// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 111/2013
दाखल दिनांक : 26/09/2013
निर्णय दिनांक : 12/03/2015
धनंजय वसंतराव तालुकदार
वय 56 वर्षे व्यवसाय – नोकरी
रा. दस्तुर नगर, न्यु भारतीय कॉलनी,
छत्रीतलाव रोड, अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- मेसर्स मॅट्रीक्स कन्स्ट्रक्शन कंपनी,
मार्फत प्राधीकृत स्वाक्षरी करणार
श्री सुचितकुमार दिवाण रामटेके
रा. 1 ला माळा, आशा टावर, काळी मंदिर जवळ
रहाटे कॉलनी, धंतोली नागपुर
दुसरा पत्ता अमर प्लाझा, व्यंकटेश बालाजी
मंदिराजवळ सन्मुख, जयस्तंभ चौक जवळ,
-
- श्री योगेश नारायणराव राणा, संचालक
मॅट्रीक राणा इन्फ्रा इस्टेट प्रा.लि.
रा. मॅट्रीक राणा इन्फ्रा इस्टेट, गाडगे नगर,
अमरावती
दुसरा पत्ता योगेश राणा, भागीरथी अपार्टमेंट
फ्लॅट क्र. 3, युनिट बी भारत नगर
नागपुर : विरुध्दपक्ष
ग्राहक तक्रार क्रमांकः 111/2013
..2..
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. राठी
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 तर्फे : एकतर्फा आदेश
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 12/03/2015)
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 हे बांधकामाचे व्यवसाय करतात. ३० सप्टेंबर २०११ ते २ ऑक्टोंबर २०११ या कालावधीत त्यांनी अमरावती येथे विदर्भ स्तरीय प्रापर्टी शो आयोजित केले होते. तक्रारदाराने भेट देवून विरुध्दपक्षा तर्फे बांधण्यात येणा-या सदनिकेची माहिती घेवून दि. १.१०.२०११ रोजी एक सदनिका, रु. ५,०००/- विरुध्दपक्ष क्र. 1 यांना देवून त्याची नोंदणी केली व दि. २.१०.२०११ रोजी रु. १,६०,८२५/- धनादेशा व्दारे विरुध्दपक्ष क्र. 1 यांना दिले होते, त्याबद्दल त्यांनी पावती क्र. १७१३ देण्यात आली होती.
ग्राहक तक्रार क्रमांकः 111/2013
..3..
3. विरुध्दपक्षाने दि. १०.१०.२०११ रोजी तक्रारदारास करारनामा करुन दिला होता. त्यानुसार सदनिकेची किंमत रु. ८,२९,१२५/- ठरविण्यात आली होती. त्यापैकी रु. १,६५,८२५/- तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 कडे जमा केले. करारनामा प्रमाणे विरुध्दपक्षाने सदनिकेचे बांधकाम करावयाचे होते. तक्रारदारास सदनिकेच्या किंमतीसाठी बॅंकेतून कर्ज काढावयाचे असल्याने त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडे दि. ११.१०.२०१२ रोजी अर्ज देवून सदनिकेच्या बांधकामा संबंधी कागदपत्राची मागणी केली. तक्रारदाराचे कथन आहे की, त्यास निरनिराळे कारणे सांगुन कागदपत्र देण्याचे विरुध्दपक्षाने टाळले किंवा त्याबद्दल योग्य ती माहिती दिली नाही. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्षाने अजुन सदनिका ज्या इमारतीत राहणार होती त्या इमारतीचे बांधकाम सुरु केलेले नाही व कागदपत्राची मागणी करुनही ते न दिल्याने त्यांनी सेवेत त्रुटी केली आहे.
4. तक्रारदाराचे कथना प्रमाणे करारात कबुल करुनही विरुध्दपक्षाने तक्रारदारास सदनिकेचा ताबा दिलेला नाही. नोंव्हेंबर २०१३ मध्ये त्यास असे कळविण्यात आले की, विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी दि. ६.६.२०१३ रोजी काही गाळा धारकांना नविन करारनामाकरुन दिला आहे. तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 2 शी
ग्राहक तक्रार क्रमांकः 111/2013
..4..
