नि.15 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 237/2010 नोंदणी तारीख – 11/10/2010 निकाल तारीख – 16/12/2010 निकाल कालावधी – 65 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ सुनिता जगन्नाथ दळवी रा.नांदगणे, ता.जावली, जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री.अनिल देशमुख) विरुध्द 1. मराठा सहकारी पतसंस्था लि. सातारा मराठा भवन, 506/10, प्लॉट नं.8, एस.टी.स्टँडमागे, सदर बझार, सातारा तर्फे व्यवस्थापक श्री दिलीप आनंदराव देशमुख रा. मराठा भवन, 506/10, प्लॉट नं.8, एस.टी.स्टँडमागे, सदर बझार, सातारा 2. चेअरमन श्री नरेंद्र मोहनराव पाटील रा.27, मॅगझीन कॉलनी, सदर बझार, सातारा 3. व्हा.चेअरमन, श्री अशोक रामचंद्र जाधव रा.154, रविवार पेठ, सातारा ----- जाबदार न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. सदरच्या ठेवींची मुदत संपलेनंतर अर्जदार यांनी ठेव रकमांची मागणी केली असता जाबदार यांनी सदरच्या रकमा परस्पर बचत खात्यामध्ये जमा केल्या व अर्जदारचे व्याजाचे नुकसान केले आहे. अर्जदार यांनी सदरचे बचत खात्यातील रकमेची मागणी केली असता सदरची बचत खात्यातील रक्कम देण्यात जाबदार हे टाळाटाळ करीत आहेत. सबब बचत खात्यातील शिल्लक रक्कम व्याजासह मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- मिळावेत अशी अर्जदार यांनी मागणी केलेली आहे. 2. जाबदार क्र.1 ते 3 यांनी याकामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 11 ला दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. जाबदार संस्थेच्या कर्जयेणे थकबाकीमुळे आर्थिक स्थितीवर विपरित परिणाम झालेला आहे. नियमाप्रमाणे अर्जदार यांनी 30 टक्के रक्कम काढून घेतलेली आहे. जाबदार संस्थेच्या ठरावाप्रमाणे रकमा देणेचे जाबदार यांनी कधीही नाकारलेले नव्हते. अर्जदारची रक्कम एक रकमी परत करणे शक्य नाही. बचत खात्यावर अर्जदार हे 2 टक्केप्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. जाबदारतर्फे दाखल पुरसिस पाहिली. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात त्यांचे बचत खात्यातील शिल्लक रकमेची व्याजासह मागणी केली आहे. अर्जदार यांनी त्यांचे कथनाचे पृष्ठयर्थ नि.5/5 ला बचत खात्याचे मूळ पासबुक दाखल केलेले आहे. सदरचे पासबुकाचे अवलोकन केले असता त्यामध्ये रक्कम रु.1,23,454/- जमा असल्याचे दिसून येत आहे. जाबदारने त्यांचे म्हणणेमध्ये असे कथन केले आहे की, कर्ज थकबाकीमुळे संस्थेचे आर्थिक स्थितीवर विपरित परिणाम झालेला आहे. तसेच जाबदार संस्थेच्या दि.16/5/2010 चे विशेष सर्वसाधारण सभेतील ठरावाप्रमाणे अर्जदार यांना एकरकमी रक्कम मागता येणार नाही. परंतु संस्थेची प्रतिकूल आर्थिक स्थिती, संस्थेचा ठराव ही कारणे अर्जदारची रक्कम परत न करण्यास कायदेशीर कारणे ठरु शकत नाहीत. मागणी केल्यानंतर बचत खात्यातील रक्कम तात्काळ मिळण्याचा अर्जदार यांना कायद्यानेच अधिकार आहे. सबब अर्जदार हे बचत खात्यातील शिल्लक रक्कम जाबदार संस्थेच्या बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय असणा-या व्याजासह मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. 5. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. 1. अर्जदारचे नावावरील बचत खात्यामधील शिल्लक रक्कम बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. 2. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. 3. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.16/12/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |