जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.179/2008. प्रकरण दाखल दिनांक – 15/05/2008. प्रकरण निकाल दिनांक – 12/08/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायसिंह राणे. अध्यक्ष. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर. सदस्या. मा.श्री.सतीश सामते. सदस्य. ओम एजन्सी, अर्जदार. प्रो.प्रा.अशोक बाबुराव कोटलवार, वय वर्षे 45, धंदा व्यापार, रा.शास्त्रीनगर रोड, भावसार चौक, तरोड (बु) ता.जि.नांदेड. विरुध्द. मॅनेजिंग डायरेक्टर, गैरअर्जदार. रमा अग्रो फुडस् प्रा.लि, आश्वीनी कमरसियल कॉम्प्लेक्स, 1004, शुक्रवार पेठ हिराबाग चौक, टिळक रोड,पुणे. अर्जदारा तर्फे. - अड.एस.एम.रावणगांवे. गैरअर्जदार तर्फे - अड.संजयकुमार शर्मा. निकालपत्र (द्वारा मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार रमा ऍगो एजन्सी प्रा.लि. यांच्या सेवेच्या अनुचित प्रकारा बाबत अर्जदार यांची तक्रार आहे ती खालील प्रमाणे. अर्जदार हे स्वतः व्यापारी असुन ओम एजन्सी या नांवाने व्यवसाय करतात. गैरअर्जदार यांनी अर्जदारास आपल्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर म्हणुन उत्पादीत अन्न पदार्थ विकण्यासाठी नियुक्त केले आहे. गैरअर्जदार यांच्याकडुन आलेला माल अर्जदाराने स्विकारुन काही माल विकला व काही माल जो डेट बार झालेला आहे तो गैरअर्जदार यांनी परत घेऊन ती रक्कम हिशोबात कमी करावी असे म्हटले आहे. गैरअर्जदारांनी ती रक्कम दिली नाही. म्हणुन गैरअर्जदाराने आता शारीरिक व मानसिक त्रासाबद्यल रु.1,00,000/- व खराब झालेल्या मालाची किंमत द्यावी महणुन ही तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. सर्व प्रथम त्यांनी आक्षेप असा घेतला की, अर्जदार हे त्यांचे डिस्ट्रीब्युटर आहेत व त्यांनी पाठविलेला माल ते विक्री करतात त्यामुळे अर्जदार व त्यांचे मध्ये ग्राहकाचे नाते नाही. सबब ही तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी आपली साक्ष रविंद्र बिलोडे यांच्या शपथपत्राद्वारे नोंदविली आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 - गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी म्हणण्यात प्रथमतः जो आक्षेप घेतलेला आहे त्याप्रमाणे अर्जदार हे कंपनीचे डिस्ट्रीब्युटर असुन अर्जदाराच्या ऑर्डर प्रमाणे ते माल पाठवितात व अर्जदार तो माल आपल्या दुकानातुन विक्री करतात त्यामुळे ते त्यांचे ग्राहक नाही व ही गोष्ट अर्जदाराने आपल्या तक्रारअर्जा मध्येच मान्य केली आहे. त्यामुळे गैरअर्जदारांनी जो माल पाठविलेला आहे तोच माल विकुन नफा कमवित असतील तर ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 2 (ड) (i) नुसार व्यवसायीक तत्वावर अर्जदार हे ग्राहक होऊ शकत नाही व अर्जदार हे ग्राहक नसतील तर या मंचास कार्यक्षेत्र येणार नाही म्हणुन कमर्शियल ट्रांजक्शन या मुद्यावर अर्जदार हे ग्राहक होऊ शकत नाहीत या मुद्यावर अर्जदाराचा तक्रारअर्ज खारीज करण्यात येतो. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजुर करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह राणे) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार, लघुलेखक. |