नि.32 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 68/2011 नोंदणी तारीख – 18/04/2011 निकाल तारीख – 13/10/2011 निकाल कालावधी – 178 दिवस श्री महेंद्र एम गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या ( श्री महेंद्र एम गोस्वामी, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारीत केला) -------------------------------------------------------------------------------- 1. श्री कृष्णात दत्तू थोरात 2. सौ. लतिका कृष्णात थोरात दोघे रा. कोर्टी, ता. कराड, जि.सातारा ----- अर्जदार (वकील श्री.आनंद कदम) विरुध्द 1. मराठा सहकारी पतसंस्था लि. सातारा (सदरचे समन्स चेअरमन नरेंद्र मोहन पाटील यांचेवर बजावण्यात यावे) जाबदार क्र. 1 तर्फे 2. चेअरमन, नरेंद्र मोहन पाटील रा. मॅगेझीन कॉलनी, सदर बझार, सातारा 3. व्हा. चेअरमन, श्री. अशोक रामचंद्र जाधव रा. 154, रविवार पेठ, सातारा 4. संचालक, किशोर दत्तात्रय शिंदे रा.46, शुक्रवार पेठ, सातारा 5. संचालक, तुकाराम आनंदा धनवडे मु.करंजे, पो.मामुडी, ता.जावली, जि. सातारा 6. संचालक, बापूसाहेब केशवराव निंबाळकर रा.मु.पो.विंचुर्णी, ता.फलटण जि. सातारा 7. संचालक, सतिश सर्जेराव पवार रा.60/61, बसाप्पा पेठ, सातारा 8. संचालक, सिताराम साहेबराव पवार रा.98, बुधवार पेठ, सातारा 9. संचालक, राजू भानू जेधे रा.513, मंगळवार पेठ, सातारा 10. संचालक, रविंद्र हिंदराज कदम रा.470, कदमबाग कॅम्प, सातारा 11. संचालक, जगन्नाथ ज्ञानू पवार रा.मु.पो.धावडशी, ता.जि.सातारा 12. संचालक, मिलींद लक्ष्मणराव पाटील रा.विकासनगर, संगमनगर, सातारा 13. संचालक, चंद्रकांत लोखंडे रा.हॉटेल मीन, विकासनगर, संगमनगर,सातारा (नि. 21 वरील आदेशाप्रमाणे जा.क्र.13 वगळणेत आले.) 14. संचालक, अशोक बापूराव काळे रा. मोरे कॉलनी, व्यंकटपुरा पेठ, सातारा 15. संचालिका, सुमन लक्ष्मणराव पाटील रा.विकासनगर, संगमनगर, सातारा 16. शाखाधिकारी, संदिप यादव, शाखा- उंब्रज, रा.मु.पो.शिरगांव, ता.कराड, जि. सातारा --- विरुध्दपक्षकार क्र.1 ते 8,11,12,14 ते16 (वकील श्री धिरज घाडगे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी विरुध्दपक्षकार संस्थेमध्ये रक्कम प्रत्येकी रु.30,000/- दामचौपट ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेली आहे. सदर दामचौपट ठेव पावत्यांची मुदत संपलेली आहे. तथापि मुदत संपलेनंतर अर्जदार यांनी रकम मागणी केली असता विरुध्दपक्षकार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजासहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. सबब दामचौपट ठेव रक्कम रु.2,40,000/- व्याजासह मिळावी, तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. विरुध्दपक्षकार क्र. 1 ते 8, 11, 12, 14 ते 16 यांनी याकामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि.16 ला व शपथपत्र नि.17 ला दाखल करुन अर्जदाराने ठेव ठेवलेचे मान्य करुन अर्जदाराचे तक्रारअर्जातील अन्य मजकूर नाकारला आहे. या विरुध्द पक्षकारांचे कथनानुसार चेअरमन अगर संचालक मंडळास संस्थेच्या देणे देणेसाठी जबाबदार धरता येणार नाही. विरुध्द पक्षकारांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराची ठेव रक्कम संस्था नियमांप्रमाणे कधीही नकार दिलेला नव्हता व नाही. त्यानंतर विरुध्दपक्षकार संस्थेने सभासदांची सभा बोलाविली व त्यामध्ये ठराव पारीत करण्यात आला. त्यानुसार परिपत्रक काढण्यात आले असून त्यानुसार बचत खात्यातील रक्कम दरमहा किती प्रमाणात देता येईल याबाबत सुधारित ठराव झाला आहे. सदरचे परिपत्रक अर्जदारवर बंधनकारक असल्याचे त्याने स्वतः कबूल केले आहे. विरुध्दपक्षकार हे अर्जदारांच्या ठेवी सुधारीत व्याजदराने व संस्थेचा ठराव क्र.1 दि. 16/5/10 नुसार देणेस आजही तयार होते व आहेत. विरुध्दपक्षकार संस्थेच्या पूर्व संचालक मंडळाच्या चुकीमुळे संस्था आर्थिक अडचणीत आल्यामुळे सहकारी संस्था कलम 88 नुसार सदर संचालकांची जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी सुरु केली आहे. सबब अर्जदारांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे दाखल नि.25 कडील प्रतिउत्तर नि.26 कडील शपथपत्र, नि.28 कडील लेखी युक्तीवाद, विरुध्द पक्षकार यांची नि.31 कडील पुरसिस पाहिली तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुत तक्रारअर्जदार हे ठेवीदार आहेत. त्यांनी त्यांचेकडील रोख रकमा ठेवीच्या स्वरुपात संस्थेकडे ठराविक मुदतीसाठी ठेवलेल्या होत्या व ती मुदत पूर्ण झाल्यानंतर कबूल केल्यानुसार सर्व ठेवीच्या देय रकमा एकरकमी अर्जदारास देणे योग्य व कायदेशीर ठरणारे होते. विरुध्दपक्षकार यांनी ठेवीदारांच्या ठेवी ठेवीदारांना परत देणे हे विरुध्दपक्षकार यांचे नैतिक व कायदेशीर कर्तव्य आहे असे या मंचाचे मत आहे. ठेवी परत करताना ठेवीदाराने मागणी केल्यानंतर 15 दिवसांत 30 टक्के रक्कम अदा करणेत येवून उर्वरीत रक्कम संबंधित ठेवीदारांच्या सेव्हींग खात्यावर वर्ग करणेत येते व सदर ठेवी निधिच्या उपलब्धतेवर वितरीत करण्यात येईल या अशा अटी विरुध्दपक्षकार यांनी घालण्याचे काहीही कारण नाही त्यामुळे मान्य करता येत नाहीत. त्यामुळे विरुध्दपक्षाची संस्था व तिचे चेअरमनसह सर्व संचालक तक्रारदारांची ठेव रक्कम अदा करणेस बांधील आहेत. 5. अर्जदार यांनी विरुध्दपक्षकार क्र. 16 ला मॅनेजर, श्री.संदीप यादव यांना वैयक्तिकरित्या पक्षकार म्हणून सामिल केले आहे. परंतु श्री. यादव हे संस्थेचे कर्मचारी असल्यामुळे त्यांना अर्जदारांची रक्कम देणेस वैयक्तिकपणे जबाबदार धरता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. 6. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. विरुध्दपक्षकार क्र.1 ते 12 व 14 ते 15 व विरुध्दपक्षकार क्र. 16 मराठा सहकारी पतसंस्था लि. संस्थेकरिता यांनी वैचक्तिक व संयुक्तरित्या अर्जदार यांना त्यांची दामचौपट ठेवपावती क्र. 2880, 2881, कडील एकूण अंतिम देय रक्कम रु.2,40,000/- अदा करावेत. 3. विरुध्दपक्षकार क्र.1 ते 12 व 14 ते 16 यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना एकूण रक्कम रु. 5,000/- द्यावेत. 4. विरुध्दपक्षकार क्र.1 ते 12 व 14 ते 16 यांनी वरील आदेशाचे अनुपालन करुन उपरोक्त रक्कम या न्यायनिर्णयापासून टप्प्या-टप्प्याने सहा महिन्यांच्या आत द्यावी. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.13/10/2011 (श्री.महेंद्र एम गोस्वामी) (श्रीमती.सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |