जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 259/2008. प्रकरण दाखल तारीख - 24/07/2008 प्रकरण निकाल तारीख - 21/10/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य संतोष पि. दासराव पाडळकर अर्जदार. रा. वय, 32 वर्षे, धंदा, व्यापार रा. आखाडा बाळापूर ता. कळमनूरी जि. हिंगोली. विरुध्द. श्री. गोंविद डिग्रसकर विमा वीभाग प्रमुख, मारोती सेवा सर्व्हीस सेंटर, गैरअर्जदार नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. संजय आर.पडोळे गैरअर्जदार तर्फे वकील - अड. पी.एस.भक्कड. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार यांचे विरुध्द अर्जदार यांची आर्थिक फसवणूक केल्या बाबत अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हे एम.एच.-26-एल-2565 या ओमनी मारोती गाडीचे मालक आहेत. दि.2.4.2008 रोजी त्यांचे वाहनाचा अपघात झाला. अर्जदार यांनी मारुती सेवा प्रा. लि. कंपनी नांदेड यांचे कर्मचारी गोंविद डिग्रसकर यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी वाहन स्वःखर्चाने घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे रु.1500/- खर्च करुन वाहन हे मारुती सेवा सेंटरमध्ये नेले. त्या बरोबर अर्जदार यांनी रु.18,000/- पार्कीग चार्जेस व इस्टीमेट चार्जेस जमा करण्याचे सांगण्यात आले, त्याप्रमाणे अर्जदाराने ते जमा केले. दि.24.7.2008 रोजी गाडी नेत असताना गाडीचे परत पार्कीग चार्जेस व इस्टीमेट चार्जेस यांची मागणी करण्यात आली त्याशिवाय गाडी नेऊ नका असे सांगितले. अर्जदाराने सूरुवातीला रु.18,000/- जमा केलेले आहेत. यामध्ये अवैध मार्गाने मारुती सेवा कंपनीने रु.7,000/- कपात करुन घेतले व बाकी रक्कम वापस दिली. गाडीचा क्लेम देखील मिळू दिलेला नाही. त्यामूळे अर्जदारास आर्थिक भूर्दड झाला. अर्जदाराची मागणी आहे की, आर्थिक फसवणूक रु.7,000/-, गाडी आणण्यासाठी रु.3000/- व मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.50,000/- असे एकूण रु.63,000/- व्याजासह मिळावेत अशी मागणी आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार घडण्यास कोणतेही कारण नाही. त्यांने सेवेत कमतरता केली नाही किंवा अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला नाही, व हे अर्जदार हे ग्राहक या व्याख्येत बसत नाही म्हणून हे प्रकरण खारीज करावे असे म्हटले आहे.अर्जदार यांच्या वाहनाचा विमा नॅशनल इन्शूरन्स कंपनी यांचेकडे काढलेला आहे. कंपनीला पार्टी केले नाही. तसेच गैरअर्जदार हा मारुती सेवा अटोमोटीव्ह प्रा. लि. या कंपनीत कामाला आहे. त्यांने जे काही कृत्य केले ते सेवा अटोमोटीव्ह यांचे अधिका-याच्या सांगण्यावरुन केले. त्यांचा या प्रकरणाशी वैयक्तीक काही संबंध नाही व अर्जदाराने सेवा अटोमोटीव्ह प्रा. लि. यांना पार्टीही केलेले नाही. यामूळे हे प्रकरण चालू शकत नाही. अर्जदाराचे वाहन नंबर एम. एच.26-एल-2565 यास अपघात झाल्यानंतर वर्कशॉप पर्यत गाडी आणण्याचा खर्च हा गाडी मालकास दयावा लागतो. अर्जदाराने सेवा अटोमोटीव्ह मध्ये रु.18,000/- जमा केले. ही रक्कम अडव्हान्स म्हणून जमा करण्यात आली होती. सदरील गाडी वर्कशॉपमध्ये आल्या बरोबर गैरअर्जदाराने अर्जदारास अपघातग्रस्त वाहनाच्या दूरुस्तीकरिता सर्व शर्ती समजावून सांगितल्या व अर्जदाराने या सर्व शर्ती सेवा अटोमोटीव्ह प्रा. लि. च्या हक्कामध्ये मान्य असल्या बाबतचे पञ दिले. गैरअर्जदाराचे वाहन टोटल लॉसमध्ये गेल्यास असेंसमेट रक्कमेच्या 10 टक्के असेसमेट चार्जेस म्हणून अर्जदारास दयावेत व जितके दिवस गाडी वर्कशॉपमध्ये राहील त्याप्रमाणे रोजी रु.100/- प्रमाणे पार्कीग चार्जेस दयावे लागते. अर्जदारास 100 टक्के विमा रक्कम मिळवून देऊ असे कूठलेही आश्वासन दिलेले नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून पार्कीग चार्जेस बददल व इस्टीमेट चार्जेस बददल रु.7,000/- घेऊन बाकीची रक्कम म्हणजे रु.11,000/- त्यांना परत केली आहे. ही रक्कम गैरकायदेशीर नाही. सबब अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांनी अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला हे सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी जो तक्रार अर्ज दाखल केला आहे त्यावरुन त्यांनी वकिलामार्फत केलेल्या यूक्तीवादावरुन हे दिसून येते की, अर्जदारांनी केलेली तक्रार ही वैयक्तीकरित्या केलेली आहे. गैरअर्जदार गोंविद डिग्रसकर हे सेवा अटोमोटीव्ह प्रा. लि. या कंपनीचे कर्मचारी आहेत. त्यांचे लेखी म्हणण्याप्रमाणे जे की काही कृत्य केले ते सेवा अटोमोटीव्ह या कंपनीच्या आदेशावरुन केलेले आहे. त्यामूळे त्यांचा या प्रकरणाशी वैयक्तीक काहीही संबंध नाही. त्यांचे असाही आक्षेप आहे की. नॅशनल इन्शूरन्स कंपनी व सेवा अटोमोटीव्ह प्रा.लि. यांना यामध्येपार्टी करण्यात आलेले नाही. अर्जदाराने जे वाहन दूरुस्तीचे बिल दाखल केलेले आहेत. जे जॉब इस्टीमेट सेवा अटोमोटीव्ह प्रा. लि. ने दिलेले आहे. विमा पॉलिसी जी अर्जदाराने दाखल केलेली आहे ती कंपनी नॅशनल इन्शूरन्स कंपनी लि. आहे व अर्जदाराने जो पञव्यवहार किंवा अर्ज दिला आहेत. दि.11.4.2008 रोजी एक अर्ज सेवा अटो, नांदेड यांच्या नांवाने व दूसरा अर्ज नॅशनल इन्शूरन्स कंपनी यांचे नांवाने दिलेला आहे. जे रु.18,000/- अर्जदाराकडून घेण्यात आलेले आहे ते सेवा अटोमोटीव्ह प्रा.लि. कंपनीने स्विकारल्या बददल त्यांचा शिक्का व सही असलेली पावती दाखल केलेली आहे. जी रक्कम रु.11,000/- अर्जदारास दि.19.6.2008 रोजी देण्यात आली ती रक्कम दिल्याबददलची पोहच सेवा अटोमोटीव्ह कंपनीने दिलेली आहे. ते सर्व कागदपञ असे दाखवतात की, अर्जदाराची जी काही तक्रार आहे ती श्री. गो्विंद डिग्रसकर फक्त यांचे विरुध्द आहे व कागदपञावरुन अशा प्रकारची तक्रार असेलच तर ती सेवा अटोमोटीव्ह प्रा.लि. कंपनी यांचे विरुध्द असावयास पाहिजे कारण जो की व्यवहार झालेला आहे तो सेवा अटोमोटीव्ह कंपनीशी संबंधीत आहे. या एकाही कागदपञावर गैरअर्जदार यांचे नोंदी नाही किंवा सही नाही. किंवा गैरअर्जदार यांनी आपल्या सहीने अर्जदारास एकही कागदपञ दिलेले नाही. वरील सर्व प्रकरणावरुन अर्जदार यांनी वैयक्तीकपणे गैरअर्जदार यांचे विरुध्द तक्रार करण्याचा अधिकार राहणार नाही. उदा. एका बँकेच्या शाखाधिकारी हा बँकेच्या वतीने सर्व कारभार पाहतो यांचा अर्थ बँकेच्या व्यवहारासाठी तो व्यक्तीशः जबाबदार राहणार नाही. त्यासाठी बँक हीच जबाबदार राहील. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते. 2. पक्षकारानी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |