जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ५९/२०१०
तक्रार दाखल दिनांक – ०२/०२/२०१०
तक्रार निकाली दिनांक – १५/०५/२०१३
संचालाल शंकरलाल जैन,
उ.व. ७६ वर्षे, कामधंदा- सेवानिवृत्त व्यवसायीक,
राहणार -१५७४/ अ, ५ वी गल्ली,
आनंदीबाई जावडेकर शाळेसमोर,
धुळे. ता.जि. धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
१) मर्चंट को.ऑप. बॅंक लि.
(नोटीस/ समन्सची बजावणी जनरल मॅनेजर
यांचेवर करण्यात यावी)
२) चेअरमन सो. श्री.सुभाष देवरे
मर्चंट को.ऑप. बॅंक लि.
दोघांचा पत्ताः- ग.नं.५, धुळे,
ता.जि. धुळे ................. सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.सौ.सी.ए. अग्रवाल)
(विरुध्दपक्ष तर्फे – अॅड.एस.एम. देशमुख)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे आईच्या नावे असलेल्या मुदत ठेवी तक्रारदार यांच्या नावे तबदील केल्या नाहीत. तसेच मुदत ठेवींची रक्कम अदा न करून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांचे मातोश्री कै.झनकारबाई यांचे सामनेवाला बॅंकेत एकूण १३ मुदत ठेवी आहेत. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे
अ.क्रं. |
मुदत ठेव पा.क्रं. |
ठेवी दिनांक |
मुदत पूर्ण दिनांक |
रक्कम रूपये |
व्याजदर |
१. |
०५१६८०/५७४०७ |
१९/०४/०६ |
१९/०७/०६ |
३०,०००/- |
९.५०% |
२. |
०५१७९०/५७५२२ |
२५/०४/०६ |
२२/०७/०६ |
३०,७१३/- |
९.५०% |
३. |
०५१७९१/५७३८२ |
२५/०४/०६ |
२५/०७/०६ |
२४,०००/- |
९.५०% |
४. |
०५२१८५/५७९१८ |
१७/०५/०६ |
१३/०८/०६ |
२३,५४६/- |
९.५०% |
५. |
०५२१२९/५७८५७ |
३०/०४/०६ |
३०/०७/०६ |
१०,५००/- |
९.५०% |
६. |
०५२१८६/५७९१९ |
१७/०५/०६ |
१७/०८/०६ |
६,०००/- |
९.५०% |
७. |
५३३६७/५९५८३ |
१५/०६/०६ |
१५/०९/०६ |
२४,०००/- |
९.५०% |
८. |
५३३६६/५९५८२ |
१५/०६/०६ |
१५/०९/०६ |
२४,०००/- |
९.५०% |
९. |
५३३६५/५९५८१ |
०१/०७/०६ |
०१/१०/०६ |
२५,५९४/- |
९.५०% |
१०. |
५३३६८/५९५८४ |
१५/०६/०६ |
१५/०९/०६ |
१५,०००/- |
९.५०% |
११. |
५३३६९/५९५८५ |
१५/०६/०६ |
१५/०९/०६ |
२२,५२३/- |
९.५०% |
१२. |
५३३७०/५९५८६ |
१५/०६/०६ |
१५/०९/०६ |
२०,०००/- |
९.५०% |
१३. |
५३३७१/५९५८७ |
१५/०६/०६ |
१५/०९/०६ |
१०,०००/- |
९.५०% |
एकुण ---- > |
२,६६,११४/- |
|
तक्रारदारची आई यांचा दि.३०/०८/२००६ रोजी मृत्यु झाला आहे. कै.झनकार बाईंनी सामनेवाला नं.१ बॅंकेत भरून दिलेल्या नॉमिनेशन फॉर्मप्रमाणे व मुदत ठेव खाते उघडण्यासाठी करावयाच्या अर्जातही त्यांचा वारस म्हणून तक्रारदारचे आईने तक्रारदारचे नाव दिले आहे. परंतु मुदत पूर्ण झालेली असतांनाही सामनेवाला नं.१ बॅंकेत मुदत ठेवी तक्रारदारचे नावाने तबदील केल्या नाहीत किंवा सामनेवाला बॅंकेच्या मागणीप्रमाणे योग्य व आवश्यक त्या पूर्तता केल्यानंतरही तक्रारदारास त्याची कायदेशीर रककम अदा केली नाही.
२. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, त्यांनी विनंती अर्जासोबत दि.०९/०७/२००९ चे आईचे मृत्युप्रमाणपत्र, मृत्युपत्र, सक्शेशन सर्टिफिकिट बददलच्या वादातील समझोता प्रकरणाची मे. जिल्हा न्यायाधिश, धुळे यांचे कडील सर्टिफाईड पुरसिस, इ. कागदपत्रे सामनेवाला बॅंकेला देवूनही सदर बॅंक रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. असे लक्षात आलेने तक्रारदारने सामनेवाला बॅंकेस दि.०४/११/०९ रोजी नोटीस देवूनही सामनेवाला यांनी तक्रारदारास आजतागायत रक्कम अदा केलेली नाही.
३. दरम्यानचे काळात तक्रारदार यांचा दि.१४/०३/१० रोजी मृत्यु झाल्याने त्यांचे वकीलांनी तक्रारदारचे मुले व पत्नी यांची नावे वारस म्हणून तक्रारीत समाविष्ट करून घेण्याबाबत अर्ज दाखल केला आहे. सदर अर्जावर सामनेवाला यांची हरकत नोंदवून घेऊन मे. मंचाने तक्रारदारचा सदरचा अर्ज मंजूर करून वारसांना तक्रारीत समाविष्ट करून घेतलेले आहे.
४. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून सर्व १३ मुदत ठेवी मुदत ठेव तारखेपासून देय तारखेपर्यंत ९.५०% प्रमाणे व्याजाने मिळावे. मानसिक व शारिरिक त्रासापोटी तसेच दरम्यानचे काळात पितृछत्र हरवल्याबददल भरपाई रककम रू.२,५०,०००/- मिळावे. अनुचित व्यापारी प्रथेसाठी सामनेवाला यांचेवर दंडात्मक कार्यवाही होवून रू.२०,०००/- दंड करण्यात यावा. तसेच तक्रारीचा खर्च रू.२०००/- मिळावा. अशी विनंती केली आहे.
५. तक्रारदार यांनी आपले म्हणण्याच्या पृष्टयार्थ १३ मुदत ठेव पावत्यांची झेरॉक्स प्रत, खाते उघडतांना वारस म्हणून तक्रारदारचे नावाचा अर्ज, नॉमीनेशन फॉर्म, दिवाणी न्यायालयाच्या एम.क्र.नं.११४/०८ ची सर्टीफाईड झेरॉक्स प्रत, समझोता कराराची झेरॉक्स प्रत, तक्रारदारने सामनेवाला यास दिलेले पत्र, विनंती अर्ज, सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस. नोटीस मिळाल्याची पोच पावती, तक्रारदारचे ऑपरेशनचे बीलाची झेरॉक्स प्रत, इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
६. सामनेवाला यांनी आपल्या खुलाश्यात सदर १३ ठेव पावत्या या तक्रारदारच्या मातोश्री कै. झनकारबाई शंकरलाल जैन यांच्या नावाच्या आहेत. तक्रारदारने त्याच्या इतर बहिणींचा, भावाचा उल्लेख अर्जात केलेला नाही. त्यामुळे मयत झनकारबाईंच्या इतर वारसांना या तक्रार अर्जात सामील केले नसल्याने सदर अर्जास ‘’नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरीज पार्टीज’ या तत्वाची बाधा येते. तक्रारदारने त्याचे आईचे वतीने भरलेले बॅंकेचे सर्व कागदपत्रे (आईचे मृत्युपत्र, नॉमीनेशन फॉर्म इ.) खोटे असून, आईची फसवणूक करून स्वतःचे स्वार्थासाठी व लाभासाठी तयार केलेले आहेत. याचा उलगडा तक्रारदारच्या मातोश्री मयत झनकारबाई यांनी त्यांच्या मृत्युपुर्वी काही दिवस अगोदर अत्यंत गोपनीय स्वरूपाचे पत्र सामनेवाला यांना लिहून ठेवल्याने होतो. तसेच या पत्राच्या आधारे तक्रारदारचा स्वार्थीपणा, बोगस कागदपत्रे, मृत्युपत्र इ. बाबींचा खुलासा होतो. सदर पत्रादवारे मुदत ठेव पावत्यांची रक्कम कोणास दयावी हया विषयीही मयत झनकारबाईंनी लेखी स्वरूपात सुचना करून ठेवली आहे. सदरचे पत्र सामनेवाला बॅंकेच्या जनरल मॅनेजरच्या नावाने लिहून ठेवलेले आहे. सदर पत्रात ठेव पावत्या हया त्यांच्या दोन मुली व नातवाला दयाव्यात या बाबतचे स्पष्ट निर्देश दिलेले असल्याने हया रकमा तक्रारदाराला अदा केलेल्या नव्हत्या. सदर ठेव पावत्या बाबत मयत झनकारबाईंच्या मुली व नातू यांना काही माहीती नसल्याने सामनेवाला शांत होते. परंतु तक्रारदारचे हया अर्जामुळे मयत झनकारबाई यांच्या वारसाचा नीट शोध लावण्याची गरज सामनेवाला यांना आहे. त्यामुळे सामनेवाला हे मयत झनकारबाईच्या अंतिम इच्छेप्रमाणे तक्रारदार यास ठेव पावत्यांची रक्कम कायदयाने देवूच शकत नसल्याने तक्रारदारचा अर्ज खर्चासह नामंजूर करावा असे म्हटले आहे.
७. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या वारस रेकॉर्डवर घेण्याच्या अर्जावरील खुलाश्यात बॅंकेच्या रेकॉडप्रमाणे मयत संचालाल जैन यांना त्यांच्या मातोश्री मयत झनकारबाई यांनी वारस म्हणून कुठेही लावलेले नसतांना त्यांचा कायदेशीर वारस हक्क येतो किंवा नाही हा मुददा डिसाईड होवून त्यावर निर्णय न लागलेने मयत संचालाल जैन यांची मुले व पत्नी यांना कायदेशीर वारस मानणे सामनेवाला यांना मान्य व कबूल नाही.
८. तसेच मयत संचालाल जैन यांच्या दुस-या पत्नी श्रीमती कल्पना जैन हया कायदेशीर वारस ठरत असतांना त्यांना या कामी वारस म्हणून रेकॉर्डवर आणण्यात आलेले नाही. त्यामुळे सदरचा अर्ज संशयास्पद आहे.
९. एखादी व्यक्ती निधन पावल्यानंतर तिच्या रकमेवर क्लेम करणा-या व्यक्तीस हिंदू सक्शेशन अॅक्ट नुसार सक्सेशन सर्टिफिकिट प्राप्त करणे गरजेचे असते. या कामी अदयापपावेतो मयत संचालाल जैन हे मयत झनकारबाईंचे कायदेशीर वारस आहेत किंवा नाही या बाबीचा निर्णय झालेला नाही. तसेच त्यांच्या पत्नी व मुलांचा बॅंकेत कुठेही कायदेशीर वारस म्हणून नोंद नसल्याने सदरचा अर्ज नामंजूर करण्यात यावा असे नमूद आहे.
