जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :- 2010/232
प्रकरण दाखल तारीख - 23/09/2010
प्रकरण निकाल तारीख – 18/03/2011
समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष
मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या
राधेश्याम आयदान शर्मा
वय वर्षे 27, धंदा खाजगी व्यवसाय
रा. महादेव मिल, व्ही.आय.पी. रोड, नांदेड. अर्जदार.
विरुध्
1. मारुती सेल्स कार्पोरेशन
स्टेट बँक ऑफ इंडिया ए.पी.एम.सी.शाखा
नवीन मोंढा नांदेड. गैरअर्जदार
2. पार्कर पॉवर सिस्टीमस लि.
531, फंक्शनल इंडस्ट्रीयल स्टेट, प्रतापगंज, दिल्ली-110092
3. गोल्ड स्टार बँटरी प्रा.लि.
राजकोट रोड, हापा, जि.जामनगर (गुजरात)पिन कोड 361 120
अर्जदारा तर्फे वकील - अड.संजयकुमार शर्मा.
गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - कोणीही हजर नाही.
गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील - कोणीही हजर नाही.
गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील - स्वतः
निकालपत्र
(द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष )
1. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा नांदेड येथील रहीवासी आहेत. गेरअर्जदार क्र.1 हे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी उत्पादीत केलेल्या इन्र्व्हर्टर संच व त्यांला लागणा-या बॅटरीचे नांदेड येथील अधिकृत विक्रेते आहेत. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून विक्री बिल नंबर 23/09 दि.06.06.2009 रोजी इन्व्हर्टर संच रु.13,850/- ला घेतला. त्यांची बिल पावती सोबत जोडली आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 यानी वॉरंटी कार्ड देऊन त्यांवर अर्जदाराची सही घेतली आहे. सदर इन्र्व्हर्टर संच PACKER POWER 860 VA ची वॉरंटी ही खरेदी केलेल्या दिनांकापासून दोन वर्षापर्यत होती व INVA STAR IST 1500 बॅटरीची वॉरंटी खरेदी दिनांकापासून 30 महिन्याची राहील व सदर इन्व्हर्टर संच हा दोन पंखे, तिन टयूबलाईट इत्यादि करिता पाच ते सहा तास इलेक्ट्रीक बॅकअप देईल व या वॉरंटी कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची
देखभाल दूरुस्ती व इन्व्हर्टर संचामध्ये बिघाड झाला तर त्यांची दूरुस्ती करण्याचे ठरले होते. सुरुवातीला म्हणजे फेब्रूवारी 2010 पर्यत नांदेड मध्ये खूप कमी भारनियमन
असल्यामूळे संच चांगले चालले. परंतु मार्च 2010 पासून भारनियमन सूरु झाले त्यावेळेस सदर इन्व्हर्टर हे अर्धा ते एक तास विज पूरवठा देऊ लागले. जेव्हा की ते गैरअर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे सहा ते सात तास विज पूरवठा दयावयास पाहिजे होते. याबाबत गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडे तक्रार केली असता त्यांनी अर्जदाराच्या घरी येऊन संचाची व बॅटरीची तपासणी केली व बॅटरीमध्ये वॉटरचा भरणा करुन पूर्ण चार्ज झाल्यानंतर पूर्ण काम करेल अशी समजूत घातली. परत तक्रार केली असता परत घरी येऊन संचाची तपासणी केली असता इन्र्व्हर्टर संचामध्ये बीघाड असून संच व बॅटरी दोन्ही दूरुस्त करावे लागेल त्यापैकी संच हे गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे जमा करण्यास सांगितले व गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे सर्व्हीस इंजिनिअर येतील ते इन्व्हर्टर संचाची तपासणी करतील. त्यानुसार अर्जदाराने दि.19.05.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांच्या दूकानात संच जमा केले. काही दिवसांनी अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे गेले असता त्यांनी सदर संच हा वापरा योग्य नाही व तो गेरअर्जदार क्र.2 कडून बदलून मिळण्यासाठी पाठविला आहे व तो बदलून आल्यानंतर तूम्हाला 15 ते 20 दिवसानंतर दिला जाईल असें सांगितले. अद्यापपावेतो गैरअर्जदार क्र.1 यांनी संच बदलून दिला नाही व वॉरंटी कार्डवर नमूद केल्याप्रमाणे गेरअर्जदार क्र. 2 व 3 यांच्या दूरध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. शेवटी दि.17.08.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व संच दिला नाही. इन्व्हर्टर नसल्यामूळे भारनियमानाच्या काळात अर्जदाराच्या वयोवृध्द आईवडिलांना व लहान मूलाना अंधारात व विनापंख्याचे राहावे लागत आहे. भर उन्हाळयात अर्जदार व त्यांचे कूटूंबाना खूप मानसिक व शारीरिक ञास झालेला आहे. असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केलेली असून अर्जदाराची मागणी आहे की , गैरअर्जदार क्र.1,2, व 3 यांच्याकडून वैयक्तीक वा सामूहिकरित्या सदर संचाची किंमत रु.13,850/- व त्यावर दि.06.06.2009 पासून 18 व्याज दराने परत करावेत, तसेच मानसिक व शारिरीक ञासासाठी रु.10,000/- मिळावेत, तसेच दाव्याच्या खर्चापोटी रु.4,000/- मिळावेत.
