Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/11/263

MRS LUIZA ALLWYAN HENDRICKS - Complainant(s)

Versus

MAX NEW YORK LIFE INSURANCE CO. LTD, - Opp.Party(s)

PRAKASH PARKAR

15 May 2013

ORDER

ग्राहक तक्रार निवारण मंच,
मुंबई उपनगर जिल्‍हा, मुंबई.
प्रशासकीय इमारत, 3 रा मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्याना जवळ,
वांद्रे (पूर्व), मुंबई 400051.
महाराष्‍ट्र राज्‍य
 
Complaint Case No. CC/11/263
 
1. MRS LUIZA ALLWYAN HENDRICKS
RED HOUSE, 3RD FLOOR, RATHODI VILLAGE, MARVE ROAD, MALAD-WEST, MUMBAI-95.
...........Complainant(s)
Versus
1. MAX NEW YORK LIFE INSURANCE CO. LTD,
MAX HOUSED, 3RD FLOOR, 1, DR. JHA MARG, OKHLA, NEW DELHI-110020.
2. MAX NEW YORK LIFE INSURANCE CO. LTD,
2ND FLOOR, 90-A, SECTOR-80, UDYOG VIHAR, GURGAON-122022, HARYANA.
3. MAX NEW YORK LIFE INSURANCE CO. LTD.
CITIZEN CREDIT CO-OP BANK LTD, SHOP NO. 1 & 2, LOURDES TOWER, SAUTAN BUDHA LANE, OPP. ORLEM CHURCH, MARVE ROAD, MALD-WEST, MUMBAI-64.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr. J. L. Deshpande PRESIDENT
 HON'ABLE MR. N. D. KADAM MEMBER
 
PRESENT:
तक्रारदार स्‍वतः हजर.
......for the Complainant
 
सा.वाले ाएकतर्फा
......for the Opp. Party
ORDER

                    तक्रारदारः- तक्रारदार स्‍वतः हजर.

                    सामनेवालेः- गैरहजर

----------------------------------------------------------------------------------------------

                निकालपत्रः- श्री.ना.द.कदम,‍सदस्‍य. वान्‍द्रे (पूर्व)

-----------------------------------------------------------------------------------------------                           

                               न्‍यायनिर्णय

1)      सामनेवाले हे विमा व्‍यायसायिक असून त्‍यांचे मुख्‍यालय न्‍यु दिल्‍ली येथे आहे. व त्‍यांची शाखा मार्वेरोड मालाड येथे आहे.

2)      तक्रारदार ही मयत ऑल्‍वीन हेंड्रिक्‍स ,राहणार मालाड यांची विधवा आहे

तक्रारदाराच्‍या तक्रारीमधील (निशाणी 1 पान क्र 1 ते 17)कथनानुसार त्‍यांच्‍या मयत पतीना सामनेवाले यांचे एक प्रतिनिधी माहे ऑगस्‍ट 2010 मध्‍ये भेटले व त्‍यांनी तक्रारदाराना युनिट लिक्‍ड नॉन पार्टिसिपेटिंग लाइफ इन्‍शुरंस पॉलिसीबददल माहिेती दिल्‍यानंतर तक्रारदाराच्‍या पतीने ती पॉलिसी घेण्‍यास संमती दिली. त्‍यानुसार तक्रारदाराच्‍या पतीची वैदयकिय तपासणी बात्रा रुग्‍णालयातील डॉक्‍टरांनी तक्रारदाराच्‍या घरी येऊन केली.

सदर डॉक्‍टरांचा तपासणी अहवाल निशाणी 2,पृ.क्र. 23/24 योग्‍य वाटल्‍यानंतर सामनेवाले यांच्‍या प्रतिनिधीने तक्रारदाराच्‍या पतीकडून विमा प्रस्‍ताव अर्ज निशाणी क्र.3,पृ.क्र.34/35 भरुन घेतला.तसेच त्‍याबरोबर विम्‍याच्‍या एकूण 10 हप्‍त्‍यांपैकी प्रथम हप्‍ता रु.2,00,000/- चा धनादेश ही तक्रारदाराकडून सिवकारला. तदनंतर तक्रारदाराना विमा पॉलिसी देण्‍यात आली. (पृ.क्र.30) सदर पॉलिसी हि दिनांक 31/08/2010 पासून सुरु असून विमा रक्‍कम रु.10,00,000/-दर्शविण्‍यात आली आहे. यानंतर तक्रारदाराचे पती दिनांक 23/10/2010 रोजी बालाबाई नानावटी

                              (3)                      तक्रार क्र.263/2011

इस्पितळात अल्‍पशा आजाराने मृत्‍यु पावले. त्‍यामुळे तक्रारदाराने त्‍याच्‍या पतीचा रु10,00,000/-चा विमा दावा सामनेवालेने,संबंधीत आवश्‍यक त्‍या कागदपत्रासहित दाखल केला असता सामनेवाले यांनी तो दावा पूर्ण विमा रक्‍कम रु.10,00,000/-(दहा लाख ) चा मंजूर न करता केवळ रु.1,63,528.23एवढया रकमेचा मंजूर करतांना आपल्‍या दिनांक 31/01/2011 च्‍या पत्रात (निशाणी क्र.103)असे नमूद केले आहे की,नानावटी रुग्‍णालयातील नोंदीनुसार मयत विमेदार हे पूर्वापार मद्यपि असून ते गेली 30  वर्षे दर दिवशी 1 बाटली मद्य सेवन करत असतांना त्‍यांनी ही बाब विमाप्रस्‍ताव अर्ज भरतांना नमूद करण्‍याचे टाळले आहे. जर सदरबाब सामनेवाले यांना विमेदारानी त्‍याचवेळी सांगितली असती तर तक्रारदारांना सदर विमा पॉलिसी देउ केली नसती.

        तक्रारदारानी तक्रारीसह विमा प्रस्‍ताव पूर्व तक्रारदाराच्‍या पतीची केलेली वैदयकीय चाचणी अहवाल पृ.क्र.24/25 विमा प्रस्‍ताव अर्ज पृ.क्र.32/36 तसेच विमा पॉलिसी पृ.क्र.40 दाखल केले आहेत. तक्रारदाराच्‍या कथनानुसार तक्रारदाराच्‍या मयत पतीने वैदयकीय तपासणी करताना तसेच विमा प्रस्‍ताव अर्ज दाखल करतांना,त्‍यामध्‍ये आपण आठवडयातून 3 वेळा मद्यपान करत असल्‍याची बाब नमूद केली असून,वैदयकीय चाचणीमध्‍ये त्‍याबाबत कोणतीही विपरीत नोंद/अहवाल डॉक्‍टरांनी अथवा प्रयोगशाळेतील अहवालामध्‍ये दर्शविला नसल्‍यानेच  सामनेवाले यांनी तक्रारदाराच्‍या पतीना विमापॉलिसी दिलेली आहे. तक्रारदाराच्‍या कथनानुसार सामनेवाले विमा कंपनीने पूर्ण विमा रक्‍कम न देण्‍यासाठी दिलेले कारण हे अन्‍यायकारक व आपली जबाबदारी टाळणारे असून ही बाब अनुचित व्‍यापारी प्रथा तसेच विमा सेवा सुविधा पुरविण्‍यातील कमतरता असल्‍याने तक्रारदाराना देय असलेली उर्वरीत विमा रक्‍कम रु.8,36,471.77, 18 टक्‍के व्‍याजासहित मिळावी,तसेच नुकसान भरपाई रु.50,000/-आणि खर्चासाठीचे रु.20,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.

3) सामनेवाले यांचे वकील दिनांक 26/07/2011,व 19/09/2011,25/11/2011 व 3 एप्रिल 2012 रोजी उपस्थित राहून प्रत्‍येक  वेळी त्‍यांनी आपली कैफियत दाखल करण्‍याकामी मुदत मागितली ती त्‍यांना न्‍यायोचितपणे देण्‍यता आली.त‍थापि सामनेवाले यांनी शेवटपर्यत आपली कैफियत दाखल केली नाही. सबब प्रस्‍तुत तक्रार सामनेवाले विरुध्‍द एकतर्फा न्‍यायनिर्णयकामी ठेवण्‍यात आली.

4)  सामनेवाले यांनी आपली कैफियत दाखल करण्‍याचे,संधी देऊनही टाळले असल्‍याने,प्रस्‍तुत मंचाने तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार पृ.क्र.1 ते 17,पुराव्‍याचे शपथपत्र,लेखी युक्‍तीवाद यांचे वाचन केले तसेच तेांडी युक्‍तीवादही ऐकण्‍यात आला.

त्‍यानुसार तक्रार निकाली कामी खाली मुददे कायम करण्‍यात येतात.

                                                                            (4)                                        तक्रार क्र.263/11

                                                                              

अनु क्र.

मुददे

निष्‍कर्ष

1

सामनेवाले यांची विमा पॉलिसी घेतांना तक्रारदाराचे मयत पती यांनी वैदयकीय तपासणी तसेच प्रस्‍ताव अर्ज भरतांना आपण आठवडयातून 3 वेळा मद्यसेवन करतो हि बाब स्‍पष्‍ट केली असतांना व ही बाब दोन्‍ही दस्‍तऐवजात नोंदीत असतांना,सामनेवाले यांनी तक्रारदाराचे पती हे पूर्वीपासूनचे मदयपी असल्‍याची सबब देऊन सामनेवाले यांनी तक्रारदारानी दाखल केलेला त्‍यांच्‍या मयत पतीचा विमादावा,अंशतः मंजूर करुन सामनेवाले यांनी सदेाष सेवा दिल्‍याची व अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याची बाब तक्रारदार सिघ्‍द करतात काय

 होय

2

तक्रारदार उर्वरीत विमा रक्‍कम प्राप्‍त

करण्‍यास पात्र आहेत काय

होय

3

अंतीम आदेश

तक्रार अंशतः मान्‍य.

 

 

5)( अ) तक्रारदार यांचे पतीने त्‍यांना भेटलेल्‍या सामनेवाले यांच्‍या प्रतिनिधीच्‍या सल्‍ल्‍यानुसार युनिट लिंक्‍ड नॉन पार्टिसिपेटिंग जीवन विमा पॉलिसी घेतली व आपली  वैदयकीय चाचणीसुध्‍दा सामनेवाले यांचे डॉक्‍टरांकडून करुन घेतली. वैदयकीय चाचणी वेळी,तक्रारदार यांचे मयत पतीने आपण मद्यपी असल्‍याचे डॉक्‍टरांना सांगितल्‍यानुसार डॉक्‍टरांनी विमाधारक हे आठवडयातून 3 वेळा गेल्‍या  20  वर्षापासून मद्य सेवन करत असल्‍याची नोंद दिनांक 14/08/2010 रोजीच्‍या वैदयकीय चाचणी अहवालामध्‍ये स्‍पष्‍ट केली आहे.(पृ.क्र24-28) हा वैदयकीय अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर सामनेवाले यांना त्‍या वैदयकीय अहवालामध्‍ये तक्रारदाराच्‍या पतीना ठरल्‍याप्रमाणे विमा पॉलिसी देण्‍यासाठी कोणतेही अनुचित बाब न आढळल्‍याने सामनेवाले यांनी दिनांक 21/08/2010 रोजी तक्रारदाराकडून विमा प्रस्‍ताव अर्ज स्विकारला.ज्‍यामध्‍ये तक्रारदाराने आपण

                                   (5)           तक्रार क्र.263/11

आठवडयातून 3 वेळा 60 मि.लि.मद्य गेल्‍या 30 वर्षापासून सेवन करीत असल्‍याचे जाहिर केले                                  (पृ.क्रृ32-35) हा प्रस्‍ताव अर्ज सामनेवाले यांनी स्विकारुन तक्रारदाराच्‍या पतीना त्‍यांनी दिनांक31/08/2010 पासून लागू झालेली पॉलिसी दिली.पृ.क्र.30 , या पॉलिसीनुसार सदर पॉलिसीच्‍या मुदतीनंतर अथवा विमाधारकाच्‍या मृत्‍युनंतर या पैकी कोणतीही घटना अगोदर घडल्‍यास विमा राशी रु.10,00,000/- (दहा लाख फक्‍त ) विमेदारास/नामांकन व्‍यक्‍तीस मिळतील अशी  तरतुद हया विमापॉलिसीमध्‍ये आहे.

   ब) तक्रारदाराच्‍या कथनानुसार त्‍यांच्‍या पतीचे निधन दिनांक 23/10/10 रोजी नानावटी इस्पितळात झाले.त्‍यानंतर त्‍यांनी विमा रक्‍कम मिळण्‍यासाठी सामनेवाले यांना आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे सादर केली. तथापि सामनेवाले यांनी त्‍यांचे दिनांक 31/1/2011 अन्‍वये तक्रारदाराना असे कळविले की, नानावटी रुग्‍णालयाच्‍या दिनांक 21/10/2011 रोजीच्‍या केस पेपर्समधील नोंदीनुसार तक्रारदाराचे पती दरदिवशी 1 बाटली मद्य गेल्‍या 30 वर्षापासून सेवन करीत होते. मात्र हि बाब त्‍यांनी विमा प्रस्‍ताव भरतांना लपवून ठेवली.व ते केवळ 30 मि.लि.मद्य आठवडयातून 3 वेळा गेल्‍या 30 वर्षापासून घेत होते असे जाहिर केले होते.तक्रारदाराचा मृत्‍यु विमा दावा नाकारण्‍यात येत असून,त्‍यांच्‍या खात्‍याचे त्‍यावेळचे मुल्‍य रु.1,63,523.23 तक्रारदाराना देण्‍यात येत असल्‍याचे उपरोक्‍त पत्रान्‍वये सामनेवाले यांनी कळविले आहे.

