Maharashtra

Sangli

CC/09/2285

Sou.Rukmini Ashok Jadhav - Complainant(s)

Versus

Manohar Co.Op.Cr.Society Ltd. Mumbai - Opp.Party(s)

18 Nov 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/09/2285
 
1. Sou.Rukmini Ashok Jadhav
Limb, Tal.Tasgaon, Dist.Sangli
...........Complainant(s)
Versus
1. Manohar Co.Op.Cr.Society Ltd. Mumbai
Siddheshwar Bhavan, Somwar Peth, Tal.Tasgaon, Dist.Sangli
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

                                           नि. नं. ६६

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर

 

मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे

मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे

मा.सदस्‍या सौ सुरेखा बिचकर

 

ग्राहक तक्रार अर्ज क्र. २२८५/२००९

----------------------------------------------

तक्रार नोंद तारीख      ०४/१२/२००९

तक्रार दाखल तारीखः    ०५/०३/२०१० 

निकाल तारीखः      -   १८/११/२०११

----------------------------------------------

 

१.  सौ रुक्‍मीनी अशोक जाधव,

    व.व.४८, धंदा घरकाम व शेती

    रा.कौलगे, ता.तासगांव जि. सांगली   

    तर्फे कुलमुखत्‍यार श्री विठ्ठल संभाजी पाटील

    व.व.६६, धंदा शेती

    रा.लिंब ता.तासगांव जि. सांगली                    ..... तक्रारदार

विरुध्‍द

 

१.   शाखा व्‍यवस्‍थापक/मॅनेजर

    मनोहर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई

    शाखा सिध्‍देश्‍वर भवन, सोमवार पेठ,

    तासगांव ता.तासगांव जि.सांगली

 

२.  श्री हणमंत ज्ञानोबा कदम

    व.व. सज्ञान, धंदा चेअरमन

    मनोहर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई

    शाखा तासगांव रा.वरचे गल्‍ली, तासगांव

    ता.तासगांव जि.सांगली

   

३.  श्री सर्जेराव जगन्‍नाथ खराडे

    व.व. सज्ञान, धंदा संचालक

    मनोहर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई

    शाखा तासगांव रा.गौरगाव

    ता.तासगांव जि.सांगली

 

४.  श्री दत्‍ताजीराव धोंडीराम म्‍हेत्रे

    व.व. सज्ञान, धंदा संचालक

    मनोहर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई

    शाखा तासगांव रा.म्‍हेत्रे मळा, तासगाव

    ता.तासगांव जि.सांगली

 

५.  श्री संजय घन:शाम बजाज,

    व.व. सज्ञान, धंदा - चेअरमन

    मनोहर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई

    शाखा सांगली रा. घन:शाम, रतनशीनगर,

    हॉटेल अक्षरमजवळ, सांगली

 

६.  श्री संजय श्रीनारायण सारडा

    व.व. सज्ञान, धंदा संचालक

    मनोहर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई

    शाखा सांगली

    रा.मेमरीज कलर लॅब, हरभट रोड, सांगली

 

७.  श्री संतोष विद्याधर कोल्‍हापूरे

    व.व. सज्ञान, धंदा संचालक

    मनोहर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई

    शाखा सांगली

    रा.कोल्‍हापूर अप्‍लायन्‍सेस, गाळा नं.१

    तरुण भारत स्‍टेडियम, सांगली

 

८.  श्री विजय विश्‍वनाथ सावळे

    व.व. सज्ञान, धंदा संचालक

    मनोहर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई

    शाखा सांगली रा.फौजदार मार्ग,

    इंडिया ट्रान्‍स्‍पोर्ट जवळ, सांगली

 

९.  श्री अशोक देवीकिसन मालू

    व.व. सज्ञान, धंदा संचालक

    मनोहर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई

    शाखा सांगली रा.रा.वखारभाग,

    हळदभवनजवळ, सांगली

 

१०. श्रीमती दिपमाला अशोक खराडे

    व.व. सज्ञान, धंदा उपाध्‍यक्ष

    रा.द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,

    एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०

    सध्‍या रा.१२०४, सिध्‍दीविनायक टॉवर,

    डनकॉन कॉजवे रोड, भागनारी हौसिंग सोसायटी,

    सायन चुनाभट्टी, मुंबई ४०० ०२२

 

११.  श्री हिराजी मनोबा निंबाळकर,

    व.व. सज्ञान, धंदा उपाध्‍यक्ष

    रा.द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,

    एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०

 

१२.  श्री संतु रखमा सांगळे,

    व.व. सज्ञान, धंदा सचिव

    रा.द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,

    एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०

    सध्‍या  रा. शिवशक्‍ती को.ऑप.हौसिंग सोसायटी,

    निकोलीस, ग्रोसालविस चाळ, काजू पाडा,

    वार्ड काळा ईन, कुर्ला, मुंबई ४०००७९

 

१३.  श्री गुलाबराव हं.पाटणकर

    व.व. सज्ञान, धंदा संचालक

    रा.द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,

    एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०

    सध्‍या रा. वेझेगाव, ता.फलटण जि. सातारा

 

१४.  श्री रविंद्र गुलाबराव मोहिते,

    व.व. सज्ञान, धंदा संचालक

    रा.द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,

    एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०

 

१५. श्रीमती भारती दत्‍तात्रय पाटणकर,

    व.व. सज्ञान, धंदा संचालिका

    रा.द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,

    एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०

 

१६. सौ ज्‍योती अशोकराव खराडे

    व.व. सज्ञान, धंदा संचालिका

    रा.द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,

    एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०

    सध्‍या रा.१२०४, सिध्‍दीविनायक टॉवर,

    डनकॉन कॉजवे रोड, भागनारी हौसिंग सोसायटी,

    सायन चुनाभट्टी, मुंबई ४०० ०२२

 

१७. सौ विमल बाळासो बांगर

    व.व. सज्ञान, धंदा संचालिका

    रा.द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,

    एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०

 

१८.  श्री रंगनाथ बारकू पवार

    व.व. सज्ञान, धंदा संचालक

    रा.द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,

    एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०

 

१९.  सौ पद्मावती बाळासो किल्‍लेदार,

    व.व. सज्ञान, धंदा संचालिका

    रा.द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,

    एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०

    सध्‍या  रा. शिवशक्‍ती को.ऑप.हौसिंग सोसायटी,

    निकोलीस, ग्रोसालविस चाळ, काजू पाडा,

    वार्ड काळा ईन, कुर्ला, मुंबई ४०००७९

 

२०. सौ विनया मदन शिंदे

    व.व. सज्ञान, धंदा संचालिका

    रा.द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,

    एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०

 

२१. श्री रविंद्र मारुती काशिद,

    व.व. सज्ञान, धंदा संचालक

    रा.द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,

    एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०

 

२२. श्री मदन जगन्‍नाथ शिंदे

    व.व. सज्ञान, धंदा संचालक

    रा.द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,

    एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०            ..... जाबदार

 

                            तक्रारदार तर्फेः  +ìb÷. के.व्‍ही.पाटील

    जाबदार क्र.१ तर्फे +ìb÷. श्री ए.आर.देशमुख

    जाबदार क्र. २ तर्फे - +ìb÷. श्री एस.एस.गुजर

    जाबदार क्र.४ तर्फे +ìb÷. श्री डी.एस.पाटील

    जाबदार क्र.३ तर्फे +ìb÷. श्री एम.एस.खराडे

    जाबदार क्र. ५ ते २२ एकतर्फा

 

   नि का ल प त्र

 

द्वारा- मा. सदस्‍या- गीता घाटगे

 

१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने दामदुप्‍पट ठेव व मुदतठेवी अन्‍वये गुंतविलेल्‍या रकमा परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार मनोहर को-ऑपरेटीव्‍ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड मुंबई, शाखा सिध्‍देश्‍वर भवन, सोमवार पेठ, तासगांव ता.तासगांव जि.सांगली (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे सोसायटी असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्‍या होत्‍या.  सदरचे ठेवींच्‍या मुदती पूर्ण झालेल्‍या आहेत.  तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या रकमांची सोसायटीकडे मागणी केली असता सोसायटीने त्‍या देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे.  सबब, आपल्‍याला रकमा देवविण्‍यात याव्‍यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे.  तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्‍वये एकूण १० कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.

