जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
तक्रार क्रमांक:-1/2016
दाखल दिनांक:-1/1/2016
आदेश दिनांक:-20/01/2016
निकाल कालावधी:-0वर्षे0म20दि
श्री.कैलास वासुदेव मडके,वय-सज्ञान,धंदा-नोकरी व शेती,
रा.मु.पो.जवळा ता.सांगोला जि.सोलापूर. ...तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
1) मे.पांडुरंग ऑटोमोटीव्हज,
बजाज मोटारसायकलचे अधिकृत डिलर,
दुध पंढरी जवळ,इसबावी ता.पंढरपूर जि.सोलापूर.
व इतर 4 ...विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:-श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
सौ.बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदारतर्फे विधिज्ञ :-पी.एस.पाटील
-:निशाणी 1 वरील आदेश:-
(पारीत दिनांक:-20/01/2016)
मा.सौ.बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या यांचेव्दारा :-
1. तक्रारकर्ता यांनी दि.28/12/2015 रोजी तक्रार दाखल केली आहे. वाद विषयाचे अनुषंगाने प्रस्तूत तक्रार दि.20/01/2016 रोजी प्राथमिक चौकशीकरीता घेण्यात आली. तक्रारीमधील वाद विषयाचे व दाखल कागदपत्राचे अवलोकन करणेत आले व तसेच तक्रारकर्ता यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला.
2. तक्रारकर्ता यांचे तक्रारीनुसार त्यांनी विरुध्दपक्ष यांचेकडून दि.8/11/2012 रोजी बजाज डिस्कव्हर 100 सीसी (4 जी) गाडी रोख स्वरुपात रक्कम देऊन खरेदी केली व त्यावेळी विरुध्दपक्ष यांनी सदर वाहन लवकरात लवकर आरटीओकडे नोंदणी करुन देणेची जबाबदारी घेतली. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी नोंदणी न होताच वाहनाचा ताबा घेतला. त्यानंतर अनेक हेलपाटे मारुन सुध्दा विरुध्दपक्ष क्र.1 ते 5 यांनी वाहनांची नोंदणी करुन दिली नाही. त्यामुळे त्यांनी दि.10/04/2013 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. तरीही विरुध्दपक्ष यांनी वाहनांची नोंदणी करुन दिली नाही. म्हणून विरुध्दपक्ष यांनी आरटीओ
(2) त.क्र.1/2016
कार्यालयात वाहनाची नोंदणी करुन द्यावी. तसेच मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/- म्हणून तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारकर्ता यांची तक्रार, दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन करणेत आले. तसेच तक्रारकर्ताचे वकीलाचा युक्तीवाद ऐकणेत आला. तक्रारीतील वाद विषयाचे अनुषंगाने सकृत दर्शनी ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे तरतुदी नुसार तक्रार मुदतीत आहे का? हे प्राथमिक मुद्दा मंचापुढे उपस्थित झाला.
4. तक्रारकर्ता यांची तक्रार व सोबतची कागदपत्रे यांचे अवलोकन करता तक्रारकर्ता यांनी वादातील मोटार सायकलचे व्यवहारापोटी कोणताही कागदोपत्री पुरावा उदा:खरेदी पावती, विमा इ. याकामी दाखल केला नाही. तक्रारकर्ता यांनी वादातील वाहन दि.8/11/ 2012 रोजी खरेदी केलेचे दिसून येते. त्यानंतर तक्रार दाखल करेपर्यंत वकीलामार्फत नोटीस पाठविले व्यतिरिक्त कोणताही विरुध्दपक्षाशी केलेला पत्रव्यवहाराचा कागदोपत्री पुरावा याकामी दाखल केलेला नाही. वकीलामार्फत दि.10/4/2013 रोजी नोटीस पाठविलेचे दिसून येते. वाहन खरेदी केले पासून वाहनाबाबत कोणताही वाद असेल तर तो दोन वर्षात ग्राहक मंचात तक्रार दाखल करणे गरजेचे असते. मात्र तक्रारकर्ता यांनी 8/11/2012 पासून दोन वर्षानंतर दि.28/12/2015 रोजी तक्रार दाखल केली आहे. ती मुदती नाही हे पुराव्यानिशी दिसून येते. वकीलामार्फत नोटीस पाठवून तक्रार मुदतीत आणणेचा तक्रारकर्ता यांनी प्रयत्न केला आहे. मात्र वकीलामार्फत नोटीस पाठवून कोणतीही तक्रार मुदतीत आणता येवू शकत नाही असे अनेक निवाडे न्यायालयाने दिलेले आहेत.
त्यामुळे वरील वस्तूस्थिती पहाता तक्रारकर्ता यांची तक्रार मुदतीत नाही. त्यामुळे ती मंचापुढे दाखल करुन घेणेकरीता प्रथमदर्शनी पात्र ठरत नाही या निर्णयाप्रत हे मंच आले आहे. त्यामुळे खालील प्रमाणे आदेश पारीत करणेत येत आहेत.
:- आदेश -:
1. तक्रारकर्ता यांची तक्रार मुदतीत नसल्यामुळे दाखल करुन घेणेस पात्र नाही. त्यामुळे सदर तक्रार दाखल पूर्व रद्द करणेत येत आहे.
2. आदेशाची प्रत तक्रारकर्ता यांना पाठविणेत यावी.
(सौ.बबिता एम.महंत-गाजरे) (श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
शिंलि02227011600