जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 187/2008. प्रकरण दाखल तारीख - 22/05/2008 प्रकरण निकाल तारीख – 11/02/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य कू.वैष्णवी उर्फ तेजस्वीनी पि.पदमाकर कदम वय, 04 वर्षे, धंदा -- अज्ञानपालतकर्ता वडिल पदमाकर पि. विठठलराव कदम, वय, 30 वर्षे,धंदा मजूरी रा.पूर्णा, ता.पूर्णा जि.परभणी. अर्जदार विरुध्द. 1. मराठवाडा बाल रुग्णालय, गोवर्धन घाट,नांदेड मार्फत डॉ.संग्राम एस. जोंधळे, वय, सज्ञान, धंदा,वैद्यकीय चिकित्सक रा. नांदेड. 2. डॉ. अषीश अग्रवाल, वय, सज्ञान, धंदा व राहणार वरील प्रमाणे. 3. डॉ.एम.एस.रिझवान, गैरअर्जदार वय,सज्ञान, धंदा सदर, रा.रजाक हॉस्पीटल, देगलूर नाका,नांदेड. 4. नॅशनल इन्शूरन्स कंपनी लि.मिडलेशन स्ट्रीट, 4.पोस्ट बॉक्स नंबर 9229, कोलकत्ता-700 071 5. द न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लि. नागपूर 5. क्षेञीय कार्यालय, शाखा नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.किरडे व्ही.व्ही. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील - अड.जी.एस.औढेंकर. गैरअर्जदार क्र.5 तर्फे वकील - अड.एस.व्ही.राहेरकर. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर,सदस्या ) गैरअर्जदारांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार ही अज्ञान असून तिचे कायदेशीर पालनकर्ते तिचे वडील आहेत. म्हणून अर्जदार यांनी पालनकर्ते म्हणून ही तक्रार स्वतः चालवित आहेत. अर्जदार हिला तिच्या पोटात दूखत असल्यामूळे तिच्या वडीलांनी तिला दि.18.04.2005 रोजी पूर्णा येथील बाल रोग तज्ञ डॉ. प्रफूल सोनी यांचे दवाखान्यातत शरीक केले. तिच्या एक दिवस तेथे उपचार केल्यावर डॉ. सोनी यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे दवाखान्यामध्ये नांदेड येथे इलाजासाठी पाठविले होते. तेथे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार हिची पूर्ण तपासणी करुन दि.19.04.2005 रोजी पोटाचे ऑपरेशन करावे लागते असे अर्जदारांच्या वडिलांना सांगितले. ऑपरेशनसाठी रु.10,000/- जमा करुन घेतले. ऑपरेशनसाठी गैरअर्जदार क्र.3 डॉ.रिझवान यांना बोलावून घेतले.गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदार हिच्या पोटाच्या आतडयाचे ऑपरेशन केले व नंतर दि.23.04.2005 रोजी तिच्याकडून रु.7000/- घेऊन डिसचार्ज दिला. याप्रमाणे संपूर्ण दवाखान्याचा खर्च मिळून रु.23,000/- लागले. दि.27.07.2006 रोजी पूर्णा येथील डॉ. सोनी यांनी डॉ.संदिप कारले परभणी यांचेकडे इलाजासाठी घेऊन जाण्यास सांगितले. त्यांनी पूर्ण तपासणी करुन असे सांगितले की, मागील एक वर्षापूर्वी झालेले ऑपरेशनमूळे जखम झाली असून ती बेंबीच्या वर झाली आहे. त्यामूळे अर्जदाराच्या पोटात दूखत आहे व तसेच त्या ऑपरेशनमूळे पूर्ण बॉडीवर गूडया पडल्या आहेत,त्यामूळे अशक्तपणा आहे व त्यामूळे चालता येत नाही व तसेच हारन्या रोग होण्याची शक्ता आहे असा रिपोर्ट दि.27.07.2007 रोजी दिला. तो तक्रारीसोबत दाखल आहे. परत दि.03.08.2006 रोजी डॉ.कात्नेश्वरकर यांच्या दवाखान्यात अर्जदारास शरीक केले. त्यांच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदारांनी केलेले ऑपरेशन पून्हा करावे लागणार आहे. कारण पोटातील टाके चीघळल्याने पोटाचा ञास आहे. जखम असल्यामूळे वेळीच ऑपरेशन केले नाही तर हारण्या रोग होण्याची शक्यता आहे. तसा रिपोर्ट दिला तो तक्रारीत दाखल आहे. नंतर दि.05.07.2007 रोजी डॉ.रेंगे नांदेड यांच्या दवाखान्यात नेले तेव्हा पोटाचा ञास कमी न झाल्याने त्यांनी वाडेकर हॉस्पीटल नांदेड येथे किडणी तपासण्याकामी पाठविले. सदर डॉक्टरांनी असे सांगितले की, दोन वर्षापूर्वी डॉ.रिझवान यांनी पोटाचे ऑपरेशन केले होते ते ऑपरेशन यशस्वी झालेले नाही म्हणून ञास होत आहे तसा रिपोर्ट दिला तो तक्रारी सोबत आहे. गैरअर्जदारांनी अर्जदाराचे ऑपरेशन चूकीच्या पध्दतीने केल्यामूळे त्यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक ञास सहन करावा लागला व सेवेत सूध्दा ञूटी केली आहे. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदाराकडून रु.5,00,000/- नूकसान भरपाई म्हणून मिळावेत तसेच अर्जदार हीला खर्चापोटी तिच्या 18 वर्षापर्यत रु.5,000/- प्रतिमहा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी व्यवसायीक बंधपञ विमा न्यू इंडिया इन्शूरन्स कंपनी कडून काढलेला आहे. त्यांचा आक्षेप आहे की, सदर प्रकरण मूदतीमध्ये नाही. तिच्यावर दि.19.04.2005 रोजी शस्ञक्रिया करण्यात आली आहे. तक्रार ही दि.22.05.2008 रोजी दाखल केलेली आहे. म्हणून तक्रार मूदतीत नाही त्यामूळे ती फेटाळण्यात यावी. अर्जदार हा ग्राहकाच्या व्याखेत बसत नाही म्हणून ही तक्रार या मंचात चालू शकत नाही म्हणून फेटाळण्यात यावी. पूर्णेचे डॉ. सोनी यांनी अर्जदार यांना त्यांचे कडे पाठविले होते. अर्जदाराची तपासणी केल्यानंतर असे आढळले की, अर्जदाराच्या पोटातील अन्ननलिकेची छोटया आतडीचा भाग छोटया आतडीमध्ये घुसला होता व त्याठिकाणचा रक्त प्रवाह थांबला होता व अर्जदारास रक्ताची संडास होत होती त्यामूळे अर्जदार सारखे रडत होते.डॉ. अग्रवाल यांचेकडे सोनोग्राफी करण्यात आली. त्या रिपोर्टवरुन अर्जदाराची छोटी आतडी छोटया आतंडीमध्ये घुसली होती व त्याठिकाणची हालचालची बंद झाली होती. अर्जदारावर शस्ञक्रिया करणे जरुरीचे होते नसता अर्जदार मरण पावण्याची शक्यता होती. सदर प्रकरण हे शस्ञक्रियेचे असल्यामूळे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी गैरअर्जदार क्र.3 यांना बोलावले कारण ते शल्यचिकित्सक आहेत. गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदारास तपासले व सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहिला व ते या नीर्णयास आले की, अर्जदारावर तातडीने शस्ञक्रिया करणे जरुरी आहे. त्या कामी त्यांनी कोणतीही फिस घेतलेली नाही. अर्जदारांच्या वडिलांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली व अर्जदारांच्या वडिलांच्या संमतीनंतरच अर्जदारावर शस्ञक्रिया करण्यात आली. अर्जदारावर केलेली शस्ञक्रिया यशस्वी झाली होती व अर्जदार हिला दूध पचत होते व संडासपण नेहमीसारखी होत होती. अर्जदाराचे रडणे कमी झाले होते म्हणून अर्जदारास दि.23.04.2005 रोजी डिसचार्ज देण्यात आला होता. अर्जदाराला पावती देण्यात आली होती ती पावती मूददाम अर्जदाराने या प्रकरणात दाखल केलेली नाही. त्यामूळे गैरअर्जदारांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही. अर्जदारास इंन्सीजनल हर्नीया होऊ नये म्हणून प्रोलिंगचे टाके दिले होते. डॉ.कारले यांनी दि.3.3.3006 रोजी अर्जदाराच्या पोटाची सोनोग्राफी केली व त्याप्रमाणे अर्जदारास पोटामध्ये कोणताही दोष नव्हता हे आढळून आले. अर्जदारास शस्ञक्रियेनंतर प्रोलिनची टाके दिले होते व प्रोलिनचा दोरा आपोआप पोटामध्ये गळत नसतो. प्रोलिनच्या दो-याचे टिश्यू मूळे रिअक्शन होऊन जखम होऊ शकते पण तशी जखम झाल्यास ते टाके काढून घेतात. अर्जदार हे गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे ऑपरेशननंतर पहिल्यांदा दि.05.12.2006 रोजी आली होती. तरी गैरअर्जदार क्र.2 यांनी अन्टीबायोटीक औषधी दिली. त्यानंतर अर्जदार ही गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे कधीही आलेले नाही. अर्जदार ही गैरअर्जदार क्र.3 यांच्या वैयक्तीक दवाखान्यात दि.2.5.2007 रोजी गेली असता त्यांनी प्रोलिन दोरा काढून टाकला. डॉ.कात्नेश्वरकर यांना रिपोर्ट वरुन पैसे उकळण्यासाठी ही खोटी तक्रार दाखल केलेली आहे. डॉ. वाडेकर यांच्या रिपोर्टवरुन अर्जदारावर केलेली शस्ञक्रियेत दोष असल्याचे कूठेही म्हटलेले नाही. अर्जदारास रिअक्शन झाल्यामूळे गैरअर्जदारांचा दोष होता असे म्हणता येणार नाही. अर्जदार ही गैरअर्जदार यांचेकडे नियमितपणे तपासणी आली नाही.ताबडतोब आली असती तर गैरअर्जदाराने तिला तपासून फारपूर्वी दोरा काढून टाकला असता. अर्जदारांच्या स्वतःच्या हलगर्जीपणामूळे ती जखम झालेली आहे. अर्जदाराच्या स्वतःच्या चूकीमूळे गैरअर्जदाराला दोष देऊ शकत नाही. म्हणून सदर तक्रार खर्चासह फेटाळावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.4 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही. अर्जदाराची तक्रार ही मूदतीत नसल्यामूळे फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. तसेच सदर तक्रार ही अत्यंत गूंतागूतीची असल्यामूळे ही सीव्हील कोर्टात दाखल करावी असे म्हटले आहे. अर्जदार हे कोणताही सबळ पूरावा घेऊन समोर आलेले नाहीत. सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहून सर्वानी मिळून ऑपरेशन करण्याचा नीर्णय तिच्या वडिलांच्या संमतीनुसार घेतला होता व ऑपरेशन सूध्दा यशस्वी झाले होते ? रक्कम घेतल्याबददल त्यांनी इन्कार केला आहे. जखमेबददल अर्जदारास मेडीसीन देण्यात आले होते पण दि.5.12.2006 नंतर अर्जदार गैरअर्जदाराकडे आले नाहीत. गैरअर्जदारांनी अर्जदारास कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नसून सदर तक्रार ही खर्चासह फेटाळावी अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र. 1, 2, 3,4 व 5 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचे ग्राहक आहेत काय ? होय 2. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. 3. अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचेकडून नूकसान भरपाई पोटी रक्कम मिळण्यास पाञ आहेत काय ? होय. 4. अर्जदारास पूढील ऑपरेशन व विलाजकामी लागणा-या खर्चापोटी गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचेकडून रक्कम वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत काय ? होय. 5. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार हे त्यांचे मुलीला कू.वैष्णवी उर्फ तेजस्वीनी हिला गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचेकडे उपचारासाठी घेऊन गेले होते. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे मराठवाडा बाल रुग्णालय येथे अर्जदार हिच्यावर मूलीवर गैरअर्जदार क्र.3 यांनी शस्ञक्रिया केलेली आहे ही बाब अर्जदार यांनी दाखल केलेल्या गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचे डिसचार्ज कार्डवरुन स्पष्ट होत आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी सदरची बाब त्यांचे लेखी म्हणणे व शपथपञामध्ये नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ त्यांनी दाखल केलेले डिसचार्ज कार्ड यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात येते. मूददा क्र.2 ः- अर्जदार हे त्यांचे मुलीला कु.वैष्णवी हिस घेऊन गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचेकडे दि.19.04.2005 रोजी आलेले होते. त्यावेळी कू.