Maharashtra

Parbhani

CC/11/103

Sheshrao Vishwanathrao Parwe - Complainant(s)

Versus

Marathwada Krashi Udega,Gangakhed - Opp.Party(s)

07 Sep 2011

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/11/103
1. Sheshrao Vishwanathrao ParweR/o Gowre Tq.PurnaParbhaniMaharashtra2. Venkatrao Viswanathrao ParwaeR/o Goure Tq.PurnaParbhaniMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Marathwada Krashi Udega,GangakhedGangakhed Road,ParbhaniParbhaniMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :

Dated : 07 Sep 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र

                        तक्रार दाखल दिनांकः-  15/04/2011

                                    तक्रार नोदणी दिनांकः- 04/05/2011

                        तक्रार निकाल दिनांकः- 07/09/2011

                                                                                    कालावधी 04 महिने. 03 दिवस.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी

अध्‍यक्ष -         श्री.चंद्रकात बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.

सदस्‍या                                                                                                    सदस्‍या

सुजाता जोशी B.Sc.LL.B.                                                          सौ.अनिता ओस्‍तवाल M.Sc.              

    

1         शेषराव पिता विश्‍वनाथराव पारवे.                           अर्जदार

वय 36 वर्ष.धंदा.वकिली.                                      अड.ए.के.उमरीकर.

रा.गौर.ता.पुर्णा. परभणी.

हा.मु.ओम शांती केंद्रा समोर,शिवराम नगर,

वसमत रोड,परभणी.               

2     व्‍यंकटराव पि.विश्‍वनाथराव पारवे.

      वय 41 वर्षे.धंदा.शेती.

      रा.गौर.ता.पुर्णा.जि.परभणी.

           विरुध्‍द

      मराठवाडा कृषी उद्योग.                                   गैरअर्जदार.

      गंगाखेड रोड,परभणी.                                  अड.एल.एस.काळे.

      व्‍दारा.प्रो.प्रा.विनोद सोपानराव पाटील,

      रा.गंगाखेड रोड.परभणी.

 

   -----------------------------------------------------------------------------------        

     कोरम  -    1)    श्री.सी.बी.पांढरपट्टे.      अध्‍यक्ष.

2)        सौ.सुजाता जोशी.                   सदस्‍या.                                              3)        सौ.अनिता ओस्‍तवाल.                 सदस्‍या.

-------------------------------------------------------------------------------------------------------         

         

 

 

              (  निकालपत्र पारित व्‍दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्‍यक्ष.)

 

          सदोष शेती अवजाराची नुकसान भरपाई मिळणेसाठी प्रस्‍तुतची तक्रार आहे.

      तक्रार अर्जातील थोडक्‍यात हकीकत.

