(मंचाचे निर्णयान्वये, सौ. मोहिनी ज. भिलकर, सदस्या)
(पारीत दिनांक : 30 ऑक्टोंबर 2010)
अर्जदार यांनी, सदर तक्रार, मे.व्हॅलियंट ऑटोमेशंस प्रा.लि. यांचे विरुध्द आहे. अर्जदाराने, मागणी केलेली नुकसान भरपाईची रक्कम रुपये 1,50,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळण्याबाबत दाखल केली. त्याचा तपशिल खालील प्रमाणे.
... 2 ... (ग्रा.त.क्र.18/2010)
1. अर्जदार यांनी, डिजीटल लेझर कॉपियर कम प्रिटंर SHARP Mode AR-163 सिरीयल क्र.35020466 हे यंञ मे.व्हॅलियंट ऑटोमेशंस प्रा.लि. यांच्याकडून रुपये 1,74,720/- या किंमतीला विकत घेतले होते, ते अर्जदारार यांचेकडे 10 नोव्हेंबर 2003 रोजी आणून बसविण्यात आले आणि कार्यरत झाले. या यंञाच्या देखभालीकरीता एक ‘संपूर्ण सेवा करार’ दि.25.3.2004 रोजी अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये करण्यात आला. त्या कराराची कलम सी 1 नुसार अंमलबजावणी त्याच दिवसांपासून सुरु झाली. त्याची मुदत यंञाला कारखान्यात नेऊन दुरुस्त करण्याची गरज भासत नाही तोवर सुरु राहील. या कलमांअतर्गत हे यंञ चालु स्थितीमध्ये आणि त्याची जरुरी ती देखभाल होत राहीली, त्यामुळे यंञाला कारखान्यात नेऊन, दुरुस्त करण्याची गरज आहे असे गैरअर्जदाराने सांगितले नाही, याच आश्वासन आणि विश्वासाखाली दोन्ही बाजुमधील देवाणघेवाण चालु राहिली.
2. यानंतर, दि.12 सप्टेंबर 2009 रोजी यंञाने संपुर्णपणे काम करणे बंद केले. तसे, गैरअर्जदार यांना कळविण्यात आले. गैरअर्जदार यांनी तज्ञ पाठविण्याचे आश्वाससन देवूनही तज्ञ पाठविला नाही. त्यासाठी, वारंवार गैरअर्जदार यांचेकडे विचारणा करण्यांत आली. दि. 22 सप्टेंबर 2009 रोजी गैरअर्जदार यांनी तज्ञामार्फत यंञ तपासून मुख्य मोटार बदलण्याची गरज आहे, जी बदलली जाईल असे सांगण्यात आले. माञ, गैरअर्जदाराकडून योग्य ती कारवाई न झाल्याने, अर्जदाराने वारंवार पाठपुरावा केला. परंतु, कारवाई झाली नाही आणि यंञ बंदच राहीले.
3. दिनांक 8 ऑक्टोंबर 2009 रोजी अर्जदार यांनी 48 तासाच्या आंत यंञ सुरु करुन देण्याबाबत पञ फॅक्सने पाठवून ताकीद दिली. या पञानंतर ही गै.अ.यांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे, अर्जदाराने, नुकसान भरपाई रुपये 1,50,000/- ची मागणी करणारे पञ दि.10.12.2009 रोजी गैरअर्जदार यांना पाठविले. यानंतर ही गैरअर्जदार यांनी कोणत्याही प्रकारे यंञाची दुरुस्ती केली नाही.
4. अर्जदार यांचेकडे अनेक प्रशिक्षण कार्यशाळा आणि शिबीरे घेण्यात येतात, ज्याकरीता सदर यंञाची नितांत आवश्यकता अर्जदार यांना होती. शिबीरार्थीला योग्य ती कागदपञे आणि देस्ताऐवज देण्यात खुप अडचणी आल्या. ज्यामुळे, अर्जदार सर्च यांना अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यामुळे, अर्जदार यांना रुपये 1,11,000/- किंमतीच्या नविन कॉपीयर प्रिंटरची खरेदी करणे भाग पडले. त्यामुळे, अर्जदार मागणी करतात की, रुपये 1,50,000/- आणि त्यावरील व्याज 18 % या दराने दि.27 डिसेंबर 2009 ते या रकमेची भरपाई होईपर्यंत भरले जावे. तक्ररीसोबत अर्जदार यांनी कराराची प्रत व दस्ताऐवज जोडलेले आहेत.
5. गैरअर्जदार यांनी, आपले लेखी बयान नि.क्र. 12 वर दिले आहे, त्यात ते म्हणतात की, मे.व्हॅलियंट ऑटोमेशंस प्रा.लि., नागपुर जे शार्प या कंपनीचे अधिकृत विक्रेते आहेत. त्यांचेपासून शार्प कॉपिअर मॉडेल एआर 163 हे विकत घेतले होते व 10
... 3 ... (ग्रा.त.क्र.18/2010)
नोव्हेंबर 2003 रोजी गडचिरोली येथे तक्रारकर्त्याकडे चालू अवस्थेत बसविण्यात आले होते. यंञाच्या देखभाली करीता सेवा करार दि.29.3.2004 रोजी ग्राहक व विक्रेत्यामध्ये करण्यात आला होता. कराराची मुदत यंञाला कारखाण्यात नेवून दुरुस्त करण्याची गरज वाटत नाही, तोपर्यंत सुरु राहणार होती. सदर मशीनचे उत्पादन करणा-या कंपनीनुसार यंञाचे जीवन/काम करण्याची कार्यक्षमता फक्त 5 वर्ष पर्यंत किंवा 5,00,000 प्रती निघेपर्यंतच आहे. त्यामुळे, विक्रेता हा स्वतः तर्फे यंञाचे काम करण्याची कार्यक्षमता संपल्यावर सेवा देवू शकत नव्हता, करारानुसार संपूर्ण 5 वर्षाचे कालावधीमध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास तत्परतेने सेवा दिली, तसेच यंञाची देखभाल व दुरुस्ती वेळोवेळी होत होती व त्यानुसार, अर्जदार खर्च देत होता.
6. गैरअर्जदार हा इंजिनियरला यंञाची देखभाल करण्याकरीता पाठवित होता, त्यामुळे अर्जदार समाधानी होता, तसेच यंञाची कार्यक्षमता 5 वर्षे पर्यंत किंवा 5,00,000 प्रती निघेपर्यंतच आहे. त्यामुळे, सदर कराराच्या नुतनिकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही, हे अर्जदारास माहिती आहे. याच, आश्वासन आणि विश्वासाखाली अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात देवान-घेवान सुरु राहीली.
7. दिनांक 22 सप्टेंबर 2009 अर्जदाराकडून, गैरअर्जदारास तक्रार करण्यात आली. त्याच तारखेस गैरअर्जदार यांनी तज्ञास पाठवून यंञ तपासून यंञाची मुख्य मोटार बदलण्याची व ते बदलण्यासाठी यंञास नागपुरला नेण्याची गरज आहे. सदरचे यंञ 10 नोव्हेंबर 2003 रोजी बसविण्यात आले होते. त्यानुसार, 5 वर्षाचा कालावधी हा 2008 मध्येच पूर्ण झाला होता. तरी सुध्दा, गैरअर्जदार यांनी आपला तज्ञ पाठवून यंञ तपासून ग्राहकांस सेवा दिली आणि यंञाची कार्यक्षमता 5 वर्षे किंवा 5,00,000 प्रती निघेपर्यंत आहे, याबाबत सांगितले होते. सदर यंञ चालू करण्याकरीता लागणा-या मोटारीची किंमत रुपये 9,000/- आहे असे तंज्ञानी सांगितले होते, त्यासाठी कंपनीच्या नावाने डिमांड ड्राफ्ट अर्जदाराने दिला नव्हता, त्यामुळे मोटार बदलविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे.
