(आदेश पारीत व्दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्यक्ष)
1. तक्रारकर्तीने सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारकर्तीने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्तीने सामनेवालाचे पतसंस्थेमध्ये खालील प्रमाणे रक्कम मुदत ठेव म्हणून जमा केलेली आहे.
पावती क्रमांक | ठेव दिनांक | परतीची दिनांक | ठेव रक्कम | मिळणारी रक्कम |
6393 | 09.02.2016 | 09.08.2016 | 105635 | 110917 |
6394 | 09.02.2016 | 09.08.2016 | 105635 | 110917 |
6395 | 09.02.2016 | 23.03.2016 | 39375 | 39822 |
| | | 250645 | 261656 |
तक्रारकर्तीने पुढे असे कथन केले आहे की, तक्रारकर्तीला वरील नमुद रकमावर खालील प्रमाणे व्याज मिळावे.
पावती क्रमांक | व्याजाची |
6393 | 792 |
6394 | 792 |
6395 | 295 |
एकुण | 1879 |
वरील नमुद मुदत ठेवीची रक्कम मुदत संपल्यानंतर सामनेवाला पतसंस्थेने तक्रारकर्तीला परत केलेली नाही व देण्यास टाळाटाळ केली. म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
3. तक्रारकर्तीने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारकर्तीची सामनेवाला पतसंस्थेकडे जमा असलेली रक्कम 18 टक्के व्याजासह द्यावी तसेच तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक शारीरीक व नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्यात यावा अशी विनंती केली आहे.
4. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्यात आल्या. सदर नोटीस “ Unclaimed ” म्हणून परत आल्या असल्याने निशाणी 30 नुसार जाहिरात देऊन जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात आली. सदर जाहिर नोटीस प्रसिध्द करण्यात आल्यावरसुध्दा सामनेवाला हे प्रकरणात हजर झाले नाही. म्हणून निशाणी 1 वर दिनांक 01.11.2018 रोजी सामनेवाला क्र.1 ते 15 यांचेविरुध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
5. तक्रारकर्तीची दाखल तक्रार, दस्तावेज व तोंडी युक्तीवादावरुन खालील निष्कर्षा प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
निष्कर्ष
6. तक्रारकर्तीने सामनेवालाकडे मुदत ठेव रक्कम रु.2,50,645/- दिनांक 09.02.2016 रोजी जमा केली आहे, ही बाब तक्रारकर्तीने दाखल तक्रार, शपथपत्रात व दस्तावेजावरुन सिध्द होते. म्हणून तक्रारकर्ती ही सामनेवालाचे ग्राहक आहे असे सिध्द होते. सामनेवालाने वरील नमुद मुदत ठेव रक्कम तक्रारकर्तीस परत केली नाही ही बाब तक्रारकर्तीचे तक्रार व शपथपत्रावरुन सिध्द होते. सामनेवाला प्रकरणात हजर झाले नाही व त्यांची बाजु मांडली नाही, याचा अर्थ तक्रारकर्तीने तक्रारीत लावलेले आरोप सामनेवाला विरुध्द सिध्द होत आहे. सामनेवालाने तक्रारकर्तीला मुदत ठेव रक्कम परत केली नसल्याने व तक्रारकर्तीप्रति सेवेत त्रुटी दिली असेही सिध्द होते. सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येतो.
- अं ति म आ दे श –
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवालाने तक्रारकर्तीला मुदत ठेव रक्कम रु.2,61,656/- (रक्कम रु.दोन लाख एकसष्ट हजार सहाशे छप्पन फक्त) दिनांक 09.08.2016 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह रक्कम अदाईकीपर्यंत तक्रारकर्तीला द्यावे.
3. सामनेवाला यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.10,000/- (रक्कम रु.दहा हजार फक्त) व तक्रारीचा खर्च 5,000/- (रक्कम रु.पाच हजार फक्त ) तक्रारकर्तीला द्यावे.
4. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला नं.1 ते 15 यांनी व्यक्तीगत व संयुक्तीकरित्या या आदेशाची प्रत मिळण्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
5. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी.
6. तक्रारकर्तीस या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.