निकालपत्र :- (दि.16.07.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी त्यांच्या शेतातील गट नं.327, क्षेत्र 40 गुंठे जानेवारी 2009 च्या सुमारास भुईमूगाचे पिक घेणेसाठी मशागत केली. सामनेवाला क्र.1 हे बियाणे उत्पादित कंपनी आहे व सामनेवाला क्र.2 हे सदर बियाणाचे विक्रेते आहेत. तक्रारदारांनी दि.17.01.2009 रोजी सामनेवाला क्र.1 यांनी उत्पादित केलेले भुईमूग बियाणे, लॉट नं.WRG-2008-235 चे वेस्टर्न-20 या वाणाचे एकूण 20 किलो भुईमूग बियाणे सामनेवाला क्र.2 यांचेकडून रक्कम रुपये 1475/- ला खरेदी केले व सामनेवाला यांनी निर्देशित केलेप्रमाणे दोन रोपातील 8 इंच अंतर व 2 ओळीतील अंतर 12 इंचाचे ठेवून ते शेतामध्ये टोकण केले.
(3) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, सदर बियाणे टोकण केलेनंतर आठ दिवस होवूनसुध्दा उगवण व्यवस्थित होत नसल्याचे आढळून आले. याबाबत सामनेवाला क्र.2 यांना विचारणा केली असता त्यांनी परत एकदा पाणी द्या, फरक जाणवेल असे सांगितले. परंतु, सामनेवाला यांनी दिलेल्या हमीनुसार 70 टक्केऐवजी 25 ते 30 टक्के इतकी उगवण झाली व तक्रारदारांना 40 टक्के इतके नुकसान सोसावे लागले. शेतजमिनीच्या 1 एकर मध्ये अंदाजे 12 क्विंटल भुईमुग अपेक्षित होता. परंतु, 12 क्विंटल ऐवजी 4 क्विंटल उत्पादन मिळाले व 8 क्विंटल इतके नुकसान तक्रारदारांना सोसावे लागले. बाजारभावाप्रमाणे प्रत्येक क्विंटलला रुपये 2,800/- प्रमाणे एकूण 8 क्विंटलचे रुपये 22,400/- इतके नुकसान लागले. (4) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांच्या मार्गदर्शनासाठी व शेती अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर भुईमुगाची लागवण केली. तसेच, त्यास लागणारे पाणी खंडाने दुस-याच्या विहीरीने विकत घेवून पाजले. परंतु, त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. याउलट जिल्हा कृषि अधिकारी यांचेकडे तक्रार केली असता जिल्हा बियाणे तक्रार समितीने पाहणी करुन बियाणे सदोष असलेबाबत अहवाल दिला. बियाणे समितीने त्यावेळेस सामनेवाला यांना नोटीस पाठविली, त्यावेळेस सामनेवाला क्र.2 हे उपस्थित होते, परंतु सामनेवाला क्र.1 हे गैरहजर राहिले. (5) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत एकूण नुकसानी रुपये 22,400/-, खत, पाणी, मशागत इत्यादीचा खर्च रुपये 10,000/-,मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 500/- इत्यादी देणेबाबतचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे.
(6) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत कुंभी कासारी कृषी सेवा केंद्र, कळे यांचेकडील खरेदी पावती, वेस्टर्न अॅग्री सिडस्चे लेबल, कृषि अधिकारी यांचेकडे केलेली तक्रार, पंचनामा व शपथपत्र दाखल केले आहे.
(7) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला कंपनीच्या माहितीपत्रकानुसार तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडून मार्गदर्शन घेतलेले नाही. जिल्हा बियाणे तक्रार समितीने नोटीस अथवा पत्र पाठविलेले नाही. सदर समितीने कोणत्या आधारे तसेच कोणते शास्त्रीय परिमाण वापरुन निष्कर्ष काढला याचा बोध होत नाही. बियाणाबाबत सामनेवाला क्र.1 यांचेकडे सांयटिफिक रिपोर्ट असून त्याचे प्रयोगशाळेत परिक्षण झालेले आहे. तक्रारदारांचे कोणतेही नुकसान झालेले नाही; सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी व कॉम्पेनसेटरी कॉस्ट देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (8) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ अधिकारपत्र, कंपनीचे माहितीपत्रक, आयएस्ओचे नामांकन, टेस्टिंग रिपोर्ट, बियाणाबाबतचे रजिस्टर, विठ्ठलराव कोळी, सुनिल मोहिते, विश्वनाथ पाटील यांचा अभिप्राय, मोहिते व पाटील यांनी खरेदी केलेल्सा बियाणाचे बिल,
(9) सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये बियाणामध्ये कोणतीही भेसळ नाही, तसेच दोष नाहीत. तसेच, जमिनीची प्रत सदर जमिन ही डोंगरी भागामध्ये असल्याने उत्पादन मिळणे अशक्य आहे असे प्रतिपादन केले आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी व कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 10,000/- देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
(10) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकलेला आहे व उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी बियाणे खरेदीची पावती दाखल केलेली आहे. तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला क्र.1 यांनी उत्पादित केलेले भुईमुग जातीचे बियाणे तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडून खरेदी करुन टोकण पध्दतीने लागण केलेली आहे. सदर भुईमुगाची उगवण 25 ते 30 टक्के इतकी झालेली आहे व 40 टक्के नुकसान तक्रारदारांना सोसावे लागले आहे इत्यादी मुद्दे उपस्थित केलेले आहेत. सामनेवाला यांनी बियाणे सदोष नसलेबाबत युक्तिवाद केलेला आहे व त्या अनुषंगाने लॅबोरेटरीचा अहवाला दाखल केलेला आहे. परंतु, सामनेवाला कंपनीने सदर लॉटचे बियाणे प्रस्तुत प्रकरणी परिक्षणासाठी दाखल करणे आवश्यक होते. पंरतु, त्यांनी ते केलेले नाही. याउलट तक्रारदारांनी जिल्हा बियाणे तक्रार निवारण समिती यांचेकडे तक्रार केलेली आहे व सदर समितीने त्यांचा अहवाल दाखल केलेला आहे. सदर अहवालाचे संपूर्ण अवलोकन या मंचाने केलेले आहे. सदरच्या अहवालावरुन सुमारे 40 टक्के भुईमुग उगवण झाली नसल्याचे दिसून येते. समितीने दिलेला निष्कर्ष हा पुढीलप्रमाणे आहे :-
‘‘वेस्टर्न सिडस् प्रा.लि. उत्पादित भुईमुग बियाणे वेस्टर्न-20 (लॉट क्र. WRG-2008-235) मध्ये दोष असल्यामुळे उगवण समाधानकारक नसलेचे निदर्शनास आले.’’
(11) उपरोक्त विवेचन व जिल्हा बियाणे तक्रार समितीने दिलेला अहवाल हा निर्णायक स्वरुपाचा पुरावा म्हणून विचारात घेता तक्रारीत उल्लेख केलेले सामनेवाला कंपनीचे बियाणे हे सदोष आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. यासाठी हे मंच खालील पूर्वाधार विचारात घेत आहे :-
(1) IV (2004) CPJ 87 - Maharashtra State Consumer Disputes Redressal Commission, Mumbai - Sasya Seeds Pvt.Ltd. and others vs. Padmakar Dattatray Joshi Consumer Protection Act, 1986 - Sections 2(1)(g) and 15 - Agriculture - Seeds defective - Seeds supplied were ‘Tolerant’ signifying immunity from any disease, did not come up satisfactorily, entirely accepted with viral disease - Evidence and committee’s report produced in support of claim - Deficiency in service proved - Damaged and compensation awarded. (2) III (2004) CPJ 655 - Punjab State Consumer Disputes Redressal Commission, Chandigarh - Sanjay Agro International Vs. Khazan Singh. Consumer Protection Act, 1986 - Section 2(1)(g) - Agriculture - Seeds defective - Spot inspection conducted by Horticure Develpment Officer - No germination found - Seeds defective proved - Contention, proper procedure regarding sowing of seeds not followed, not acceptable in absence of evidence on record - Deficiency in service proved - Complaint rightly allowed - Appeal against order dismissed. (3) I (2003) CPJ 241 (NC) - National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi - National Seeds Corporation Ltd. Vs. Nemmipati Nagi Reddy. Consumer Protection Act, 1986 - Sections 13 (1(c), 21 (b) - Agriculture - Defective seeds supplied - Growth of fruits not upto the mark - Heavy losses suffered - District Forum relying on the report of Local Commissioner awarded Rs.22,000/- per acre for loss of crop - Order upheld by State Commission - no interference required in revision. (4) 2003 (2) CPR 15 (NC) - National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi - National Seeds Corporation Ltd. Vs. M. Madhusudan Reddy and Anr. (i) Consumer Protection Act, 1986 - Sections 12 and 17 - Compensation claim for supply of defective seeds which did not yield promised crop - claim resisted on plea that provisions of Consumer Protection Act could not be invoked in view of Seeds Act, 1966 - No provisions in Seeds Act to compensate a farmer for low quality of seed supplied to him - Only under Consumer Protection Act remedy lies for the farmer to be compensated. (ii) Consumer Protection Act, 1986 - Section 13 (1) - Caster seeds purchased by Complainant farmer from petitioner did not yield promised quantity of crop resulting in loss to complainant - District Forum directed petitioner to pay Rs.89,000/- with interest - Appeal dismissed by the State Commission - Revision - Contention that provisions of Section 13(1)(c) of the Act was not followed - Provisions of Section 13(1)(c) became unimplementable and fora below relied upon report of Commissioner, a retired Asstt. Director of Agriculture - No interference was called for in the order. (5) I (2003) CPJ 263 (NC) - National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi - Shayam Beej Bhandar Vs. Daria Singh. (i) Consumer Protection Act, 1986 - Section 2(1)(g) - Agriculture - Seeds - Carrot seed for red carrots purchased - Germination in the field showd 90 % of black carrot & 10% of red carrot - Compensation of Rs.40,000/- awarded by Forum as per report of Local Commissioner, reduced to Rs.20,000/- by State Commission - Compensation for mental agony waived - No interference required in revision. (6) IV (2008) CPJ 119 (NC) - National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi - Pratham Biotech Pvt. Ltd. Vs. Sayed Javed Sayed Amir. Consumer Protection Act, 1986 - Sections 2(1)(f), 14(1)(d) - Agriculture - Seeds defective - Inspection carried out by Inquiry Committee - Vast variance in chaacteristics of plants found - Complaint allowed by Forum - Compensation granted - Order upheld in appeal - Hence revision - Procedure prescribed under Seeds Act followed - Necessary inquiry held, report given by Seeds Committee - Report cannot be brushed aside on contention that seeds not sent for testing - Order of lower Fora upheld. (7) III (2008) CPJ 409 - Andhra Pradesh State Consumer Disputes Redressal Commission, Hyderabad - Dannu Hybrid Cotton Seed Vs. Rayarakula Chandramouli & Anr. Consumer Protection Act, 1986 - Section 2(1)(g), 14(1)(d) - Agriculture - Seeds defective - Crop gave less than expected yield in spite of following all crop management practices - Contention, proper crop management not followed by farmers, not acceptable in absence of documentary evidence - Improbable that proper crop management not followed by all farmers affected by low yield - All seeds sown by farmers - Provisions of Section 13(1)(c) become un-implementable - Alternative methods like report of Expert due to defective, inferior quality of seed proved by report of Expert Committee - Complaints allowed by Forum - Order upheld in appeals - Rate of interest reduced. (12) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये एकूण 40 टक्के झाले असल्याचे प्रतिपादन केले आहे. सामनेवाला कंपनीने एकूण सरासरी उत्पादनबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा स्पष्टपणे दाखल केलेला नाही. परंतु, संपूर्ण वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदारांचे किमान 8 क्विंटल भुईमुगाचे नुकसान झाले आहे व सर्वसाधारण पणे बाजारामध्ये प्रतिक्विंटल भाव रक्कम रुपये 2,800/- याचा विचार करता एकूण नुकसानी रुपये 22,400/- इतकी नुकसानी हे मंच विचारात घेत आहे. तसेच, वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत असा निष्कर्ष हे मंच काढीत आहे व सदर रक्कमा देणेस सामनेवाला हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत असाही निष्कर्ष हे मंच काढीत आहे. उपरोक्त संपूर्ण विवेचन व पूर्वाधार विचारात घेवून हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 22,400/- (रुपये बावीस हजार चारशे फक्त) द्यावी.
3. सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.
4) सामनेवाला यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |