Maharashtra

Satara

CC/10/153

vishnupant baburao jambure - Complainant(s)

Versus

Maratha sah. pat. Satara - Opp.Party(s)

Adv. shinde

30 Sep 2010

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 10 of 153
1. vishnupant baburao jamburesadguru krupa z.p. colony sahupuri dist. Satara SataraMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. Maratha sah. pat. SataraMaratha bhavan 506/19, plot no 8 behind S. T. stand SataraMaharashtra ...........Respondent(s)


For the Appellant :Adv. shinde, Advocate for
For the Respondent :

Dated : 30 Sep 2010
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.33
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 153/2010
                                          नोंदणी तारीख – 11/6/2010
                                          निकाल तारीख – 30/9/2010
                                          निकाल कालावधी – 109 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
 श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 
(श्री सुनिल कापसे, सदस्‍य यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
श्री विष्‍णूपंत बाबूराव जंबुरे (मयत)
रा.34, सदगुरु कृपा, झेड.पी.कॉलनी,
शाहूपुरी, गेंडामाळ, सातारा                          
वारस
1अ) पत्‍नी – श्रीमती विजया विष्‍णूपंत जंबुरे
1ब) मुलगा – श्री संग्रामसिंह विष्‍णूपंत जंबुरे
1क) मुलगी – सौ सुचेता मोहन खिंडकर
     रा.समता पार्क, शाहूपुरी, सातारा
1ड) सौ सविता भरत कदम
     रा.धनकवडी, पुणे
1इ) सौ रुपाली किशोर आदाते                                          
     रा.गडहिंग्‍लज, ता.गडहिंग्‍लज, जि.कोल्‍हापूर
1ई) कु.सोनाली विष्‍णूपंत जंबुरे
     क्र.1अ, ब व इ रा. 34, सदगुरु कृपा,
     झेड.पी.कॉलनी, शाहूपुरी, गेंडामाळ, सातारा         ----- अर्जदार
                                          (अभियोक्‍ता श्री.जितेंद्र शिंदे)
 
      विरुध्‍द
1) मराठा सहकारी पतसंस्‍था लि.सातारा
    मराठा भवन, 506/10, प्‍लॉट नं.8,
    एस.टी.स्‍टँडमागे, सदर बझार, सातारा
    व्‍यवस्‍थापक, श्री दिलीप आनंदराव देशमुख
    रा.मराठा भवन, 506/10, प्‍लॉट नं.8,
    एस.टी.स्‍टँडमागे, सदर बझार, सातारा
2) मराठा सहकारी पतसंस्‍था लि.सातारा
    चेअरमन, श्री नरेंद्र मोहनराव पाटील
    रा.27, मॅगेझिन कॉलनी, सदरबझार, सातारा
3) मराठा सहकारी पतसंस्‍था लि.सातारा
    व्‍हाईस चेअरमन, श्री अशोक रामचंद्र जाधव
    रा.154, रविवार पेठ, सातारा                         ----- जाबदार
                                          
 
न्‍यायनिर्णय
 
    अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे -
1.     अर्जदार हे जाबदार संस्‍थेचे चेअरमन होते. परंतु प्रकृती अस्‍वास्‍थ्‍यामुळे त्‍यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिलेला असून त्‍यांचे जागी श्री मिलींद लक्ष्‍मणराव पाटील यांची संचालक म्‍हणून नेमणूक झाली आहे. त्‍यामुळे अर्जदार व जाबदार यांचेमध्‍ये आता केवळ सभासद ग्राहक म्‍हणूनच संबंध राहिलेला आहे. मयत अर्जदार यांनी जाबदार संस्‍थेमध्‍ये वेगवेगळया ठेवपावत्‍यांन्‍वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्‍कम ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या आहेत. सदरच्‍या ठेवींची मुदत संपलेली आहे. तसेच त्‍यांचे बचत खात्‍यामध्‍ये काही रक्‍कम शिल्‍लक आहे. मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्‍याजासहित देय झालेली रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्‍यात यावयाची रक्‍कम न दिल्‍यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्‍थेचे ग्राहक आहेत. त्‍यामुळे जाबदार संस्‍थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्‍कम वसूल होऊन मिळण्‍यासाठी अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्‍ये अर्जदार यांनी ठेवींची व्‍याजासह होणारी एकूण रक्‍कम तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु. 5,000/- ची मागणी केलेली आहे.
 
