Maharashtra

Gondia

CC/12/19

Shri. Gyaniram Martand Janbhulkar - Complainant(s)

Versus

Me. Pratap Zerox Center, Gondia,his work of Zerox, - Opp.Party(s)

Self

21 May 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/12/19
 
1. Shri. Gyaniram Martand Janbhulkar
At. Deulgaon (Bodra), Post- Bondgaon (Devi), Tah- Arjuni (Mor), Dist- Gondia
Gondia
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Me. Pratap Zerox Center, Gondia,his work of Zerox,
Ambedkar Scare,Gondia, At-Post- Tah- Gondia
Gondia
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. R.D. Kundle PRESIDENT
 HON'ABLE MRS. Alka Patel MEMBER
 HONABLE MS. Geeta R. Badwaik MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रारकर्त्‍याने ही तक्रार दि. 02.05.2012 रोजी सादर केली व दि. 17.05.2012 रोजी दाखल करुन घेण्‍याच्‍या मुद्यावर तक्रारकर्त्‍याचा युक्तिवाद ऐकला.
      तक्रार तपासली असता तक्रारकर्त्‍याकडून विरुध्‍द पक्षाने दोन झेरॉक्‍स प्रतीचे रु. 4/- मागितले म्‍हणून तसेच तक्रारकर्ता राहतो त्‍या भागात झेरॉक्‍स प्रतीचा दर रु.1/- आहे. म्‍हणून दाखल केली आहे. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे की, त्‍याच्‍याकडून रु.2/- विरुध्‍द पक्षाने जास्‍त घेतले, त्‍याबद्दल तक्रारकर्त्‍याची मागणी रुपये 25,000/- एवढी आहे.
      सदर तक्रार मंचाच्‍या मते दाखल करुन घेण्‍याच्‍या स्‍टेजलाच खारीज करण्‍या योग्‍य ठरते. तक्रारकर्त्‍याने कोणतेही कागदोपत्री पुरावा किंवा शपथपत्र दाखल केलेले नाही. 2/- रुपयासाठी 25,000/- रुपयाची मागणी वरुन तक्रारकर्त्‍याच्‍या धुर्तपणा सहज लक्षात येते. यापूर्वीही तक्रारकर्त्‍याने अशा प्रकारच्‍या एकूण 3 तक्रारी (तक्रार क्रं. सी.सी.21/2007, 63/2008 व 32/2009) या मंचात दाखल केल्‍या होत्‍या. त्‍या सर्व पुराव्‍या अभावी खारीज करण्‍यात आल्‍या.
      तक्रारकर्त्‍याला अतिरंजित आणि तथ्‍यहीन तक्रारी दाखल करुन निरनिराळया लोकांना त्रास देण्‍याची (Black-mail) करण्‍याची सवय आहे असे स्‍पष्‍ट होते. म्‍हणून हातातील तक्रार दाखल करुन घेण्‍या योग्‍य नसल्‍याने दाखल करुन घेण्‍याच्‍या स्‍टेजलाच खारीज करण्‍यात येते. या संदर्भात मा. राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोग, मुंबई यांनी पारित केलेल्‍या केस लॉ चा आधार घेतला आहे.
 
I (2004) CPJ 243
LADHARAM LALCHAND RAJANI
VS.
CHAIRMAN, GREATER BOMBAY CO-OP. BANK LTD.

तक्रारकर्त्‍याला अशी ही ताकीद देण्‍यात येते की, त्‍यांनी अशाप्रकारच्‍या निरर्थक तक्रारी करुन मंचाचा वेळ वाया घालवू नये.

 
 
 
[HON'ABLE MRS. R.D. Kundle]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Alka Patel]
MEMBER
 
[HONABLE MS. Geeta R. Badwaik]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.