 6 वर दाखल केलेल्‍या आहेत. मात्र सदर नोटस् वर 29.09.2009 अशी चुकीची तारीख नमुद आहे कारण तक्रारकर्ती दिनांक 28.09.2010 रोजीच वि.प.क्र.1 कडे तपासणीस गेली होती असे तक्रारकर्ती व वि.प. या दोघांचेही म्‍हणणे आहे.  सदर नोटस् वरुन हे स्‍पष्‍ट होते कि, तक्रारकर्ती दि.28.09.2009 रोजी सायंकाळी 6 वाजता तपासणीस गेली आणि तिची तपासणी केली असता गर्भाच्‍या हृदयाचे ठोके स्‍टेथॅस्‍कोपने जाणवत नव्‍हते “Heart beats of fetas not located with stethoscope”  असे नमुद आहे. तसेच गर्भाची स्थिती निश्चित करण्‍यासाठी आवश्‍यक तपासणीचा सल्‍ला दिला आणि मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला पाठविले (Adv. USB for confirmation of fetas .Refer to MCH”  असे नमुद केले आहे. तक्रारकर्तीने मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, नागपूरचे डिसचार्ज कार्ड दस्‍त क्र. 7 वर दाखल केले आहे. त्‍यांत तक्रारकर्ती सदर रुग्‍णालयात दि. 28.09.2009 रोजी इंदीरागांधी म्‍युनिसिपल कार्पोरेशन रुग्‍णालयातून गर्भाची निश्चित स्थिती जाणून घेण्‍यासाठी पाठविण्‍यांत आल्‍याचे नमुद आहे. तसेच तक्रारकर्तीची दि. 29.09.2009 रोजी सकाळी प्रसुती होवून मुलगा झाल्‍याचे व दि. 30.09.2009 रोजी हॉस्पिटल मधून डिसचार्ज दिल्‍याचे नमुद आहे.

 

10.         तक्रारकर्त्‍याचे अधिवक्‍त्‍यांनी आपल्‍या युक्तिवादात असे प्रितिपादन केले कि, तक्रारकर्ती दि.13.06.2009 पासून वि.प.क्र.1कडे प्रसुतीतील तपासणी व उपचार करुन घेत असतांना ती  दि. 28.09.2009 रोजी  प्रसुतीप्रसुतीसाठी वि.प.क्र.1 कडे गेली असता त्‍यांनी तिला प्रसुतीसाठी रुग्‍णालयात दाखल करुन घेतले नाही व मेडिकल कॉलज हॉस्पिटलला पाठविले ही सेवेतील न्‍युनता आहे. व त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या जिवास धोका झाला असता आणि तिच्‍या अपत्‍यांवर मातृहीन होण्‍याची पाळी आली असती. विरुध्‍द पक्षाच्‍या वरील कृत्‍यामुळे तक्रारकर्तीस व तिच्‍या कुटूंबास शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला म्‍हणून  तक्रारकर्ती मागणी केल्‍याप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्‍यांसस पात्र आहे.

 

            याउलट विरुध्‍द पक्षांच्‍या अधिवक्‍त्‍यांनी आपल्‍या युक्तिवादास सांगितले की, दि.28.09.2009 रोजी सायंकाळी 6.00 वा. तक्रारकर्तीच्‍या पोटात दुखत असल्‍याची व बाळ कमी फिरत असल्‍याची तक्रार घेवून तपासणीसाठी ती वि.प.क्र. 1 कडे आली. तिची ताबडतोब तपसणी करण्‍यांत आली त्‍यावेळी तिची नाडी व रक्‍तदाब सामान्‍य होता, परंतु असे लक्षात आले कि, गर्भाच्‍या हृदयाचे ठोके स्‍टेथॉस्‍कोपवर जाणवत नव्‍हते. वि.प.क्र. 1 च्‍या रुग्‍णालयात अल्‍ट्रासाऊंड तपासणीची सोय व त्‍यासाठी लागणारे रेडिऑलॉजीस्‍ट उपलब्‍ध नसल्‍यामुळे शासकिय मेडिकल कॉलेज हॉस्पिटल नागपूर येथून तक्रारकर्तीची सोनोग्राफी करुन आणण्‍यास सांगितले आणि त्‍याबाबतचे पत्र तक्रारकर्तीस दिले. तक्रारकर्तीची मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्‍ये सामान्‍य प्रसुती होवून तिने सुदृढ बालकास जन्‍म दिला असून तिला किंवा तिच्‍या बाळाला कोणतीही हानी झालेली नाही.  प्रसुती सुलभ व्‍हावी आणि बाळ व बाळंतीण सुखरुप राहावे याकरिता काही तपासण्‍या शासकिय मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मधून करुन आणावयास सांगणे ही सेवेतील न्‍यूनता होत नाही. 

 

11.         वरील प्रमाणे उपलब्‍ध दस्‍तावेजांचा विचार करता विरुध्‍द पक्ष क्र. 1 ने दि.28.09.2009 रोजी तक्रारकर्तीची तपासणी केली असता गर्भाच्‍या ह्यदयाचे ठोके जाणवले नाही आणि त्‍याबाबत अधिकची तपासणी करण्‍याची संसाधने उपलब्‍ध नसल्‍यामुळे त्‍यांनी आवश्‍यक असलेली तपासणी करण्‍यासाठी जर तक्रारकर्तीस शासकिय मेडिकल कॉलेज हॉस्‍पीटलकडे पाठविले असेल तर त्‍यात विरुध्‍द पक्ष क्र. 1 ची कोणतीही चूक किंवा निष्‍काळजीपणा आहे असे म्‍हणता येणार नाही. तक्रारकर्ती त्‍यानंतर शासकिय मेडिकल कॉलेज हॉस्‍पाटलमध्‍ये तपासणीसाठी गेली आणि तेथे आवश्‍यक तपासण्‍या झाल्‍यानंतर तिची सामान्‍य प्रसुति होऊन मुलाला जन्‍म दिला आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला शासकिय मेडिकल हॉस्‍पीटलमध्‍ये पाठविल्‍यामुळे तिचे कोणतेही नुकसान झालेले नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडून प्रसुतीसाठी पैसे घेतले किंवा प्रसुती करतांना कोणत्‍याही प्रकारचा निष्‍काळजीपणा केला अशी तक्रारकर्तीची तक्रार नाही त्‍यामुळे तक्ररकर्ती व तिच्‍या गर्भातील बाळ यांच्‍या सुरक्षेसाठी व सुलभ प्रसुतीसाठी विरुध्‍द पक्ष क्र. 1 ची तक्रारकर्तीस मेडिकल कॉलेज हॉस्‍पीटलकडे पाठविण्‍याची कृति सेवेतील न्‍यूनता या सदरात मोडत नाही. म्‍हणून मुद्दा क्र.1 वरील निष्‍कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.

 

12.         मुद्दा क्र. 2 बाबतः मुद्दा क्र. 1 वरील विवचनेप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्र. 1 कडून सेवेत कोणताही न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार झालेला नसल्‍यामुळे तक्रारकर्ती तक्रारीत मागितलेली कोणतीही दाद मिळण्‍यांस पात्र नाही. म्‍हणून मुद्दा क्र. 2 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविला आहे.

     

            वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

आदेश -

 

1)    तक्रारकर्तीची ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केलेली तक्रार खारिज करण्‍यांत येते.

2)    दोन्‍ही पक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

3)    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

4)    तक्रारकर्त्‍यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.