( आदेश पारित द्वारा- श्रीमती रोहीणी कुंडले, मा.अध्यक्षा )
आदेश
(पारीत दिनांक – 14 डिसेंबर, 2012 )
तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत विरुध्द पक्षाचे सेवेतील त्रृटी बाबत या मंचासमारे दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडुन मरजघाट –II , तह.उमरेड, जि.नागपूर येथील ले-आऊट मधील भुखंड क्रं.43 आणि 76, खसरा /शेत नं.52 प.ह.न.13, एकूण क्षेत्रफळ 5033.82 चौ.फुट किंमत 8,55,749/- मध्ये खरेदी करण्याचे ठरविले.
दिनांक 3/10/2009 रोजी उभयपक्षकारांमध्ये करारनामा झाला व इसाराची रक्कम म्हणुन तक्रारदाराने विरुध्द पक्षाला रुपये 2,50,000/- दिले. विरुध्द पक्षाने ही बाब मान्य केली आहे. उर्वरित रक्कम रुपये 6,05,749/- 15 समान मासिक हप्ता रुपये 40,383/- प्रमाणे देण्याचे ठरले व त्यानंतर भुखंडाचा ताबा व विक्रीपत्र करुन देण्याचे ठरले होते असे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत नमुद केले आहे.
पुढे तक्रारदाराने वेळोवेळी ठरल्याप्रमाणे रक्कमा भरल्या व त्याबाबत पावत्या विरुध्द पक्षाने तक्रारदारास दिल्या आहेत त्याचा तपशील खालीलप्रमाणे.....
अ.क्र. |
रसीद क्रं. |
तारीख |
रक्कम |
1 |
855 |
12.10.2008 |
1000/- |
2 |
912 |
26.10.2008 |
54000/- |
3 |
1034 |
26.11.2008 |
10000/- |
4 |
1114 |
14.12.2008 |
10000/- |
5 |
1243 |
14.01.2009 |
10000/- |
6 |
1427 |
17.02.2009 |
40000/- |
7 |
1575 |
21.03.2009 |
10000/- |
8 |
1708 |
26.04.2009 |
10000/- |
9 |
1879 |
17.6.2009 |
20000/- |
10 |
2092 |
19.7.2009 |
25000/- |
11 |
2131 |
26.8.2009 |
40000/- |
12 |
2231 |
02.10.2009 |
200000/- |
13 |
2334 |
7.11.2009 |
20000/- |
14 |
2420 |
05.12.2009 |
20000/- |
15 |
2525 |
09.01.2010 |
10000/- |
16 |
2615 |
06.02.2010 |
10000/- |
17 |
2746 |
31.03.2010 |
10000/- |
18 |
193 |
08.5.2010 |
10000/- |
19 |
1879 |
17.06.2010 |
10000/- |
20 |
254 |
19.06.2010 |
10000/- |
21 |
332 |
31.07.2010 |
10000/- |
22 |
386 |
04.09.2010 |
10000/- |
23 |
444 |
09.10.2010 |
20000/- |
24 |
039 |
11.06.2011 |
50000/- |
25 |
048 |
09.07.2011 |
20000/- |
एकुण किंमत 640000/- |
विरुध्द पक्षाने खरेदीखत करुन दिल्यास उर्वरित रक्कम रुपये 2,15,749/- तक्रारदार आजही देण्यास तयार आहे.
विरुध्द पक्षाने तक्रारदाराशी करार केला त्यावेळेस 15 महिन्यांचे आत सर्व कागदपत्र तयार करुन खरेदी करुन देण्याचे मान्य केले होते. परंतु आजपर्यन्तही उपरोक्त लेआऊट अकृषक झालेले नाही व नगर रचना विभागाचे ना हरकत प्रमाणपत्रही मिळविले नाही. त्यामुळे भुखंडाची नोंदणी होऊ शकत नाही. म्हणुन तक्रारदाराने पुढील हप्ते देण्यास थांबविले आहे. तक्रारदार उर्वरित रक्कम एकमुस्त खरेदीखत करुन मिळण्याच्या अटीवर देण्यास तयार आहे.
दिनांक 14/5/2012 रोजी तक्रारदाराने विरुध्द पक्षाला वकीलामार्फत नोटीस दिली त्याची दखल विरुध्द पक्षाने घेतली नाही.
तक्रारदाराला त्याच्या कायदेशीर हक्कापासुन वंचित ठेवल्यामुळे त्याला शारीरीक व मानसिक त्रास झाला ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रुटी ठरते. त्याची नुकसान भरपाई म्हणुन रुपये 1,00,000/- (एक लाख) विरुध्द पक्षाकडुन मिळावे अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
तक्रारीस कारण प्रथम जेव्हा भुखंड दिनांक 12/10/2008 रोजी आवंटीत केला तेव्हा घडले. त्यानंतर दिनांक 3/10/2009 रोजी विक्रीबाबत करारनामा केला तेव्हा व पुढे विक्री करुन देण्याची 15 महिन्यांची मुदत दिनांक 3/01/2011 रोजी संपली तेव्हा घडले आहे.
भुखंडाचा सर्व व्यवहार नागपूर येथे मंचाच्या अधिकार क्षेत्रात घडला आहे म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन मरजघाट –II , तह.उमरेड, जि.नागपूर येथील ले-आऊट मधील भुखंउ क्रं.43 आणि 76, खसरा /शेते नं.52 प.ह.न.13, एकूण क्षेत्रफळ 5033.82 चौ.फुटचे नोदंणीकृत खरेदी खत करुन मिळावे त्यासाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्र विरुध्द पक्षाने पुरवावे व ते शक्य नसल्यास भुखंडाची आजच्या बाजारभावाप्रमाणे येणारी किंमत मिळावी. शारीरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 1,00,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 25,000/- मिळावा. अशी मागणी केली.
तक्रारकर्त्याने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादी नुसार एकुण 4 कागदपत्रे दाखल केली आहे त्यात कराराची प्रत ले-आऊटचा नकाशा, तक्रारदाराने रक्कम भरल्याच्या पावत्या, नोटीसची प्रत, इत्यादी दस्त दाखल आहेत.
सदर तक्रार दाखल झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन विरुध्द पक्ष हजर झाले नाही व लेखी जवाब दाखल केला नाही म्हणुन दिनांक 1/10/2012 च्या आदेशान्वये त्यांना एकतर्फी घोषित करण्यात आले.
तक्रारदाराचे वकीलांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारीतील दाखल दस्तऐवज तपासले त्यावरुन मंचाची निरीक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणे
// नि री क्षणे व नि ष्क र्ष //
दिनांक 03/10/2009 च्या कराराचे अवलोकन केले असता तक्रारदार व विरुध्द पक्ष यांच्यात मरजघाट –II , तह.उमरेड, जि.नागपूर येथील ले-आऊट मधील भुखंड क्रं.43 आणि 76, खसरा /शेते नं.52 प.ह.न.13, एकूण क्षेत्रफळ 5033.82 चौ.फुट किंमत 8,55,749/- मध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याचे स्पष्ट होते.
पुढे तक्रारदाराने भुखंडासाठी एकुण रक्कम रुपये 6,40,000/- भरल्याचे दाखल केलेल्या 24 पावत्यांवरुन निष्पन्न होते.
कराराप्रमाणे तक्रारदाराने 15 मासिक हप्त्यात दरमहा रुपये 40,383/- भरायला पाहिजे होते. परंतु तक्रारदारानेच दाखल केलेल्या 24 पावत्यांवरुन ठरल्याप्रमाणे रक्कम तक्रारदाराने भरल्याचे दिसत नाही. अनेकवेळा कमी तर कधी जास्त रक्कमेचा हप्ता भरला आहे. तक्रारदाराला अजूनही त्यांचे म्हणण्यानुसार 2,15,749/- एवढी रक्कम विरुध्द पक्षाला देणे बाकी आहे हे तक्रारदार मान्य करतो. त्यांने रक्कम/हप्ता भरण्याचे थांबविले आहे हे ही तक्रारदार मान्य करतो.
दिनांक 3/10/2009 च्या करार बारकाईने तपासला असता, करारामध्ये कोठेही विरुध्द पक्षाने 15 महिन्यात –सर्व आवश्यक सरकारी परवानग्या मिळविण्यासाठी मुदत निश्चित केल्याचे निष्पन्न होत नाही. उलट 15 महिन्यांची मुदत तक्रारदाराने दरमहा रुपये 40,383/- भरण्यासाठी निश्चित केली आहे असे निष्पन्न होते.
The PURCHASER knows that the said plot is valued at Rs.8,55,749/- total
( at the Rate of Rs.170/- per Sq.Ft.) and the PURCHASER agrees to pay the remaining amount of Rs.6,05,749/- as per the rules of the company in Monthly installments, and the sale deed will be executed after completion of total amount. That the VENDOR shall develop the said layout by means including Tar Road, Nali, Electrification, water etc. as per G.S.R. Purchaser further agrees to bear expenses as may be incurred for Sale Deed registration charges for the said Plot. PURCHASER himself agrees to be responsible for the loss caused to him on account of his failure to pay the installments and get the Sale deed executed within the time limit, as per mentioned herein. PURCHASER further agrees that incase of his failure to pay, the monthly installment for three months consecutively, the said Booking of Plot will be cancelled and the advance amount will be refunded as per company rule. Responsibility arising out of change in Govt. Policies will be of Purchaser Possession of the Plot will be handed over to the PURCHASER at the time of execution of the Sale Deed. 15 Month installments as per month installments 40383/- Rupees.
यावरुन तक्रारदाराने करारातील तक्रारदाराचा भाग पूर्णपणे निभावलेला/पाळलेला
नाही हे स्पष्ट होते. तक्रारदाराने हप्त्यांच्या रक्कमा कराराप्रमाणे ठराविक मुदतीत भरल्या नाहीत असे दिसुन येते.
तक्रारदाराने तक्रारदाराचा भुखंड दर्शविणारा नकाशा प्रकरणात दाखल केला नाही. विरुध्द पक्षाला तक्रारीत वर्णन केलेल्या भुखंडाचे खरेदी खत करुन देण्यासाठी आवश्यक सरकारी परवानग्या, जसे अकृषक व नगर रचना विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अजूनही मिळाले नाही हे तक्रारदार स्वतःच मान्य करतो.
उपरोक्त सर्व कायदेशी बाबी लक्षात घेता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्षाने आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत खरेदी खत नोंदविण्याकरिता लागणारे आवश्यक सरकारी परवानग्या, जसे अकृषक व नगर रचना विभागाचे ना हरकत इत्यादी मिळवावे.
3. विरुध्द पक्षाने सदर बाबींची परवानगी मिळाल्यावर तक्रारदारास लेखी कळवावे. त्यानंतर तक्रारदाराने उर्वरित रक्कम रुपये 2,15,749/- विरुध्द पक्षाकडे 15 दिवसांचे आत एकमुस्त जमा करावी. सदर रक्कम प्राप्त झाल्यावर दिनांक 3/10/2009 च्या कराराच्या अधीन राहुन विरुध्द पक्षाने तक्रारदारास खरेदी खत करुन द्यावे.
4. विरुध्द पक्षाला खरेदी खत करुन देणे शक्य नसल्यास तक्रारदाराने 24 पावत्यानुसार जमा केलेली एकुण रुपये 64,000/- तक्रार दाखल तारखेपासुन द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी मिळुन येणारी रक्कम परत करावी.
5. विरुध्द पक्षाने तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 5,000/-(रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/-(रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
वरील आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 2 महिन्यांचे आत करावे.