वैष्णवी हिचे पोटाचे ऑपरेशन करावे लागेल असे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी सांगितले व त्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी गैरअर्जदार क्र.3 यांना ऑपरेशन करण्याकरिता बोलावले. अर्जदार यांनी दाखल केलेल्या डिसचार्ज कार्डचे अवलोकन केले असता अर्जदार प्रथमतः गैरअर्जदार यांचेकडे आले असताना Blood in stool, excessive cry, other complain या तक्रारी गैरअर्जदार यांचे डिसचार्ज कार्डवर नमूद करण्यात आलेल्या आहेत. अर्जदार यांनी सदर अर्जासोबत लाईफलाईन हॉस्पीटल यांचे अल्ट्रासोनोग्राफी रिपोर्ट दि.19.04.2005 रोजीचा या अर्जासोबत या मंचाकडे दाखल केलेला आहे. सदर अल्ट्रासोनोग्राफी रिपोर्टचे अवलोकनक ले असता, या सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याचे दिसून येत आहे आणि शेवटच्या conclusion मध्ये BOWEL MASS WITH LOOP IN LOOP IN LEFT PARAUMBILICAL REGION WITH LUMEN IN LUMEN WITHOUT PERISTALTIC ACTIVITY IS S/O INTUSSUSEPTION ? ILIOILIAL TYPE REST NO ABNORMALITY IS DETECTED ON THIS STUDY. असे नमूद केलेले आहे. म्हणजेच यांचा अर्थ अर्जदार ही गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचेकडे आलेले असताना तिच्या ABDOMEN AND PELVIS मध्ये कोणतीही तक्रार असल्याचे सदरच्या रिपोर्टवरुन स्पष्ट दिसून येत नाही. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये व शपथपञामध्ये अर्जदार ही गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचेकडे आले त्यावेळेस तिची त्या वेळेस परिस्थिती गंभीर होती व अर्जदारावर तातडीने शस्ञक्रिया करणे जरुरी होते. अर्जदाराची शस्ञक्रिया केली नसती तर अर्जदाराचा मृत्यू झाला असता असे नमूद केले आहे. अर्जदार ही गैरअर्जदार क्र. 1 व2 यांचेंकडे आली असताना गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे मराठवाडा बाल रुग्णालय यांचेकडे कोणतेही मास्टर ऑफ सर्जन नसल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदार हिला दाखल करुन घेऊन गैरअर्जदार क्र.3 या ञयस्थ डॉक्टरांना मराठवाडा बाल रुग्णालय येथे बोलावून अर्जदार हिचेवर शस्ञक्रिया केलेली आहे. ही बाब दाखल कागदपञावरुन स्पष्ट होत आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्जदाराची परिस्थिती गंभीर होती. अर्जदारावर तातडीने शस्ञक्रिया करणे जरुरी होते. अर्जदाराची शस्ञक्रिया केली नसती तर अर्जदाराचा मृत्यू पण झाला असता हे दर्शवीणारा कोणताही कागदोपञी पूरावा या मंचामध्ये दाखल केलेला नाही. याउलट अर्जदार यांनी दाखल केलेले अल्ट्रासोनोग्राफी रिपोर्ट हा अर्जदार हिची स्थिती नॉर्मल होती असे दर्शवीणारा आहे. अर्जदार यांनी current civil cases मधील पान नंबर 179 ची झेरॉक्स प्रत या मंचामध्ये दाखल केलेली आहे. त्यांचे अवलोकन केले असता Medical Law- Consent by attendant of guardian-When a patient is a competent adult. There is no question of someone else giving consent on her behalf-When there was no medical emergency during surgery and the appellant was only temporarily unconsclous, undergoing only a diagnostic procedure by way of laparoscopy, the respondent ought to have waited till the appellant regained consciousness, discussed the result of the laparoscopic examination and then taken her consent for the removal of her uterus and ovaries- In the absence of an emergency and as the matter still being at the stage of diagnosis, the question of taking her mother s consent for radical surgery did not arise- Such consent by mother can not be treated as valid or real consent. असे नमूद केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी अर्जदारावर शस्ञक्रिया करण्यापूर्वी अर्जदार हिची म्हणजेच तिच्या आई वडिलांची कोणतीही संमती घेतली अगर त्या बाबत शस्ञक्रिया करण्यापूर्वी अर्जदार हिचे आईवडिलांनी विस्तृत माहीती दिली या बाबत संमती पञ अगर तसे दर्शवीणारा कोणताही कागदोपञी पूरावा या मंचासमोर दाखल केलेला नाही. अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे दवाखान्यामध्ये आले होते. अर्जदार यांचे अल्ट्रासोनोग्राफी रिपोर्टप्रमाणे अर्जदार यांचे प्रकृती स्वास्थामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार दिसून येत नाही. अशा परिस्थीतीमध्ये गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे स्वतः सर्जन नसताना अर्जदार हिला स्वतःकडे दाखल करुन घेतले आहे व गैरअर्जदार क्र. 3 या ञयस्थ डॉक्टरां मार्फत अर्जदार हिचेवर कोणतेही योग्य व संयूक्तीक कारण नसताना शस्ञक्रिया केलेली आहे व सदरची शस्ञक्रिया करताना केलेली जखम आजअखेर अर्जदार हिला आहे व त्यामधून अर्जदार हिला हार्नीया सारखा आजार उदभवू शकतो असे दाखल कागदपञावरुन स्पष्ट होत आहे. वरील सर्व परिस्थितीचा विचार करता गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी गैरअर्जदार क्र.3 मार्फत अर्जदार हिचेवर कोणतेही योग्य व संयूक्तीक कारण नसताना शस्ञक्रिया केलेली आहे आणि अर्जदार हिचे त्यावेळेला वय फक्त 6 महिने एवढेच होते. एखादा रुग्ण डॉक्टरकडे त्यांचे दवाखान्यात उपचार करण्यासाठी येत असतो आणि मेडीकल सायन्स प्रमाणे डॉक्टर हे रुग्णाच्या शारिरीक अवस्थेचा अभ्यास करुन त्यांचेवर उपचार करीत असतात. हा साधा निसर्गनियम आहे. परंतु प्रस्तूतच्या अर्जामध्ये अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडे आले असताना अर्जदार यांचे अल्ट्रासोनोग्राफी रिपोर्टप्रमाणे अर्जदार हिची शारीरिक अवस्था व्यवस्थीत असतानाही गैरअर्जदार यांनी अर्जदार हिचेवर कोणतेही योग्य व संयूक्तीक कारण नसताना शस्ञक्रिया केलेली आहे आणि त्याअनुषंगाने गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. मूददा क्र.3 ः- अर्जदार हिचेवर गैरअर्जदार यांनी विनाकारण शस्ञक्रिया केली त्यावेळेला अर्जदार हिचे वय 6 महिने इतकेच होते. त्यानंतर आजअखेर अर्जदार हिला सदरच्या शस्ञक्रिया अनुषंगाने ञास झालेला आहे. तिला तिच्या बालपणास मूकावे लागलेले आहे. गैरअर्जदार यांनी शस्ञक्रियेचे वेळेला वापरलेले प्रोलिनचा दोरा दि.26.06.2008 पर्यत तिचे शस्ञक्रिया केलेल्या जागी असल्याचे अर्जदार यांनी दाखल केलेल्या फोटोवरुन स्पष्ट दिसून येत आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी कोणतेही योग्य व संयूक्तीक कारण नसताना अर्जदार हिचेवर विनाकारण शस्ञक्रिया करुन तिला शारीरिक ञास दिलेला आहे तसेच सदर शस्ञक्रियेमूळे तिला हार्निया सारख्या रोगाला सामोरे जावे लागले आहे. या सर्व बाबीचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून नूकसान भरपाई पोटी अर्जदार यांचे मागणीप्रमाणे रक्कम रु.5,00,000/- गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांचेकडून वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. मूददा क्र.4 ः- अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडे दाखल झाली त्यावेळेस अर्जदार हिचे वय फक्त 6 महिने इतकेच होते. कोणतेही योग्य व संयूक्तीक कारण नसताना गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी अर्जदार हिचेवर लहान वयात शस्ञक्रिया केलेली आहे. सदर शस्ञक्रियेचे परीणाम अर्जदार हिचे शरीरावर आजअखेर दिसून येत आहेत. शस्ञक्रियेचे वेळी वापरलेले प्रोलिन धागा ही सन,2008 अखेर अर्जदार हिचे पोटामध्येच होता हे दाखल कागदपञावरुन स्पष्ट होत आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी शस्ञक्रिया केल्यानंतरही अर्जदार हिला वेगवेगळे दवाखान्यामध्ये जावे लागले आहे आणि इथून पूढेही अर्जदार हिस हार्निया सारखा रोग डेव्हलप झाल्याचे दि.26.07.2008 रोजीच्या डॉ.कात्नेश्वरकर यांचे पञावरुन स्पष्ट होत आहे. अर्जदार हिला तिच्या वयाच्या सहा महिन्यापासून आजअखेर गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांचे कृत्यामूळे निष्कारण शारीरिक ञासाला व त्याअनुषंगाने हार्निया सारख्या रोगासही बळी पडावे लागले आहे. हे दाखल कागदपञावरुन स्पष्ट होत आहे. त्यामूळे अर्जदार यांनी अर्जामध्ये अर्जदाराचे पूढील ऑपरेशन व विलाजकामी वयाचे 18 वर्षापर्यत तिला खर्चापोटी प्रतिमहा रु.5,000/- मागितले आहेत परंतु त्या बाबत कोणताही कागदोपञी पूरावा या मंचामध्ये दाखल केलेला नाही. त्यामूळे अर्जदारास पुढील ऑपरेशन आणि विलाजकामी रक्कम रु.50,000/- एवढी न्याय व योग्य अशी रक्कम देणे उचित होणार आहे असे या मंचाचे मत आहे. सदर तक्रार अर्जामध्ये गैरअर्जदार क्र.4 नॅशनल इन्शूरन्स कंपनी व गैरअर्जदार क्र.5 दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी यांनाही पार्टी करण्यात आलेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी गैरअर्जदार क्र.4 कडे पॉलिसी घेतलेली आहे व गैरअर्जदार क्र.3 यांनी गैरअर्जदार क्र.5 यांचेकडे पॉलिसी घेतलेली आहे. सदरची घटना ही पॉलिसीच्या वैध कालावधीमध्ये घडलेली आहे. त्यामूळे गैरअर्जदार क्र. 4 व 5 यांनी या अर्जाचे कामी आवश्यक पक्षकार म्हणून सामील केलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार क्र. 4 व 5 हे वैयक्तीक व संयूक्तीक अर्जदार यांना नूकसान भरपाईपोटी रक्कम देण्यास बंधनकारक आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचेवर लहान वयामध्ये गैरअर्जदार यांचेकडून शस्ञक्रिया झाल्यामूळे विवीध डॉक्टराकडे जावे लागलेले आहे. त्याअनुषंगाने निरनिराळया शस्ञक्रियेला सामोरे जावे लागले आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांचेकडून नूकसान भरपाईपोटी रक्कम मिळण्यासाठी अर्जदार यांनी या मंचामध्ये अर्ज करावा लागला आहे व त्याअनुषंगाने खर्चही करावा लागला आहे. त्यामूळे अर्जदार हे अर्जाच्या खर्चाचेपोटी रक्कम वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदाराचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद आणि गैरअर्जदार क्र. 1, 2,3,4 व 5 यांनी दाखल केलेला लेखी जवाब, शपथपञ तसेच दाखल केलेले कागदपञ व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद यांचा सर्वाचा विचार होता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. आजपासून 30 दिवसांचे आंत, गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांनी अर्जदार यांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात. 2. अर्जदार यांना रक्कम रु.5,00,000/- नूकसान भरपाईपोटी दयावेत. 3. अर्जदार यांना ऑपरेशन व इलाजकामी येणा-या खर्चापोटी रु.50,000/- दयावेत. 4. अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- दयावेत. 5. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यु.पारवेकर लघूलेखक. |