क)  तक्रारदारानी सादर केलेली त्‍यांच्‍या मयत पतीचे वैदयकीय अहवाल व विमा प्रस्‍ताव यांचे वाचन केले असता असे स्‍पष्‍टपणे दिसून येते की, तक्रारदाराने  आपण गेल्‍या 30 वर्षापासून मद्य सेवन करीत असल्‍याची बाब स्‍पष्‍टपणे जाहिर केलेली नोंद दोन्‍ही कागदपत्रामधे दिसून येते.या संदर्भात असे ही नमूद करणे आवश्‍यक वाटते की,तक्रारदाराच्‍या मयत पतीची वैदयकीय चाचणी ही सामनेवाले यांच्‍या विशिष्‍ट डॉक्‍टराने तक्रारदाराच्‍या घरी जाऊन केली होती.व त्‍या  अहवालामध्‍ये,तक्रारदारास एखादा व्‍याधी/रोग/त्रास झाल्‍याची नोंद डॉक्‍टरांनी केल्‍याचे दिसून येत नाही.तक्रारदाराच्‍या मयत पतीने आपण मद्यपी असल्‍याचे  जाहिर केल्‍यानंतर,सामनेवाले  यांना त्‍या संबंधी आणखी आवश्‍यक त्‍या वैदयकीय चाचण्‍या करुन त्‍यांची शारिरीक क्षमता तपासता आली असती.परंतू सामनेवाले यांनी तसे न करता,वैदयकीय चाचणी झाल्‍याबरोबर 15-20 दिवसात त्‍यांना विमा पॉलिसी पाठवून दिली. यावरुन सामनेवाले हे आपले कायदेशीर जबाबदारी टाळण्‍यासाठी व विमा दावा नाकारण्‍यासाठी तांत्रिक व तकलादू कारणाचा आधार घेत आहेत असे प्रस्‍तुत मंचास वाटते.

 

                                     (6)            तक्रार क्र.263/11

ड)  या संदर्भात सर्वसाधारण स्थितीमध्‍ये,एखादी व्‍यक्‍ती 1 बाटली मद्य 30 वर्षे सातत्‍याने घेत असल्‍यास त्‍या व्‍यक्‍तीचे आरोग्‍य निश्चितपणे क्षीणतम अथवा मृतप्राय होणे अनिवार्य आहे.मात्र सदर प्रकरणातील सामनेवाले यांनी मयत विमेदाराच्‍या केलेल्‍या विविध वैदयकीय चाचण्‍यामध्‍ये सामनेवाले  यांच्‍या डॉक्‍टरांना तशी कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नाही. त्‍यामुळे मयत विमाधारकांस पॉलिसी देण्‍यात आली.ही बाब कागदोपत्री स्‍पष्‍ट व लिखित असून ही सामनेवाले यांनी आपल्‍या प्रतिनिधीच्‍या वैदयकीय चाचण्‍यांवर केवळ पॉलिसी देण्‍यापुरता विश्‍वास ठेवला,मात्र विमा दावा मंजूर करतांना त्‍या चाचण्‍यांवर अविश्‍वास दाखवून त्रयस्‍थ व्‍यक्‍तीने केसपेपरवर केलेल्‍या काही नोंदीचा आधार घेऊन तक्रारदाराचा विमा दावा पुर्णतः मंजूर न करता,अनावश्‍यक बाबींचा आधार घेऊन अंशतः मंजूर करुन,आपल्‍या सेवेतील कमतरता तसेच अनुचित प्रथेचा अवलंब केल्‍याचे, तक्रारदार सिध्‍द करतात.

    वरील चर्चेनुरुप खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतो.

 

                                   -आदेश-

1) तक्रार अंशतः मान्‍य  करण्‍यात  येते.

2) सामनेवाले यांनी तक्रारदारास,विम्‍याची उर्वरित रक्‍कम रु.8,36.472/- दिनांक 31/01/2011  

   पासून 9 टक्‍के व्‍याजासहित आठ आठवडयाच्‍या आंत अदा करावी. अन्‍यथा  तदनंतर त्‍यावर   

   12टक्‍के  व्‍याज देय होईल.

3) सामनेवाले यांनी तक्रार खर्चापोटी तक्रारदाराना रु.10,000/- आठ आठवडयाच्‍या आत दयावेत.

4) न्‍यायनिर्णयाच्‍या  प्रती उभयपक्षांना विनामुल्‍य देण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'ABLE MR. Mr. J. L. Deshpande]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. N. D. KADAM]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.