8. गैरअर्जदाराने, यंञाला नवीन मोटार मशिनीस बसविण्यात आल्यावरच मशीन कार्यरत होईल, याबद्दल सांगितले पण अर्जदाराने सदर मशीनची उत्पादनानुसार असलेली कार्यक्षमता पूर्ण झाल्यामुळे व 6,50,000 पेक्षा जास्त प्रती निघाल्यामुळे, अर्जदार नविन यंञ घेण्याबाबत उत्सुक असल्याचे सांगितले. त्यामुळे, कुठलेही उत्तर किंवा कार्यवाही करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्यानुसार, अर्जदाराने नोव्हेंबर 2009 मध्ये नविन मशीनकरीता ऑर्डर नोंदवून नविन मशीन घेतली. गैरअर्जदार मागणी करतात की, अर्जदाराची तक्रार खोटी व कायद्यानुसार नसल्यामुळे, खारीज करण्यांत यावी, ही विनंती.
... 4 ... (ग्रा.त.क्र.18/2010)
अर्जदार व गैरअर्जदार यांनी, दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ आणि दोन्ही पक्षाच्या वकीलांनी केलेला तोंडी युक्तीवाद यावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे : उत्तर
(1) गैरअर्जदाराने, अर्जदारास सेवा देण्यात न्युनता केली : नाही.
आहे काय ?
(2) तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे काय ? : नाही.
(3) तक्रारीचा अंतिम निकाल काय ? :अंतिम आदेशाप्रमाणे.
// कारण मिमांसा //
मुद्दा क्रमांक 1 व 2 :
1. अर्जदाराने, डिजीटल लेझर कॉपीयर कम प्रिंटर SHARP Model AR-163 सिरीयल क्रमांक 35020466 हे यंञ मे.व्हॅलियंट ऑटोमेशंस प्रा.लि., नागपुर यांच्याकडून 10 नोव्हेंबर 2003 रोजी रुपये 1,74,720/- या किंमतीला विकत घेतले होते, याबाबत वाद नाही. परंतु, दि.12 सप्टेंबर 2009 रोजी यंञाने काम करणे बंद केले, तेंव्हा गैरअर्जदाराने यंञ तपासून मुख्य मोटार बदलण्याची गरज आहे असे सांगूनही, त्याबाबत काही कार्यवाही केली नाही म्हणून अर्जदाराने रुपये 1,50,000/- ची भरपाई मागीतली आहे.
2. अर्जदार यांनी, घेतलेल्या डिजीटील लेझर कॉपीयर क्रम प्रिंटर हे यंञ रुपये 1,74,720/- या किंमतीला विकत घेवून ते 10 नोव्हेंबर 2003 रोजी बसविण्यात आले. या यंञाच्या देखभालीसाठी अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात एक ‘संपूर्ण सेवा करार’ असा करार 25/3/2004 रोजी करण्यात आला, या कराराची प्रत नि.क्र.3-अ वर दाखल केलेली आहे. यात कुठेही यंञाचा सेवा कालावधी दिलेला नाही किंवा यंञ किती कॉपी काढू शकतो याबद्दल उल्लेख नाही. अर्जदार यांनी यंञ हे दि.10 नोव्हेंबर 2003 रोजी घेतले व सप्टेंबर 2009 पर्यंत यंञाने सेवा दिलेली आहे. तसेच, त्या यंञाची जरुर ती देखभाल व दुरुस्ती नेहमी रितसर गैरअर्जदार यांचेकडून होत होती. कराराच्या कलम सी 1 नुसार हे यंञ चालु स्थितीमध्ये होते, याच आश्वासन आणि विश्वासाखाली अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात देवान-घेवान सुरु होती, असे अर्जदारांचे म्हणणे आहे. गैरअर्जदार आपल्या तोंडी युक्तीवादात म्हणतात की, डिजीटल लेझर कॉपीयर कम प्रिंटर ह्या यंञाची कार्यक्षमता 5 वर्षे किंवा 5,00,000 प्रती निघेपर्यंतच आहे. यावरुन, अर्जदार यांच्या यंञाची कार्यक्षमता ही 10 नोव्हेंबर 2003 ते सप्टेंबर 2009 पर्यंत म्हणजे 5 वर्षे पेक्षा
... 5 ... (ग्रा.त.क्र.18/2010)
जास्त कालावधी पर्यंत यंञाने सेवा दिलेली आहे व 6,50,000 पेक्षा जास्त प्रती निघाल्यामुळे यंञाने पूर्ण सेवा दिलेली आहे. गैरअर्जदार हे आपल्या इंजिनियर कडून सदर यंञाची देखभाल वारंवार करवून देत होते. यावरुन, अर्जदाराच्या यंञाने 5 वर्षा पेक्षा जास्त कालावधी पर्यंत उत्तम सेवा दिलेली आहे. त्यामुळे, गैरअर्जदार यांनी सेवा देण्यात ञुटी केली, ही बाब सिध्द होत नाही, असे या मंचाचे मत आहे.
3. अर्जदाराने, नविन यंञ घेतल्याचे बिलाची प्रत अ-6 वर दाखल केली त्यावरुन सिध्द होते. सदर बिलात सुध्दा यंञाची कार्यक्षमता 5 वर्षे किंवा 6 लाख प्रती ऐवढे सांगीतले असून, एक वर्षाची वॉरंटी दिले आहे. यावरुन, यंञाची कार्यक्षमता 5 वर्षे पर्यंत सेवा देण्याची होती, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आल्यामुळे अर्जदार व गैरअर्जदार यांच्यातील सेवा करार यंञ पूर्णपणे खराब होईपर्यंत होता, असे म्हणता येणार नाही. जनरल क्लाज मध्ये कालावधी न टाकल्यामुळे तो करार चिरकाल होता, असे गृहीत धरता येणार नाही.
4. गैरअर्जदाराचे वकीलाने आपल्या युक्तीवादात सांगितले की, अर्जदार यांचे यंञ 12 सप्टेंबर 2009 रोजी बंद पडले. त्यानंतर, 22 सप्टेंबर 2009 ला गैरअर्जदार यांनी यंञ तपासून मुख्य मोटार बदलविण्यास सांगितले, त्या मोटारची किंमत रुपये 9,000/- ऐवढी असून, त्यासाठी अर्जदार यांना डिमांड ड्राफ्ट काढण्यास सांगितलेले होते, परंतु अर्जदार यांनी ड्राफ्ट न काढता नविन मोटार घेण्याचे ठरले असल्याचे सांगितले. यावरुन, अर्जदार हे यंञाची कार्यक्षमता 5 वर्षे व यंञाने दिलेली सेवा यात समाधानी होते व पुन्हा यंञाची दुरुस्ती करण्यापेक्षा नविन यंञ घेण्यास उत्सुक होते, हे दिसून येते. अर्जदार यांनी दस्ताऐवज अ-6 नुसार नविन यंञाचे बिल रेकॉर्डवर दाखल केलेले आहे, त्यात नविनि यंञ हे दि.28 नोव्हेंबर 2009 मध्ये नोंदणी करुन, 31 डिसेंबर 2009 ला विकत घेतल्याचे दिसून येते. जेंव्हा की, अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना नोटीस हा 10.12.2009 ला रजिस्टर पोष्टाने पाठवीला. यावरुन, नोटीस पाठविण्याआधीच अर्जदाराची नविन यंञ घेण्याची प्रोसीजर सुरु झालेली होती, हे दिसून येते. यावरुन, जुने यंञ हे आता काम करणार नाही, हे अर्जदार यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे दिसून येते, असे या न्यायमंचाचे मत आहे.
5. एकंदरीत, उपलब्ध रेकॉर्डवरुन गैरअर्जदार यांनी न्युनतापूर्ण सेवा दिली नाही. त्यामुळे, तक्रार मंजुर करण्यास पाञ नाही, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्यामुळे मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
... 6 ... (ग्रा.त.क्र.18/2010)
मुद्दा क्रमांक 3 :-
6. वरील मुद्दा क्र.1 व 2 च्या विवेचनेवरुन, तक्रार नामंजुर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज.
(2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 30/10/2010.