 

२.    जाबदार क्र. ३ ते २२ यांना मंचाच्‍या नोटीसीची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत.  सबब त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला.  परंतु जाबदार क्र.४ व ३ यांनी विलंबाने हजर होवून सदरहू आदेश रद्द होण्‍याचा अर्ज सादर करुन त्‍यांचे म्‍हणणे दाखल करुन घेण्‍यात यावे असा अर्ज प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केला.  हे दोनही अर्ज दंडात्‍मक रक्‍कम तक्रारदारांना अदा करण्‍याच्‍या अटीवर मंजूर करण्‍यात आले.  या आदेशाचे पालन जाबदार क्र.३ व ४ यांनी केल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द करणेत आलेला नि.१ वरील एकतर्फा आदेश रद्द करुन त्‍यांचे म्‍हणणे प्रस्‍तुत प्रकरणी दाखल करुन घेवून विचारातही घेणेत आले.

 

३.    जाबदार क्र. १ यांनी मंचाच्‍या नोटीसीची बजावणी त्‍यांचेवर झालेवर विधिज्ञांमार्फत हजर होवून त्‍यांचे म्‍हणणे प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केले.  त्‍यांचे म्‍हणण्‍याचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये त्‍यांनी जाबदार क्र.२ ते १० यांचेवतीनेच जास्‍तीत जास्‍त म्‍हणणे मांडल्‍याचे दिसून येते.  परंतु सदरहू म्‍हणणे केवळ जाबदार क्र.१ वतीने दाखल करण्‍यात आले असल्‍याने जाबदार क्र.२ ते १० बाबत जे म्‍हणणे यामध्‍ये मांडण्‍यात आलेले आहे, त्‍याबाबत प्रस्‍तुत निकालपत्रात या जाबदारांचे म्‍हणणे म्‍हणून ऊहापोह करण्‍यात येत नाही.  जाबदार क्र.१ यांनी सदरहू सोसायटी ही तक्रारदारांनी एकाच वेळी ठेवी काढून घेण्‍याचा सपाटा चालू केल्‍यामुळे अडचणीत आली असल्‍याचे नमूद केले आहे. त्‍यामुळे सदरहू जाबदारांची तक्रारदारांच्‍या ठेवीतील रक्‍कम अदा करण्‍याची इच्‍छा असून देखील तसे करणे त्‍यांना अडचणीचे होत असल्‍याचे म्‍हणणे मांडलेले आहे.  सदरहू जाबदार पुढे असेही म्‍हणणे मांडतात की, त्‍यांनी तक्रारदारांची रक्‍कम परत देण्‍यास कधीही टाळाटाळ केलेली नाही.  तसेच जाबदार यांनी एकीकडे त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदारांना त्‍यांच्‍या ठेवीतील रक्‍कम अदा करण्‍याची तयारी दर्शवित असतानाच त्‍यांना रक्‍कम रु.५००/- चा मासिक हप्‍ता बांधून मिळावा अशी विनंती केली आहे.  तर दुसरीकडे तक्रारदारांचा तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करावा अशी देखील विनंती त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये केली आहे.  जाबदार क्र.१ यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

     

४.    जाबदार क्र.२, ३ व ४ यांनी विधिज्ञांमार्फत हजर होवून त्‍यांचे म्‍हणणे प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केले.  या जाबदारांच्‍या मते हे जाबदार कधीही पतसंस्‍थेचे संचालक नव्‍हते तसेच त्‍यांनी संस्‍थेच्‍या निवडणूकीमध्‍ये उमेदवारीचा अर्जही भरलेला नव्‍हता.  ते संचालक असल्‍याचा कोणताही पुरावा तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेला नाही.  त्‍यामुळे त्‍यांना विनाकारण याकामी सामील केलेले आहे आणि म्‍हणून प्रस्‍तुत प्रकरणी Mis-joinder of necessary parties या कायदेशीर तत्‍वाचा बाध येतो.  सदरहू जाबदार पुढे असेही नमूद करतात की, या क्रेडीट सोसायटीच्‍या शाखा तासगाव येथील कारभार व या सोसायटीचे कामकाज हे मनोहर को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मुंबई या मुख्‍य शाखेमार्फत चालते.  त्‍यामुळे या सोसायटीचे शाखा तासगांव येथे स्‍वतंत्र असे संचालक मंडळ नाही.  आणि म्‍हणून देखील प्रस्‍तुतचा अर्ज रद्द होणेस पात्र आहे.  तक्रारदारांनी जो सदरहू अर्ज दाखल केलेला आहे तो अर्ज वर नमूद कारणांमुळे रद्द होणेस पात्र आहे व त्‍याचबरोबर रक्‍कम रु.२५,०००/- ची कॉम्‍पेन्‍सेटरी कॉस्‍ट मिळावी अशी विनंती करुन जाबदारांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे व सोबत सोसायटीच्‍या मुंबई येथील प्रधान कार्यालयाच्‍या संचालक मंडळाची जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था सांगली यांनी दिलेली यादी दाखल केलेली आहे. 

 

५.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी जी मागणी केलेली आहे त्‍या मागणीचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार सोसायटीबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुद्दा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने  रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे.  त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.   

सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.  ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र.२ ते २२ यांना पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून सोसायटीने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने सोसायटीच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो.  प्रस्‍तुत प्रकरणी जाबदारांना पुराव्‍याअभावी जबाबदार धरता येत नाही असा निष्‍कर्ष निघाल्‍याने जाबदार क्र.२, ३ व ४ यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात व लेखी युक्तिवादामध्‍ये उपस्थित केलेल्‍या आक्षेपाच्‍या मुद्यांचा ऊहापोह प्रस्‍तुत निकालपत्रात करणेत आलेला नाही.

            जाबदार क्र.१ मनोहर क्रेडीट सोसायटीच्‍या वतीने तक्रारदारांनी शाखा व्‍यवस्‍थापक/मॅनेजर यांना जाबदार म्‍हणून सामील केलेले आहे.  शाखा व्‍यवस्‍थापक/मॅनेजर हे सोसायटीचे पगारदार नोकर आहेत सबब त्‍यांचेविरुध्‍द कोणतेही वैयक्तिक आदेश पारीत करण्‍यात येत नाहीत. 

 

      ६.    प्रस्‍तुत प्रकरणी दाखल मूळ ठेवपावतीचे व सत्‍यप्रतींचे अवलोकन करता तक्रारदारांना सदरहू ठेवींतील रकमेवर कोणतेही व्‍याज मिळाल्‍याचे दिसून येत नाही.  ठेवींच्‍या मुदतीही निकाल तारखेदिवशी पूर्ण झालेल्‍या आहेत.  सबब मुदत ठेवीतील रक्‍कम ठेव ठेवल्‍याचे तारखेपासून ठेवपावतीमध्‍ये नमूद केलेल्‍या व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहे व दामदुप्‍पट ठेवीतील मुदतीनंतर मिळणा-या रकमा मुदत संपल्‍याच्‍या दुसरे दिवशीपासून द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहेत.

 

सबब, मंचाचा आदेश की,

                              दे

 

१.  यातील जाबदार सोसायटी व सोसायटीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.९५१० मधील रक्‍कम रु.४,०००/- (रुपये चार हजार फक्‍त) दि.७/११/२००५ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्‍के व्‍याजदराने अदा करावी.

 

२.  यातील जाबदार सोसायटी व सोसायटीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र.८९७४ मधील रक्‍कम रु.८,०००/- (रुपये आठ हजार फक्‍त) दि.१२/५/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्‍के व्‍याजदराने अदा करावी.

 

३.  यातील जाबदार सोसायटी व सोसायटीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र.८९९१ मधील रक्‍कम रु.५,०००/- (रुपये पाच हजार फक्‍त) दि.१५/५/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्‍के व्‍याजदराने अदा करावी.

 

४.  यातील जाबदार सोसायटी व सोसायटीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.२,०००/- (रुपये दोन हजार फक्‍त) अदा करावेत.

 

५.  वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.३/१/२०१२ पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.

 

सांगली

दिनांकò: १८/११/२०११    

 

 

  (सुरेखा बिचकर)                 (गीता सु.घाटगे)                         (अनिल य.गोडसे÷)

       सदस्‍या                        सदस्‍या                                 अध्‍यक्ष           

जिल्‍हा मंच, सांगली.             जिल्‍हा मंच, सांगली                 जिल्‍हा मंच, सांगली.  

                                                                            

|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä  Ênù.   /   /२०११

      VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä  Ênù.   /    /२०११

 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.