Maharashtra

Nagpur

CC/11/53

Ajay Bhimraj Manapure - Complainant(s)

Versus

Max New York Life Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv. Govind Gurve

23 Nov 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/53
 
1. Ajay Bhimraj Manapure
Plot No. 33, Tapasya Bhwan, Nav Nirman Society, Pratap Nagar
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Max New York Life Insurance Co.Ltd.
Plot No. 90 A, Sector- 18, Udyog Vihar,
Gudgaon
Haryana
2. Manager, Max New York Life Insurance Co.
Civil Lines, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्री.नरेश बनसोड, मा. सदस्‍य यांचे कथनांन्‍वये. 
 
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 23/11/2011)
1.           तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदार विरुध्‍द दाखल केलेली असून, मागणी केली आहे की, अपघात विमा मोबदला 15 दिवसाचे आत द्यावा व एकूण रक्कम रु.2,70,000/- तक्रार दाखल दिनांकापासून 12 टक्‍के व्‍याजासह गैरअर्जदारांनी द्यावे.
 
2.          तक्रारकर्त्‍याचे कथन असे आहे की, त्‍यांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडून दि.25.11.2008 रोजी रु.6,00,000/- चा विमा रु.1745.96 विमा प्रीमीयम भरुन पॉलिसी क्र. 374947950 अन्‍वये 20 वर्षाकरीता काढला होता. दि.08.05.2010 रोजी रात्री तक्रारकर्ता आपल्‍या स्‍कूटी वाहनाने घरी जात असतांना, त्‍यांचे वाहनावर एक दोन चाकी वाहन येऊन आदळल्‍याने तक्रारकर्ता डिवायडरवर सरपटत जाऊन पडला. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे दोन्‍ही पायांना जबदरस्‍त मार लागला. लोकांनी त्‍याला होप हॉस्‍पीटल, धंतोली येथे औषधोपचाराकरीता भरती केले. दि.15.05.2010 ला धंतोली पोलीस ठाण्‍यात याबाबत एफ.आय.आर नोंदविण्‍यात आला.
 
3.          तक्रारकर्त्‍याला पायाला मार लागल्‍याने, डाव्‍या पायाला फ्रॅक्‍चर Left hip dislocation with compound comminuted fracture shaft of right femur  झाले होते. त्‍यामुळे औषधोपचाराकरीता 15 ते 20 दिवस ऑपरेशन झाल्‍यावर औषधोपचाराकरीता हॉस्‍पीटलमध्‍ये राहावे लागले व याकरीता एकूण दीड ते दोन लाख रुपये खर्च आला. तक्रारकर्ता सदर अपघातानंतर कायमच दोन्‍ही पायाने अपंग झाला. दि.05.07.2010 रोजी अपघात विमा मोबदला मिळण्‍याकरीता गैरअर्जदाराकडे अर्ज केला. परंतू तक्रारकर्त्‍याला गैरअर्जदारांनी अपघाताबाबत कोणताही विमा मोबदला दिला नाही. तक्रारकर्त्‍याचे मते गैरअर्जदाराची सदर कृती ही अनुचित व्‍यापार प्रणालीमध्‍ये मोडते व त्‍यांनी दिलेल्‍या सेवेत त्रुटी आहे. तक्रारीचे पुष्‍टयर्थ तक्रारकर्त्‍याने एकूण 6 दस्‍तऐवज दाखल केले असुन त्‍यामध्‍ये पोलिस स्‍टेशनच्‍या एफ.आय.आर प्रत, औषधोपचाराबाबतची कागदपत्रे, गैरअर्जदाराचे पत्र इ. चा समावेश आहे.
 
4.          सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना प्राप्‍त झाल्‍यावर त्‍यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दस्‍तऐवजासह दाखल केले व प्राथमिक आक्षेपात नमूद केले आहे की, तक्रारकर्त्‍याची तक्रार खोटी असून ग्रा.सं.का.चे कलम 26 अंतर्गत खारीज होण्‍यास पात्र आहे. तसेच गैरअर्जदाराच्‍या सेवेत कोणतीही त्रुटी नाही. तक्रारकर्त्‍याने 09.12.2009 चा विमा हप्‍ता भरलेला नाही, त्‍यामुळे 08.01.2010 रोजी पॉलिसी लोप पावली व तक्रारकर्त्‍याचा अपघात हा 08.05.2010 ला झाला, त्‍यामुळे त्‍याला कुठलेही संरक्षण विमा करारातील अटी व शर्तीच्‍या आधारे नसल्‍याने दावा नामंजूर करण्‍यात आला. तसेच सदर तक्रारीमध्‍ये किचकट प्रश्‍नांचे निर्धारण कण्‍याकरीता ग्रा.सं.का. आणि त्‍या अंतर्गत यंत्रणेचा प्रभावीपणे वापर होऊ शकत नाही. याबाबत गैरअर्जदाराने खालील निवाडे नमूद केले आहेत.
1] Oriental Insurance Company Ltd. Vs. Munimahesh Patel, 2006 (IV) CPJ 1
2] General Assurance Society Ltd. Vs. Chandumal Jail 1966 (3) SCR 500
3] Oriental Insurance Co. Ltd. Vs. Samayanallur Primary Agricultural Co-op. Bank, AIR 2000 SC 10
4] Polymat India P. Ltd. & anr. Vs. National Insurance Co. Ltd. & ors. AIR 2005 SC 286
 
5.          आपल्‍या सविस्‍तर उत्‍तरात गैरअर्जदाराने नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने लाईफ-लाईन – सेफ्टी नेट प्‍लॅन रु.6,00,000/- आश्‍वासित विमाकरीता, प्रस्‍ताव अर्ज क्र. 374947950 द्वारे घेतला. रु.1745.96 विमा हप्‍ता अर्ध-वार्षिक पध्‍दतीने भरावयाचा होता. प्रस्‍ताव अर्जातील माहितीप्रमाणे तक्रारकर्त्‍याला पॉलिसी निर्गमित करण्‍यात आली होती. तक्रारकर्त्‍याला देय असलेल्‍या विमा हप्‍त्‍यासाठी नुतनीकरणाकरीता स्‍मरणपत्र पाठविले होते. 24.05.2010 रोजी गैरअर्जदार यांना डिसएबिलीटी बेनीफीट क्‍लेम फॉर्म प्राप्‍त झाला व त्‍यासोबत तक्रारकर्त्‍याला hip dislocation & shaft fracture झाल्‍याचे निदान करण्‍यात आले. परंतू गैरअर्जदाराने, पॉलिसी पुर्नस्‍थापीत केली नसल्‍याने पॉलिसी लोप पावली व दावा नामंजूर केला. त्‍यामुळे त्‍यांची सेवेत कोणतीही त्रुटी किंवा कमतरता नाही, म्‍हणून सदर तक्रार खारीज करण्‍याची मागणी केली. 
 
6.          तक्रारकर्तीने प्रतीउत्‍तरात गैरअर्जदाराने 07.06.2010, 25.06.2010 प्रत्‍येकी 1,925/- विमा हप्‍त्‍याची रक्‍कम स्विकारली व म्‍हटले की, तक्रारकर्ता हा सदर पॉलिसी मुदतीत आहे.
-निष्‍कर्ष-
7.          मंचाने दोन्‍ही पक्षांचा युक्‍तीवाद ऐकला. कागदपत्रांचे अवलोकन केले असता दोन्‍ही पक्षात पॉलिसी क्र., पॉलिसी रक्‍कम, पॉलिसी दिनांक, अवधी व विमा प्रीमीयमबाबत वाद नाही. तसेच तक्रारकर्त्‍यांचा अपघात झाला, याबाबतसुध्‍दा दोन्‍ही पक्षात वाद नाही. गैरअर्जदारानुसार सदर पॉलिसीचा विमा हप्‍ता 09.12.2009 ला देय होता. परंतू तो त्‍यांनी भरलेला नाही. म्‍हणून गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍यास 14.12.2009 ला स्‍मरणपत्र पाठविले. तसेच तक्रारकर्त्‍याची विमा पॉलिसी ही लोप पावली आहे, म्‍हणून 08.01.2011 चे पत्राद्वारे कळविल्‍याचे पृष्‍ठ क 64 व 66 वरुन स्‍पष्‍ट होते. दाखल दस्‍तऐवजावरुन तक्रारकर्त्‍याने अपघातानंतर 07.06.2010 व 25.06.2010 ला विमा प्रीमीयमची रक्‍कम भरलेली दिसते. पॉलिसी अपघाताचेवेळी लोप पावली स्थितीत होती, या एकमेव गोष्‍टीसाठी गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारला. तक्रारकर्त्‍याचेनुसार अपघातासंबंधी व उपचारासाठी व रुग्‍णालयाचा खर्च म्‍हणून दीड लाख ते दोन लाख रुपयांचा खर्च आला असे तक्रारीत नमूद आहे व त्‍याकरीता तक्रारकर्त्‍याने पृष्‍ठ 18 वर रु.79,961/- ची बिले दाखल केली. परंतू दीड लाख ते दोन लाख रुपयांचा खर्च आला, याबाबतचे विस्‍तृत विवरण व बिले नाही. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे की, अपघातामध्‍ये दोन्‍ही पाय अपंग झालेले आहे. तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारास दाखल केलेले डिसएबीलीटी बेनीफीट क्‍लेमचा अर्ज 16 व 17 वर आहे. त्‍यात उपचार करणारे डॉक्‍टरांनी What is the prognosis that expected complete recovery  त्‍यामध्‍ये, तसेच तक्रारकर्त्‍यांना दोन्‍ही पयांना अपंगत्‍व आल्‍याबाबत प्राधिकृत अधिका-यांचे प्रमाणपत्र दाखल न केल्‍यामुळे पॉलिसीच्‍या अटी व शर्ती अंतर्गत तक्रारकर्ता या एकमेव कारणासाठी विमा दावा मिळण्‍यास पात्र नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. वरील विवेचनावरुन  मंचाचे स्‍पष्‍ट मत झाले आहे की, अपघातानंतर केलेल्‍या उपचारांनी तक्रारकर्त्‍याचे दोन्‍ही पाय पूर्ण दुरुस्‍त होणे अपेक्षीत होते असे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारकर्ता दोन्‍ही पायांनी अपंग झालेला आहे हे विधान Disability Certificate च्‍या अभावी पूर्णतः खोडसाळ स्‍वरुपाचे वाटते. म्‍हणून तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. करीता खालील आदेश.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.  
2)    उभय पक्षांनी आप-आपला खर्च सहन करावा लागला.
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.