2. गैरअर्जदार क्र.1 यांना अनेक संधी देऊनही त्यांनी आपले म्हणणे मांडले नाही म्हणून त्यांचे विरुध्द नो से चा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले.
3. अर्जदार यांना अनेक संधी देऊनही त्यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्द नोटीस तामीली बाबत कोणतीही स्टेप्स न घेतल्यामूळे गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्द तक्रार खारीज करण्यात आली.
4. गैरअर्जदार क्र.3 हे स्वतः हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी त्यांचेकडून बॅटरी खरेदी केली आहे व त्यांची तक्रार ही इन्व्हर्टर बददल आहे. तरी आमचे इंजिनिअर श्री.संतोष खांमजल यांनी दि.25.10.2010 रोजी अर्जदाराच्या समोर बॅटरी तपासली असता बॅटरी ओके असल्याचे दिसून आले. बॅटरी तपासल्याचा रिपोर्ट जवाबासोबत जोडला आहे. अर्जदार यांना बँटरी बददल कोणतीही तक्रार नाही. म्हणून या तक्रारी आमचा काहीही सहभाग नाही म्हणून आम्हाला या तक्रारीतून वगळण्यात यावे असे म्हटले आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासल्यानंतर जे मूददे उपस्थित होतात ते मूददे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे.
मुद्ये. उत्तरे.
1. अर्जदार हे ग्राहक आहे काय ? होंय.
2. अर्जदार यांने केलेली मागणी पूर्ण करण्यास
गैरअर्जदार जबाबदार आहेत काय ? फक्त गैरअर्जदार क्र.1
जबाबदार आहेत व ते ही
फक्त रु.5,000/- साठी
3. काय आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारणे
मुद्या क्र. 1 –
6. अर्जदार यांनी पावती दाखल केली आहे. त्या पावतीवरुन असे दिसते की, त्यांनी पार्कर 860 VA 080 H 580599 किंमत रु.5,000/- व IST 1500 211161 किंमत रु.8850/- म्हणजे एकूण किंमत रु.13,850/- ची पावती दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांना, संधी मिळून देखील आपले म्हणणे दाखल केलेले नाही यांचा अर्थ त्यांना त्या पावती बददल काहीही सांगायचे नाही असा होतो. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 चे विरुध्द स्टेप्स न घेतल्यामूळे ही फिर्याद गैरअर्जदार क्र.2 चे विरुध्द खारीज करण्यात आलेली आहे. गैरअर्जदार क्र.3 ने आपले म्हणणे नि.9 वर दिलेले आहे व त्यांनी फक्त इन्व्हर्टर स्टार बॅटरी अर्जदारास विकल्याचे कबूल केले आहे व त्या बॅटरीचे कामकाज ‘ OK ’ असल्याचा रिपोर्ट दाखल केलेला आहे यावरुन असे दिसते की, अर्जदार हे गैरअर्जदार याचे ग्राहक आहेत म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात आले.
मूददा क्र.2 ः-
7. अर्जदाराने वरील जी पावती दाखल केलेली आहे ती पावती गैरअर्जदार क्र.1 मारुती सेल्स कार्पोरेशन यांचेतर्फे अर्जदार यांना देण्यात आलेली आहे. या पावतीवर ग्राहकांचे नांव “ राधेश्याम आयदान खंडेलवाल नांदेड ” असे लिहीलेले आहे व त्या पावतीचा दि.6.6.2009 असा आहे. अर्जदाराने आपल्या फिर्यादीमध्ये त्यांचे ऊर्फ आडनांव खंडेलवाल असल्याचा कोणताही उल्लेख केलेला नाही व तो का केला नाही ? याबददल काही खूलासाही केलेला नाही. तथापि, गैरअर्जदाराने सदरी आडनांवाला आक्षेप घेतलेला नसल्यामूळे ती पावती अर्जदाराचीच असावी असे गृहीत धरण्यास हरकत नाही.
8. सदरी पावती पाहिल्यानंतर असे दिसते की, ती पावती मारुती सेल्स कार्पोरेशन यांचेतर्फे देण्यात आलेली आहे व त्या नांवाखाली त्यांचा पत्ता जो त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे “ Near State Bank of India, New Mondha, Nanded ” असा आहे. यांचा अर्थ सदरी मारुती सेल्स कार्पोरेशन हे स्टेट बँक ऑफ इंडिया न्यू मोंढा बँकेचे जवळ आहे परंतु अर्जदाराने आपल्या फिर्यादीमध्ये “ जवळ ” किंवा “Near ” हे शब्द वगळलेले आहेत ? त्यामूळे सदरी पत्त्याबददल संभ्रम निर्माण होतो व सदरी मारुती सेल्स कार्पोरेशन ही बँकेतर्फे आहे किंवा काय ? असाही संभ्रम निर्माण होतो. सदरी तक्रार दाखल केल्यानंतर अर्जदार पून्हा इकडे फिरकलेच नाहीत. गैरअर्जदार क्र.2 चे विरुध्द
त्यांनी काही स्टेप्सही घेतली नाही ? त्यामूळे दि.8.3.2011 रोजी सदरी फिर्याद गैरअर्जदार क्र.2 चे विरुध्द खारीज करण्यात आलेली आहे. त्यानंतर देखील अर्जदाराचे वकील यूक्तीवाद करण्यासाठी या मंचाकडे आलेले नाहीत ?
