::: नि का ल प ञ :::
(मंचाचे निर्णयान्वये, अधि.वर्षा जामदार मा.सदस्या )
(पारीत दिनांक : 22.04.2013)
1. अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. गै.अ. क्रं. 1 ते 3 यांनी मौजा र्बोर्डा येथिल भुमापन क्रं. 1/13 व 1/17 ही शेतजमिन खरेदी केली, व मा.उपविभागीय अधिकारी वरोरा यांचे कार्यालयातुन रा मा क्रं. 80/ N A P 34/2004- 2005 दि. 21/11/2012 च्या आदेशान्वये अकषक करुन घेण्यात आली. गै.अ.नी सदर शेतात भुखंड पाडले व ते भुखंड विक्रीस काढले. अर्जदाराने सदर भुखंडा मधील भुखंड क्रं. 58 हयाचे क्षेञफळ 173.75 चौ.मिटर होते. गै.अ. क्रं. 4 मार्फत नोंदणी क्रं.1829/2011 दि. 15/06/2011 रोजी विकत घेतला. सदर विक्रीचे वेळीस ले-आऊट मधील विद्युत पुरविण्याची व्यवस्था केली जाईल असे गै.अ.क्रं. 2 ते 4 यांनी अर्जदारांना सांगितले होते. गै.अ.नी सदर भुखंडाला अकषक परवानगी मिळाल्यानंतर त्या आदेशाच्या अटी व शर्तीनुसार तुमचे खर्चाने पाणी, विद्युत, रस्ते, नाल्या व खाली जागा विकसित करण्याच्या अटी दिलेल्या होत्या व त्या अटी पूर्ण करणे आवश्यक होत्या. अर्जदाराने भुखंड क्रं. 58 च्या विक्रीच्या वेळेस सदर ले-आऊट मध्ये विद्युत व्यवस्था न झाल्याबद्दल क्रं. 2 ला सुचित केले. गै.अ.नी सदर व्यवस्था लवकरच करुन देण्यात येईल असे अर्जदाराना सांगितले. त्यानंतर अर्जादाराने वेळोवेळी विद्युत पुरवठयाबाबत तिन्ही गै.अ.ना विनंती केली परंतु तिघांनीही त्याबाबतीत वेगवेगळी कारणे दाखवून चालढकल केली व टाळाटाळीचे धोरण कायम ठेवले. गै.अ.च्या टाळाटाळीच्या धोरणामुळे अर्जदारानी सदर प्लॉट वर बांधलेल्या घरात विद्युत पुरवठा घेण्यासाठी अडथळा निर्माण झालेला आहे. सदर अभिन्यासातील अकषक मंजुरी घेतांना लावण्यात आलेल्या अटी व शर्तीचे गै.अ.नी पालन केले नाही. त्यामुळे तिघेही गै.अ.योग्य त्या महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियमाच्या उपबंधामुळे घालुन दिलेल्या शिक्षेस व कार्यवाहीस पाञ आहे. गै.अ.नी अर्जदाराची फसवणुक केलेली असून त्याचा ग्राहक म्हणून असलेल्या कायदेशिर अधिकार व हक्कांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे अर्जदाराला मानसिक ञास झाला व त्यासाठी गै.अ. जबाबदार आहे. गै.अ.ना अधि.आर.आर.नकबे यांचे मार्फत दि.27/02/2012 ला सुचनापञ पाठविण्यात आले. परंतु सुचनापञ मिळूनही गै.अ.नी त्याची दखल घेतली नाही. अर्जदाराला विद्युत पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचे घरी अंधाराचे साम्राज्य आहे. अर्जदाराकडे विज व्यवस्था नसल्यामुळे अर्जदाराला जिवन जगणे कठिन झालेले आहे. त्यासाठी गै.अ.जबाबदार आहे. म्हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन प्लॉट क्रं. 58 भुमापन क्रं. 1/13 व 1/17 मॉजा बोर्डा येथे विज व्यवस्था करण्याचे निर्देश गै.अ. ला दयावे द्यावे मागणी केली. तसेच आर्थिक व मानसिक ञासापोटी गै.अ.कडून रु.1,00,000/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च व मोबदला मिळावा अशीही मागणी अर्जदाराने केलेली आहे.
2. अर्जदाराने आपल्या तक्रारी सोबत निशाणी क्रं. 5 नुसार 5 दस्ताऐवज दाखल केलेले आहे.
3. अर्जदाराची तक्रार दाखल करुन गै.अ.विरुध्द नोटीस काढण्यात आले. व गै.अ.क्रं. 1 ते 3 यांनी हजर होवून निशाणी क्रं. 17 नुसार आपले लेखी उत्तर प्राथमिक आक्षेपासह दाखल केले. गै.अ.क्रं. 1 ते 3 चे म्हणणे नुसार सदर तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडले नाही, व दाखल दस्ताऐवजावरुन कोणते कारण घडले याचा बोध होत नाही. त्यामुळे प्राथमिक द़ृष्टया तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. तसेच अर्जदार व गै.अ.क्रं. 1 ते 3 यांच्यामध्ये कोणताही ग्राहक वाद नसुन अर्जदार यांचा ग्राहक नाही तथा या गै.अ.नी अर्जदारास कोणतीही सेवा अथवा वस्तु विक्री केली नाही अथवा विक्री करण्याचे कबुल केले नाही. गै.अ.क्रं. 2 हा गै.अ. क्रं. 4 चा पति आहे. तथा गै.अ.क्रं.1 व 3 हे गै.अ. क्रं. 2 व गै.अ. क्रं. 4 चे स्नेही आहेत. म्हणून गै.अ.विरुध्द ग्राहक वाद दाखल करण्याकरीता कारण होवू शकत नाही. गै.अ.क्रं. 1 ते 3 यांचे दरम्यान ग्राहक नाते नसल्यामुळे सदर तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. तसेच अर्जदाराचे म्हणणे की गै.अ.नी अर्जदाराची फसवणुक केली त्यामुळे फसवणुकी बाबतचे दावे ग्राहक न्यायालयात चालु शकत नाही हया कारणाने सुध्दा सदर तक्रार प्राथमिक द्रृष्टया खारीज होण्यास पाञ आहे. गै.अ.क्रं. 1 ते 3 नी आपल्या लेखीउत्तरात असे म्हटले आहे की, भुखंड क्रं. 58 च्या खरेदी विक्रीशी गै.अ.चा काहीही संबंध नाही. गै.अ.नी सदर शेतजमीन त्याचे मालकीचे बाबत असल्याचे अमान्य केले आहे. त्यामुळे गै.अ.ने कोणतीही सुविधा अर्जदाराना उपलब्ध करुन देण्याचा व भुखंड विकसित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गै.अ.ला खोटा व चुकीचा नोटीस पाठविण्यात आलेला आहे. त्यामुळे गै.अ.ने त्याची दखल घेतलेली नाही. भुखंड खरेदी केल्यानंतर त्या भुखंडावर घर बांधल्यानंतर विज कनेक्शन देण्याची जबाबदारी ही मालकाची असते. तसेच विज कंपनीने मालकास विज कनेक्शन देण्यास नकार दिल्यास तर विज कंपनी विरुध्द दाद मागता येईल. कायदेशिर बाबींची पूर्तता केल्याशिवाय विज कंपनी सुध्दा ग्राहकांना विज कनेक्शन देत नाही. अर्जदारानी विज कनेक्शन मिळण्याकरीता विज कंपनीकडे काय पाठपुरावा केला याबाबत कोणताही पुरावा अर्जदाराने सादर केलेला नाही. अर्जदाराने मुद्दाम ञास देण्यासाठी गै.अ.विरुध्द खोटी तक्रार दाखल केलेली आहे. अशा परिस्थितीत या गै.अ.विरुध्द अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे. अर्जदाराने विद्यमान मंचाचा दुरुपयोग करुन कोणतेही कारण नसतांना विनाकारण या गै.अ. विरुध्द खोटी तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे गै.अ. क्रं. 1 ते 3 यांना कलम 26 अन्वये रु.10,000/- नुकसान भरपाई दाखल दयावे असा आदेश अर्जदाराविरुध्द पारीत करण्याची मागणी गै.अ. क्रं 1 ते 3 यांनी केलेली आहे. गै.अ. क्रं. 4 यांनी निशाणी क्रं. 18 नुसार प्राथमिक आक्षेपासह आपले लेखीउत्तर दाखल केले आहे. त्यांनी गै.अ. क्रं. 1 ते 3 नी घेतलेला प्राथमिक आक्षेप आपल्या उत्तरात नोंदविला आहे. गै.अ.क्रं.4 यांनी दि. 20/12/2007 रोजी गै.अ. क्रं.1 कडून सदर भुखंड खरेदी केल्याचे मान्य केले आहे. परंतु अर्जदाराने ज्यावेळी भुखंड खरेदी केला तेव्हा सदर भुखंडाचा विकास करुन देण्याचे कोणतेही आश्वासन दिलेले नव्हते व नाही. गै.अ. क्रं.4 यांनी अर्जदारास करुन दिलेल्या विक्रीपञाचा गै.अ.क्रं. 1 ते 3 यांच्याशी कोणताही संबंध नाही. या गै.अ.स शेतजमिन अकषक वापरण्याकरीता कोणताही आदेश प्राप्त झाला नाही. अथवा या गै.अ.च्या विनंती वरुन सक्षम अधिका-यांनी असा कोणताही आदेश पारीत केलेला नाही या गै.अ.ने सदर भुखंड खरेदी केला व दुसरी चांगली जागा घर बांधण्यासाठी उपलब्ध झाल्यामुळे अर्जदाराच्या विनंतीवरुन योग्य मोबदला घेवून भुखंड विकला आहे. त्यामुळे कोणत्याही अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला नाही. दि.21/11/2005 रोजी पारीत झालेल्या आदेशाची अटी व शर्ती पूर्ण झाल्या की नाही याची शहानिशा करण्याची जबाबदारी भुखंड खरेदी करते वेळी अर्जदाराची होती. या गै.अ.ने अर्जदाराला कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी मागणी गै.अ.क्रं. 4 ने केलेली आहे. गै.अ.ने अर्जदाराचे इतर सर्व कथन पूर्णतः नाकारले आहे. तसेच कलम 26 अन्वये रु.10,000/- नुकसान भरपाई देण्याचा आदेश अर्जदारावर व्हावा अशी मागणी केलेली आहे.
4. अर्जदाराने निशाणी क्रं. 20 नुसार शपथपञ दाखल केलेले आहे. तसेच गै.अ.क्रं. 1 ते 3 यांनी निशाणी क्रं. 22 वर शपथपञ दाखल केले आहे. गै.अ.क्रं.4 ने निशाणी क्रं. 23 वर शपथपञ दाखल केलेले आहे. अर्जदाराने निशाणी क्रं. 24 वर तक्रारीत प्रार्थना क्रं. 1 ची मागणी पूर्ण झाल्याबद्दलची पुरसीस दाखल केलेली आहे.
5. वरील तक्रारीच्या कथनावरुन व दाखल केलेल्या दस्ताऐवजा वरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
6. अर्जदाराने गै.अ.क्रं. 4 यांचे कडून विक्रीपञाव्दारे भुखंड क्रं. 58 खरेदी केला परंतु गै.अ.ने अकषक परवानगी आदेश दि. 21/11/2005 च्या अटी व शर्तीनुसार अर्जदाराच्या अभिन्यासात विद्युत प्रवाहासाठी सोय करुन दिली नाही. अर्जदाराची मागणी क्रं. 1 नि. 24 नुसार संपुष्टात आली आहे. विद्युत पुरवठा ही जिवनावश्यक बाब असल्यामुळे स्वतःच ही बाब पूर्ण करुन घेतली आहे. त्यामुळे अर्जदारानी केलेली मागणी क्रं. 1 अर्थहिन झाली आहे. परंतु अर्जदाराने मानसिक व आर्थिक ञासाबद्दल मागणी कायम ठेवली आहे.
7. अर्जदाराने निशाणी क्रं. 24 वरील पुरशीस मध्ये प्रार्थना क्रं.1 ची मागणी ची पूर्तता स्वतःच करुन घेतल्याबद्दल म्हटले आहे. अर्जदाराने गै.अ.शी 2005 मध्ये करार केला. त्यानंतर दि.15/06/2011 ला विक्री झालेली आहे. करारा पासुन ते विक्री पर्यंत त्याठिकाणी विद्युत प्रवाहाची सोय करुन देण्यात आली नव्हती. अर्जदाराला विक्रीचे वेळी हया गोष्टीची पूर्ण कल्पना होती. तरी ही अर्जदाराने मोबदला देवून विक्री करुन घेतली. त्यानंतर दि. 22/03/2012 ला अर्जदाराने तक्रार दाखल करुन विद्युत प्रवाहाची सोय करण्याची मागणी केली आहे. मधल्या एक वर्षात अर्जदाराने योग्य खात्याच्या योग्य अधिका-यांकडे मागणी केल्या बद्दल एकही दस्ताऐवज रेकॉर्डवर नाही. त्यामुळे विद्युत प्रवाह सुरु करण्याबाबत अर्जदाराने स्वतः प्रयत्न केल्याचे दिसत नाही. अशा परिस्थितीत अर्जदाराने प्रयत्न केल्यानंतर अर्जदाराचा पुरवठा सुरु झाल्याचे अर्जदारानेच मान्य केले आहे. त्यामुळे अर्जदाराला विद्युत पुरवठा न सुरु होण्याबद्दल गै.अ. जबाबदार असल्याचे दिसुन येत नाही. उलट पक्षी अर्जदाराने सन 2011 पासुन हे प्रयत्न केले असते तर अर्जदाराला विद्युत पुरवठा वेळीच उपलब्ध झाला असता. म्हणून अर्जदाराची मानसिक, आर्थिक ञासापोटीची मागणी अमान्य करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
1) अर्जदाराची तक्रार खारीज.
2) अर्जदार व गैरअर्जदार यांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
चंद्रपूर.
दिनांक :22/04/2013