(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून जीवन विमा पॉलीसी घेतली आहे. त्यांनी विमा पॉलीसीचे तीन हप्ते भरल्यानंतर गैरअर्जदार यांनी, त्यांना पॉलीसी रदद झाल्याचे कळवून काही रक्कम परत केली. विमा हप्त्यापोटी भरलेल्या रकमेपैकी उर्वरीत (2) त.क्र.190/10 रक्कम परत देण्याची मागणी गैरअर्जदार यांनी नामंजूर केल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी 29 एप्रिल 2006 रोजी गैरअर्जदार यांच्याकडून जीवन विमा पॉलीसी घेतली व त्याबददल त्यांनी 16,170.87/- रुपये गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडे जमा केले. गैरअर्जदार यांनी दि.24.09.2007 व 19.10.2007 रोजीच्या पत्राद्वारे सदरील विमा पॉलीसीचा 15,341.74 रुपयाचा हप्ता भरण्यास कळविले, ज्याचा भरणा त्यांनी दि.10.12.2007 रोजी केला. त्यानंतर गैरअर्जदार यांनी दि.04.07.2008 रोजी त्यांना 16,170.87 रुपये विमा हप्ता भरण्याची मागणी केली. व अर्जदाराने दि.24.07.2008 रोजी त्याचा भरणा केला. दि.08.08.2008 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांच्यातर्फे त्यांना सदरील पॉलीसी लॅप्स झाली असल्याचे कळविले व त्यांनी भरलेल्या एकून रकमेपैकी 32,341.75 रुपये परत करण्यात आले. अर्जदाराने याबाबत गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केली असता, हप्त्याची कमी रक्कम भरलेली असल्यामुळे पॉलीसी रदद करण्यात आली असल्याचे त्यांना कळविण्यात आले. व पॉलीसीच्या हप्त्यापोटी भरलेली उर्वरित रक्कम परत देण्यास गैरअर्जदार यांनी नकार दिला. गैरअर्जदार यांच्या या कृतीमुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून, व्याजासह उर्वरित रक्कम परत देण्याची तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत पॉलीसीची कागदपत्रे, विमा हप्त्याची रक्कम भरण्याबाबतची गैरअर्जदार यांची पत्रे, विमा हप्त्याची रक्कम भरल्याच्या पावत्या इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्र.1, 2, 3 यांच्यातर्फे देण्यात आलेल्या संयुक्त जवाबानुसार अर्जदाराने त्यांच्याकडून विमा पॉलीसी घेतल्याचे मान्य केले आहे. अर्जदाराने विमा हप्ता भरताना त्यांच्याकडे थकबाकी असलेले 829.13 रुपये भरलेले नाही, तसेच अनेकवेळेस विनंती केल्यानंतरही त्यांनी हेल्थ डिक्लरेशन फॉर्म दाखल केलेला नाही. म्हणून नियमाप्रमाणे त्यांची पॉलीसी रदद करण्यात आली व अटी व शर्तीप्रमाणे रक्कम परत करण्यात आली. अर्जदारास देण्यात आलेल्या सेवेत त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदाराने दि.29.04.2006 रोजी गैरअर्जदार यांच्याकडून जीवन विमा पॉलीसी घेतली आहे. सदरील पॉलीसीचा क्रमांक 285223046 असा आहे. दि.24.09.2007 व दि.19.10.2007 रोजीच्या पत्राद्वारे गैरअर्जदार यांनी (3) त.क्र.190/10 अर्जदारास 15,341.74 रुपये विमा हप्ता भरण्याची मागणी केली, ज्याचा अर्जदाराने दि.10.12.2007 रोजी भरणा केला असल्याचे दिसून येते. दि.04.05.2007 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्या प्रिमीअम पेमेंट रिमाइन्डर (Exh.-B) मधील पत्रात Modal Premium Amount 16,170.87, Amount available 829.18 Net Amount Payable – 15,341.74 असे नमूद केलेले दिसून येते. यावरुन अर्जदाराने मागणी केल्याप्रमाणे रक्कम भरल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा हप्त्यापोटी मागणी केलेल्या रकमेमध्ये 829.13 रुपयाचा समावेश नसल्याचे दिसून येते. दि.08.08.2008 रोजी गैरअर्जदार यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता, अर्जदाराची पॉलीसी रदद केल्याचे व 32,341.74 रुपये परत केल्याचे पत्र दिलेले दिसून येते. गैरअर्जदार यांनी, अर्जदाराने 829.13 रुपये न भरल्यामुळे तसेच हेल्थ डिक्लरेशन फॉर्म न दिल्यामुळे पॉलीसी रदद केल्याचे जवाबात म्हटले आहे. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदारास 829.13 रुपयाची मागणी केल्याचा कोणताही पुरावा दिसून येत नाही. तसेच हेल्थ डिक्लरेशन फॉर्म हा गैरअर्जदार यांनी पॉलीसी काढताना घेणे अपेक्षित आहे. गैरअर्जदार यांनी 2 वर्षानंतर, हेल्थ डिक्लरेशन फॉर्म दिला नाही म्हणून पॉलीसी रदद केल्याचे कारण योग्य नसल्याचे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी एकूण भरलेल्या हप्त्यापैकी केवळ 32,341.74 रुपये परत केले आहेत. व उर्वरित रक्कम कोणत्या अटी व शर्तीच्या आधारे परत केले नाहीत यासाठी मंचामध्ये कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. मंचाने या संदर्भात नियम दाखल करण्यासाठी संधी देऊनही त्यांनी कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाही. अर्जदाराने केलेली तक्रार मान्य करण्यात येत असून अर्जदार हे हप्त्यापोटी भरलेली उर्वरित रक्कम, तसेच नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. आदेश 1) गैरअर्जदार क्र.1,2,3 यांनी अर्जदारास 15,341.75 रुपये दि.01.08.2008 पासून रक्कम देईपर्यंत 9% व्याजासह 30 दिवसात द्यावे. 2) गैरअर्जदार क्र.1, 2, 3 यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चाबददल रु.5,000/- 30 दिवसात द्यावे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |