Maharashtra

Nagpur

CC/10/709

Adv. Jeevan Renurao Patil - Complainant(s)

Versus

Max New York Life Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv. Bharat Borikar

27 Aug 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/709
 
1. Adv. Jeevan Renurao Patil
Awdhutwadi, Yawatmal
Yawatmal
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Max New York Life Insurance Co.Ltd.
Shri Arun V.Dabre, 25, Anujyoti, Sneha Nagar, Chhatrapati Chowk, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
For the Complainant:Adv. Bharat Borikar, Advocate
For the Opp. Party: ADV.A.M.PANDE, Advocate
ORDER

        (मंचाचा निर्णय : श्री. मनोहर चिलबुले - अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)

 

                          -//  आ दे श  //-

 

 (पारित दिनांकः 27/08/2014)

 

  1.       तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केलेल्‍या तक्रारीचे संक्षिप्‍त विवरण येणेप्रमाणे...

 

                        तक्रारकर्ता जिवन रेणूराव पाटील हे यवतमाळ येथे वकील व्‍यवसाय करतात. त्‍यांचा मुलगा तेजस नागपूर येथे 25, अनुज्‍योती अपार्टमेंट, स्‍नेह नगर नागपूर येथे राहतो व त्‍याच स्किममध्‍ये तक्रारकर्त्‍याने फ्लॅट घेतला आहे. वि.प.क्र. 1 अरुण डाबरे त्‍याच स्किम मधील रहिवासी आहे. त्‍याने तक्रारकर्त्‍यांस सांगितले कि, तो मॅक्‍स न्‍युयार्क लॉईफ इन्‍शुरन्‍स कं. लि. चा एजन्‍ट आहे. सदर स्किम मध्‍ये तुम्‍ही पैसे गुंतवा, 3 वर्षानंतर पैसे काढता येतील व गुंतविलेल्‍या रकमेपेक्षा जास्‍त रक्‍कम मिळेल. त्‍याच्‍यावर विश्‍वास ठेवून तक्रारकर्त्‍याने वि.प. मॅक्‍स न्‍युयार्क लॉईफ इन्‍शुरन्‍स कं. लि. च्‍या दोन पॉलीसी मध्‍ये पैसे गुंतविले. दोन्‍ही पॉलीसी मिळून वार्षिक हप्‍ता रु. 50,000/- होता आणि 3 वर्षानंतर 2,25,000/- रक्‍कम व इतर लाभ देण्‍यांत येतील असे वि.प. क्र.1 याने तक्रारकर्त्‍यास सांगितले.

तक्रारकर्त्‍याने दि. 13.03.2010 रोजी तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्‍यानंतर खालील प्रमाणे दोन्‍ही पॉलीसी सरेंडर केल्‍या परंतु वि.प. मॅक्‍स न्‍युयार्क लॉईफ इन्‍शुरन्‍स कं. लि. ने तक्रारकर्त्‍यास आश्‍वासनाप्रमाणे रु. 2,25,000/- न देता खालील प्रमाणे प्रत्‍यक्ष भरलेल्‍या रकमेपेक्षा कमी रक्‍कम परत केली.

 

पॉलीसी क्र. 

गुंतविलेली रक्‍कम रुपये

 

मिळालेली रक्‍कम रुपये

चेक मिळाल्‍याची तारीख

423629682

90,000/-

78,532.38/-

19.03.2010

423626506

60,000/-

48,247.00/-

21.04.2010

 

      कमी मिळालेल्‍या रकमेबाबत तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 1 ला विचारणा केली असता त्‍यांनी मी कंपनी सोडली आहे, तुम्‍हाला जे कांही करावयाचे आहे ते करा असो सांगितले. वि.प.कंपनीकडे संपर्क साधला असता पुनम चव्‍हाण या कर्मचारी महिलेने अपशब्‍द वापरले व मुळ पॉलीसी आमच्‍याकडे आहे, तुम्‍ही कंपनीचे कांहीच करु शकत नाही असे सांगितले.