9. गैरअर्जदार क्र.3 च्या लेखी म्हणण्यावरुन असे दिसते की, अर्जदाराची त्यांचे बॅटरी बददल जी तक्रार होती त्याबददल त्यांचे इंजिनिअर श्री.संतोष खामगाळ हे अर्जदाराकडे दि.25.10.2010 रोजी गेले व बॅटरीची तपासणी केली व तेव्हा बॅटरी ‘ OK ’ असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे त्यांनी तसा अहवालही दिलेला आहे व त्यावर फिर्यादी राधेशाम शर्मा यांची सही आहे. यांचा अर्थ गैरअर्जदार क्र.3 ची बॅटरी होती ती बॅटरी OK होती व अर्जदार यांना मान्यही होते म्हणून अर्जदाराने सदरी रिपोर्टवर सही केलेली आहे. आता अर्जदार यांची तक्रार गैरअर्जदार क्र.3 विरुध्द नाही. वर सांगितल्याप्रमाणे अर्जदाराचे वकील यूक्तीवादासाठी आलेले नसल्यामूळे, गैरअर्जदार क्र.3 चे म्हणणे व त्यांचा अहवाल नाकारण्यास कोणतेही कारण नाही. म्हणून सदरी कागदपञी पूरावेवरुन असे दिसते की, गैरअर्जदार क्र.3 चे विरुध्द अर्जदार यांची कोणतीही तक्रार नसल्यामूळे गैरअर्जदार क्र.3 वर कोणतीही जिम्मेदारी टाकता येणार नाही.
10. कागदपञावरुन असे दिसते की, गैरअर्जदार क्र.1 यांना संधी मिळूनही देखील त्यांनी आपले म्हणणे दाखल केलेले नाही ? सदरी पावती दि.6.6.2009 वरुन असे दिसते की, पार्कर पॉवर इन्व्हर्टर रु.5,000/- चे फक्त गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास विकलेले होते. अर्जदाराची तक्रार आहे की, ते इन्व्हर्टर बरोबर बॅकअप देत नाही म्हणून गैरअर्जदार क्र.1 चे अर्जदारास सदरी इन्व्हर्टर ची किंमत रु.5,000/- देण्यास बाध्य असेल या निर्णयास्तव हे मंच आलेले आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे अर्जदाराचे वकिल यूक्तीवादासाठी आलेले नसल्यामूळे एकंदर कागदपञावरुन असे दिसते की, फक्त गैरअर्जदार क्र.1 च सदरी किंमत रु.5,000/- अर्जदारास परत करण्यास बांधील राहील म्हणून मूददा क्र.2 चे उत्तर अशा प्रकारे देण्यात येत आहे.
मूददा क्र.3 ः-
11. वरील चर्चेवरुन असे स्पष्ट होते की, फक्त गैरअर्जदार क्र.1 च अर्जदाराला रु.5,000/- देण्यास बाध्य असेल, गैरअर्जदार क्र.2 च्या विरुध्द अर्जदाराने स्टेप्स न घेतल्यामूळे ही तक्रार गैरअर्जदार क्र.2 च्या विरुध्द खारीज करण्यात आलेली आहे. गैरअर्जदार क्र.3 तर्फे बॅटरी OK असल्याचा रिपोर्ट दाखल केलेला आहे व त्यावर अर्जदाराची सही देखील आहे. त्यामूळे गेरअर्जदार क्र.3 देखील कोणतीही रक्कम देण्यास बाध्य नाहीत. म्हणून आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार
क्र.1 यांनी अर्जदारांस सदरी इन्व्हर्टरच्या किंमतीपोटी
रु.5,000/- (रु.पाच हजार फक्त) अर्जदारास देतील, तसे
न केल्यास गैरअर्जदार क्र.1 हे सदरी रु.5,000/- वर
तक्रार दाखल केलेल्या दिनांकापासून म्हणजे
दि.23.09.2010 पासून 9 टक्के व्याज देण्यास बाध्य
असतील.
2. गैरअर्जदार क्र.1 यांनी स्वतःच या दाव्याचा खर्च सोसून अर्जदारास या दाव्यापोटी रु.1,000/- दयावेत.
3. गैरअर्जदार क्र. 2 व 3 विरुध्द काही आदेश नाही.
4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा.
श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख
अध्यक्ष सदस्या