संपर्क साधला असता त्यास दि. १८.११.२०१३ रोजी रु. २०,९९६/- व दि. २०.११.२०१३ रोजी तितक्याच रक्कमेचा धनाकर्ष (डी.डी.) देण्यात आला. विरुध्दपक्ष क्र. 1 तर्फे विरुध्दपक्ष क्र. 2 यांना सदनिकेची किंमती पोटी दिलेली रक्कम तक्रारदारास परत करण्याची जबाबदारी घेवून ती रक्कम परत केली नाही किंवा कराराची पुर्तता केली नाही. त्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास झाला त्यासाठी त्यानी नुकसान भरपाई मिळण्यासाठी हा तक्रार अर्ज दाखल केला.
5. विरुध्दपक्ष यांना नोटीस पाठविल्या नंतर त्या नॉट क्लेम या शे-यासह परत आल्या. त्यानंतर तक्रारदाराने निशाणी 31 ला शपथपत्र दाखल केले. त्यावरुन विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 विरुध्द दि. १३.२.२०१५ च्या आदेशा प्रमाणे एकतर्फा चालविण्यात आला.
6. तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. राठी यांचा युक्तीवाद ऐकला.
7. तक्रारदाराने तक्रार अर्जात ज्या बाबी नमूद केल्या त्या प्रित्यर्थ निशाणी 2 सोबत दस्त दाखल केले. त्यावरुन असे स्पष्ट होते की, दि. १०.१०.२०११ रोजी विरुध्दपक्षाने तक्रारदारा सोबत करारनामा केला होता त्यानुसार त्याने तक्रारदार यांना मॅट्रीक्स रुबी ही इमारत बांधुन त्यातील सदनिका क्र. टी-1-107 ही ६७० स्के.फुट रु. ८,२९,१२५/- ला विकण्याचे कबुल करुन बांधकाम सुरु
ग्राहक तक्रार क्रमांकः 111/2013
..5..
झाल्यानंतर २४ महिन्याच्या कालावधीत त्या सदनिकेचा ताबा देण्याचे कबुल केले होते. या करारनाम्यात त्यांनी तक्रारदाराकडून सदनिकेच्या किंमती पोटी रु. १,६५,८२५/- मिळाल्याचे कबुल केलेले आहे. रु. १,६०,८२५/- धनादेशाव्दारे तक्रारदाराकडून मिळाल्या बद्दल विरुध्दपक्ष क्र. 1 तर्फे पावती क्र. १७१३ ही तक्रारदाराला देण्यात आली होती, जी तक्रारदाराने दाखल केली आहे.
8. तक्रारदाराचे कथन असे आहे की, विरुध्दपक्षाने अजुन पर्यंत सदनिकेचे बांधकाम सुरु केलेले नाही व तक्रारदारास रु. ४०,७९२/- हे त्याने विरुध्दपक्ष यांना दिलेल्या रु. १,६५,८२५/- पैकी परत केले. यावरुन हे शाबीत होते की, विरुध्दपक्षाने सदनिकेचे बांधकाम अजुन सुरु केलेले नाही. दि. १०.१०.२०११ च्या कराराचा भंग केलेला आहे अशा परिस्थितीत तक्रारदाराकडून घेतलेली एकूण रक्कम ही परत करण्याची जबाबदारी विरुध्दपक्षाची असतांना ती त्यांनी पार पाडलेली नाही व त्यामुळे विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली असा निष्कर्ष काढावा लागतो. ग्राहका कडून घेतलेली रक्कम परत न करणे व कराराप्रमाणे न वागणे ही विरुध्दपक्षाची कृती ही सेवेतील त्रुटी ठरते.
9. तक्रारदाराने मानसिक व शारिरीक त्रासापोटी जरी रु. २५,०००/- ची मागणी केली असली तरी ती कशी योग्य आहे त्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु एकंदर बाबींचा
ग्राहक तक्रार क्रमांकः 111/2013
..6..
विचार करता व विरुध्दपक्षाने तक्रारदारास रक्कम परत न करता स्वतःच्या लाभासाठी वापरत असल्याचे निदर्शनास आल्याने तक्रारदार हा रु. ५,०००/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतो असा निष्कर्ष हे मंच काढते.
10. वरील विवेचनावरुन, खालील आदेशा प्रमाणे तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारदारास रु. १,२४,०३३/- त्यावर दि. २.१०.२०११ पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 60 दिवसाचे आत द्यावे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या नुकसान भरपाई म्हणून तक्रारदार यांना रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च रु. 2,000/- द्यावे.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 12/03/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष