Maharashtra

Ahmednagar

CC/16/144

Alishan Aslam Pathan - Complainant(s)

Versus

Mansur Chandbhai Inamdar - Opp.Party(s)

G,N.Ghalme

07 Dec 2018

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/16/144
( Date of Filing : 04 May 2016 )
 
1. Alishan Aslam Pathan
A.P.Ummatnagar,Jovre Road,Sangamner,Tal.Sangamner
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Mansur Chandbhai Inamdar
A.P.Hivargaon Pavsa,Tal-Sangamner
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:G,N.Ghalme, Advocate
For the Opp. Party: B.N.Ransing, Advocate
Dated : 07 Dec 2018
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्‍या)

1.   तक्रारदार हिने सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये दाखल केलेली आहे.

2.   तक्रारदार हिची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणेः-

    तक्रारदार ही संगमनेर ता.संगमनेर जि.अहमदनगर येथील रहिवासी असून सामनेवाला यांचा बांधाकाम ठेकेदारीचा व्‍यवसाय आहे. तक्रारदार हिने संगमनेर येथे कोल्‍हेवाडी रोड, जमजम कॉलनी या भागात सर्व्‍हे नं.186(1/1/3)5 पैकी प्‍लॉट नं.19, क्षेत्र 1076 चौ.फुट अशी जागा घेतलेली आहे. सदर जागेपैकी 540 चौ.फुट जागेमध्‍ये तक्रारदार हिला बांधकाम करावयाचे होते. त्‍यामुळे तिने सामनेवाला यांना भेटून बांधकाम करण्‍यासाठी सांगितले. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्‍ये दिनांक 11.09.2015 रोजी रक्‍कम रुपये 100/- रुपयाचे स्‍टँप पेपरवर बांधकाम करारनामा करण्‍यात आला. कामाचा कालावधी, बांधकाम चालू केल्‍यापासून 6 महिन्‍यात काम पुर्ण करुन द्यावयाचे ठरले आहे. बांधकामासाठी लागणारे सर्व मटेरियल वाळू, विट, सिमेंट, फरशी, लोखंड, खडी, मुरुम इ. मटेरियल ठेकेदाराने पुरविण्‍यात यावे असे ठरले. बांधकामासाठी लागणारे पाणी, लाईट, इलेक्ट्रिक मोटार तक्रारदार हिने पुरवायचे आहे. अशा प्रकारे इतर अटीही बांधकाम करारामध्‍ये ठरलेल्‍या आहेत. मात्र सामनेवाला यांनी बांधकाम करारनाम्‍याप्रमाणे बांधकाम केलेले नाही व निकृष्‍ट बांधकाम केले आहे. तक्रारदार हिने सामनेवाला यांना एकूण रक्‍कम रुपये 4,55,000/- एवढी रक्‍कम दिली. परंतू सामनेवाला यांनी त्‍याची कोणतीही पावती दिली नाही. सामनेवालाने बांधकाम चुकीच्‍या पध्‍दतीने केले. सामनेवाला यांनी सदर घराचे बांधकाम कराराप्रमाणे केले नाही, योग्‍य प्रकारच्‍या क्‍वॉलिटीची फरशी बसविली नाही, जिन्‍याचे बांधकाम चुकीच्‍या पध्‍दतीने केले, जिना बांधकामाचे बाहेरील बाजूने करण्‍याचे कराराप्रमाणे ठरले होते, परंतु जिना हॉलमधुन तयार केल्‍यामुळे हॉलची साईज कमी झाली आहे व त्‍यामुळे सुध्‍दा अडचण निर्माण झाली आहे. हौदाचे शेजारी जाण्‍या-येण्‍यासाठी जागा ठेवली नाही व दरवाजा उघडल्‍याबरोबर हौदात पाय पडतो, बेडरुमला कराराप्रमाणे दोन खिडक्‍या न बसविता फक्‍त एकच खिडकी बसविली आहे, जिन्‍याखाली खिडकीऐवजी दरवाजा बसविला व दरवाजाचे जागी खिडकी बसविली आहे. हॉलचे व किचनचे बांधकामसुध्‍दा चुकीच्‍या पध्‍दतीने केले, संडास- बाथरुमचे बांधकाम प्‍लॅनप्रमाणे न करता चुकीच्‍या दिशेला केले. ठरल्‍याप्रमाणे दरवाजे बसविले नाहीत. बांधकामाची ऊंची (प्‍लींथ हाईट) ही जमिनीपासून 4 फुट उंच ठेवावी असे करारामध्‍ये व प्‍लॅनमध्‍ये नमुद आहे. परंतु सदरची उंची ही फक्‍त 3 फुट 3 इंच ठेवली आहे. प्‍लॉस्‍टर केले नाही. अशा प्रकारे संपुर्ण बांधकाम हे निकृष्‍ट प्रतिचे केले. दिनांक 10.04.2016 रोजी आर्किटेक इंजिनिअर यांनी सदर बांधकामाची प्रत्‍यक्ष पाहणी करुन त्‍याप्रमाणे सर्टीफिकेट तक्रारदार हिस दिले आहे. सामनेवाला यांनी उर्वरित बांधकाम करुन द्यावे व प्‍लॅनप्रमाणे तसेच करारामधील शर्तीप्रमाणे व्‍य‍वस्थित बांधकाम करुन देणे आवश्‍यक आहे. परंतु सामनेवाला यांनी तसे केले नाही. त्‍यामुळे दिनांक 08.03.2016 रोजी तक्रारदाराने सामनेवाला यांना नोटीस पाठवून बांधकाम करुन देण्‍याची विनंती केली. सामनेवाला यांनी सदरहू बांधकामाविषयी दखल घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारदार हिने सामनेवाला यांनी दुषीत सेवा दिली, त्‍यामुळे तिचे नुकसान झाले. त्‍यामुळे मंचात तक्रार दाखल करुन परीच्‍छेद 12 प्रमाणे मागणी केली आहे.

3.   सामनेवाला यांनी त्‍यांची लेखी कैफियत निशाणी क्र.11 वर दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी असे कथन केले की, तक्रारदार हिचे तक्रारीतील कथन अमान्‍य केले आहे. सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीत असे कथन केले आहे की, तक्रारदार हिने केलेला करारनामा कायदेशिर नाही. बांधकाम हे तक्रारदार हिचे सांगण्‍याप्रमाणे करुन दिलेले आहे. तक्रारदार हिने नगरपालिकेकडून बांधकाम करताना मंजूर प्‍लॅन घेतला नाही. त्‍यांनी महानगरपालिकेची परवानगी घेण्‍याची गरज होती. सामनेवाला यांनी मुदतीत संपुर्ण बांधकाम करताना इंजिनिअरकडून प्‍लॅन करुन वेळोवेळी सामनेवाला यांना सुचना देऊन सदरचे बांधकामात बदल केलेले आहेत. तक्रारदार हिने खोटे सर्टीफिकेट दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी संपुर्ण बांधकाम करुन दिलेले आहे. उलट तक्रारदार हिनेच सामनेवाला यांना बांधकामापोटी संपुर्ण रक्‍कम दिलेली नाही. तक्रारदार हिने तक्रारीमध्‍ये केलेला मजकूर खोटा आहे. सामनेवाला यांनी बांधकाम तक्रारदार हिचे सांगण्‍यावरुन पुर्ण केलेले आहे. सदरहू बांधकाम उच्‍चप्रतिचे आहे. सामनेवाला यांनी कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही, सबब तक्रारदार हिची तक्रार मेंटेंनेबल नाही. तक्रारदार हिची तक्रार खर्चासह खारीज करण्‍याची मंचाला विनंती केली आहे.

4.   तक्रारदार हिने दाखल केलेली तक्रार, कागदपत्र, शपथपत्र यांचे अवलोकन केले. तक्रारदार हिचे वकील श्री.घालमे यांनी केलेला युक्‍तीवाद ऐकला. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेली कैफियत, कागदपत्रे, शपथपत्र व त्‍यांचे वकील श्री.रणसिंग यांनी केलेला युक्‍तीवाद ऐकला. व न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.  

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

सामनेवाला यांनी तक्रारदार हिस सेवा देणेत त्रुटी ठेवली आहे काय.?                                                         

 

... नाही.

2.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

5.   मुद्दा क्र.1- तक्रारदार ही संगमनेर ता.संगमनेर जि.अहमदनगर येथील रहिवासी आहे. तक्रारदार हिने संगमनेर येथे कोल्‍हेवाडी रोड, जमजम कॉलनी या भागात सर्व्‍हे नं.186(1/1/3)5 पैकी प्‍लॉट नं.19, क्षेत्र 1076 चौ.फुट अशी जागा घेतलेली आहे. सदर जागेपैकी 540 चौ.फुट जागेमध्‍ये तक्रारदार हिला बांधकाम करावयाचे होते. त्‍यामुळे तिने सामनेवाला यांना भेटून बांधकाम करण्‍यासाठी सांगितले. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्‍ये दिनांक 11.09.2015 रोजी रक्‍कम रुपये 100/- रुपयाचे स्‍टँप पेपरवर बांधकाम करारनामा करण्‍यात आला. तक्रारदार हिने पुढे असे कथन केले आहे की, सदरहू करारामध्‍ये ठरल्‍याप्रमाणे सामनेवाला यांनी बांधकाम केले नाही. संपुर्ण बांधकाम निकृष्‍ट दर्जाचे केलेले आहे त्‍यासाठी मंचाने प्रकरणात दाखल असलेल्या करारनाम्‍याचे अवलोकर केले. त्‍या करारनाम्‍यामध्‍ये कोणकोणत्‍या गोष्‍टीचे बांधकाम करावयाचे होते व तक्रारदार व सामनेवाला यांची कोणकोणती जबाबदारी राहील याबाबत नमुद केलेले आहे. मात्र तक्रारदार हिचे कथनाप्रमाणे सामनेवाला यांनी बांधकामामध्‍ये बदल केले ही बाब स्‍पष्‍ट करताना दस्‍त प्रकरणात दाखल केले नाही. तसा कोणताही तपासणी अहवाल किंवा कोणत्‍याही तज्ञाची नेमणुक करुन त्‍यांचे मार्फत तपासणी अहवाल प्रकरणात दाखल केलेला नाही. त्‍यामुळे बांधकामामध्‍ये सामनेवाला यांनी कोणते बदल केले ही बाब स्‍पष्‍ट झालेली नाही. तसेच सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीमध्‍ये कथन केले व बांधकामामध्‍ये जे कोणकोणते बदल केले ते तक्रारदार हिचे सांगण्‍यावरुन केलेले आहेत. परंतु बांधकाम अपुर्णं झाल्‍याबद्दल कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्‍यामुळे तक्रारदार हिचे सदरचे कथन ग्राहय धरता येणार नाही.

6.   तक्रारदार हिने असे कथन केले आहे की, संपुर्ण बांधकाम हे निकृष्‍ट दर्जाचे केलेले आहे. परंतु निकृष्‍ट दर्जाचे बांधकामामध्‍ये कोणत्‍या प्रकारचे बांधकाम होते या बाबत कोणताही दस्‍त किंवा फोटो दाखल केले नाहीत. त्‍यामुळे सदरहू केलेले बांधकाम हे निकृष्‍ट दर्जाचे होते ही बाब स्‍पष्‍ट करण्‍याकरीता दस्‍तावेज प्रकरणात दाखल करणे आवश्‍यक व गरजेचे होते. परंतू तसे केले नाही त्‍यामुळे तक्रारदार हिचे कथन हे अपुरे कागदपत्राअभावी सिध्‍द झालेले नाही. तसेच तक्रारदार हिने कथन केले की, सामनेवाला यांना 4,55,000/- रुपये दिलेले आहेत, मात्र रक्‍कम दिल्‍या बाबतच्‍या कोणत्‍याही पावत्‍या किंवा दस्‍तावेज प्रकरणात दाखल केलेले नाहीत. त्‍यामुळे नेमके सामनेवाला यांना किती पैसे दिले ही बाब सिध्‍द होत नाही. तक्रारदार हिचे कथनाप्रमाणे बांधकाम हे निकृष्‍ट दर्जाचे किंवा अपुरे आहे यासाठी कागदोपत्री पुरावा असणे आवश्‍यक आहे असे मंचाचे मत आहे किंवा तज्ञ नेमनूक तपासणी अहवाल प्रकरणात दाखल करणे आवश्‍यक आहे. मात्र तक्रारदार हिने तसा कोणताही दस्‍तावेज प्रकरणात दाखल केलेला नाही. तक्रारदार हि तिची तक्रार सिध्‍द करण्‍यास अपात्र ठरलेली आहे. सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीमध्‍ये संपुर्ण बांधकाम करुन दिले आहे असे कथन केले, मात्र त्‍यावरसुध्‍दा तक्रारदार हिने प्रतिउत्‍तर दाखल केलेले नाही किंवा कोणतेही शपथपत्र दाखल केलेले नाही. त्‍यामुळे सामनेवाला यांनी घेतलेला बचाव हा ग्राहय धरण्‍यात येतो.

7.   वरील बाबी वरुन हे स्‍पष्‍ट होते की, सामनेवाला यांनी त्‍यांचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. सबब मुद्दा क्र.1 उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

8.   मुद्दा क्र.2   मुद्दा क्र.1 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.2 चे उत्‍तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ  दे  श –

1)   तक्रारदार हिची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.

2)   या तक्रारीचा खर्च उभय पक्षकार यांनी स्‍वतः सहन करावा.

3)   या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क दयावी.

4)   या प्रकरणाची  “ ब ” व “ क ” फाईल तक्रारकर्तास परत दयावी.  

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.