Maharashtra

Satara

CC/11/11

Shri . Shivaji Baburao Sutar - Complainant(s)

Versus

Maratha sha. p[atsanstha .Sadarbzar Manager - Opp.Party(s)

Shinde

19 Mar 2011

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 11 of 11
1. Shri . Shivaji Baburao SutarKinhi Tal Koregaon Dist satarasatara ...........Appellant(s)

Vs.
1. Maratha sha. p[atsanstha .Sadarbzar Manager Sadarbzar Satarasatara2. Manager Shri Dilip Deshmukh satarasatara3. Ch. Shri N. M. Patil Satarasatara4. Va.Ch. Shri A. R. Jadhavsatarasatara ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 19 Mar 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.23
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 11/2011
                                          नोंदणी तारीख – 18/01/2011
                                          निकाल तारीख – 19/3/2011
                                          निकाल कालावधी – 61 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 
(श्री सुनिल कापसे, सदस्‍य यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
1. श्री शिवाजी बाबूराव सुतार
2. सौ जयश्री शिवाजी सुतार
3. मनिषा शिवाजी सुतार अ.पा.क.नं.1
    सर्व रा.किन्‍हई, ता.कोरेगाव, जि.सातारा              ----- अर्जदार
                                             (अभियोक्‍ता सौ.शर्मिला शिंदे)
      विरुध्‍द
1. मराठा सहकारी पतसंस्‍था मर्या. तर्फे
   मराठा भवन, 506/10, प्‍लॉट नं.8,
   एस.टी.स्‍टँडमागे, प्‍लॉट नं.8, एस.टी.स्‍टँडमागे,
   सदर बझार, सातारा तर्फे व्‍यवस्‍थापक  
   व्‍यवस्‍थापक श्री दिलीप आनंदराव देशमुख
   रा.मराठा भवन, 506/10, प्‍लॉट नं.8,
   एस.टी.स्‍टँडमागे, सदर बझार, सातारा
2. चेअरमन, श्री नरेंद्र मोहन पाटील,
   27, मॅगझीन कॉलनी, सदर बझार, सातारा
3. व्‍हाईस चेअरमन, श्री अशोक रामचंद्र जाधव
   रा.154, रविवार पेठ, सातारा                    ----- जाबदार
                                            (एकतर्फा )
 
न्‍यायनिर्णय
 
    अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे -
1.     अर्जदार यांनी जाबदार संस्‍थेमध्‍ये वेगवेगळया ठेवपावत्‍यांन्‍वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्‍कम ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या आहेत. सदरच्‍या ठेवींपैकी काही ठेवींची मुदत संपलेली आहे. अर्जदार यांना रकमेची आवश्‍यकता असल्‍याने त्‍यांनी सदरच्‍या सर्व मुदत ठेव पावत्‍यांवर देय होणा-या रकमेची मागणी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्‍याजसहित देय झालेली रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. तसेच अर्जदार यांचे जाबदार संस्‍थेत बचत खाते आहे सदरच्‍या खात्‍यातील रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली असता जाबदार यांनी फक्‍त रु.1,000/- दिले. थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्‍यात यावयाची रक्‍कम न दिल्‍यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्‍थेचे ग्राहक आहेत. त्‍यामुळे जाबदार संस्‍थेकडून मुदत ठेव पावतींची एकूण देय रक्‍कम वसूल होऊन मिळण्‍यासाठी अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्‍ये अर्जदार यांनी एकूण रक्‍कम रु.2,81,710/- तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम व अर्जाचे खर्चापोटी रकमेची मागणी केलेली आहे.
 
2.    जाबदार क्र.1 ते 3 यांनी नि.18 ला म्‍हणणे दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. जाबदार यांची दि.16/5/10 रोजी विशेष सर्वसाधारण सभा त्‍यामध्‍ये मुदत ठेवींवर प्रचलित दराप्रमाणे व्‍याजाची आकारणी करावी असा निर्णय झालेला आहे. सदरचा ठराव सर्व ठेवीदांरांवर बंधनकारक आहे. अर्जदार यांना मुदतपूर्व ठेवपावती मोडता येणार नाही. सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार जाबदार यांनी अर्जदार यांना रक्‍कम देण्‍याचे नाकारलेले नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे.
3.    अर्जदार यांनी दाखल केलेली पुरसि‍स पाहिली तसेच अर्जदार व जाबदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहिली.
 
4.    जाबदार यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये असे कथन केले आहे की, जाबदार यांची दि.16/5/10 रोजी विशेष सर्वसाधारण सभा त्‍यामध्‍ये मुदत ठेवींवर प्रचलित दराप्रमाणे व्‍याजाची आकारणी करावी असा निर्णय झालेला आहे. सदरचा ठराव सर्व ठेवीदांरांवर बंधनकारक आहे परंतु सदरचा ठराव अर्जदार यांनी मान्‍य केल्‍याबाबत जाबदार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच अशा प्रकारे ठराव करुन व्‍याजाची रक्‍कम कमी-जास्‍त करण्‍याचा जाबदार संस्‍थेला कायद्याने अधिकार आहे हे दर्शविणारा कोणताही पुरावा उदा. रिझर्व्‍ह बँकेचा आदेश किंवा सक्षम अधिका-याचा आदेश याकामी जाबदार यांनी दाखल केलेला नाही. त्‍यामुळे सदरचे ठरावाचा आधार घेवून जाबदार यांना अर्जदार यांची देय असणारी रक्‍कम नाकारता येणार नाही. तसेच जरी काही ठेवींची मुदत अद्याप संपलेली नसली तरी ठेवीची मुदत संपणेपूर्वी अगर संपलेनंतर ठेवीची रक्‍कम परत मिळण्‍याचा अर्जदार यांचा कायद्यानेच अधिकार आहे. अर्जदारचे इच्‍छेविरुध्‍द जाबदार त्‍यांची रक्‍कम अडवून ठेवू शकत नाही. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्‍या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्‍पष्‍ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्‍हणजे ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या रकमेवर व्‍याजासहित देय झालेली रक्‍कम अर्जदार यांना दिलेली नाही. तसेच बचत खात्‍यातील रक्‍कमही दिलेली नाही.   अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्‍कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे.
5.    या सर्व कारणास्‍तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्‍यात येत आहे.
आदेश
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या व
    संयुक्‍तरित्‍या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्‍यात.
    अ. ठेवपावती क्र. 1404, 2592, 2567, 2552, वरील मूळ रक्‍कम
       ठेवपावतीमध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे देय होणा-या व्‍याजासह रक्‍कम द्यावी तसेच
       ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंत
       द.सा.द.शे. 9 टक्‍केंप्रमाणे व्‍याजासह द्यावी.
   ब. ठेवपावती क्र. 3580, 3600, 3595, 3592 वरील रकमा मुदतपूर्व
        ठेवपावतीवर नियमाप्रमाणे देय होणा-या व्‍याजासह द्यावी.
         क. बचत खाते क्र.157/20 वरील शिल्‍लक रक्‍कम बचत खात्‍याचे नियमाप्रमाणे
       देय होणा-या व्‍याजासह द्यावी.
    ड. मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/- द्यावेत.
    इ. अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु. 2,000/- द्यावेत.
3. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा
दि.19/3/2011
 
 
 
(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)         (विजयसिंह दि. देशमुख)
   सदस्‍य                   सदस्‍या                     अध्‍यक्ष
 
 
 
 

HONABLE MR. Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER