जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/272. प्रकरण दाखल तारीख - 16/12/2009 प्रकरण निकाल तारीख – 15/04/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, - सदस्या. अड.उदयसिंह पि. पालसिंह ठाकूर वय 41 वर्षे, धंदा वकीली, अर्जदार रा.महाराणा प्रताप हाऊसिंग सोसायटी, गांधी नगर, नांदेड. विरुध्द. मे. आडेराव शुज शॉप प्रो.प्रा.बळीराम पि.धोंडीबाराव आडेराव एल.आय.सी.ऑफिस समोर, गैरअर्जदार गांधी नगर, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदारा तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, सदस्या ) गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हे नांदेड येथील रहीवासी असून त्यांनी दि.30.08.2009 रोजी गैरअर्जदाराकडे अडव्हान्स पूर्ण रक्कम रु.1500/- देऊन आडेराव कंपनीचे प्यूअर लेदर कंपनीचे बूट तयार करुन देतो म्हणून घेतले. त्यासाठी दोन्ही पायाचे माप त्यांनी आपल्या रजिस्ट्रर बुकमध्ये घेतले व दोन दिवसांत बूट तयार करुन देतो अशी हमी दिली. अर्जदार हा गैरअर्जदार यांचेकडे बूट घेण्यासाठी गेला असता आज नाही, उद्यापर्यत तयार होईल व कधी कधी बूट तयार आहे पण पॉलीश राहीली आहे, उघाला घेऊन जा असे म्हणत होते. गैरअर्जदाराने अर्जदारास दोन महिन्यापर्यत चकरा मारावयास लावल्यानंतर शेवटी दि.25.10.2009 रोजी गैरअर्जदाराने सांगितले की, बूट तयार नाही, मी देत नाही व त्यांचे पैसेही मिळत नाही काय करावयाचे असेल ते करा. शेवटी अर्जदाराने दि.27.10.2009 रोजी कायदेशीर नोटीस गैरअर्जदारास दिली पण त्यांने ती नोटीस घेण्यास इन्कार केला. म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली असून त्यांची मागणी आहे की, बूटासाठी घेतलेले अडव्हान्स रु.1500/-व व्याज तसेच नूकसान भरपाई रु.2000/- व दावा खर्च रु.1000/- मिळावेत. गैरअर्जदार यांना मंचातर्फे पाठविण्यात आलेली नोटीस मिळूनही ते हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही म्हणून त्यांचे विरुध्द नो से चा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, अर्जदारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांनी लेदर बूटासाठी घेतलेली रक्कम रु.1500/- बददलची पावती दि.30.08.2009 रोजीची दाखल केलेली आहे व त्यावर गैरअर्जदार आडेराव यांची सही आहे.तसेच गैरअर्जदार यांना त्यांनी पाठविलेली नोटीस दि.27.10.2009 रोजीची मंचात दाखल केलेली आहे. ती नोटीस घेण्यास गैरअर्जदार यांनी इन्कार केलेला आहे. तसेच मंचातर्फे पाठविण्यात आलेली नोटीस मिळूनही गैरअर्जदार हे हजर झाले नाहीत म्हणजे अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही त्यांना मान्यच आहे असा त्यांचा अर्थ नीघतो. कारण नोटीस मिळूनही व आपले म्हणणे मांडण्याची संधी देऊनही त्यांनी आपले म्हणणे मांडले नाही. गैरअर्जदार यांनी हजर होऊन आपले म्हणणे मांडले असते तर त्यांचे सेवेत ञूटी आहे की नाही यांचा उलगडा झाला असता पण ते नोटीस मिळूनही हजर झाले नाही यांचा अर्थ त्यांना तक्रार मान्य आहे. अर्जदार हे उच्चशिक्षीत कायदयाचे पदवीधारक आहेत. गैरअर्जदार यांनी एक तर त्यांना लेदर बूट दिले नाही, त्यांनी पाठविलेली नोटीस ही घेतली नाही तसेच मंचाने पाठविलेली नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही यावरुन त्यांची व्यापार करण्याची पध्दत दिसून येते. असे करुन त्यांनी गैरअर्जदार यांनी अर्जदार सेवादेण्यामध्ये कमतरता केलेली आहे हे दिसून येते. अर्जदाराला लेदर बूट देऊन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली आहे, अर्जदार हे वकील आहेत व त्यांना बूट न दिल्यामूळे व त्यांचेशी नीट वर्तन न केल्यामूळे निश्चितच अर्जदार यांना मानसिक ञास झालेला असला पाहिजे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदारांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत रु.1500/- व त्यावर दि.30.08.2009 पासून पूर्ण रक्कम वसूल होईपर्यत 9 टक्के व्याज दयावे. 3. मानसिक ञासाबददल रु.200/- दयावेत. 4. दावा खर्च म्हणून रु.200/- मंजूर करण्यात येतात. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |