Maharashtra

Chandrapur

CC/12/68

Janardhan Ramchandra Gedam - Complainant(s)

Versus

Maya Ashok Sontakke - Opp.Party(s)

Adv Kirti Gadgil

22 Apr 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/65
 
1. Vijay Ganpatrao Randaye
R/o Ashok Vihar Colony,(Borda) Warora Tah Warora
Chandrapur
M.S.
...........Complainant(s)
Versus
1. Maya Ashok Sontakke
Abyankar ward,Warora Tah Warora
Chandrapur
M.S.
2. Parag Govindrao Pattiwar
Malviya Ward,Warora
Chandrapur
M.S.
3. Vilas baburaoji Pidurkar
Datta Mandir ward,Warora
Chandrapur
M.S.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/66
 
1. Arun Shamrao Junghare
Karmvir Ward,Warora
Chandrapur
M.S.
...........Complainant(s)
Versus
1. Maya Ashok Sonattake
Abhyankar ward,Warora
Chandrapur
M.S.
2. Parag Govindrao Pattiwar
Malviya Ward,Warora
Chandrapur
M.S.
3. Vilas Baburaoji Pidurkar
Datta Ward,Warora,
Chandrapur
M.S.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/67
 
1. Vinod Namdeo Pimpalkar
R/o Ashok Vihar Colony,(Borda) Warora Tah Warora
Chandrapur
M.S.
...........Complainant(s)
Versus
1. Maya Ashok Sontakke
Abhyankar Ward,Warora
Chandrapur
M.S.
2. Parag Govindrao Pattiwar
Malviya Ward,Warora
Chandrapur
M.S.
3. Vilas Baburaoji Pidurkar
Datta Mandir Ward,Warora
Chandrapur
M.S.
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/12/68
 
1. Janardhan Ramchandra Gedam
R/o Ashok Vihar Colony,(Borda) Warora Tah Warora
Chandrapur
M.S.
...........Complainant(s)
Versus
1. Maya Ashok Sontakke
Abhyankar Ward,Warora
Chandrapur
M.S.
2. Parag Govindrao Pattiwar
Malviya Ward,Warora
Chandrapur
M.S.
3. Vilas Baburaoji Pidurkar
Datta Mandir Ward,Warora
Chandrapur
M.S
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. SHRI. MILIND B. PAWAR (HIRGUDE) PRESIDENT
 HON'ABLE MR. SHRI R.L.BOMIDWAR MEMBER
 HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

         ::: नि का ल  प ञ   :::

         (मंचाचे निर्णयान्वये, अधि.वर्षा जामदार मा.सदस्‍या )   

                           (पारीत दिनांक : 22.04.2013)

 

1.     अर्जदाराी सदर तक्रारी, ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये अर्ज दाखल केल्‍या आहे. वरील सर्व तक्रारकर्त्‍यांनी सारख्‍याच व्‍यक्‍तींना गै.अ.क्र.1, 2 व 3 म्‍हणून सामील केलेले आहे. सर्व तक्रारी मधील तपशीलाचा भागात काही फरक वगळता बहुतांश वस्‍तुस्थिती आणि कायदेविषयक बाबी समान आहेत. म्‍हणून ह्या सर्व तक्रारींचा एकञितपणे निर्णय देण्‍यात येत आहे. तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.   गै.. क्रं. 1 ते 3 यांनी मौजा र्बोर्डा येथिल भुमापन क्रं. 1/13 1/17 ही शेतजमिन खरेदी केली, मा.उपविभागीय अधिकारी वरोरा यांचे कार्यालयातुन रा मा क्रं. 80/ N A P 34/2004- 2005 दि. 21/11/2012  च्‍या आदेशान्‍वये अकषक करुन घेण्‍यात आली. गै.अ.नी सदर शेतात भुखंड पाडले व ते भुखंड विक्रीस काढले. अर्जदार क्रं. 1 ते 4 यांनी अनुक्रमे खालील प्रमाणे भुखंड खरेदी केले.

 

अर्जदार क्रं. 1   भुखंड क्रं. 12   क्षेञफळ  150.00 चौ.मी. विक्रीपञ क्रं.1226 दि.14/06/07

अर्जदार क्रं. 2   भुखंड क्रं. 11   क्षेञफळ  151.87 चौ.मी. विक्रीपञ क्रं.2125 दि.15/12/06

अर्जदार क्रं. 3   भुखंड क्रं. 10   क्षेञफळ  153.35 चौ.मी. विक्रीपञ क्रं 2096 दि.20/12/05

अर्जदार क्रं. 4   भुखंड क्रं. 21   क्षेञफळ  150.00 चौ.मी. विक्रीपञ क्रं 1506 दि.24/07/06

 

2.    सदर विक्रीचे वेळीस ले-आऊट मधील विद्युत पुरविण्‍याची व्‍यवस्‍था केली जाईल असे गै.अ.क्रं. 1 ते 3 यांनी अर्जदारांना सांगितले होते. गै.अ.नी सदर भुखंडाला अकषक परवानगी मिळाल्‍यानंतर त्‍या आदेशाच्‍या अटी व शर्तीनुसार तुमचे खर्चाने पाणी, विद्युत, रस्‍ते, नाल्‍या व खाली जागा विकसित करण्‍याच्‍या अटी दिलेल्‍या होत्‍या व त्‍या अटी पूर्ण करणे आवश्‍यक होत्‍या. अर्जदारानी भुखंडाच्‍या विक्रीच्‍या वेळेस सदर ले-आऊट मध्‍ये विद्युत व्‍यवस्‍था न झाल्‍याबद्दल क्रं. 2 ला सुचित केले. गै.अ.नी सदर व्‍यवस्‍था लवकरच करुन देण्‍यात येईल असे अर्जदाराना सांगितले. त्‍यानंतर अर्जादाराने वेळोवेळी विद्युत पुरवठयाबाबत तिन्‍ही गै.अ.ना विनंती केली परंतु तिघांनीही त्‍याबाबतीत वेगवेगळी कारणे दाखवून चालढकल केली व टाळाटाळीचे धोरण कायम ठेवले. गै.अ.च्‍या टाळाटाळीच्‍या धोरणामुळे अर्जदारानी सदर प्‍लॉट वर बांधलेल्‍या घरात विद्युत पुरवठा घेण्‍यासाठी अडथळा निर्माण झालेला आहे. सदर अभिन्‍यासातील अकषक मंजुरी घेतांना लावण्‍यात आलेल्‍या अटी व शर्तीचे गै.अ.नी पालन केले नाही. त्‍यामुळे तिघेही गै.अ.योग्‍य त्‍या महाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियमाच्‍या उपबंधामुळे घालुन दिलेल्‍या शिक्षेस व कार्यवाहीस पाञ आहे. गै.अ.नी अर्जदारांची फसवणुक केलेली असून त्‍याचा ग्राहक म्‍हणून असलेल्‍या कायदेशिर अधिकार व हक्‍कांचे उल्‍लंघन केले आहे. त्‍यामुळे अर्जदारांना मानसिक ञास झाला व त्‍यासाठी गै.अ. जबाबदार आहे. गै.अ.ना सुचनापञ पाठविण्‍यात आले. परंतु सुचनापञ मिळूनही गै.अ.नी त्‍याची दखल घेतली नाही. अर्जदारांना विद्युत पुरवठा उपलब्‍ध न झाल्‍यामुळे त्‍यांचे घरी अंधाराचे साम्राज्‍य आहे. अर्जदारांकडे विज व्‍यवस्‍था नसल्‍यामुळे अर्जदारांना जिवन जगणे कठिन झालेले आहे.  त्‍यासाठी गै.अ.जबाबदार आहे. म्‍हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन भुखंड क्रं. 1/13 व 1/17 येथिल  भुखंड क्रं. 12, 11, 10, 21 मौजा बोर्डा येथे विज व्‍यवस्‍था करण्‍याचे निर्देश गै.अ. ला दयावे अशी मागणी केली. तसेच आर्थिक व मानसिक ञासापोटी गै.अ.कडून रु.1,00,000/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च व मोबदला मिळावा अशीही मागणी अर्जदारांनी केलेली आहे. 

 

3.    अर्जदाराने आपल्‍या तक्रारी सोबत निशाणी क्रं. 5 नुसार 5 दस्‍ताऐवज दाखल केलेले आहे.

 

4.    अर्जदाराची तक्रार दाखल करुन गै.अ.विरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. व गै.अ.क्रं. 1 ते 3 यांनी हजर होवून प्रत्‍येक प्रकरणात निशाणी क्रं. 16 नुसार आपले लेखी उत्‍तर प्राथमिक आक्षेपासह दाखल केले. गै.अ.क्रं. 1 ते 3 चे म्‍हणणे नुसार सदर तक्रार दाखल करण्‍याचे कोणतेही कारण घडले नाही,  व दाखल दस्‍ताऐवजावरुन कोणते कारण घडले याचाही बोध होत नाही.  त्‍यामुळे प्राथमिक द़ृष्‍टया तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे. तसेच अर्जदार व गै.अ.क्रं. 1 ते 3 यांच्‍यामध्‍ये कोणताही ग्राहक वाद नसुन अर्जदार यांचा ग्राहक नाही तथा या गै.अ.नी अर्जदारांना कोणतीही सेवा अथवा वस्‍तु विक्री केली नाही अथवा विक्री करण्‍याचे कबुल केले नाही. गै.अ.क्रं. 1 ते 3 यांचे दरम्‍यान ग्राहक नाते नसल्‍यामुळे सदर तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे. तसेच अर्जदाराचे म्‍हणणे की गै.अ.नी अर्जदारांची फसवणुक केली त्‍यामुळे फसवणुकी बाबतचे दावे ग्राहक न्‍यायालयात चालु शकत नाही हया कारणाने सुध्‍दा सदर तक्रार प्राथमिक द्रृष्‍टया खारीज होण्‍यास पाञ आहे. गै.अ.क्रं. 1 ते 3 नी आपल्‍या लेखीउत्‍तरात असे म्‍हटले आहे की, सदर भुखंडाच्‍या खरेदी विक्रीशी गै.अ.चा काहीही संबंध नाही. गै.अ.नी सदर शेतजमीन त्‍याचे मालकीचे बाबत असल्‍याचे अमान्‍य केले आहे. त्‍यामुळे गै.अ.ने कोणतीही सुविधा अर्जदाराना उपलब्‍ध करुन देण्‍याचा व भुखंड विकसित करण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. गै.अ.ला खोटा व चुकीचा नोटीस पाठविण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे गै.अ.ने त्‍याची दखल घेतलेली नाही. भुखंड खरेदी केल्‍यानंतर त्‍या भुखंडावर घर बांधल्‍यानंतर विज कनेक्‍शन देण्‍याची जबाबदारी ही मालकाची असते. तसेच विज कंपनीने मालकास विज कनेक्‍शन देण्‍यास नकार दिल्‍यास तर विज कंपनी विरुध्‍द दाद मागता येईल. कायदेशिर बाबींची पूर्तता केल्‍याशिवाय विज कंपनी सुध्‍दा ग्राहकांना विज कनेक्‍शन देत नाही. अर्जदारानी विज कनेक्‍शन मिळण्याकरीता विज कंपनीकडे काय पाठपुरावा केला याबाबत कोणताही पुरावा अर्जदारांनी सादर केलेला नाही. अर्जदारांनी मुद्दाम ञास देण्‍यासाठी गै.अ.विरुध्‍द खोटी तक्रार दाखल केलेली आहे. अशा परिस्थितीत या गै.अ.विरुध्‍द अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज होण्‍यास पाञ आहे. अर्जदारांनी विद्यमान मंचाचा दुरुपयोग करुन कोणतेही कारण नसतांना विनाकारण या गै.अ. विरुध्‍द खोटी तक्रार दाखल केलेली आहे. त्‍यामुळे गै.अ. क्रं. 1 ते 3 यांना कलम 26 अन्‍वये रु.10,000/- नुकसान भरपाई दाखल दयावे असा आदेश अर्जदारांविरुध्‍द पारीत करण्‍याची मागणी गै.अ. क्रं 1 ते 3 यांनी केलेली आहे. गै.अ.नी कोणत्‍याही अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केलेला नाही. दि.21/11/2005 रोजी पारीत झालेल्‍या आदेशाची अटी व शर्ती पूर्ण झाल्‍या की नाही याची शहानिशा करण्‍याची जबाबदारी भुखंड खरेदी करते वेळी अर्जदारांची होती. या गै.अ.ने अर्जदारांना कोणतीही न्‍युनतापूर्ण सेवा दिलेली नाही.

 

5.    अर्जदारांनी प्रत्‍येक प्रकरणात निशाणी क्रं. 18 नुसार शपथपञ दाखल केलेले आहे. तसेच गै.अ.क्रं. 1 ते 3 यांनी निशाणी क्रं. 20 वर शपथपञ दाखल केले आहे. अर्जदारांनी निशाणी क्रं. 21 वर तक्रारीत प्रार्थना क्रं. 1 ची मागणी पूर्ण झाल्‍याबद्दलची पुरसीस दाखल केलेली आहे.

 

6.    वरील तक्रारीच्‍या कथनावरुन व दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजा वरुन खालील कारणे व निष्‍कर्ष निघतात.

               // कारणे व निष्‍कर्ष //

 

7.    अर्जदारांनी गै.अ.क्रं. 1 ते 3 यांचे कडून विक्रीपञाव्‍दारे भुखंड खरेदी केले परंतु गै.अ.ने अकषक परवानगी आदेश दि. 21/11/2005 च्‍या अटी व शर्तीनुसार अर्जदाराच्‍या अभिन्‍यासात विद्युत प्रवाहासाठी सोय करुन दिली नाही. अर्जदारांची मागणी क्रं. 1 नि. 21 नुसार संपुष्‍टात आली आहे. विद्युत पुरवठा ही जिवनावश्‍यक बाब असल्‍यामुळे स्‍वतःच ही बाब पूर्ण करुन घेतली आहे. त्‍यामुळे अर्जदारांनी केलेली मागणी क्रं. 1 अर्थहिन झाली आहे. परंतु अर्जदारांनी मानसिक व आर्थिक ञासाबद्दल मागणी कायम ठेवली आहे.

 

8.    अर्जदारांनी निशाणी क्रं. 21 वरील पुरशीस मध्‍ये प्रार्थना क्रं.1 ची मागणी ची पूर्तता स्‍वतःच करुन घेतल्‍याबद्दल म्‍हटले आहे. अर्जदारांनी गै.अ.शी 2005 मध्‍ये करार केला. त्‍यानंतर विक्री झालेली आहे. करारा पासुन ते विक्री पर्यंत त्‍याठिकाणी विद्युत प्रवाहाची सोय करुन देण्‍यात आली नव्‍हती.  अर्जदारांना विक्रीचे वेळी हया गोष्‍टीची पूर्ण कल्‍पना होती.  तरी ही अर्जदारांनी मोबदला देवून विक्री करुन घेतली.  तसेच विक्रीनंतरही बराच काळ लोटला असताना अर्जदारांनी विद्युत पुरवठा मिळवून घेण्‍यासाठी केलेल्‍या प्रयत्‍नांचे कोणतेही दस्‍ताऐवज किंवा पुरावे तक्रारीत दाखल नाही. त्‍यानंतर दि. 22/03/2012 ला अर्जदारांनी तक्रार दाखल करुन विद्युत प्रवाहाची सोय करण्‍याची मागणी केली आहे. मधल्‍या काळात अर्जदारांनी योग्‍य खात्‍याच्‍या योग्‍य अधिका-यांकडे मागणी केल्‍या बद्दल एकही दस्‍ताऐवज रेकॉर्डवर नाही. त्‍यामुळे विद्युत प्रवाह सुरु करण्‍याबाबत अर्जदारांनी स्‍वतः प्रयत्‍न केल्‍याचे दिसत नाही.  अशा परिस्थितीत अर्जदारांनी प्रयत्‍न केल्‍यानंतर अर्जदारांचा पुरवठा सुरु झाल्‍याचे अर्जदारांनीच मान्‍य  केले आहे. त्‍यामुळे अर्जदारांचा विद्युत पुरवठा न सुरु होण्‍याबद्दल गै.अ. जबाबदार असल्‍याचे दिसुन येत नाही. उलट पक्षी अर्जदारांनी तसे प्रयत्‍न पूर्वीच केले असते तर अर्जदारांना विद्युत पुरवठा वेळीच उपलब्‍ध झाला असता. म्‍हणून अर्जदारांची मानसिक, आर्थिक ञासापोटीची मागणी अमान्‍य करण्‍यात येत आहे.

                     

                       // अंतिम आदेश //

              1)      अर्जदारांची तक्रार खारीज.

              2)      सर्व पक्षांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.

 

 

 

चंद्रपूर.

‌दिनांक :22/04/2013

 
 
[HON'ABLE MR. SHRI. MILIND B. PAWAR (HIRGUDE)]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. SHRI R.L.BOMIDWAR]
MEMBER
 
[HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.