 

2.          तक्रारकर्त्‍याने दि. 1.05.2010 आणि 19.05.2010 रोजी पाठविलेल्‍या नोटीसला वि.प.नी उत्‍तर दिले नाही. परंतु वि.प.क्र.2 यांच्‍या सदर येथील कार्यालयातील कृष्‍णकांत नावाच्‍या व्‍यक्तिने तक्रारकर्त्‍यास कळविले कि, आश्‍वासनाप्रमाणे कंपनी त्‍यांना रु. 2,25,000/- आणि त्‍यावर 12 टक्‍के व्‍याज तसेच झालेल्‍या मनस्‍तापाबाबत नुकसान भरपाई देखिल देईल. प्रत्‍यक्षात वि.प.ने कोणतीही कार्यवाही केली नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने वि.प.ना दि. 08.07.2010 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु त्‍याची कोणतीही दखल वि.प.ने घेतली नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या तक्रारीत खालील प्रमाणे मागणी केली आहे.

 

      1. वि.प.कडून नुकसान भरपाईची रक्‍कम रु. 3,93,000/- व्‍याजासह मिळावी.

      2. मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु. 10,000/- मिळावी.

      3. तक्रारखर्च रु. 10,000/- मिळावा.

      4. वकील फी रु. 10,000/- आणि नोटीस खर्च रु. 2,000/- मिळावा.

      तक्रारकर्त्‍याने तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ खालील दस्‍तावेज दाखल केले आहेत.

 

            तक्रारकर्त्‍याने तक्रारीतील कथनाचे पुष्‍टयर्थ विरुध्‍द पक्षास दि.19.05.2010, 08.07.2010, 15.07.2010 व दि. 01.05.2010 रोजी पाठविलेल्‍या नोटीसच्‍या प्रती, तसेच विरुध्‍द पक्षातर्फे त्‍याला आलेले दि.26.03.2010 आणि 13.04.2010 रोजीचे पत्र, पोच पावत्‍या इत्‍यादींच्‍या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.

 

3.          विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 ते 4 यांनी स्‍वतंत्र लेखीजबाब दाखल करुन तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे. वि.प.क्र. 1 हा वि.प. मॅक्‍स न्‍युयार्क लॉईफ इन्‍शुरन्‍स कं. लि. चा एजन्‍ट  होता व त्‍याच्‍या मार्फत तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमुद दोन पॉलीसीज खरेदी केल्‍याचे वि.प.नी कबुल केले आहे. मात्र सदर पॉलीसीज विकतांना 3 वर्षानंतर पॉलीसीची रक्‍कम काढल्‍यास किमान रु. 2,25,000/- आणि त्‍यावर इतर लाभ देखिल देण्‍यांत येईल असे आश्‍वासन देवून पॉलीसी घेण्‍यासाठी तक्रारकर्त्‍यास प्रवृत्‍त केल्‍याचे नाकबूल केले आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे कि, तक्रारकर्त्‍याने सर्व अटी व शर्तीचे आकलन केल्‍यावर दि. 11.06.2006 रोजी तक्रारीत नमुद क्रमांकाच्‍या ‘’लाईफ मेकर युनिट लिंक्‍ड इनवेस्‍टमेंट प्‍लॉन’’ पॉलीसीज खरेदी केल्‍या. सदर पॉलीसीज  युनिट लिंक्‍ड आहेत. योजनेतून बाहेर पडतांना तक्रारकर्त्‍याच्‍या नावाने असलेल्‍या युनिटचे जे एन.ए.व्‍ही. मुल्‍य  असले तेवढीच रक्‍कम वि.प.कडून तक्रारकर्त्‍यास देय असते. सदरच्‍या पॉलीसीमध्‍ये 3 वर्षापूर्वी ग्राहकाने पॉलीसी सरेंडर करुन रक्‍कम परत घेतल्‍यास खालील प्रमाणे सरेंडर चार्जेस कपात करण्‍यची तरतुद  क्‍लॉज 4.2 मध्‍ये   नमुद आहे.

 

SURRENDER

 

4.2 The Cash Value, which We shall endeavor to pay within 10 days after Our receipt of Your notice, will equal the Account Value at the next available price immediately following Our receip of Your written notice less a surrender charge(Provided this value is positive).The Surrender Charge is as follows:

 

Policy Year

Surrender Charge as Percentage of  Annual Target Premium

1

100%

2

100%

3

50%

4

0%

 

तक्रारकर्त्‍याकडून दि. 12.03.2010 रोजी पॉलीसी सरेंडर करण्‍याबाबत अर्ज प्राप्‍त झाले. सदर पत्र प्राप्‍त झाल्‍याबाबत वि.प.ने तक्रारकर्त्‍यास दि. 19.03.2010 रोजी कळविले आणि दि. 25.03.2010 रोजी पॉलीसी क्र. 423629682 चे खातेमुल्‍य रु. 78,532.38

चेक क्र. 015065 व्‍दारे तक्रारकर्त्‍यास पाठविले. तसेच दि. 21.04.2010 पॉलीसी क्र. 423626506चे खातमुल्‍य रु. 48,247.00 तक्रारकर्त्‍यास चेक क्र. 808374 व्‍दारे पाठविले.

 

4.          तक्रारकर्त्‍याकडून दि. 25.05.2010 रोजी प्राप्‍त नोटीसला दि. 30.06.2010 रोजी पॉलीसीच्‍या शर्ती व अटीं प्रमाणे योग्‍य ते सरेंडर मुल्‍य देण्‍यांत आल्‍याचे कळविले आहे. 06.09.2010 रोजीच्‍या तक्रारकर्त्‍याच्‍या नोटीसला वि.प. यांनी दि. 27.10.2010 रोजी उत्‍तर पाठवून कळविले कि, 15 दिवसांच्‍या फ्रिलूक पिरेडमध्‍ये पॉलीसी परत केली नसल्‍यामुळे पॉलीसी चे खरेदीमुल्‍य परत करता येत नाही. वि.प.यांनी कधीही तक्रारकर्त्‍यास 3 वर्षानंतर सरेंडरमुल्‍य रु. 2,25,000/- आणि त्‍यावर लाभ देण्‍यांत येतील असे आवश्‍वासन दिल्‍याचे नाकबूल केले असून विमा करारातील अटी व शर्तीना अनुसरुनच पॉलीसीचे सरेंडर मुल्‍य परत केल्‍याचे म्‍हटले आहे. तक्रारकर्त्‍याने सरेंडरचा अर्ज केला तेंव्‍हा तक्रारकर्त्‍याच्‍या नावे शिल्‍लक युनिट व त्‍याचे मुल्‍य खालील प्रमाणे असल्‍याचे नमुद केले आहे.

 

 

Policy No.

NAV

Units

Fund Value Approximate

423629682

27.91

2812.19

78508.8763

423626506

27.91

1728.15

48232.6665

 

तक्रारकर्त्‍याने 15 दिवसांच्‍या फ्रिलूक पिरेडमध्‍ये पॉलीसी परत न केल्‍यामुळे पॉलीसीच्‍या शर्ती व अटींप्रमाणे तक्रारकर्ता व विमा कंपनी यांच्‍यामध्‍ये विमा करार पक्‍का झाला. विमा कंपनी ग्राहकांना जी सेवा देते त्‍याच्‍या मोबदल्‍यांत ऍडमिनिस्‍टेटिव्‍ह चार्जेस, अंडररायटिंग चार्जेस , मार्टेलिटी चार्जेस इ. आकारते व विमा हप्‍त्‍यातून हया रकमा वसुल करुन उर्वरित रकमा बाजारात गुतविण्‍यांत येतात. त्‍यामुळे कोणत्‍याही परिस्थितीत तक्रारकर्त्‍याच्‍या मागणीप्रमाणे त्‍याने भरलेली विमा हप्‍त्‍याची रक्‍कम परत करता येत नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या नावाने जेवढे युनिट शिल्‍लक असतील त्‍याचे एनएव्‍ही मुल्‍याएवढी रक्‍कम मिळण्‍याचा तक्रारकर्त्‍याला अधिकार असून ती विमा कंपनीने परत केली असल्‍याने सेवेत कोणताही न्‍युनतापूर्ण व्‍यवहार केला नाही. विमा कंपनीकडून देय नसलेली रक्‍कम उकळण्‍यासाठी म्‍हणून तक्रारकर्त्‍याने खोटी व काल्‍पनिक कारणे नमुद करुन तक्रार दाखल केली असल्‍याने ती खारीज करण्‍याची विनंती केली आहे.

