(मा.सदस्या, अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवालाकडून विमाक्लेमपोटी रक्कम रु.5,00,000/- मिळावेत, या रकमेवर दि.02/01/2010 पासून संपुर्ण रक्कम वसूल होईपर्यंत 18% दराने व्याज मिळावे, शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.5,00,000/- तसेच अर्जाचा खर्च व नोटीस खर्च रक्कम रु.50,000/- मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांनी योग्य त्या मुदतीत म्हणणे दाखल केले नाही म्हणून त्यांचे विरुध्द म्हणणे दाखल नाही असे आदेश दि.31/12/2011 रोजी करण्यात आले.
अर्जदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दें विचारात घेतले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? - होय
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे
काय?-होय.
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमापॉलिसीपोटी रक्कम वसूल
होवून मिळण्यास पात्र आहेत काय?-होय.
4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी
रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?-होय.
3) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः
मंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
या कामी अर्जदार व सामनेवाला यांचेवतीने युक्तीवाद करण्यात आलेला नाही.
अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून लाईफ पार्टनर प्लस पॉलिसी घेतलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.13 लगत पॉलिसी शेडयुल व पान क्र.14 लगत विमा प्रिमीयम रिसीट यांच्या झेरॉक्स प्रती हजर केलेल्या आहेत. सदर विमा पॉलीसी घेतल्याची बाब सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे सादर करुन नाकारलेली नाही. पान क्र.13 लगतचे पॉलिसी शेडयुल व पान क्र.14 लगतची विमा प्रिमीयम रिसीट यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचे तक्रार अर्जातील व प्रतिज्ञापत्रामधील हकीकत सामनेवाला यांनी नाकारलेली नाही तसेच अर्जदार यांनी पान क्र.5 ते पान क्र.36 लगत दाखल केलेले सर्व कागदपत्र सामनेवाला यांनी नाकारलेले नाहीत. अर्जदार यश कन्स्ट्रक्शन व लॅण्ड डेव्हलपमेंट कंपनी यांचे एक भागीदार श्री. संजय सावळेराम बारे यांचा दि.02/01/2010 रोजी मृत्यु झालेला आहे ही बाब पान क्र.18 ते पान क्र.31 लगतचे पोलिसांचेकडील कागदपत्रावरुन स्पष्ट झालेली आहे. वास्तविक विमापॉलिसीप्रमाणे सामनेवाला यांनी अर्जदार यांना भागीदार श्री.संजय सावळेराम बारे यांचे मृत्युनंतर रक्कम मंजूर करणे गरजेचे होते परंतु सामनेवाला यांनी अर्जदार यांना विमाक्लेमपोटी कोणतीही रक्कम मंजूर केलेली नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
पान क्र.13 चे पॉलिसीनुसार पॉलिसी धारकास किंवा भागीदाराचा मृत्यु झाल्यास रक्कम रु.5,00,000/- देय होत आहेत. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी रक्कम रु.5,00,000/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमची रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवाला विरुध्द या मंचामध्ये दाद मागावी लागलेली आहे. यामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे तसेच अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यात.
2अ) विमा पॉलिसीपोटी रक्कम रु.5,00,000/- द्यावेत.
2ब) मानसिक त्रासापोटी रु.15,000/- द्यावेत.
2क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत.