Maharashtra

Dhule

CC/11/30

Subhsh Shankar Patil(2) Tanuja Subhash PatilPlot 17 Mahatmaji Nagar, sakri road dhule - Complainant(s)

Versus

Matoshri patsantha, bang complex, khol gali dhule - Opp.Party(s)

vishal bhat

28 Jan 2014

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/11/30
 
1. Subhsh Shankar Patil(2) Tanuja Subhash PatilPlot 17 Mahatmaji Nagar, sakri road dhule
...........Complainant(s)
Versus
1. Matoshri patsantha, bang complex, khol gali dhule
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 HON'ABLE MR. S.S. Joshi MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

                                  ग्राहक तक्रार क्रमांक     ३०/२०११


 

                                  तक्रार दाखल दिनांक – ११/०२/२०११


 

                                 तक्रार निकाली दिनांक – २८/०१/२०१४


 

१) सुभाष शंकर पाटील  


 

   उ.व. – ५४ वर्षे, कामधंदा – नोकरी,


 

२) कु.तनुजा सुभाष पाटील


 

   उर्फ सौ. तनुजा कविश्‍वर सुर्यवंशी


 

   उ.व. – वर्षे, कामधंदा – घरकाम


 

   दोन्‍ही राहणार – प्‍लॉट नंबर १७, महात्‍माजी नगर,


 

   सिंधुरत्‍न शाळेजवळ, साक्री जकात नाका,


 

   साक्री रोड, धुळे. ता.जि.धुळे.                     ................ तक्रारदार


 

        विरुध्‍द


 

१. मातोश्री द्वारकाई महिला सहकारी पतसंस्‍था


 

   मर्यादित, धुळे, ता.जि.धुळे  


 

   पत्‍ताः- बंग कॉम्‍प्‍लेक्‍स, खोलगल्‍ली,


 

   २ रा मजला, डॉ.नेवाडकर लॅब शेजारी,


 

   ग.नं.४, धुळे.


 

   (समन्‍स/नोटीसीची बजावणी व्‍यवस्‍थापक


 

   यांचेवर करण्‍यात यावी)


 

२. सौ.पुष्‍पा प्रकाश अमृतकर (चेअरमन),


 

 पत्‍ताः- बंग कॉम्‍प्‍लेक्‍स, खोलगल्‍ली,


 

  २ रा मजला, डॉ.नेवाडकर लॅब शेजारी,


 

   ग.नं.४, धुळे.


 

३. सौ.सुनंदा रमेश अमृतकर (व्‍हा.चेअरमन)


 

 पत्‍ताः- बंग कॉम्‍प्‍लेक्‍स, खोलगल्‍ली,


 

  २ रा मजला, डॉ.नेवाडकर लॅब शेजारी,


 

    ग.नं.४, धुळे.


 

 


 

४. सौ.साधना विलास अमृते (संचालिका)


 

    पत्‍ताः- बंग कॉम्‍प्‍लेक्‍स, खोलगल्‍ली,


 

  २ रा मजला, डॉ.नेवाडकर लॅब शेजारी,


 

    ग.नं.४, धुळे.


 

५. सौ.प्रतिभा अरूण कुलकर्णी (शाखाधिकारी)


 

   पत्‍ताः- बंग कॉम्‍प्‍लेक्‍स, खोलगल्‍ली,


 

  २ रा मजला, डॉ.नेवाडकर लॅब शेजारी,


 

   ग.नं.४, धुळे.


 

   (जाबदेणार नंबर ३ ते ५ यांची बजावणी


 

    रा.ग.नं.५, सुपर मार्केट समारे,


 

    नवसाचा मारोती मंदीराजवळ, धुळे


 

    कार्यालय, येथे करण्‍यात यावी)                     ............ जाबदेणार


 

 


 

न्‍यायासन  


 

 (मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

 (मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

(मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.व्‍ही.एस. भट)


 

(सामनेवाले तर्फे – अॅड.व्‍ही.एस. वाघ)


 

 


 

निकालपत्र


 


 (दवाराः मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

 


 

तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍या पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अन्‍वये गुंतवलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.


 

 


 

१.   तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी जाबदेणार  मातोश्री द्वारकाई महिला सहकारी पतसंस्‍था मर्या., धुळे (यापुढे संक्षीप्‍तेसाठी पतसंस्‍था असे संबोधण्‍यात येईल) या पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अंतर्गत रक्‍कम गुंतविली होती. त्‍याचा तपशील खालील प्रमाणे आहे.


 

अ.  तक्रारदार नंबर १, श्री.सुभाष शंकर पाटील यांचे नावेः-


 

 


 

























अ.क्र.

पावती क्र.

ठेव दिनांक

ठेव रक्‍कम

ठेव देय दिनांक

व्‍याजदर

मुदतअंती मिळणारी रक्‍कम

०१

३६४८

३१/०५/२००८

१३,०००/-

३०/०६/२००९

१२%

१३०००/-+व्‍याज

एकुण

१३,०००/-

 

 

१३०००/-+व्‍याज


 

 


 

ब.    तक्रारदार नंबर २, कु.तनुजा सुभाष पाटील उर्फ सौ.तनुजा कविश्‍वर सुर्यवंशी यांचे नावेः- 


 

 


 

































































अ.क्र.

पावती क्र.

ठेव दिनांक

ठेव रक्‍कम

ठेव देय दिनांक

व्‍याजदर

मुदतअंती मिळणारी रक्‍कम

०१

३५९१

१४/०१/०८

१९,०००/-

१३/०२/०९

१२%

१९०००/-+व्‍याज

०२

३६३२

२२/०२/०८

०४,०००/-

२१/०३/०९

१२%

०४०००/-+व्‍याज

०३

३६५५

०५/०६/०८

२०,०००/-

०५/०७/०९

१२%

२०,०००/-+व्‍याज

०४

३६५६

०५/०६/०८

२०,०००/-

०५/०७/०९

१२%

२०,०००/-+व्‍याज

०५

३६५७

०५/०६/०८

१५,०००/-

०५/०७/०९

१२%

१५,०००/-+व्‍याज

०६

३६६६

०७/०६/०८

१५,०००/-

०६/०७/०९

१२%

१५०००/-+व्‍याज

एकुण

९३,०००/-

 

 

९३०००/-+व्‍याज


 

 


 

२.   तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍याकडे वरील देय रक्‍कमेची वेळोवेळी मागणी केली असता जाबदेणार यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍याकडून मुदत ठेव पावतींमधील एकूण रक्‍कम रू.१,०६,०००/- व त्‍यावरील देय तारखेपर्यंतचे व्‍याज अधिक मानसिक, शारिरिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रूपये ५०,०००/- आणि अर्जाचा खर्च रूपये २५,०००/- अशी एकूण रक्‍कम व ही रक्‍कम मिळेपर्यंत त्‍यावर द.सा.द..शे. १८% प्रमाणे व्‍याज जाबदेणार यांचेकडून मिळावे याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्‍यात आला. 


 

 


 

     तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयार्थ नि.४/१ ते नि.४/७ वर मुदत ठेव पावत्‍यांच्‍या छायांकित प्रती दाखल केलेल्‍या आहेत.


 

 


 

३.   सामनेवाला नं.१ यांनी आपल्‍या लेखी खुलाशामध्‍ये असे म्‍हटले आहे की, त्‍यांनी तक्रारदार यांना खालीलप्रमाणे रकमा दिलेल्‍या आहेत.


 

     अ. दि.०९/०४/२०१० रोजी रोखीने रूपये १०,०००/-


 

     ब. दि.०४/०५/२०१० रोजी शहादा पिपल्‍स बॅंकेत शाखा धुळे चेक नं.८४२७९    द्वारा रूपये १०,०००/-


 

     क. दि.१४/०७/२०१० रोजी शहादा पिपल्‍स बॅंकेत शाखा धुळे चेक नं.२९९१०५        द्वारा रूपये १०,०००/-


 

     ब. दि.१३/०९/२०१० रोजी डी.सी.सी. बॅंक प्रमोद नगर शाखा धुळे


 

        चेक नं.१११२४ द्वारा रूपये १०,०००/-


 

 


 

      तसेच तक्रारदार यांनी उपरोक्‍त रकमा घेवून सुध्‍दा घेतलेल्‍या पैश्‍यांची कोर्टापुढे केलेल्‍या मूळ अर्जात मागणी कलेली आहे व कोर्टास सामनेवाल्‍याची खोटी माहिती देऊन पतसंस्‍थेची व कोर्टाची फसवणूक करण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. तरी सदरचा दावा हा रद्द होण्‍यास पात्र आहे. तसेच भा.दं.वि. कलम ४२० नुसार तक्रारदार हा फौजदारी स्‍वरूपाच्‍या गुन्‍हयास पात्र आहे. म्‍हणून तक्रारदारचे खर्चासहीत अर्ज रद्दबादल करण्‍यात यावा.  


 

 


 

४.   सामनेवाले क्र.२ हे मे. मंचात हजर झालेनंतर मुदतीत खुलासा दाखल न केलेने त्‍यांच्‍या विरुध्‍द नो से चा आदेश करण्‍यात आलेला आहेत.


 

 


 

५.   जाबदेणार क्र.३ ते ५ यांना मंचाच्‍या नोटीसीची बजावणी होवूनही मुदतीत हजर न झालेने त्‍यांच्‍या विरूध्‍दएकतर्फा आदेश करण्‍यात आलेले आहेत.


 

 


 

६.   तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, सामनेवाला यांचा खुलासा व वकीलांचा युक्तिवाद ऐकल्‍यानंतर, तसेच दाखल कागदपत्रे पाहता आमच्‍या समोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.


 

 


 

 


 

 


 

              मुददे                                   निष्‍कर्ष


 

१.     तक्रारदार हे जाबदेणार  यांचे ग्राहक आहेत काय ?                होय


 

२.     जाबदेणार  यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात    


 

कमतरता केली आहे काय ?                                                   होय


 

३.     तक्रारदार हे जाबदेणार  यांच्‍याकडून देय रक्‍कम


 

व त्‍यावरील व्‍याज मिळण्‍यास पात्र आहेत काय ?           होय


 

४.     तक्रारदार हे जाबदेणार  यांच्‍याकडून मानसिक


 

त्रास व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम वसुल होऊन


 

मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                           होय


 

५.     अंतिम आदेश ?                                 आदेशाप्रमाणे


 

 


 

विवेचन


 

७.   मुद्दा क्र.१-  तक्रारदार यांनी मुदत  ठेव  पावत्‍यांच्‍या  छायांकित प्रती नि.४/१ ते नि.४/७ वर दाखल केलेल्‍या आहेत. जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्‍या  मुदत ठेव पावत्‍यांमधील रक्‍कमा नाकारलेल्‍या नाही. मुदत ठेव पावत्‍यांमधील असलेली रक्‍कम याचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार  यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे  मत  आहे.  म्‍हणून  मुद्दा क्र.१  चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.



 

८.   मुद्दा क्र.२- प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अन्‍वये रक्‍कम गुंतविली होती ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांच्‍या मागणीप्राणे सामनेवाला यांनी दि.०९/०४/२०१० रोजी रोखीने रु.१०,०००/- व दि.०४/०५/२०१०, दि.१४/०७/२०१० व दि.१५/०९/२०१० रोजी चेकने प्रत्‍येकी रू,१०,०००/- असे एकूण रू.४०,०००/- तक्रारदार यांना दिले आहे. याबबतचे स्‍टेटमेंट दाखल केले आहे व तक्रारदार यांनी मान्‍य केले आहे. याचा विचार होता तक्रारदार यांना मिळालेली रक्‍कम वजा जाता उर्वरित रक्‍कम म्‍हणजे रूपये ६६,०००/- ही रक्‍कम घेणे लागत आहे. परंतु सदरची रक्‍कम मागणी करुनही न देणे ही जाबदेणार यांची तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.२ चे  उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

९. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या मुदत ठेव पावत्‍यांमधील व्‍याजासह होणारी रक्‍कम जाबदेणार पतसंस्‍था व चेअरमन/व्‍हा.चेअरमन /संचालिका /शाखाधिकारी मातोश्री द्वारकाई महिला सहकारी पतसंस्‍था मर्या., धुळे यांच्‍याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू या संदर्भात मा.मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.५२२३/०९ सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये पुढील प्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.


 

 


 

        As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceededagainst and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain ableagainst the society, the Directors of members of the managing committee cannot be heldresponsible in view of the scheme of Maharashtra              Co-operative Societies Act. To holdthe Directors of the banks/members of the managing committee of the societiesresponsible, without observing the procedure prescribed under the Act, would also beagainst the principles of   co-operation, which is the very foundation of establishment oftheco-operative societies.


 

 


 

     वरील न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना रक्‍कम देण्‍यासाठी  वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे जाबदेणार पतसंस्‍थेचे चेअरमन/व्‍हा.चेअरमन/संचालिका  यांना वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही. तसेच जाबदेणार क्र.५ हे पतसंस्‍थेचे कर्मचारी असल्‍याने त्‍यांचा प्रत्‍यक्षरित्‍या पतसंस्‍थेच्‍या व्‍यवहारात त्‍यांचा संबंध नसल्‍याने त्‍यांना वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार पतसंस्‍था श्री मातोश्री द्वारकाई महिला सहकारी पतसंस्‍था मर्या., धुळे यांचेकडून मुदत ठेव पावत्‍यांमधील तक्रारदर यांना मिळालेली रक्‍कम वजा जाता उर्वरित रक्‍कम रू.६६,०००/- वर ठेव दिनांकापासून द.सा.द.शे.१२% प्रमाणे व्‍याज व या रकमेवर देय  दिनांकापासुन द.सा.द.शे.९% दराने संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत व्‍याज,अशी एकूण रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.३ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

१०. मुद्दा क्र.४- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावत्‍यांमधील व्‍याजासह होणारी रक्‍कम जाबदेणार  यांच्‍याकडुन परत मिळावी म्‍हणून तक्रारदार यांना जाबदेणार पतसंस्‍था मातोश्री द्वारकाई महिला सहकारी पतसंस्‍था मर्या., धुळे यांच्‍या विरुध्‍द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्‍यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे जाबदेणार  यांच्‍या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुदद क्रं.४ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

 


 

११. मुद्दा क्र.५- वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.


 

 


 

आ दे श


 

 


 

१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

 


 

२.  जाबदेणार मातोश्री द्वारकाई महिला सहकारी पतसंस्‍था मर्या., धुळे यांनी सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना खालील प्रमाणे रक्‍कमा दयाव्‍यात.


 

 


 

(१) मुदत ठेव पावत्‍यांमधील तक्रारदर यांना मिळालेली रक्‍कम वजा जाता उर्वरित रक्‍कम रू.६६,०००/- (अक्षरी रूपये सहासष्‍ट हजार मात्र) वर ठेव दिनांकापासून द.सा.द.शे.१२% प्रमाणे व्‍याज व या रकमेवर देय  दिनांकापासुन द.सा.द.शे.९% दराने संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत व्‍याज अशी एकूण रक्‍कम दयावी.


 

 


 

 


 

(२) मानसिक त्रासापोटी रक्‍कम रू.१,०००/- (अक्षरी रू. एक हजार मात्र) व


 

 अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- (अक्षरी रू. पाचशे मात्र) दयावेत.


 

 


 

३.  वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्‍यक्ष/संचालक/व्‍यवस्‍थापक/अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्‍थेचा कारभार पाहात असतील त्‍यांनी करावी.  तसेचक्र.मधीलरकमेपैकीकाहीरक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास, त्‍यावर कर्ज दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरित रक्‍कम अदा करावी.  


 

 


 

 


 

धुळे.


 

दि.२८/०१/२०१४


 

            (श्री.एस.एस. जोशी)  (सौ.एस.एस. जैन)  (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

                   सदस्‍य           सदस्‍या           अध्‍यक्षा


 

                   जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER
 
[HON'ABLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.