नि.29 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 94/2011 नोंदणी तारीख – 30/06/2011 निकाल तारीख – 14/10/2011 निकाल कालावधी – 107 दिवस श्री महेंद्र एम गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या ( श्री महेंद्र एम गोस्वामी, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारीत केला) -------------------------------------------------------------------------------- 1. सौ. सुनिता अनिल शिंदे 2. कु. रोहीत अनिल शिंदे दोघे रा. 134,सदाशिव पेठ,सातारा ----- अर्जदार (वकील श्री.आनंद कदम) विरुध्द 1. मराठा सहकारी पतसंस्था लि. सातारा (सदरचे समन्स चेअरमन नरेंद्र मोहन पाटील यांचेवर बजावण्यात यावे) जाबदार क्र. 1 तर्फे 2. चेअरमन, नरेंद्र मोहन पाटील रा. मॅगेझीन कॉलनी, सदर बझार, सातारा 3. व्हा. चेअरमन, श्री. अशोक रामचंद्र जाधव रा. 154, रविवार पेठ, सातारा 4. संचालक, किशोर दत्तात्रय शिंदे रा.46, शुक्रवार पेठ, सातारा 5. संचालक, तुकाराम आनंदा धनवडे मु.करंजे, पो.मामुडी, ता.जावली, जि. सातारा 6. संचालक, बापूसाहेब केशवराव निंबाळकर रा.मु.पो.विंचुर्णी, ता.फलटण जि. सातारा 7. संचालक, सतिश सर्जेराव पवार रा.60/61, बसाप्पा पेठ, सातारा 8. संचालक, सिताराम साहेबराव पवार रा.98, बुधवार पेठ, सातारा 9. संचालक, रविंद्र हिंदराज कदम रा.470, कदमबाग कॅम्प, सातारा 10. संचालक, मिलींद लक्ष्मणराव पाटील रा.विकासनगर, संगमनगर, सातारा 11. संचालक, अशोक बापूराव काळे रा. मोरे कॉलनी, व्यंकटपुरा पेठ, सातारा 12. संचालिका, सुमन लक्ष्मणराव पाटील रा.विकासनगर, संगमनगर, सातारा --- विरुध्दपक्षकार क्र.1 ते 12 (वकील श्री.विलासराव भोईटे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी विरुध्दपक्षकार संस्थेमध्ये दामदुप्पट ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेली आहे. काही दामदुप्पट ठेव पावत्यांची मुदत संपलेली आहे. तर काही ठेवपावत्या मुदतपूर्व आहेत. तथापि मुदत संपलेनंतर अर्जदार यांनी रक्कम मागणी केली असता विरुध्दपक्षकार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजासहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. सबब दामदुप्पट ठेव रक्कम व्याजासह मिळावी, तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. विरुध्दपक्षकार क्र. 1 ते 12 यांनी याकामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि.21 ला व शपथपत्र नि.22 ला दाखल करुन अर्जदाराने ठेव ठेवलेचे मान्य करुन अर्जदाराचे तक्रारअर्जातील अन्य मजकूर नाकारला आहे. या विरुध्द पक्षकारांचे कथनानुसार चेअरमन अगर संचालक मंडळास संस्थेच्या देणे देणेसाठी जबाबदार धरता येणार नाही. तसेच तक्रारदारांनी केलेली मागणी Pre-Mature असून चार ठेवींची मुदत सन 2012 साली संपत आहे. तसेच प्रस्तुत अर्ज करणेपूर्वी रकमा मागणीची नोटीस दिली नाही. त्यामुळे तक्रार अर्ज रद्दबातल करावा अशी विनंती केली. 3. अर्जदारतर्फे दाखल नि.24 कडील प्रतिउत्तर, नि.25 शपथपत्र, नि.31 कडील पुरसीस विरुध्द पक्षकार यांची नि.27 कडील पुरसिस पाहिली तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुत तक्रारअर्जदार हे ठेवीदार आहेत. त्यांनी त्यांचेकडील रोख रकमा ठेवीच्या स्वरुपात संस्थेकडे ठराविक मुदतीसाठी ठेवलेल्या होत्या व ती मुदत पूर्ण झाल्यानंतर कबूल केल्यानुसार सर्व ठेवीच्या देय रकमा एकरकमी अर्जदारास देणे योग्य व कायदेशीर ठरणारे होते. विरुध्दपक्षकार यांनी ठेवीदारांच्या ठेवी ठेवीदारांना परत देणे हे विरुध्दपक्षकार यांचे नैतिक व कायदेशीर कर्तव्य आहे असे या मंचाचे मत आहे. त्यामुळे मुदत पूर्ण झालेल्या ठेव पावती क्र. 1679 ची दामदुप्पट रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. मात्र उर्वरीत ठेव पावती क्र. 1326, 2192, 1773 व 1324 ची मुदत सन 2012 रोजी संपत असल्याची व या मुदतपूर्व ठेवींची मागणी लेखी अर्जाव्दारे विरुध्दपक्षकार बँकेकडे केली नसल्यामुळे व तसा लेखी अर्ज प्रकरणात जोडला नसल्यामुळे ठेवपावत्यांची रक्कम मुदतीपूर्वी मिळण्यास तक्रारदार पात्र नाहीत. मात्र या ठेवींची मुदत संपल्यावर तक्रारदार नव्याने लेखी मागणी करु शकतात व मागणी करुनही रक्कम न मिळाल्यास नव्याने तक्रार दाखल केली जाऊ शकते. त्यानुसार आम्ही खालील आदेश पारित करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. विरुध्दपक्षकार क्र.1 ते 12 यांनी वैचक्तिक व संयुक्तरित्या अर्जदार यांना त्यांची दामदुप्पट ठेवपावती क्र. 1679, कडील एकूण अंतिम देय रक्कम रु.32,000/- अदा करावेत. 3. विरुध्दपक्षकार क्र.1 ते 12 यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना एकूण रक्कम रु. 5,000/- द्यावेत. 4. विरुध्दपक्षकार क्र.1 ते 12 यांनी वरील आदेशाचे अनुपालन करुन उपरोक्त रक्कम या न्यायनिर्णयापासून 60 दिवसांचे आत द्यावी. 5. तक्रारदारांच्या इतर मागण्या फेटाळण्यात येतात. 6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.14/10/2011 (श्री.महेंद्र एम गोस्वामी) (श्रीमती.सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |