तक्रारकर्तातर्फे वकील ः- श्री. एस.बी.राजनकर
विरूध्द पक्ष ः- एकतर्फा
(युक्तीवादाच्या वेळेस)
निकालपत्रः- कुमारी. सरिता ब. रायपुरे सदस्या, -ठिकाणः गोंदिया.
निकालपत्र
(दिनांक 04/02/2019 रोजी घोषीत )
1. तक्रारकर्ता यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये ही तक्रार या मंचात दाखल केलेली आहे.
तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हे श्री. अरूण केशवराव खाडे हा मालविया वार्ड, श्रीनगर गोंदिया येथील रहिवासी आहे. तक्रारकर्ता जिल्हा आणि सत्र न्यायालय गोंदिया येथे अधिक्षक या पदावर कार्यरत होते आणि दि. 31/05/2015 रोजी या पदावरून सेवानिवृत्त झाले. झाले. त्यावेळी जे कर्मचारी दि.01/06/2014 ते 30/06/2015 चे कालावधीत सेवानिवृत्त होतील त्यांना वैद्यकीय विमा पॉलीसी भरणा करणे सकतीचे करण्यात आले होते. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने वैदयकीय विमा पॉलीसी योजने अंतर्गत Premium रू. 8764/-,Vide UTR – No. SBHY- 8151763241 नूसार दि. 25/06/2015 रोजी विरूध्द पक्ष क्र 3 मार्फत विरूध्द पक्ष क्र 1 कडे विमा पॉलीसी भरणा केली परंतू विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी आजपर्यंत वैद्यकिय विमा पॉलीसीचे कार्ड तक्रारकर्त्याला दिले नाही.
3. तक्रारकर्ता हा सेवानिवृत्त झाल्यानंतर तक्रारकर्त्याला अचानकपणे B.J Hospital गोंदिया येथे Appendix ची शस्त्रक्रिया करण्याकरिता भरती व्हावे लागले. तेथे तक्रारकर्त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तक्रारकर्त्याने औषधोपचाराकरिता व शस्त्रक्रियेकरीता आलेला एकंदरीत खर्च रक्कम रू. 30,052/-, इतका खर्च आला. तो खर्च वैद्यकीय विमा पॉलिसीमधुन मिळावा म्हणून दि. 20/06/2016 रोजी विरूध्द पक्ष क्र 3 कडे अर्ज केला आणि विरूध्द पक्ष क्र 3 ने दि. 20/06/2016 रोजी तक्रारकर्त्याचा विमा अर्ज 28/06/2016 ला विरूध्द पक्ष क्र 1 कडे पाठविला. परंतू आजपर्यंत तक्रारकर्त्याकडून वैद्यकीय विमा पॉलीसी अर्ज विरूध्द पक्ष क्र 1 व 2 ने मंजूर केला नाही किंवा तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र 1 व 2 ला पाठविलेल्या नोटीसला प्रतिसाद दिला नाही. विरूध्द पक्ष क्र 3 ने मात्र तक्रारकर्त्याच्या नोटीसला उत्तर देऊन तक्रारकर्त्याची वैद्यकिय विमा पॉलीसी विषयी मान्य केले. परंतू विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याचा वैदयकीय विमा पॉलीसी विषयी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेला खर्च रक्कम रू. 30,052/-, 9 टक्के व्याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रू. 25,000/-,आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रू.10,000/-, विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांच्याकडून मिळण्यासाठी मा. मंचात तक्रार दाखल केली.
4. विरूध्द पक्ष क्र. 1,2 व 3 यांचेविरूध्द मा. मंचाततर्फे दि. 16/06/2017 रोजी नोटीसेस बजावण्यात आल्या. नोटीसेस प्राप्त होऊन सुध्दा विरूध्द पक्ष मंचासमक्ष हजर न झाल्यामूळे त्यांच्याविरूध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याचा आदेश दि. 07/12/2018 रोजी पारीत करण्यात आला. .