2.    जाबदार क्र.1 ते 3 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे नि.14 ला दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. जाबदार संस्‍था बँकींग व्‍यवसाय करीत नाही. अर्जदार हे जाबदार संस्‍थेचे अनेक वर्षे चेअरमन, संचालक म्‍हणून होते त्‍यामुळे माजी संचालक चेअरमन पदाधिकारी म्‍हणून त्‍यांची जबाबदारी संपुष्‍टात आलेली नाही. अर्जदार यांचे मागणीप्रमाणे ठेवीची रक्‍कम देण्‍याची जबाबदारी जाबदार यांचेवर नाही. जाबदार संस्‍थेचे लेखा परिक्षण करण्‍यात आले असून गैरव्‍यवहाराचे चौकशीची नोटीस जाबदार क्र.1 यांना आलेली आहे व त्‍यानुसार नुकसानीची जबाबदारी निश्चित करुन रकमा वसुलीचे कामकाज चालू आहे. त्‍यामुळे अर्जदार हे अर्जातील रकमा मिळणेस पात्र नाहीत. जाबदार क्र.1 व 2 यांना विनाकारण प्रस्‍तुत प्रकरणात सामील केलेले आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे.
3.    अर्जदार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्‍दतेसाठी नि. 2 ला शपथपत्र दिलेले आहे. ते शपथपत्र पाहिले. अर्जदार यांनी नि. 5 सोबत दाखल केलेल्‍या मूळ ठेवपावत्‍या व पासबुक पाहिले. तसेच अर्जदारतर्फे दाखल प्रतिउत्‍तर नि.26 व शपथपत्र नि.27 पाहिले. तसेच अर्जदारतर्फे दाखल वारसांची शपथपत्रे व नि.24 सोबतची कागदपत्रे पाहिली. जाबदारतर्फे दाखल शपथपत्र नि.15 व नि.16 सोबतची कागदपत्रे, नि.32 सोबतची कागदपत्रे पाहिली.
4.    अर्जदारतर्फे वकील श्री शिंदे यांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकला. जाबदारतर्फे दाखल नि.31 चा लेखी युक्तिवाद पाहिला.
 
5.    जाबदार क्र.1 ते 3 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे नि.14 मध्‍ये अर्जदार हे जाबदार संस्‍थेचे अनेक वर्षे चेअरमन, संचालक म्‍हणून होते त्‍यामुळे माजी संचालक चेअरमन पदाधिकारी म्‍हणून त्‍यांची जबाबदारी संपुष्‍टात आलेली नाही असे कथन केले आहे. परंतु मयत अर्जदार यांचा राजीनामा मंजूर होवून त्‍यांचेजागी अन्‍य संचालकांची नेमणूक झालेली आहे हे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. तसेच मयत अर्जदार यांची जबाबदारी अद्याप संपुष्‍टात आलेली नाही हे दर्शविणारा कोणताही पुरावा जाबदार यांनी दाखल केलेला नाही. तद्वतच चौकशी चालू असेतोपर्यंत ठेवीदारांच्‍या ठेव रकमा परत देता येणार नाहीत हे दर्शविणारा सक्षम अधिका-यांचा कोणताही आदेश जाबदार यांनी दाखल केलेला नाही त्‍यामुळे जाबदार संस्‍थेतील गैरव्‍यवहाराची चौकशी चालू आहे या कारणास्‍तव जाबदार यांना अर्जदारची ठेव रक्‍कम परत करण्‍याची जबाबदारी नाकारता येणार नाही. ठेवीची मुदत संपलेनंतर अगर संपणेपूर्वी ठेव रक्‍कम परत मिळण्‍याचा अर्जदार यांना कायद्यानेच अधिकार आहे. परंतु जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीची रक्‍कम परत केलेली नाही हे दाखल कागदपत्रांवरुन स्‍पष्‍ट दिसून येते.
6.    जाबदार यांनी त्‍यांचे तक्रारअर्जात असे कथन केले आहे की, जाबदार क्र.1 हे व्‍यवस्‍थापक म्‍हणून काम पहात आहेत त्‍यामुळे जाबदार क्र.1 व 2 यांना विनाकारण प्रस्‍तुत प्रकरणात सामील केलेले आहे. परंतु संस्‍थेच्‍या संपूर्ण आर्थिक व्‍यवहारांची जबाबदारी ही संचालक मंडळाची असते. त्‍यामुळे जरी जाबदार क्र.1 हे व्‍यवस्‍थापक म्‍हणून काम पहात असले तरी जाबदार क्र.2 व 3 यांना त्‍यांचे कायदेशीर देयत्‍वाची जबाबदारी नाकारता येणार नाही. सबब, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे व जाबदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्‍या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्‍पष्‍ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्‍हणजे ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या रकमेवर व्‍याजासहित देय झालेली रक्‍कम ठेवींची मुदत संपलेनंतर दिलेली नाही. तसेच बचत खात्‍यातील रक्‍कमही दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार क्र.1 ते 3 यांचेकडून रक्‍कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे.
 
7.    या सर्व कारणास्‍तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्‍यात येत आहे.
 
आदेश
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या व
    संयुक्‍तरित्‍या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्‍यात.
    अ. ठेवपावती क्र. 7431, 7266, 8415, 7904 वरील मूळ रक्‍कम ठेवपावतीमध्‍ये
        नमूद केल्‍याप्रमाणे देय होणा-या व्‍याजासह रक्‍कम द्यावी तसेच ठेवीची मुदत
        संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9
        टक्‍केंप्रमाणे व्‍याजासह द्यावी.
    ब. बचत खाते क्र.841/8 वरील शिल्‍लक रक्‍कम बचत खात्‍याचे नियमाप्रमाणे
        देय होणा-या व्‍याजासह द्यावी.
    क. मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/- द्यावेत.
    ड. अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु. 2,000/- द्यावेत.
3. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा
दि. 30/9/2010
 
 
 
(सुनिल कापसे)                                 (विजयसिंह दि. देशमुख)
   सदस्‍य                                              अध्‍यक्ष
 
 
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER