(मा.सदस्या सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांना वॉशिंग मशिनची किंमत रु.22,400/- रोख परत मिळावेत, वॉशिग मशिन संपुर्णपणे दुरुस्त करुन मिळावे, मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल भरपाई रक्कम रु.50,000/- मिळावेत, नोटीस खर्च रु.5000/- मिळावेत, अर्जाचा खर्च रु.10,000/- मिळावा व या सर्व रक्कमेवर कोर्टाचा निकाल मिळेपर्यंत किंवा रक्कम देण्याच्या तारखेपर्यंत 18% प्रमाणे व्याज मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी पान क्र.26 लगत लेखी म्हणणे व पान क्र.27 लगत प्रतिज्ञापत्र तसेच सामनेवाला क्र.2 व 4 यांनी पान क्र.35 लगत इंग्रजी भाषेमध्ये एकत्रीत लेखी म्हणणे, सामनेवाला क्र.1,3,4 यांनी पान क्र.37 लगत मराठी भाषेमध्ये एकत्रीत लेखी म्हणणे व पान क्र.38 लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?-होय.
2) अर्जदार यांनी सर्व्हिस सेंटर यांना आवश्यक पक्षकार म्हणून सामील कलेले आहे काय?- नाही.
3) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
विवेचनः
अर्जदार व त्यांचे वकिल हे युक्तीवादाचे वेळी गैरहजर राहीलेले आहेत. सामनेवाला क्र.1,3,4 हे युक्तीवादाचे वेळी गैरहजर राहीलेले आहेत. सामनेवाला क्र.2 यांनी पान क्र.31 लगत लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 9 व प्रतिज्ञापत्र यामध्ये अर्जदार यांनी त्यांचेकडून वॉशिगमशिन घेतल्याची बाब मान्य केलेली आहे. तसेच सामनेवाला क्र.1,3,4 यांनी त्यांचे एकत्रीत लेखी म्हणणे कलम 3 व प्रतिज्ञापत्र यामध्ये अर्जदार यांनी सामनेवाला क्र.2 मार्फत वॉशिग मशिन घेतल्याची बाब मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.5 लगत वॉशिग मशिन विकत घेतल्याची पावती झेरॉक्स प्रत हजर केलेली आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र व पान क्र.5 ची पावती याचा विचार होता अर्जदार हे
तक्रार क्र.130/2011
सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “प्रस्तुतच्या अर्जास मिसजॉईंडर ऑफ पार्टीचा बाध आहे. सामनेवाला क्र.1 यांचे सामनेवाला क्र.2 प्रस्तुत सामनेवाला हे डिलर आहेत. वस्तु विक्री केल्यानंतर प्रस्तुत सामनेवाला यांचा संबंध राहात नाही. सामनेवाला क्र.2 यांनी सेवा देण्यात कमतरता केली नाही. अर्ज नामंजूर करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
सामनेवाला क्र.1,3,4 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सामनेवाला क्र.2 यांचेतर्फे निष्णात सर्व्हीस इजिनीयर यांनी व्हिजीट देवून वॉशिग मशिन दुरुस्त केलेले आहे. उंदरांनी वायर कुरतडल्यामुळे वॉशिग मशिनचे नुकसान झालेले होते. कुरतडलेल्या वायर सामनेवाला यांनी स्वखर्चाने बदलून दिलेल्या आहेत व मशिन पुर्ववत सुरु करुन दिलेले आहे. योग्य ती सेवा दिलेली आहे. वायर कंट्रोल पॅनलचा खर्च रु.2730/- सामनेवाला यांनी केलेला आहे. अर्जदार यांचे निष्काळजीपणामुळे मशिन खराब झालेले आहे. सेवा देण्यात कमतरता केलेली नाही. मशिनमध्ये कोणताही दोष नाही. अर्ज रद्द करण्यात यावा. ” असे म्हटलेले आहे.
या कामी अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्ज कलम 7 मध्येच सामनेवाला क्र.1 यांचे प्रतिनीधी इंजिनीयर यांनी वॉशिग मशिनची पाहणी करुन सर्किट बदलून दिलेले आहे तसेच सामनेवाला क्र.1 याचे प्रतिनीधी इंजिनीयर यांनी “घरात उंदीर आहे त्याने वॉशिग मशिन वायर कुरतडून टाकली आहे.” असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 6 अ मध्ये “कंपनीने संबंधीत उत्पादनाचे सर्व्हीस स्टेशन तयार केलेले आहे, त्याठिकाणी तज्ञ इंजिनीयरची नेमणूक देखील केलेली आहे.” असा उल्लेख केलेला आहे. तसेच लेखी म्हणणे कलम 14 मध्ये “सामनेवाला क्र.2 यांचे इंजिनीयर कधीही अर्जदाराकडे मशिन तपासणीस गेलेले नाहीत. प्रस्तुत सामनेवाला यांचेकडे कोणतेही इंजिनीयर कामास नाहीत. ” असा उल्लेख केलेला आहे.
अर्जदार यांनी या कामी सामनेवाला क्र.1 कंपनीचे अधीकृत सर्व्हीस स्टेशन यांना आवश्यक पक्षकार म्हणून सामिल कलेले नाही. अर्जदार यांचे तक्रार अर्ज कलम 7 मधील कथन व सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणण्यामधील कथन याचा विचार होता अर्जदार यांचे वॉशींग मशीनबाबत सामनेवाला क्र.1 कंपनीचे नाशिक येथील सर्व्हीस स्टेशन व त्यामधील सर्व्हीस इंजिनीयर यांनी अर्जदार यांचे वॉशिग मशीनबाबत अर्जदार यांना सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे दिसून येत आहे. परंतु अर्जदार यांनी सामनेवाला क्र.1 कंपनीचे नाशिक येथील अधीकृत सर्व्हीस स्टेशन
तक्रार क्र.130/2011
यांना आवश्यक ते पक्षकार म्हणून सामील केलेले नाही यामुळे अर्जदार यांचा तक्रार अर्ज चालण्यास पात्र नाही असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार व त्यांचे वकिल हे 18 ऑगष्ट 2011 पासून प्रत्येक तारखेस गैरहजर राहीलेले आहेत. अधिकृत सर्व्हीस स्टेशन यांना आवश्यक पक्षकार म्हणून सामील करण्याबाबत अर्जदार यांना 18 ऑगष्ट 2011 पासून प्रत्येक तारखेस संधी मिळालेली होती. परंतु अर्जदार व त्यांचे वकिल हे 18 ऑगष्ट 2011 पासून गैरहजर राहीलेले आहेत.
जरुरतर सामनेवाला क्र.1 कंपनीचे अधिकृत सर्व्हीस स्टेशन यांना आवश्यक पक्षकार म्हणून सामनेवाला म्हणून सामील करुन अर्जदार हे पुन्हा नवीन तक्रार अर्ज दाखल करण्यास पात्र आहेत असेही या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र.1 ते 4 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, सामनेवाला क्र.2 यांचा लेखी युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.