      अर्जदार क्रमांक 1 व 2 सख्‍खे भाऊ आहेत. अर्जदार क्रमांक 1 वकीली व्‍यवसाय  व अर्जदार क्रमांक 2 शेती करतात. त्‍यांनी एकत्र कुटूंबातील शेती व्‍यवसायासाठी गैरअर्जदार शेती औजारे उत्‍पादका कडून शेत नांगरणेसाठी तारीख 28/10/2010 रोजी तिरी हे तीन फाळाचे अवजार 18,000/- रु. ला विकत घेतले होते. त्‍याची निर्मिती गैरअर्जदाराने स्‍वतः केलेली आहे. सन 2010 च्‍या रब्‍बी हंगामात सदरचे अवजार अर्जदाराने ट्रॅक्‍टरला जोडून शेतीची मशागत व नांगरट करीत असतांना अवजाराला वेल्‍डींग केलेले जोड निखळले. वेल्‍डींग केल्‍यावरही ते टिकत नव्‍हते त्‍याबाबत गैरअर्जदारास फोन करुन कळवले असता त्‍याने त्‍याकडे दुर्लक्ष केले. त्‍यानंतरही पुन्‍हा तारीख 20/11/2010 रोजी सदर अवजाराने शेतीची मशागत करत असतांना तिरीची डाव्‍या बाजूच्‍या लिंकला जोडणारी पट्टी तुटली अर्जदाराचे म्‍हणणे असे की, संबंधीत अवजारामध्‍ये उत्‍पादनातील दोष राहून गेल्‍यामुळे वेल्‍डींग केलेले भाग वारंवार तुटून निकामी होत आहेत त्‍यामुळे गैरअर्जदाराने सदरचे अवजार बदलून द्यावे अगर त्‍याची किंमत अर्जदाराला परत मिळावी म्‍हणून तारीख 08/12/2010 रोजी गैरअर्जदारास कायदेशिर नोटीस पाठवली होती त्‍याला गैरअर्जदाराने खोटे उत्‍तर पाठवुन त्‍याचेकडून अवजार विकत घेतलेलेच नाही बँकेकडे कर्ज प्रकरण करण्‍यासाठी अवजाराचे कोटेशन पाहिजे म्‍हणून मागणी केली होती व त्‍यावरुन त्‍याला इस्‍टीमेट दिले होते असे कळवले अर्जदाराचे म्‍हणणे असे की, सदरचे अवजार गैरअर्जदाराकडूनच रोखीने घेतले असतांनाही त्‍याने इस्‍टीमेटची पावती देवुन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवात्रुटी केली आहे म्‍हणून त्‍याची कायदेशिर दाद मिळणेसाठी ग्राहक मंचात प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन दुरुस्‍तीचा खर्च मानसिकत्रास भाडे खर्च वगैरेची  नुकसान  भरपाई  रु. 13,500/- +  अवजाराची किंमत

रु.18,000/- 18 टक्‍के व्‍याजासह गैरअर्जदाराकडून मिळावेत अशी मागणी केली आहे.

      तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ अर्जदार क्रमांक  1 चे शपथपत्र (नि.2) व पुराव्‍यातील कागदपत्रात नि.4 लगत अवजाराचे बील, 9 फोटोप्रींटस्, नोटीसीची स्‍थळप्रत, पोस्‍टाची पावती अशी 4 कागदपत्रे दाखल केली आहेत.

      तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करणेसाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्‍यावर दिनांक 13/06/2011 रोजी लेखी जबाब (नि.8) सादर केला.

      लेखी जबाबातून गैरअर्जदाराच्‍या तक्रार अर्जातील बहुतांश सर्व विधाने गैरअर्जदाराने साफ नाकारली आहेत.त्‍यांचे म्‍हणणे असे की, तारीख 28/10/2010 रोजी अर्जदार क्रमांक 1 त्‍याच्‍या दुकानात आला व म्‍हणाला की, माझ्याकडे ट्रॅक्‍टर आहे तुमच्‍याकडून शेती अवजारे खरेदी करावयाचे आहे व त्‍यासाठी बॅंकेकडून कर्ज घेणार आहे म्‍हणून तिरी अवजाराचे कोटेशन मागितले म्‍हणून रु.18,000/- चे कोटेशन मराठवाडा कृषी उद्याग केंद्र या दुकानच्‍या लेटरपॅडवरुन दिले होते. अर्जदारांनी सदरचे अवजार प्रत्‍यक्षात मुळीच विकत घेतलेले नाही. दिनांक 08/12/2010 रोजी अर्जदार क्रमांक 1 ने नोटीस पाठवुन अवजार बदलुन द्यावे अगर किंमत परत करावी असे कळवल्‍यानंतर नोटीसीला रितसर उत्‍तर पाठवले. त्‍यानंतरही गैरअर्जदारावर दबाव आणण्‍याचा व धमकी देण्‍याचा अर्जदाराने प्रकार केला व प्रस्‍तुतचा खोटा दावा केलेला आहे. गैरअर्जदाराचे पुढे म्‍हणणे असे की, शेती उपयोगी लोखंडी अवजारे विकण्‍याचा मराठवाडा कृषी उद्योग केंद्र या नावाचा त्‍याचा व्‍यवसाय आहे.अवजारे विकल्‍यावर रोखीची पावती सहीनिशी देतो.अर्जदारांना फक्‍त कोटेशन दिलेले आहे त्‍याने खरेदी केलेले नाही. तरीही खोटी तक्रार करुन मानिकसत्रास दिला आहे.सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा.अशी शेवटी विनंती केली आहे.

लेखी जबाबाच्‍या पुष्‍टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.9) दाखल केले आहे.

      प्रकरणाच्‍या अंतिम सुनावणीच्‍या वेळी अर्जदार तर्फे अड.ए.के.उमरीकर व गैरअर्जदार तर्फे अड.एल.एस.काळे.यांनी युक्तिवाद केला.

निर्णयासाठी  उपस्थित होणारे मुद्दे.

मुद्दे.                                            उत्‍तर.

1     अर्जदार गैरअर्जदाराचे ग्राहक आहे काय हे

      शाबीत झाले आहे काय ?                                 होय

2     गैरअर्जदाराने निर्मिती केलेले व त्‍याचेकडून अर्जदारांनी

      खरेदी केलेले तिरी शेती अवजारामध्‍ये उत्‍पादनातील

      सदोषता आहे हे कायदेशिररित्‍या शाबीत झाले आहे

      काय ?                                                 नाही.

3     अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहेत?         अंतिम आदेशा प्रमाणे.    

                 

 

                  कारणे

मुद्या क्रमांक‍ 1

     अर्जदार गैरअर्जदाराचे ग्राहक नाहीत व तारीख 28/10/2010 रोजी त्‍याचेकडून तिरी शेती अवजार विकत घेतलेले नाही.त्‍या तारखेची पुराव्‍यात दाखल केलेली पावती ही विक्रीची पावती नसुन इस्‍टीमेट तथा कोटेशन अर्जदारांनी मागणी केले वरुन त्‍याला कर्ज प्रकरणी बँकेत सादर करणेसाठी दिलेले होते. तिरी अवजार अर्जदारास विकले नसल्‍याने गैरअर्जदाराचे ग्राहक नाहीत.त्‍यामुळे तक्रार फेटाळावी असा लेखी जबाबात तिव्र आक्षेप घेतलेला आहे.नि.14/1 वर दाखल केलेल्‍या संबंधीत मुळ पावतीचे बारकाईने अवलोकन केले असता गैरअर्जदाराचा बचाव मुळीच मान्‍य करता येणार नाही. याचे पहिले कारण असे की,इस्‍टीमेटच्‍या तथा दरपत्रकाच्‍या पावतीवर एकतर वॉरंटी / गॅरंटीचा मुळीच उल्‍लेख केला जात नाही. व नसतो.मात्र सदर पावतीवर तुटफूट व बेंडची गॅरंटी नाही.असे लिहिलेले असल्‍यामुळे ती रोखीचीच पावती असली पाहिजे असा निष्‍कर्ष निघतो.दुसरे कारण असे की, संबंधीत शेती अवजार गैरअर्जदारानेच निर्मिती केली असल्‍याचा त्‍या अवजारावर गैरअर्जदाराच्‍या दुकानचे नाव व फोन नंबर पेंटींग केली असल्‍याचे अर्जदाराने पुराव्‍यात नि.4/4 वर दाखल केलेल्‍या फोटोचे निरीक्षण केले असता दिसते त्‍यामुळे ते अवजार गैरअर्जदाराकडूनच विकत घेतेलेले आहे. हे सिध्‍द होते.तिसरे कारण म्‍हणजे गैरअर्जदार विकलेल्‍या मालाची रोखीची पावती (कॅशमेमो) प्रत्‍येक गि-हाईकाला देत असल्‍या बद्दलचे बील बुक तुमच्‍याकडे आहे का ? असा मंचानेच गैरअर्जदाराच्‍या वकिलास युक्तिवादाच्‍या वेळी प्रश्‍न विचारला तेव्‍हा कॅशमेमोचे वेगळे बीलबुक आहे व ते प्रकरणात दाखल करतो असे अड.काळे यांनी सांगितले होते.मात्र प्रकरणात आजअखेर ते दाखल केलेले नसल्‍यामुळे गैरअर्जदाराने विकलेल्‍या शेती अवजाराची अथवा इतर मालाची पावती नि.14/1 वर दाखल केल्‍याप्रमाणे इस्‍टीमेट शिर्षक असलेल्‍या बील बुकातूनच दिली जात असली पाहिजे असा विरुध्‍द तर्क निघतो. त्‍यामुळे नि.14/1 वरील रु.18,000/- ची पावती ही रोखीचीच असली पाहिजे शिवाय नि.14/3 ते 5 वरील शपथपत्रातून देखील साक्षीदारांने तिरी हे अवजार गैरअर्जदारास रोख रक्‍कम देवुन खरेदी केले होते असे शपथेवर सांगितले आहे आणि ती शप‍थपत्रे गैरअर्जदाराकडून चॅलेंज केलेली नसल्‍यामुळे संबंधीत पावती रोखीचीच पावती आहे हे वरील निष्‍कर्षा वरुन सिध्‍द होते.सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक 2 व 3             

अर्जदारांचे म्‍हणणे असे की, माहे ऑक्‍टोबर 2010 मध्‍ये गैरअर्जदाराकडून तिरी अवजार विकत घेतल्‍यावर त्‍याच्‍या साह्याने शेतात मशागत करीत असतांना वेल्‍डींग तुटून एक फाळ निकळला तसेच त्‍यानंतरही पुन्‍हा ट्रॅक्‍टरच्‍या लोअर लिंकला जोडणा-या तिरी अवजाराच्‍या दोन्‍ही बाजुंच्‍या  पट्टया (कान) पैकी एक पट्टी तुटली त्‍याबाबत गैरअर्जदाराकडे तक्रार केली असता त्‍याने प्रत्‍यक्ष येवुन पाहतो असे आश्‍वासन दिले मात्र टाळाटाळ केली.त्‍यानंतरही स्‍वखर्चाने वेल्‍डींग तुटलेले भाग वारंवार दुरुस्‍त करुन घेतले त्‍यामुळे गैरअर्जदारास समक्ष भेटून अवजार बदलून द्यावे अगर पैसे परत करावेत अशी मागणी केली असता त्‍याने दोन्‍हींसही नकार दिला.वेल्‍डींग सतत तुटण्‍याचे कारण अवजाराच्‍या निर्मिती दोषामुळेच घडले आहे.त्‍यासाठी प्रस्‍तुत तक्रार अर्जाव्‍दारे अर्जदारांनी ग्राहक मंचापुढे दाद मागितल्‍यानंतर वास्‍तविक संबंधीत अवजाराची त्‍या क्षेत्रातील तज्ञाकडून तपासणी करुन त्‍याचा अहवाल प्रकरणात मागवुन घेण्‍याबाबत ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 13 (क) मधील तरतुदी प्रमाणे मंचाकडे रितसर अर्ज करुन मागणी करण्‍याची जबाबदारी असतांनाही प्रकरणाच्‍या अंतिम सुनावणी पर्यंत त्‍याबाबत कोणतीही हालचाल अर्जदारांनी केलेली नव्‍हती.आणि शेवटी शेवटी युक्तिवादाच्‍या वेळेस नि.14 लगत संबंधीत अवजाराचा तपासणी अहवाल (नि.14/2) एकतर्फी दाखल करुन अवजारासाठी लोखंड चांगले वापरले नाही हे मत संबंधीत अहवाल देणारी व्‍यक्‍ती अब्‍बास खान इस्‍माईल खान(वेल्‍डर) रा. पुर्णा याच्‍या सहीने दाखल केलेला असला तरी तो एकतर्फी व मंचाचे किंवा गैरअर्जदाराच्‍या संमंतीविना तपासणी केलेला नसल्‍याने आणि संबंधीत व्‍यक्‍ती त्‍या क्षेत्रातील तज्ञ आहे असा पुरावा दिलेला नसल्‍यामुळे तो कायदेशिररित्‍या पुराव्‍यात ग्राह्य धरता येणार नाही. असे मंचाचे मत आहे.तरी परंतु अर्जदारांनी तक्रार अर्जासोबत नि.4/4 लगत खरेदी केलेल्‍या अवजाराचे एकुण 9 फोटो सादर केलेले आहेत.त्‍यांचे बारकाईने अवलोकन केले असता अवजाराचे जोडलेले भाग वेल्‍डींग करुन जोडलेले दिसतात आणि वेल्‍डींगचाच जोडलेला भाग तुटलेला असल्‍याचे फोटो क्रमांक 2, 3 व 4 वरुन दिसते. अर्जदारांनी तक्रार अर्जामध्‍ये सदरची वेल्‍डींग वारंवार तुटत होते त्‍यासाठी 15,00/- रु. खर्च करावा लागला असे म्‍हंटलेले आहे परंतु वेल्‍डींग करुन घेतलेल्‍या खर्चाची एकही पावती पुराव्‍यात दाखल केलेली नाही.तसेच अवजार वेल्‍डींगला नेण्‍यासाठी वाहतुक खर्चाच्‍या नुकसान भरपाईचीही मागणी केलेली आहे.त्‍याबाबतच्‍या खर्चाचा पुरावा दिलेला नाही.त्‍यामुळे ती नुकसान भरपाई ग्राह्य धरता येणार नाही.तक्रार अर्जातून अवजाराची किंमत रु.18,000/- 18 टक्‍के व्‍याजासह गैरअर्जदाराकडून मिळावी अशी मागणी केलेली असली तरी मुळातच खरेदी केलेल्‍या अवजारामध्‍ये  उत्‍पादनातील दोष राहून गेलेला आहे.हे कायदेशिररित्‍या शाबीत झालेले नसल्‍यामुळे ती मागणी मान्‍य करता येणार नाही.तरी परंतु दाखल केलेल्‍या फोटो मधून अवजाराच्‍या जोड भागातील वेल्‍डींग निघाली असल्‍याचे दिसत असल्‍याने व सतत असे घडत असल्‍याचे अर्जदाराने शपथपत्रातून सांगितले असल्‍याने ती तक्रार विचारात घेवुन गैरअर्जदाराने आपल्‍या कारखान्‍यातून सदर अवजाराचे तुटलेले भाग व्‍यवस्‍थीतरित्‍या कणखरपणे जोडून देण्‍याचे आदेश गैरअर्जदारास देणे न्‍यायोचित होईल. मात्र तक्रार अर्जातून मागणी केलेला अनुतोष खरेदी केलेल्‍या वस्‍तुमध्‍ये निर्मितीतील दोष आहे हे कायदेशिररित्‍या शाबीत झालेले नसल्‍यामुळे मुद्दा क्रमांक 2 चे उत्‍तर नकारार्थी देवुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत.                 

                           आदश            

1          अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्‍यात येते.

2          गैरअर्जदाराने आदेश तारखेपासून  30 दिवसाचे आत अर्जदारास विकलेले तिरी शेती अवजाराचे तुटलेले भाग स्‍वखर्चाने पुर्ववतः कणखर जोडून द्यावेत.

3     गैरअर्जदाराने तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.2,000/- आदेश मुदतीत द्यावेत.

4     पक्षकाराना आदेशाच्‍या प्रती मोफत पुरवाव्‍यात.  

 

 

 

 

सौ. अनिता ओस्‍तवाल              सौ.सुजाता जोशी        श्री. सी.बी. पांढरपटटे

     सदस्‍या                        सदस्‍या                  अध्‍यक्ष

 

 

 

 


[HONABLE MRS. Anita Ostwal] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT