Maharashtra

Raigad

MA/23/4

Eicher Trucks & Buses, VE Commercial Vehicles Ltd., - Complainant(s)

Versus

Manoj Jagannath Pawar - Opp.Party(s)

Jaiprakash Nair

10 Apr 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM RAIGAD - ALIBAG
COLLECTOR OFFICE BUILDING, SECOND FLOOR, NEAR HIRAKOT TALAV
TAL. ALIBAG, DIST. RAIGAD
 
Miscellaneous Application No. MA/23/4
( Date of Filing : 01 Feb 2023 )
In
Complaint Case No. cc/13/148
 
1. Eicher Trucks & Buses, VE Commercial Vehicles Ltd.,
96, Sector No.32, Gurgaon-122001
...........Appellant(s)
Versus
1. Manoj Jagannath Pawar
R/at Room No.2, Flat No.D-36, Navjyot Society, Sector No.12, Kharghar, Tal.Panvel, Dist.Raigad
2. Fort Point Automotive Mumbai
Plot No.9, L.B.S. Kurla, Kurla West, Mumbai-400 070
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. RAVINDRA P. NAGRE PRESIDENT
 
PRESENT:
 
Dated : 10 Apr 2023
Final Order / Judgement

नि.1 वरील आदेश

(दिनांक 10 एप्रिल, 2023)

  1. प्रस्तुतचा किरकोळ अर्ज या आयोगासमोरील मुळ ग्राहक तक्रार क्र.148/2013 मधील सामनेवाले क्र.2 (या अर्जातील अर्जदार-आयशर ट्रक्स व बसेस, गुरगांव) यांनी दाखल केलेला आहे.
  2. त्यांचे असे म्हणणे आहे की, वर नमुद मुळ ग्राहक तक्रार क्र.148/2013 मध्ये आयोगाने दि.30/05/2015 रोजी पारीत केलेल्या अंतिम आदेशाविरुध्द त्यांनी मा.राज्य आयोग, मुंबई यांचेसमोर अपील क्र.ए/16/194 दाखल केले होते.  सदरचे अपील मा.राज्य आयोगाने दि.23/08/2022 च्या आदेशान्वये मंजूर करुन या आयोगाचा दि.30/05/2015 चा अंतिम आदेश रद्द करुन मुळ तक्रार क्र.148/2013 खारीज केली आहे.  सबब, त्यांनी प्रस्तुत प्रकरणांत मा.राज्य आयोगाच्या अंतरीम आदेशानुसार या आयोगात जमा केलेली रक्कम रु.8,29,285/- व रु.25,000/- परत मिळण्याबाबत सदरील अर्जाद्वारे विनंती केली आहे.
  3. या प्रकरणांत मुळ तक्रारदार यांना नोटीस त्यांचे म्हणणे देणेकामी नोटीस पाठविण्यात आली होती.  तसेच या आयोगाच्या सहायक लेखाधिकारी यांना अहवाल दाखल करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते.
  4. आयोगाच्या सहायक लेखाधिकारी यांनी याबाबत अहवाल दाखल केला असून, त्यानुसार सामनेवाले क्र.2 वर नमुद रक्कम रु.8,29,285/- व रु.25,000/- या आयोगात जमा केल्या आहेत व त्या मुदत ठेवीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
  5. तक्रारदार यांना पाठविलेली नोटीस “Left” या शे-यासह परत आली आहे.  परंतू सदरची नोटीस तक्रारदारांच्या मुळ तक्रारीतील व मा.राज्य आयोगासमोरील अपीलातील पत्त्यावर पाठविण्यात आलेली दिसून येते.  तक्रारदार यांनी त्यांचा नवीन पत्ता सादर केलेला नाही.  तसेच मा.राज्य आयोगाने दि.23/08/2022 रोजी पारीत केलेल्या आदेशाविरुध्द मा.राष्ट्रीय आयोगासमोर रिव्हीजन दाखल केल्याचे तक्रारदार यांनी कळविलेले नाही.  सबब, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.

आदेश

  1. प्रबंधक / सहायक लेखाधिकारी यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी मुळ ग्राहक तक्रार क्र.148/2013 (अपील क्र.ए/16/194) मधील जमा रक्कमेची मुदत ठेव मोडून सदरील रक्कम मुळ ग्राहक तक्रार क्र.148/2013 मधील सामनेवाले क्र.1 (या अर्जातील अर्जदार-आयशर ट्रक्स व बसेस, गुरगांव) यांना येणा-या व्याजासह विहीत प्रकियेची पुर्तता करुन अदा करावी.
  2. या आदेशाची साक्षांकित प्रत उभय पक्षकारांना पाठविण्यात यावी.
  3. मुळ आदेशाच्या प्रतीसह मुळ नस्ती लेखा विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपुर्द करण्यात यावी.
  4. वरील आदेशानुसार प्रस्तुतचा किरकोळ अर्ज निकाली काढण्यात येतो.
 
 
[HON'BLE MR. RAVINDRA P. NAGRE]
PRESIDENT
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.