 

5.             वि.प.2 ते 4 यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ प्रपोजल फॉर्म (Annexure op-1), पॉलिसीचे दस्‍तावेज (Annexure op-2), प्रपोजल फॉर्म (Annexure op-3), पॉलिसीचे दस्‍तावेज (Annexure op-4), सरेंडर रिक्‍वेस्‍ट (Annexure op-5), दि.19.03.2010चे पत्राची प्रत (Annexure op-6), दि.25.04.2010 रिक्‍वेस्‍ट पत्राची प्रत (Annexure op-7), दि.21.04.2010 चे पत्राची प्रत (Annexure op-8), लिगल नोटीस (Annexure op-9), नोटीसला उत्‍तर (Annexure op-10), लिगल नोटीस (Annexure op-11), नोटीसला उत्‍तर (Annexure op-12) इत्‍यादी दस्‍तावेज दाखल केले आहेत.

 

6.            तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्षाच्‍या परस्‍पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यांत आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा खालिल प्रमाणे...

            मुद्दे                                            निष्‍कर्ष

   

 1) वि.प.नी तक्रारकर्त्‍यास त्‍याने जमा केलेल्‍या विमा

   हप्‍त्‍यांच्‍या रकमेपेक्षा कमी रक्‍कम परत करुन

   सेवेत न्‍युनतापूर्ण व्‍यवहार केला आहे काय ?              नाही.

 

2) तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्‍यांस

पात्र आहे काय ?                                     नाही.

 

3) अंतिम आदेश काय ?                          अंतिम आदेशाप्रमाणे  

                                              तक्रार खारीज.

-  कारणमिमांसा  -

 

7.          मुद्दा क्र.1 बाबतः- सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्त्‍याने वि.प.विमा कंपनी कडून वि.प.क्र.1 या एजंटामार्फत खालील प्रमाणे पॉलीसीज खरेदी केल्‍या व 3 वर्षे पूर्ण झाल्‍यावर वि.प.ने त्‍यांना प्रत्‍यक्ष भरलेल्‍या रकमांपेक्षा कमी रकमा दिल्‍या याबाबत उभयपक्षांत दुमत नाही.

 

पॉलीसी क्र. 

गुंतविलेली रक्‍कम रुपये

 

मिळालेली रक्‍कम रुपये

चेक मिळाल्‍याची तारीख

423629682

90,000/-

78,532.38/-

19.03.2010

423626506

60,000/-

48,247.00/-

21.04.2010

 

3 वर्षानंतर वरील दोन्‍ही पॉलीच्‍या भरलेल्‍या रकमांपोटी वि.प. रु. 2,25,000/-  व इतर लाभ देईल असे विमा कंपनीचा एजन्‍ट वि.प.क्र. 1 ने सांगितल्‍याबाबत तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीतील कथनाशिवाय कोणताही पुरावा नाही. तक्रारकर्ता व्‍यवसायाने नामवंत वकील आहेत. त्‍यांना पॉलीसी मिळाल्‍यावर वरील प्रमाणे कोणतीही बाब लखी स्‍वरुपात पॉलीसी दस्‍तात नमुद नसल्‍याबाबत कोणताही आक्षेप न घेता किंवा फ्रिलूक पिरेडमध्‍ये पॉलीसी परत न करता 3 वर्षेपर्यंत पॉलीसीचे हप्‍त भरलेले आहेत याचाच अर्थ असा कि, पॉलीसी दस्‍तामध्‍ये लेखी स्‍वरुपातील सर्व अटी व शर्ती तक्रारकर्त्‍याने स्विकारल्‍या असून त्‍या उभय पक्षावर बंधनकारक आहेत. भरलेल्‍या विमा हप्‍त्‍यांतून वि.प. विमा कंपनी ऍडमिनिस्‍टेटिव्‍ह चार्जेस, मार्टेलिटी चार्जेस, अंडररायटिंग चार्जेस कपात करुन उर्वरित रक्‍कम वित्तिय बाजारात गुंतवते व विमा ग्राहक असलेला गुंतवणूकदार जेंव्‍हा पॉलीसी सरेंडर करीतो त्‍यावेळी त्‍याच्‍या खात्‍यात असलेल्‍या युनिटची एनएव्‍ही किंमत त्‍यास परत करण्‍यांत येते. पॉलीसीमध्‍ये याबाबत क्‍लॉज 4.2 मध्‍ये दिलेल्‍या नियमाप्रमाणे जर पॉलीसी सुरु झाल्‍यापासून 3 वर्षाच्‍या आंत सरेंडर केली तर अशा एनएव्‍ही मधूनही सरेंडर चार्जेस कपात करण्‍याची तरतुद आहे. परंतु सदरच्‍या प्रकरणांत तक्रारकर्त्‍याने 3 वर्षानंतर पॉलीसी सरेंडर केली असल्‍यामुळे वि.प.ने क्‍लॉज 4.2 प्रमाणे सरेंउर चार्जेस कपात केलेले नाहीत.

 

8.          तक्रारकर्त्‍याने 3 वर्षानंतर पॉलीसी सरेंडर केली त्‍या दिवशी तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात शिल्‍लक असलेले युनिट व त्‍याचे एनएव्‍ही मुल्‍य वि.प.ने खालील प्रमाणे नमुद केले आहे.

 

Policy No.

NAV

Units

Fund Value Approximate

423629682

27.91

2812.19

78508.8763

423626506

27.91

1728.15

48232.6665

 

 

वि.प.ने तक्रारकर्त्‍यास वरीलप्रमाणे एनएव्‍ही मुल्‍य (Fund Value)  अनुक्रमे रु. 78508.8763/- आणि रु. 48232.6665/- दिलेली आहे व तक्रारकर्त्‍याने स्विकारलेली आहे. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे असे कि, त्‍याने वरील दोन्‍ही पॉलीसींमध्‍ये रु. 1,50,000/- गुंतविले असतांना व वि.प.ने त्‍यांना किमान रु. 2,25,000/- मिळतील असे आश्‍वासन दिले असतांना वरील गुंतवणूकीपोटी केवळ रु. 1,26,741.50/- परत करणे ही त्‍यांची फसवणूक आणि सेवेतील न्‍युनतापूर्ण व्‍यवहार आहे.

 

9.           तक्रारकर्त्‍याने केलेली गुंतवणूक ही युनिट लिक्‍ड इन्‍शुरन्‍स प्‍लॉन मध्‍ये  असल्‍याने वित्‍तीय बाजारातील ब-या वाईट घटनांचा  प्रभाव गुंतवणुकीचे बाजार मुल्‍य कमी किंवा अधिक होण्‍यावर होतो. याशिवाय सदरची गुंतवणूक ही मुदतबंद ठेवीसारखी नसल्‍याने ज्‍या विमा कंपनीकडे गुंतवणूक केली आहे ती गुंतवणूकीच्‍या रकमेतूनच आपला खर्च भागविण्‍यासाठी कपात करुन उर्वरित रक्‍कम वित्‍तीय बाजारात गुंतविते. म्‍हणजेच प्रत्‍यक्ष गुंतवणूक भरलेल्‍या  विमा हप्‍त्‍यापेक्षा  कमी असते व अल्‍पावधीसाठी ती किफायतशिर ठरत नाही. कोणत्‍या दराने ऍडमिनिस्‍ट्रेटिव्‍ह चार्जेस व इतर चार्जेसची  कपात केली जाईल याची माहिती पॉलीसीच्‍या माहितीपत्रकात दिलेली आहे. त्‍यामुळे 3 वर्षानंतर तक्रारकर्त्‍याने वि.प.ला रु. 2,25,000/- परत देण्‍याचे आश्‍वासन दिले होते (कोणताही कायदेशीर रित्‍या स्विकाराहर्य पुरावा नाही) ,परंतु दिले नाही किंवा किमानपक्षी मुळ विमा हप्‍त्‍यांची भरलेली रक्‍कम रु. 1,50,000/- परत केली नाही म्‍हणून वि.प.नी तृटीपूर्ण किंवा सदोष सेवा दिली असे म्‍हणता येत नाही.

 

तक्रारकर्त्‍यांनी आपल्‍या युक्तिवादाचे पुष्‍टयर्थ खालील न्‍याय निर्णयांचा दाखल दिला आहे.

    1.  1998(2)CPR 417 (P.B.)

        Jahat Singh Vs. M/S Ek-Jot Leasing Pvt.Ltd.

 

     2. I(1994)CPJ 377

        Raj Kishore Sahoo Vs. The Favourite Small Investment Ltd. & Others

 

परंतु, वरील दोन्‍ही न्‍यायनिर्णयात ग्राहकांकडून डिपॉझीट स्विकारणा-या संस्‍थेने मुदत पुर्तीनंतर डीपॉझीटची रक्‍कम परत न करणे ही सेवेतील न्‍युनता असल्‍याचे म्‍हटले आहे.

 

10.          आमच्‍या समोरील प्रकरणांत विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याच्‍या विमा पॉलीसीची सरेंडर व्‍हॅल्‍यू विमा पॉलीसीच्‍या शर्ती व अटीस अधीन राहून परत केलेली आहे, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यातर्फे दाखल केलेले न्‍यायनिर्णय आणि मंचासमोरील प्रकरणांत वस्‍तुस्थिती पूर्णतः भिन्न असल्‍यामुळे आमच्‍या समोरील प्रकरणाच्‍या निर्णयासाठी वरील न्‍यायनिर्णयांचा उपयोग होवू शकत नाही. म्‍हणून मुद्या क्र. 1 वरील निष्‍कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.

 

11.         मुद्दा क्र.2 बाबतः-    मुद्दा क्र. 1 वरील विवेचनाप्रमाणे तक्रारककर्त्‍याने जरी 3 वर्षांत वि.प.कडे रु. 1,50,000 विमा हप्‍त्‍यापोटी जमा केली असेल तरी वि.प.ने तक्रारकर्त्‍यास परत केलेली पॉलीसींची सरेंडर व्‍हॅल्‍यू रु. 1,26,741.50 ही पॉलीसी अटी व शर्तीच्‍या  क्‍लॉज 4.2 प्रमाणे बरोबर असल्‍याने  वि.प.विमा कंपनी आणि तिच्‍या एजंट असलेल्‍या वि.प.क्र. 1 सेवेत कोणताही तृटीपूर्ण व्‍यवहार केलेला नसल्‍यामुळे तक्रारकर्ता मागणीप्रमाणे कोणत्‍याही स्‍वरुपात नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाही. म्‍हणून मुद्दा क्र.2 वरील निष्‍कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.

            वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

      -//  अं ति म आ दे श  //-

 

1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार खारिज करण्‍यांत येते.

2)    उभय पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.

3)    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

4)    तक्रारकर्त्‍यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.