5. तक्रारकर्त्याने त्यांच्या तक्रारीसोबत विमाछत्र योजनेचे अर्ज, बँकेचा धनादेश, प्रो-फॉर्म ई, वैद्यकीय प्रतिपूर्तीचा अर्ज, औषधीचे बिल, तक्रारीच्या पृष्ठर्थ आपला रिजाईंडर साक्षपुरावा व लेखीयुक्तीवाद या मंचात दाखल केला मंचानी त्यांचे वाचन केले आहे. तक्रारकर्त्यांच्या विद्वान वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा दाद मिळण्यास पात्र आहे काय? | होय. |
2. | तक्रारकर्ता हा वैद्यकीय विम्याची रक्कम मिळण्यास पात्र आहे काय? | होय. |
3 | अंतीम आदेश | अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 ः-
6. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना मंचातर्फे नोटीस बजावण्यात आल्या. परंतू ते मंचासमक्ष हजर न झाल्यामूळे त्यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दि. 07/12/2018 रोजी पारीत करण्यात आला. म्हणजे तक्रारकर्त्याचे कथन अबाधीत राहिला. तसेच विम्याची रक्कम स्विकारल्यानंतरही पॉलीसीचे कागदपत्र न देणे हे ग्रा.सं.कायदा 1986 नूसार अनुचित व्यापार प्रथा आहे. तसेच विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी रककम मिळावी म्हणून अर्ज केला. परंतू त्याची रक्कम विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांनी मंजूर केली नाही हि विरूध्द पक्षाची कृती ग्रा. सं.कायदयाप्रमाणे चुकीची व्यापारी प्रथा ठरते व तक्रारकर्त्याला वैद्यकिय विमा रक्कम दिली नसल्याने त्यांनी सेवा देण्यात कसुर केला हे सिध्द होते. तसेच विरूध्द पक्ष क्र 3 विरूध्द तक्रारकर्त्याने कोणतेही प्रार्थना न केल्यामूळे त्यांच्या विरूध्द दावा खारीज करण्यात येत आहे.
7. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये सादर केलेली कागदपत्रे जसे- विरूध्द पक्ष क्र 3 कडून पाठविलेला प्रो फॉर्म- ‘ई’ नूसार तक्रारकर्त्याने दि. 25/06/2015 रोजी Vide UTR No. SBHY – 81517632341 नूसार रक्कम रू. 8,764/-, वैद्यकिय विम्याची किस्त भरली हे सिध्द होते. तसेच तक्रारकर्त्याला अचानकपणे अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्याकरीता पैशाची गरज पडली त्यामूळे त्यांनी वैद्यकिय प्रतिपूर्तीची रक्कम मिळण्याबाबतचा अर्ज मा. जिल्हा कोषागार कार्यालय गोंदियाकडे अर्ज सादर केला होता आणि तो अर्ज विरूध्द पक्ष क्र 3 ने विरूध्द पक्ष क्र 1 व 2 कडे सादर केला. परंतू त्या अर्जाविषयी विरूध्द पक्षाने कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच तक्रारकर्त्याने सदर दाव्यासोबत औषधीच्या खर्चाच्या बिलाचे विवरण दाखल केलेले आहे. यावरून हे सिध्द होते की, तक्रारकर्त्याने शस्त्रक्रियेला लागलेली रक्कम रू. 30,052/-,मिळण्यास पात्र आहे. तसेच तकारकत्या्रला मानसिक त्रास सोसावा लागला म्हणून ग्रा.सं.कायदा कलम 14 प्रमाणे मानसिक व दाव्याच्या खर्चापोटी रककम मिळण्यास पात्र आहे. करीता हा मंच मुद्दा क्र 1 व 2 चा निःष्कर्ष होकारार्थी नोंदवित आहे.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला रक्कम रू. 30,052/-, द.सा.द.शे 9 टक्के व्याजासह तक्रार दाखल दिनांक 20/07/2017 पासून या रकमेवर व्याज दयावे.
3. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक त्रासापोटी म्हणून रू. 10,000/-आणि तक्रारीच्या खर्चापोटी रू.5,000/-द्यावे.
4. विरूध्द पक्ष क्र 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे. तसे न केल्यास वरील नमूद (2) व (3) आदेशाप्रमाणे रकमेवर द.सा.द.शे 12 टक्के व्याज अदा करावे.
5. विरूध्द पक्ष क्र 3 यांच्याविरूध्द तक्रारकर्त्याची कोणतीही प्रार्थना नसल्याने त्याच्या विरूध्द सदरहू तक्रार खारीज करण्यात येते.
6. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
7. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्ताला परत करावी.