१०. सामनेवाले यांनी आपले म्हणण्याचे पृष्टयार्थ मयत झनकरबाई जैन यांचे दि.२९/०७/०६ चे गोपनीय पत्राची अॅटेस्टेड प्रत, कल्पना संचालाल जैन यांचा खाते उतारा, संचालाल जैन यांचे मृत्युंजय योजनेचे वारस फॉर्म इ. कागदपत्रे दाखल केलेले आहेत.
११. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचा खुलासा, दाखल कागदपत्रे पाहता व युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना
दयावयाच्या सेवेत त्रृटी केली आहे काय ? नाही
२. अंतिम आदेश ? खालीलप्रमाणे
विवेचन
१२. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, सामनेवाला यांनी त्यांचे बॅंकेत तक्रारदारची आई मयत झनकारबाई जैन यांचे नावे असलेल्या १३ मुदत ठेवी बॅंकेच्या नॉमिनेशन फॉर्मप्रमाणे व खाते उघडण्यासाठीच्या अर्जातही त्यांचे वरस म्हणून नाव असतांनाही, तसेच योग्य व आवश्यक त्या पुर्तता केल्यानंतरही तक्रारदार यांना कायदेशीर रक्कम अदा केलेली नाही व सेवेत त्रृटी केली आहे.
१३. या संदर्भात सामनेवाला यांनी आपल्या खुलाशामध्ये एखादी व्यक्ती मयत झालेनंतर हिंदू अॅक्ट कायदा कलम ३७२ नुसार दिवाणी न्यायालयाकडून ‘सक्शेशन सर्टिफिकेट’ आणणे गरजेचे आहे. तसे सर्टिफिकिट तक्रारदारने दिलेले नसल्याने त्यास कायदेशीर वारस ठरविता येणार नाही व रक्कमही देता येणार नाही.
१४. तक्रारदारने बॅंकेचे भरलेले नॉमिनेशन फॉर्म व मृत्युपत्र वगैरे सर्व कागदपत्रे हे त्यांच्या मयत आईची फसवणूक करून तयार केलेले आहेत. हया म्हणण्याच्या पृष्टयार्थ त्यांनी तक्रारदारचे आईचे मयत होण्यापूर्वीच्या तारखेचे (दि.२९/०७/२००६ चे) बॅंकेच्या जनरल मॅनेजरला पाठविलेल्या गोपनीय पत्राची अॅटेस्टेड प्रत खुलाश्यासोबत दाखल केलेली आहे.
१५. तसेच तक्रारदार मयत झालेनंतर त्यांची दुसरी पत्नी कायदेशीर वारस असतांना तिचे नाव रेकॉर्डवर न आणता घटस्फोटित पहिली पत्नी जी २५ ते ३० वर्षापासून विभक्त राहात आहे, तिचे व तीच्या मुलांची नावे वारस म्हणून रेकॉर्डवर आणलेली आहेत. हे पूर्णतः चुकीचे व बेकायदेशीर आहे. त्यामुळे तक्रारदार यास ठेव पावत्यांची रक्कम कायदयाने देवू शकत नाही.
१६. वरील सर्व बाबी पाहता प्रथमतः तक्रारदारचे मयत आईने सामनेवाला बॅंकेला दिेलेले पत्र पाहणे आवश्यक ठरते. सदर पत्र पाहता त्यात पुढीलप्रमाणे आशय लिहिलेला आहे.
माझा मुलगा संचालाल जैन याने माझे इच्छेविरूध्द आपल्या बॅंकेत असलेल्या सर्व ठेवींवर माझे सोबत त्याचे नाव पावत्यांवर माझे मर्जीविरूध्द लावून घेतलेले आहे. मी यापूर्वी या रकमांच्या संदर्भाने कोणतेही मृत्युपत्र लिहून ठेवलेले नाही व मृत्युपत्र लिहून देण्यास नकार दिला म्हणून त्याने माझेकडून आपल्या बॅंकेच्या वेगवेगळया स्वरूपाच्या को-या फॉर्मवर माझे अंगठे माझे इच्छेविरूध्द घेतलेले आहे. त्याचा दूरूपयोग भविष्यात डॉ. संचालाल याने करू नये म्हणून मी ही माहिती या पत्रादवारे आपणांस देत आहे. तसेच सदरच्या सर्व ठेव पावत्यांची रक्कम माझे मृत्युनंतर डॉ. संचालाल याला कोणत्याही परिस्थितीत देण्यात येवू नये. तसेच या सर्व ठेव पावत्यांच्या रकमा माझे नातू म्हणजे डॉ. संचालाल यांच्या सर्व मुलांना व माझया दोन मुली अनुक्रमे सौ. पदमबाई व सौ. प्रेमबाई यांच्यात समसमान वाटण्यांत याव्यात. मात्र डॉ.संचालाल या माझया मुलास एकही ठेव पावतीची रक्कम कुठल्याही परिस्थितीत देण्यांत येवू नये.
तसेच हे पत्र अत्यंत गोपनीय ठेवण्यात यावे व ज्यावेळेस डॉ.संचालाल हा माझा मुलगा एकटयानेच सदरच्या सर्व ठेव पावत्यांची रक्कम मी मेल्यावर हडपण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस सदरची पत्रातील वस्तुस्थिती आपण लक्षात घेऊन त्यावेळेस हे पत्र बाहेर काढुन आपल्या बॅंकेत माझया नावाने असलेल्या सर्व ठेव पावत्या, शेअर्सची रक्कम, बचत खात्यातील रकमा या डॉ. संचालाल जैन यांस न देता माझया दोन्ही मुली व डॉ. संचालाल यांचे मुलं यांना आपणच हया पत्राच्या आधारे समसमान वाटुन देण्याचे अधिकार मी या पत्रादवारे आपणांस देत आहे.
१७. तसेच तक्रारदारने दाखल केलेल्या कागदपत्रांत त्यांनी त्यांचे पुतण्याबरोबर झालेल्या समझोता प्रकरणाची प्रत जोडलेली आहे. सदर प्रकरण सक्शेशन अॅक्टचे संदर्भातील आहे. परंतु त्यात तक्रारदारची व त्यांचे पुतण्याची आपसात समझुत झालेने सदर अर्ज निकाली काढण्यात आलेला आहे. परंतु त्यावरून तक्रारदार हे मयत झनकारबाई जैन यांचे वारस असल्याचे सिध्द होत नाही.
यावरून तक्रारदार यांनी बॅंकेत दिलेला नॉमिनेशन फॉर्म, खाते उघडण्यासाठी केलेल्या अर्जातील त्यांचे नाव हे सर्व फसवणुकीने तयार करून दाखल केल्याचे निर्देशनास येत आहे.
१८. तक्रारदारने मे. दिवाणी न्यायालयाकडून हिंदू सक्शेशन अॅक्ट चे कलम ३७२ प्रमाणे योग्य ते सक्शेशन सर्टिफेकिट प्राप्त केलेले नाही. एखादी व्यक्ती निधन पावल्यानंतर तिच्या वारसाबाबत मतभेद असल्यास मयत व्यक्तींच्या पैश्यांवर अधिकार प्रस्थापित करू इच्छिणा-या व्यक्तीने सदरचे सर्टिफिकेट प्राप्त करणे गरजेचे असते. तक्रारदारने कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर कागदपत्रांची पुर्तता न केल्याचे आमच्या निर्देशनास येत असल्याने सामनेवाला यांनी तक्रारदार यास मुदत ठेवींच्या रकमा न देवून अथवा त्याचे नावे तबदील न करून कोणत्याही प्रकारच्या अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही व तक्रारदार यास दयावयाच्या सेवेत त्रृटी केलेली नाही. या मतास आम्ही आलो आहोत म्हणुन मुददा क्रं.१ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१९. मुद्दा क्र.२- वरील विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
२. तक्रारदार व सामनेवाला यांनी आपआपला खर्च सोसावा.
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.