Maharashtra

Gondia

CC/10/61

Manishkumar Lalitkumar Agrawal - Complainant(s)

Versus

Manoharsingh ramani, Prop Hindistan Batteries - Opp.Party(s)

Adv. Rahangadale

30 Oct 2010

ORDER

 
Complaint Case No. CC/10/61
 
1. Manishkumar Lalitkumar Agrawal
R/o Sadak Arjuni, Dist gondia
Gondia
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manoharsingh ramani, Prop Hindistan Batteries
Old Bus stand road, Gondia
Gondia
Maharashtra
2. Exide Insustries Ltd.
Exide House 92 Temple road Civil Lines Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Smt. Potdukhe PRESIDENT
 HON'ABLE MS. Smt. Patel Member
 HON'ABLE MR. Shri. Ajitkumar Jain Member
 
PRESENT:
 
ORDER

 

                       -- आदेश --
                          (पारित दि. 30-10-2010)
                     द्वारा-सौ. अलका उमेश पटेल, सदस्‍या
      तक्रारकर्ता श्री. मनिषकुमार ललितकुमार अग्रवाल यांनी दाखल केलेल्‍या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,....
1                    तक्रारकर्ता यांनी वि.प.क्रं. 1 यांच्‍या दुकानातून दि. 13.08.09 ला रु.11,800/- मध्‍ये एक्‍साईड कंपनीची बॅटरी खरेदी केली आहे. काही महिन्‍यानंतर बॅटरी कमी पॉवर बॅकअप देत आहे म्‍हणून तक्रार दाखल केली आहे. त.क. मागणी करतात की, वि.प.यांनी सदर बॅटरी बदलवून नविन बॅटरी द्यावी तर शारीरिक, मानसिक त्रासासाठी रु.10,000/- द्यावेत व न्‍यायालयीन खर्च वि.प.यांच्‍यावर लादण्‍यात यावा.
2                    वि.प.क्रं. 1 व 2 म्‍हणतात की, बॅटरी कंपनीकडे टेस्‍टींगसाठी पाठविलेली होती. बॅटरी सुरु अवस्‍थेत आहे व त्‍याच्‍या मध्‍ये काही बिघाड झालेला नाही. त.क.ची सदर बॅटरी वि.प.यांच्‍या दुकानात आहे व त.क. यांना अनेकदा विनंती करुनही त्‍यांनी ती परत नेली नाही. बॅटरीला पूर्णपणे चार्ज करणे आवश्‍यक आहे लोडशेडींगमुळे बॅटरी पूर्णपणे चार्ज होत नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ताची सदर तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी.
कारणे व निष्‍कर्ष
3                   तक्रारकर्ता  व वि.प. यांनी दाखल केलेली शपथपत्रे, दस्‍ताऐवज इतर पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, बॅटरीच्‍या वॉरंटी कार्डच्‍या अट क्रं. 11 प्रमाणे बॅटरीची सर्विस प्रत्‍येक तीन महिन्‍यात करणे आवश्‍यक आहे. तसेच अट क्रं. 12 प्रमाणे त्‍याची नोंद वॉरंटी कार्डवर घेणे आवश्‍यक आहे. अन्‍यथा त्‍यांनी केलेला कोणताही दावा अवैध मानल्‍या जाईल. त.क.च्‍या बिलामध्‍ये व वॉरंटी कार्डवर दुर्गा मंदिर लिहिलेले आहे. बॅटरीचा कमी पॉवर बॅकअप त्‍याचा वापर करण्‍यावर अवलंबून असते. वि.प. यांच्‍या तर्फे 2010 (5) ALL MR (JOURNAL) 53 (महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोग) हा न्‍याय निवाडा दाखल करण्‍यात आला आहे. तक्रारकर्ता यांनी बॅटरी विकत घेतल्‍यानंतर एकदा ही सर्व्हिसींग केल्‍याचे रेकॉर्ड दिसत नाही. ही त.क. यांची चुक आहे व स्‍वतःच्‍या चुकिचा फायदा ते घेवू शकत नाही. म्‍हणून तक्रारकर्ताची सदर तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
आदेश
1                    तक्रारकर्ताची सदर तक्रार खारीज  करण्‍यात येत आहे.
2                    वि.प. यांनी त.क.ला त्‍यांची बॅटरी परत करावी.
 
 
[HON'ABLE MRS. Smt. Potdukhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MS. Smt. Patel]
Member
 
[HON'ABLE MR. Shri. Ajitkumar Jain]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.