Maharashtra

Beed

CC/13/16

Santoshkumar Savkumar - Complainant(s)

Versus

Marketing Manager,Ashian Paints,Ltd - Opp.Party(s)

15 Jan 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/13/16
 
1. Santoshkumar Savkumar
R/o Jamshedpur Gopmuri Zarkhand
Zarkhand
Zarkhand
...........Complainant(s)
Versus
1. Marketing Manager,Ashian Paints,Ltd
6,A Shantinagar,Santrakruj Mumbai
Mumbai
Maharashtra
2. Mundada Traders Prop Govind Mundada
Georai
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

निकाल
दिनांक- 15.01.2014
(द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्‍य)
तक्रारदार संतोषकुमार सावकुमार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली म्‍हणून नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे,तक्रारदार हा कलर पेंटींगचा गुतेदार आहे. तक्रारदार हा गुतेदारी व्‍यवसाय महाराष्‍ट्रातील ठिकठिकाणच्‍या आनंद नगरीचे पाळणे, ब्रेक डान्‍स, सेंलॅबा ड्रॅगन ट्रेन, क्रॉस झोका इत्‍यादी साहित्‍यास आर्ट पेंटींग करण्‍याचे काम कूटूंबाचे उपजिवीकेसाठी करतो. तक्रारदार यांनी गेवराई येथे आनंद नगरीचे साहित्‍यास आर्ट पेटींग करण्‍याचे काम रु.90,000/- मध्‍ये गुंते घेतले. सदर कामासाठी लागणारे साहित्‍य तक्रारदार यांने दि.10.10.2012 रोजी सामनेवाले क्र.1 कंपनीचे सामनेवाले क्र.2 यांचेकडून रक्‍कम रु.6913/- चे घेतले. सदर काम करण्‍यासाठी तक्रारदार यांने 12 दिवसासाठी आठ लोकांना सोबत घेतले होते. वरील घेतलेल्‍या साहित्‍यामधील रंग हे हलक्‍या प्रतीचे असल्‍यामुळे ते साहित्‍यास बसले नाहीत. सदर रंग कमी प्रतीचे असल्‍यामुळे फाटु लागले व फीके पडू लागले. त्‍यामुळे रु.90,000/- चें काम तक्रारदार यांचेकडून काढून घेतले. त्‍यामुळे तिन दिवसाची मजूरी रु.24,000/- तक्रारदार यांस मजूरास द्यावी लागली. सामनेवाले क्र.2 यांचेकडून घेतलेले साहित्‍य रु.6913/- असे मिळून तक्रारदाराचे एकूण रु.1,20,913/- चे आर्थिक नुकसान झाले आहे व त्‍यांस सामनेवाले क्र.1 व 2 जबाबदार आहेत.
तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 व 2 यांना वकिलामार्फत रजिस्‍ट्रर पोस्‍टाने नोटीस पाठवून वरील रक्‍कम देण्‍याची मागणी केली. सदर नोटीस मिळूनही सामनेवाले यांनी नोटीसचे उत्‍तर दिले नाही व त्‍यांची दखल घेतली नाही. तक्रारदार यांना निकृष्‍ट प्रतीचे साहित्‍य विक्री करुन सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांची फसवणूक केली आहे. तक्रारदाराची मागणी आहे की, व्‍यावसायीक नुकसान रु.90,000/-, मजुरीपोटी दिलेली रक्‍कम रु.24,000/-, साहित्‍य खरेदीपोटी रु.6913/-, मानसिक शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रु.15,000/-, नोटीसचे खर्चापोटी रु.1,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,000/- असे एकूण रक्‍कम रु.1,4,4,613/-व त्‍यावर 12 टक्‍के व्‍याज सामनेवाले क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्‍तीक व संयूक्‍तीकरित्‍या मिळावेत.
सामनेवाले क्र.1 हे हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे लेखी जवाबा सोबत रोहीत मालखानी यांचे शपथपत्र दाखल केले आहे. त्‍यांच्‍या कथनेनुसार सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारीतील मजकूर स्‍पष्‍ट नाकारलेला आहे. त्‍यांचे पूढील कथन की, सदरील तक्रार ही कायदया अंतर्गत बसत नाही. तक्रार ही खोटी व चुकीची आहे. तक्रारदारांनी सदरील तक्रारीत एशियन पेंटस लि. या कंपनीला प्रतिवादी म्‍हणून सामील केले नाही. तक्रारदार हा गुत्‍ते घेऊन काम करतो. तक्रारदार यांनी सदरील रंगकामाचे रु.90,000/- चे गुत्‍ते घेतले होते. त्‍यासाठी तक्रारदार हा 12 दिवसासाठी आठ कामगांराना कामावर ठेऊन रंगरंगोटीचे घेतो. तक्रारदार हा सामनेवाले क्र.1 यांचा ग्राहक नाही. सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 चे वितरक नाही. तक्रारदार यांनी गेवराई येथील विश्‍वनाथ भवाने यांच्‍या कडून काम घेतले ही बाब मान्‍य नाही. सामनेवाले क्र.1 यांचे म्‍हणणे की, तक्रारीतील मागणी ही चुकीची आहे. सामनेवाले क्र.1 यांचे पूढील कथन की, रंग साहित्‍याची क्‍वालिटी व त्‍याच्‍यात वापरले जाणारे साहित्‍य इत्‍यादी वर उत्‍पादकीय कंपनीचे नियंत्रण असते. सामनेवाले क्र.1 यांचे कथन की, सदर एशियन पेंटस कंपनी ही ब्रँडेड नावाजलेली कंपनी आहे.त्‍यांचे रंग साहित्‍य तयार करतांना त्‍यांच्‍यावर योग्‍य ती प्रक्रिया करुन ते प्रमाणीत करुनच बाजारात विक्रीस आणले जाते.जर ते प्रमाणीत केलेले नसेल तर बाजारात विक्रीसाठी येत नाही. वापरण्‍यात येणारा कच्‍चा माल, पॅकींग साहित्‍य व फिनीश उत्‍पादन ची तपासणी करुनच नंतर ते रंग साहित्‍य तयार करण्‍यात येते. तयार झालेला माल हा रिसर्च व डेव्‍हलमेंट विभागाकडून तपासणी करतात. सामनेवाले हे कोणत्‍याही इलक्‍या प्रतीचे रंग तयार करत नाही व विक्रीसाठी उपलब्‍ध करत नाही. तक्रारदार यांनी केलेले आरोप हे चुकीचे व खोटे आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी.
सामनेवाले क्र.2 हे हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलें आहे.तक्रारदार यांचा काय व्‍यवसाय आहे हे माहित नाही. त्‍यांचा व्‍यवसाय हा रंगाचा आहे हे त्‍यांना मान्‍य नाही.तक्रारदार यांनी आंनद नगरीचे काम घेतले होते किंवा काय हे माहीत नाही. त्‍या कामासाठी किती लोक लावले होते यांची माहीती नाही. तक्रारदार यांनी रंग व त्‍या अनुषंगाने इतर साहित्‍य व सामान नेलेले आहे. तक्रारदारांच्‍या नोटीसला सामनेवाले क्र.2 यांनी उत्‍तर दिलेले आहे परंतु तक्रारदाराचा पत्‍ता अपूरा असल्‍यामुळे नोटीसचे उत्‍तर परत आले आहे. तक्रारदाराचे कोणत्‍याही प्रकारचे नुकसान झालेले नाही व तक्रारदार हा नुकसान भरपाई व व्‍याज मिळण्‍यास पात्र नाही. सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 एशीयन पेंटस प्रा.लि. कंपनीचे वितरक आहे. भारतातील रंग कामाच्‍या बाबतीत नं.1 चा ब्रँड आहे. सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 कंपनीचे वितरक आहेत. रंग विक्री झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या वापराच्‍या बाबतीत वितरकाचे कोणतेही नियंत्रण नसते. दुकानावरुन नेलेले साहित्‍य त्‍यांने कसे वापरले त्‍यावर त्‍या रंगकामाचे वैशिष्‍ट ठरते व एशियन रंगाच्‍या बाबतीत यापूर्वी कधीही तक्रार आलेली नाही. रंगाचे क्‍वालिटी कंन्‍ट्रोज हा त्‍या संबंधीत कंपनीचा विषय ठरतो.सामनेवाले क्र.2 यांने विक्री केलेले रंग हे तक्रारदाराने कोणत्‍या चुकीचा पध्‍दतीने वापरले असण्‍याची शक्‍यता असल्‍याने सामनेवाले क्र.2 ला कोणत्‍याही प्रकारची नुकसान भरपाई देणे लागत नाही. तक्रारदाराने चुकीची व खोटी तक्रार केल्‍याने तक्रारदाराची तक्रार खारीज करुन सामनेवाले क्र.2 यांस नुकसान भरपाईपोटी रु.5,000/- दयावेत.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत नि.4 द्वारे कागदपत्र दाखल केलें आहेत. त्‍यात सामनेवाले क्र.2 यांची पावती, नोटीसची पावती, नोटीस मिळाल्‍यची पावती इत्‍यादी कागदपत्र दाखल केले आहेत. सामनेवाला क्र.2 यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे.तसेच नोटीसची उत्‍तर परत आल्‍याबाबत पाकीट दाखल केले आहे,नोटीसच्‍या उत्‍तराची प्रत, तसेच पोस्‍टाची पावती दाखल केली आहे. सामनेवाले क्र.1 यांचे वकिलांचा यूक्‍तीवाद ऐकला.सामनेवाले क्र.1 यांनी लेखी जवाबासोबत श्री.रोहीत मालखानी यांचे शपथपत्र दाखल केले आहे.सामनेवाला क्र.1 व 2 यांचे जबाबाचे अवलोकन केले असता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्‍तर 1) तक्रारदार यांनी सामनेवाला यानी हलक्‍या प्रतीचे रंग दिले ही बाब तक्रारदार यांनी सिध्‍द केली आहे काय? नाही.
2) सामनेवाले यांनी तक्रारदारास सेवा देण्‍यात त्रुटी ठेवली आहे काय नाही. 3) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्‍यास पात्र आहे काय नाही.
4) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 4 ः-
तक्रारदार व त्‍यांचे वकील यांना युक्‍तीवादासाठी वेळोवेळी संधी देऊनही त्‍यांनी युक्‍तीवाद केला नाही व कोणताही लेखी पुरावा किंवा पुराव्‍याकामी शपथपत्र व कागदपत्र दिले नाही. तक्रारदाराचे तक्रारीतील कथन की, तक्रारदार हा कलर पेंटीगचा गुत्‍तेदार म्‍हणून काम करतो. तक्रारदार हे महाराष्‍ट्रातील ठिकठिकाणच्‍या आनंद नगरीचे पाळणे, ब्रेकडान्‍स, ड्रगनटेन इत्‍यादी साहित्‍यास आर्ट पेंटीगचे काम करतो. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांच्‍याकडून एशीयन पेंटस रंग खरेदी केले.तक्रारदार यांनी गेवराई येथील विश्‍वनाथ भावने यांच्‍याकडून आनंद नगरीचे आर्ट पेंटीगचे कामाचे रु.90,000/- मध्‍ये गुत्‍ते घेतले होते. सदर कामासाठी लागणारे साहित्‍य, ब्रश कपील, वेगवेगळया रंगाचे डबे, क्‍लीनर वार्नीस स्‍टीनर, इत्‍यादी साहित्‍य सामनेवाले क्र.2 यांच्‍याकडून रक्‍कम रु.6913/- ला खरेदी केले. आर्ट पेंटीगच्‍या कामासाठी तक्रारदार यांने आठ लोकांना 12 दिवसासाठी गुत्‍ते देऊन काम करुन घेणार होता. रंगकाम करण्‍यास सुरवात केली असता सदरील रंग हे साहित्‍यास बसले नाही. ते रंग फाटू लागले व फिके पडू लागले.त्‍यामुळे तक्रारदाराचे रक्‍कम रु.90,000/- चे काम हातून गेले. त्‍यासाठी तक्रारदारास रु.24,000/- मजूरी कामगारांना दयावी लागली. त्‍यामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना नोटीस दिली. सदर नोटीसचे सामनेवाले यांनी उत्‍तर दिले नाही. तक्रारदाराची फसवणूक झाली आहे त्‍यासाठी तक्रारदार हे तक्रारीतील रक्‍कम मिळणेस पात्र आहेत. सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. सामनेवाले क्र.1 यांचे वकील श्री. याडकीकर व श्री.कूलकर्णी यांनी युक्‍तीवादात सांगितले की,तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांच्‍याकडून एशियन पेंटसचे रंग साहित्‍य खरेदी केले ही बाब मान्‍य नाही. सामनेवाले क्र.1 यांचे पूढील कथन की,तक्रारदार यांने रंगाचे उत्‍पादक कंपनी याना सदर तक्रारीत प्रतिवादी म्‍हणून सामील केले नाही. तक्रारदार यांने जे रंग साहित्‍य खरेदी केले त्‍यांचा वापर कसा करावा यांचे त्‍यांला संपूर्ण ज्ञान नाही. कोणत्‍या कामासाठी कोणत्‍या प्रकारचे रंग वापरावे यांची पूर्ण माहीती असणे आवश्‍यक आहे. ती तक्रारदार यांना नाही. तक्रारदार यांनी गेवराई येथील आनंद नगरीचे काम गुत्‍तेदारी स्‍वरुपात रक्‍कम रु.90,000/- मध्‍ये घेतले होते. त्‍याबददलचा कोणताही पुरावा मंचासमोर दाखल केला नाही. तक्रारदार यांने खरेदी केलेले रंग हे एशियन पेंटस या कंपनीचे होते व ते खराब होते ही बाब सिध्‍द करण्‍यासाठी तक्रादार यांने सदर रंगाचे टिन हे मंचासमोर हजर केले नाही. तसेच सदर रंग हे खराब आहे व ते वापरल्‍यानंतर फिके पडू लागले, फाटू लागे हे दाखवण्‍यासाध्‍ठी कोणताही पुरावा किंवा त्‍याबाबतच्‍या चित्रफिती दाखल केल्‍या नाहीत.सदर रंग हे सदोष आहे ही बाब सिध्‍द करण्‍यासाठी तक्रारदार यांने कोणत्‍याही तज्ञांचा अहवाल किंवा प्रयोगशाळेत रंग तपासणी करुन प्रयोगशाळेचा अहवाल सादर केला नाही.तक्रारदार यांने खरेदी केलेले पेंट रंग हे एशियन पेंट या कंपनीचे आहे हे सिध्‍द करण्‍यासाठी कोणताही पुरावा दाखल केला नाही. तसेच तक्रारदार यांस झालेले नुकसान याबाबतचा कोणताही पुरावा सादर केला नाही. त्‍यामुळे सामनेवाले क्र.1 यांनी सेवा देण्‍यात कसूर केला असे असे म्‍हणता येणार नाही. तक्रारदार यांने खरेदी केलेला रंग हा स्‍वतःसाठी न वापरता व्‍यावसायीक कारणासाठी वापरले असल्‍यामुळे तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदया अंतर्गत ग्राहक होऊ शकत नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांची तक्रार खारीज करण्‍यात यावी.
सामनेवाले क्र.2 मंचासमोर हजर झाले. त्‍यांनी आपले लेखी कैफियत दाखल केली. युक्‍तीवाद केला नाही. सामनेवाले क्र.2 यांचे कथनेनुसार त्‍यांनी तक्रारीतील मजकूर अमान्‍य केला आहे. सामनेवाले क्र.2 हे एशियन पेंटसचे वितरक आहे. एशियन पेंटस ही कंपनी दर्जेदार साहित्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी प्रसिध्‍द आहे. सामनेवाले क्र.2 यांच्‍याकडून रंग्र विक्री झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या वापराबाबत वितरकाचे नियंत्रण नसते. त्‍यामुळे तक्रारदार यांनी सदरील रंग कसे वापरावे त्‍यावर कामाचे वैशिष्‍ट ठरते. तक्रारदार यांने चुकीच्‍या पध्‍दतीने रंग वापरले आहे. त्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी.
वर नमूद केलेले कथन तसेच सामनेवाले क्र.1 यांच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद व सामनेवाले क्र.2 यांची लेखी कैफियत, तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांने खरेदी केलेले रंग साहित्‍य हे हलक्‍या प्रतीचे आहे हे पाहणे गरजेचे आहे. तसेच तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत बसतात काय हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांने सामनेवाले क्र.2 यांच्‍याकडून रंग साहित्‍य खरेदी केले. सदर रंग साहित्‍य खरेदी केल्‍याची पावती दाखल केली आहे. ही बाब सामनेवाले क्र.2 यांना मान्‍य आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेले रंग हे आनंद नगरीचे आर्ट पेंटींगच्‍या कामासाठी वापरले.त्‍यासाठी तक्रारदार हे गुत्‍ते घेऊन काम करतात. तक्रारदार हे गुत्‍तेदारीचा व्‍यवसाय करतात. तक्रारदार यांने हरंग वापरत असतांना योग्‍य ती पध्‍दत अवगत केली नसल्‍यास व रंग साहित्‍याचे पदार्थ मिश्रण करीत असतांना एखादे साहित्‍य जसे थिनट हे जास्‍त प्रमाणात पडल्‍यास रंग खराब होऊ शकते. कोणत्‍या प्रकारचे रंग हे कोणत्‍या वस्‍तूवर वापरायचे यांची खबरदारी घेणे आवश्‍यक असते. तक्रारदार यांने सदर रंग कूठे वापरले कसे वापरले याबाबत कोणताही पुरावा दाखल केला नाही किंवा दस्‍ताऐवज दाखल केले नाही.
तक्रारदार यांनी तक्रार दाखल केल्‍यानंतर सदरील रंग साहित्‍य हे हलक्‍या प्रतीचे आहे ही बाब सिध्‍द करण्‍यासाठी त्‍या रंग साहित्‍याचे टिन किंवा रंगकाम केल्‍यानंतरचे ते रंग फिके पडू लागे किंवा फाटू लागले हे दर्शविण्‍यासाठी त्‍याबाबतचे चित्रफित हे मंचासमोर हजर केली नाही.तसेच सदर रंग साहित्‍य हे तपासणी करीता प्रयोगशाळेत पाठविण्‍या संबंधी अर्ज केला नाही किंवा रंग तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्‍याची तयारी दर्शविली नाही. तक्रारदार यांनी खरेदी केलेले रंग हे हलक्‍या प्रतीचे आहे हे सिध्‍द करण्‍यासाठी कोणत्‍याही तज्ञांचा अहवाल सादर केला नाही. जेणेकरुन तक्रारदार ही बाब सिध्‍द करु शकला असता. परंतु तक्रारदार यांने मंचासमोर सदर रंग साहित्‍य हे हलक्‍या प्रतिचे आहे व ते वापरल्‍यानंतर फाटू लागले व फिके पडू लागले याबबतचा कोणताही ठोस पुरावा मंचासमोर दाखल केला नाही. त्‍यामुळे सदर रंग साहित्‍य हे हलक्‍या प्रतीचे आहे ही बाब तक्रारदार सिध्‍द करु शकले नाही. तसेच तक्रारदाराचे तक्रारीतील कथन हे स्विकार्य नाही.
तक्रारदार यांने खरेदी केलेले रंग साहित्‍य यांचा वापर हे स्‍वतःसाठी न करता त्‍यांचा वापर व्‍यावसायीक कारणासाठी केला आहे. तक्रारदार हे रंग कामाचे गुत्‍तेदारीचा व्‍यवसाय करतात. त्‍या कामासाठी तक्रारदार हे तर लोकांना मजूरीवर ठेऊन काम करतात. यावरुन तक्रारदार यांनी खरेदी केलेला रंग हा व्‍यावसायीक कारणासाठी वापरत असल्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार या मंचापूढे चालू शकत नाही व तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदया कलम 2(1)(ड) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत बसत नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुददा क्र. 1 ते 3 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येऊन खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येते. 2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.

 

 

श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्‍य अध्‍यक्ष
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.

 

जयंत पारवेकर
लघुलेखक
 

 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.