नि का ल प त्र :- (व्दारा- मा. सौ. रुपाली डी. घाटगे, सदस्या) (दि. 18-09-2015)
(1) प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये वि.प. मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने नुकसान भरपाई मिळणेसाठी या मंचात दाखल केला आहे.
प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. विमा कंपनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे व वि.प. विमा कंपनी तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्तीवाद ऐकला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
वि.प. ही वित्तीय विमा व्यवसाय करणारी विमा कंपनी असून तक्रारदारांची वि.प. कंपनीकडे “लाईफ इन्शुरन्स पॉलिसी” असून सदर पॉलिसीचा क्र. 828204214 असा असून पॉलिसीचा कालावधी दि. 08-10-2011 ते 2020 असा आहे. सदरची पॉलिसी तक्रारदार यांचे नावे देणेत आलेली असून पॉलिसीचा वार्षिक रक्कम रु. 24,999.44 इतका प्रिमियम वि.प. यांनी तक्रारदार यांना निश्चित केलेला होता. तक्रारदारांनी सदर ठरलेल्या वार्षिक प्रिमियम प्रमाणे दि. 8-10-2011 रोजी वि.प. यांना अदा केलेला असून त्यानंतरच सदर पॉलिसी वि.प. यांनी दिलेली आहे. यानंतर दुस-या वर्षाचा म्हणजेच सन 2012 चा प्रिमियम दि. 8-10-2012 रोजी वि.प. कडे जमा केला असता वि.प. यांनी तक्रारदाराकडे रक्कम रु. 100/-ची मागणी केली व तक्रारदारांनी रु. 100/- ची रक्कम दि. 29-11-2012 रोजी वि.प. यांना अदा केलेली असून वि.प. यांनी तक्रारदारासतशी पावतीदेखील दिलेली आहे. परंतु दि. 04-03-2012 रोजी वि.प. यांनी अचानकपणे रक्कम रु. 100/- चा चेक नं. 0000824785 तक्रारदाराला पाठवून दिला. त्याबाबत वि.प. यांचेकडे विचारणा केली असता दि. 8-10-2012 रोजी तक्रारदारांनी रोखीने भरलेली वार्षिक प्रिमियमची रक्कम रु. 24,999.44 ही वि. प. कंपनीला मिळालेली नसलेचे तोंडी उत्तर वि.प. कडून तक्रारदार यांना देणेत आले. तक्रारदारांना वि.प.यांनी दिलेला चेक रु.100/- चा चेक न वटवता वि.प. च्या अनुचित व्यापारी कृत्याबाबत वि.प. यांना वारंवार ई-मेलव्दारे भरलेल्या प्रिमियम रिसीट दाखवून तक्रारी नोंदविली आहे. वि.प. यांनी त्याकडेही दुर्लक्ष केले. त्यानंतर वि.प. यांनी तक्रारदारांचे प्रिमियम भरुन घेतले नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी वकिलामार्फत दि. 20-02-2014 रोजी रजि.ए.डी. ने नोटीस पाठवून पॉलिसी पुर्ववत करुन देणेबाबत कळविले असता वि.प. यांनी दि. 27-03-2014 रोजी खोटे व चुकीचे उत्तर दिले आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेली आहे त्यामुळे तक्रारदारांना प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडल आहे. सबब, तक्रारदारांनी पॉलिसी नं. 828204214 ही विमा पॉलिसी पुर्ववत चालू होऊन मिळावी व मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 5,000/- वि.प. यांचेकडून मिळावी अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे.
(3) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकुण 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अ.क्र. 1 कडे पॉलिसी, अ.क्र. 2 कडे प्रिमियम भरलेची रिसिट, अ.क्र. 3 कडे अपुरा प्रिमियम भरलेली पावती, अ.क्र. 4 व 5 कडे प्रिमियम (short payment) परत आलेला चेक, अ.क्र. 6 व 7 कडे तक्रारदाराने वि.प. कडे तक्रार केलेले ई-मेल्स, अ.क्र. 8 कडे वि.प. ला पाठविलेली नोटीस, तक्रारदाराचे दि. 11-11-2014 रोजीचे पुराव्याचे शपथपत्र, अ.क्र. 9 कडे वि.प. चे उत्तर इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
(4) वि.प. यांनी तक्रादारांचे तक्रार अर्जास दि. 05-08-2014 रोजी म्हणणे दाखल केले असून त्यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. सदरच्या पॉलिसीचा रिन्युएल हप्ता वेळेत न भरलेने (Non payment of renewal premium) सदरची पॉलिसी अटी व शर्तीनुसार पॉलिसीतील खंडीत (lapsed) झालेली आहे. तक्रारदारांनी दि. 8-10-2011 रोजी प्रपोजल फॉर्म भरुन वि.प. यांचेकडे वार्षिक विमा हप्ता रक्कम रु.24,619/- भरलेला होता. सदरची पॉलिसी तक्रारदार यांना दिलेली असलेने पॉलिसीबद्दल वाद नाही. ऑक्टोंबर 2012 मध्ये सदरचे पॉलिसीचा रिन्यु (Renew) करणेकरिता हप्ता भरणेचे गरजेचे होते. त्यानुसार वि.प. यांनी direct debt रक्कम स्विकारुन तक्रारदार यांना दि. 8-10-2012 रोजी सदर पॉलिसी देवू (issue) केली. परंतु दि. 10-10-2012 रोजी सदरचे ECS Transaction अकाऊंट नं. 911010037762751 via BJ Reference No. 7727236 हे तक्रारदार यांचे अकाऊंट बंद/हस्तांतरण(Transferred) झालेने बाऊन्स झालेले आहे. सदरचे घटनेची माहिती(intimate) तक्रारदार यांना द. 12-10-2012 रोजी वि.प. यांनी दिलेली होती. दि. 12-10-2012 रोजी नोटीसीने बाऊन्स झालेल्यार हप्त्याची मागणी केलेली होती. सदरचे रिन्युएल प्रिमिएम (हप्ता ) कालावधी होऊन गेल्यानंतरही तक्रारदारांनी दिलेली नसलेने सदरची पॉलिसी खंडीत (lapsed) झाली. त्याअनुषंगाने दि. 7-11-2012 रोजी वि. प. यांनी तक्रारदारांना कळविलेले दि. 15-02-2012 आणि दि. 16-02-2012 रोजी ई-मेलने सदरची पॉलिसी (lapsed) खंडीत झालेचे वि.प. ने तक्रारदारांना वेळोवेळी कळविलेले होते. वि.प. यांनी दि. 23-03-2013 रोजीचे पत्राने सदरचे पॉलिसीचे लाभाकरिता तक्रारदाराने सदरचा हप्ता वि.प. यांना भरुन उपभोग घ्यावा हे कळविले. तक्रारदाराने वि.प. यांचे क्लेमफॉर्म भरतेवेळी ECS mandate वर सही करुन तक्रारदारांचे बँक खाते (Accounts) वरुन direct debit हप्ता रक्कम उपलब्ध करणेची उपयोजना (facility) केलेली होती. सदरचे declaration वरुनच Policy No. 828204214 ही देय केलेली असून सदरची पॉलिसी दि. 8-10-2011 रोजी सुरु झालेली आहे. ऑक्टोंबर 2012 ची पॉलिसी रिन्यु (Renew) direct debit करुन त्याची पावती दि. 8-10-2012 रोजी तक्रारदारांना दिली. तथापि दि. 10-10-2012 रोजी ECS Transaction Account No. 911010037762751 कार्यान्वीत केले असता सदरचे बँक खाते ( closed) बंद/(transfer) हस्तांतरण असलेचे तक्रारदारांना दि. 12-10-2012 रोजी कळविले. दि. 12-10-2012 रोजीचे पत्राने वि.प.यांनी bounce हप्त्याचे रक्कमेची मागणी तसेच रक्कम रु. 100/- चेक नं. 824785 चा तक्रारदारांना परत केलेला आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही.
(5) वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणणेसोबत प्रपोजल फॉर्म, ECS mandate, सदरचे पॉलिसीची प्रत, दि. 12-10-2012 रोजी वि.प. यांनी तक्रारदार यांना पाठविलेले पत्र दि. 7-11-2012 रोजी Policy lapse intimation चे पत्र, वि.प. यांनी तक्रारदार यांना दि. 15-02-2013 रोजीचे ई-मेल, दि. 23-03-2013, व दि. 27-03-2014 रोजी वि.प. यांनी तक्रारदार यांना पाठविलेले पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
(6) तक्रारदाराचा तक्रार अर्ज, तक्रारीसोबतचे दाखल कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र, वि.प. यांचे म्हणणे याचा विचार करता तक्रारदारांनी वि.प. विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी क्र. 828204214 उतरविलेली असून पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. सदरचे पॉलिसीचा वार्षिक हप्ता रक्कम रु. 24,949.42/- इतका तक्रारदार यांनी दि. 8-10-2011 रोजी वि.प. यांचेकडे अदा करुन सदरची पॉलिसी वि.प.यांनी तक्रारदार यांना दिलेली आहे. दुस-या वर्षीचा सन 2012 रोजीचा प्रिमियम दि. 8-10-2012 रोजी तक्रारदाराचे वि.प. यांचेकडे जमा केला असता वि.प. यांनी त्यापोटी रितसर पावतीदेखील देवूनही तक्रारदाराने रोखीने भरलेली वार्षिक प्रिमियम वि.प. कंपनीला मिळालेली नसलेने तोंडी उत्तर देऊन तक्रारदारास सदरची पॉलिसी न देवून सेवेत त्रुटी ठेवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. त्याअनुषंगाने या मंचाने तक्रारदार यांनी दाखल केलेलया कागदपत्राचे या मंचाने अवलोकन केले असता अ.क्र. 1 ला दि. 8-11-2011 रोजी पॉलिसी प्रत दाखल असून त्यावर तक्रारदाराचे नाव नमूद आहे. Agent details- Axis Bank Ltd, Kolhapur 2, Premium Rs. 24,999.44 असे नमूद आहे. अ.क्र.2 ला दि. 8-12-2012 रोजी Insured Premium Receipt त्यावर Your Agent Advisor – Axis Bank Ltd. Kolhapur 2 असे नमूद आहे. सदर कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी या मंचास वि.प. यांचेकडे दि. 8-11-2012 रोजी विमा पॉलिसीचा हप्ता भरुन पावती मिळालेचे निदर्शनास आणून दिलेले आहे. तथापि, सदर मुद्दयाचे अनुषंगाने वि.प. यांनी त्यांचे लेखी युक्तीवादामध्ये तक्रारदाराने वि.प. यांचे क्लेमफॉर्म भरतेवेळी ECS mandate वर सही करुन तक्रारदारांचे बँक खाते (Accounts) वरुन direct debit हप्ता रक्कम उपलब्ध करणेची उपयोजना (facility) केलेली होती. सदरचे declaration वरुनच Policy No. 828204214 ही देय केलेली असून सदरची पॉलिसी दि. 8-10-2011 रोजी सुरु झालेली आहे. ऑक्टोंबर 2012 ची पॉलिसी रिन्यु (Renew) direct debit करुन त्याची पावती दि. 8-10-2012 रोजी तक्रारदारांना दिली. तथापि दि. 10-10-2012 रोजी ECS Transaction Account No. 911010037762751 कार्यान्वीत केले असता सदरचे बँक खाते ( closed) बंद/(transfer) हस्तांतरण असलेचे तक्रारदारांना दि. 12-10-2012 रोजी कळविले. दि. 12-10-2012 रोजीचे पत्राने वि.प.यांनी bounce हप्त्याचे रक्कमेची मागणी रक्कमेची मागणी केली. सदर मुद्दयाचेअनुषंगाने या मंचाने वि.प.यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता अ.क्र. 1 ला क्लेम फॉर्म दाखल असून क्लेम फॉर्म मधील
(2) Premium Payment details Rs. 25,000/- Cheque 500/- ,date 8-10-2011, Bank Account No. 911010037762751 Bank Name – Axis Bank.
(6) Renewal Premium by – direct debt
सदर फॉर्मवर तक्रारदार यांची सही आहे. अ.क्र. 2 ला ECS mandate दाखल असून Bank Account No. 911010037762751 त्यावर तक्रारदाराचे नाव नमूद असून त्यावर तक्रारदाराची सही आहे. सदरचे कागदपत्रांवरुन तक्रारदार यांनी पॉलिसी रिन्यू करिता त्यांचे ECS Transaction Account No. 911010037762751 वरुन direct debit रक्कम वि.प.यांना देण्याचे कबुल केले होते हे स्पष्ट दिसून येते. तथापि, दि. 10-10-2012 रोजी सदरचे तक्रारदाराचे खाते (account) (closed) बंद/हंस्तातर (transferred) झाले असलेने सदरची विमा रक्कम वि. प. यांना मिळालेली नसलेने दि. 12-10-2012 व दि. 7-11-2012 रोजी वि.प. यांनी तक्रारदारांना पत्राने कळविले. सदरचे पत्र वि.प. अ.क्र. 4 ला दाखल केलेले आहे. तसेच दि. 15-02-2013 व 16-02-2013 रोजी ई मेल ने तक्रारदारांना कळविलेले आहे. दि. 27-03-2014 रोजीचे वि.प. यांनी तक्रारदारांना पाठविलेल्या पत्रामध्ये तक्रारदाराचे proof of payment म्हणजे सदर बँकेमधील खाते उतारा (bank statement of account) ची मागणी वि.प. यांनी केलेली आहे. यावरुन वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरचे खाते Closed/Transfer झालेचे वेळोवेळी कळविले होते. तक्रारदाराने वि.प. यांचे क्लेमफॉर्म भरतेवेळी ECS mandate वर सही करुन तक्रारदारांचे बँक खाते (Accounts) वरुन direct debit हप्ता रक्कम उपलब्ध करणेची उपयोजना (facility) केलेली होती. म्हणजे सदरचे खातेवरुन तक्रारदारांनी त्यांचे क्लेम फॉर्ममध्ये पॉलिसी रिन्यू करणेकरिता direct debit रक्कम वि.प. यांना देण्याचे मान्य केलेले होते. तथापि सदरचे खाते उतारा (bank statement account) ची वि.प.यांनी मागणी करुन देखील तक्रारदारांनी सदरचे खाते उता-याची माहिती वि.प. यांना कळविलेली नाही अथवा सदरचे Axis Bank मधील Bank Account No. 911010037762751 तक्रारदारांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये नाकारलेले देखील नाही. सदर Axis Bank Ltd, Kolhapur-2 नोंद तक्रारदारांनी दाखल केलेल्या दि. 8-10-2012 रोजीचे पॉलिसी पावतीवर नमूद आहे.
सबब, वरील सर्व कागदपत्रांचे या मंचाने बारकाईने अवलोकन केले असता वि.प. यांनी तक्रारदारांना वेळोवेळी सदरची पॉलिसी पुर्ववत करणेकरिता तक्रारदारांचे खाते (account) बंद (closed)/ हस्तांतर (transferred) झाले असलेने विमा हप्ता प्राप्त न झालेने सदरची पॉलिसी lapsed झालेचे कळविलेले होते. तथापि त्या अनुषंगाने तक्रारदाराने वि.प. यांना कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही अथवा त्या अनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा या मंचात दाखल केलेला नाही. त्या कारणाने सदरच्या पॉलिसीचा हप्ता हा तक्रारदाराने त्यांचे तक्रारीत नमूद केलेप्रमाणे रोखीनेच भरलेला होता हे शाबीत होत नाही. दि. 24-03-2014 रोजीचे पत्राने वि.प. यांनी तक्रारदारांना सदर पॉलिसीचे Due Premium Rs. 53,203/- इतका भरुन सदरची पॉलिसी रिव्हाव्ह (Revive) पुर्ववत करणेबाबत कळविलेले आहे. सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे नमूद पॉलिसीतील उर्वरीत विमा हप्त्याची रक्कम रु. 53,203/- इतकी भरुन, सदरची पॉलिसी वि.प. यांनी तक्रारदार यांना पुर्ववत करुन द्यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे पॉलिसी नं. 828204214 ची उर्वरीत विमा रक्कम रु. 53,203/-( अक्षरी रुपये त्रेपन्न हजार दोनशे तीन फक्त) इतकी भरुन सदरची विमा पॉलिसी वि.प. यांनी तक्रारदारांना पुर्ववत चालू करुन द्यावी.
3. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.
4. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.