मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार अर्ज क्र. 146/2011 निकाल तारीख – 13/10/2011 श्री. महेंद्र एम.गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या (श्री. महेंद्र एम.गोस्वामी, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला) --------------------------------------------------------------------------------------- 1. श्री. तुकाराम गेणु जवळ 2. सौ. अनुसया तुकाराम जवळ दोघे रा. जवळवाडी, ता. जावली, जि. सातारा ........अर्जदार विरूध्द मराठा सहकारी पतसंस्था मर्या. सातारा रा. मराठा भवन 506/10 प्लॉट नं. 8 एस.टी.स्टॅडचे पाठीमागे, सदरबझार, सातारा ........जाबदार नि. 1 खालील अंतिम आदेश 1. विरूध्द पक्षाच्या पतसंस्थेने तक्रारदारच्या ठेवीच्यारकमा व्याजासह परत न केल्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे व आज सदरचे प्रकरण अडमिशन हिअरिंगसाठी ठेवले आहे. 2. आज मंचासमोर तक्रारदार व त्यांचे वकील हजर आहेत. सदरचे तक्रार प्रकरणात काही त्रुटी असल्याबाबत मंचाने तक्रारदाराचे वकीलांना सूचना केली. त्यानुसार तक्रारदार व त्यांचे वकीलांनी नि. 7 वर अर्ज दाखल करून तक्रार प्रकरण मागे घेत असल्याचे विषद केले व नव्याने तक्रार दाखल करण्याची परवानगी मागीतली. सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे. आदेश 1. तक्रारदारने दाखल केलेल्या नि. 7 वरील अर्जाला अनुसरून सदरचे तक्रार प्रकरण मागे घेण्याची परवानगी देण्यात येते. 2. तसेच तक्रादराला नव्याने तक्रार दाखल करण्याची परवानगी देखील देण्यात येते. 3. तक्रारदराने दाखल केलेले सर्व मूळ कागदपत्र व ठेव पावत्या त्यांना परत करण्यात याव्यात. 4. खर्चाबाबत काही आदेश नाही. 5. सदरचे तक्रार प्रकरण नस्तीबध्द करण्यात येते. सातारा दि. 13/10/2011 (श्री.महेंद्र एम. गोस्वामी) (श्रीमती सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |