Maharashtra

Sangli

CC/09/2286

Someshwar Vittha Patil - Complainant(s)

Versus

Manohar Co.Op.Cr.Society Ltd. Mumbai - Opp.Party(s)

13 Aug 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/09/2286
 
1. Someshwar Vittha Patil
Limb, Tal.Tasgaon, Dist.Sangli
...........Complainant(s)
Versus
1. Manohar Co.Op.Cr.Society Ltd. Mumbai
Siddheswar Bhavan, Somwar Peth, Tasgaon, Tal.Tasgaon, Dist.Sangli
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  A.V. Deshpande PRESIDENT
  Smt.M.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                      नि. ६५


 

 


 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली


 

 


 

                                    मा.अध्‍यक्ष  श्री ए.व्‍ही.देशपांडे


 

                                    मा.सदस्‍या - सौ वर्षा शिंदे – रजेवर


 

                                    मा.सदस्‍या - सौ मनिषा कुलकर्णी


 

ग्राहक तक्रार अर्ज क्र.२२८६/२००९


 

 


 

तक्रार नोंद तारीख    - ०४/१२/२००९


 

तक्रार दाखल तारीख  - ०५/०३/२०१०


 

निकाल तारीख             - १३/०८/२०१३


 

----------------------------------------------


 

 


 

श्री सोमेश्‍वर विठ्ठल पाटील


 

तर्फे कुलमुखत्‍यार श्री विठ्ठल संभाजी पाटील


 

रा.लिंब ता.तासगांव जि.सांगली                               ....... तक्रारदार


 

 


 

      विरुध्‍द


 

 


 

१.  शाखा व्‍यवस्‍थापक/मॅनेजर,


 

    मनोहर को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि.मुंबई


 

    शाखा सिध्‍देश्‍वर भवन, सोमवार पेठ,


 

    तासगांव, ता.तासगांव जि.सांगली


 

२.  श्री हणमंत ज्ञानोबा कदम


 

    मनोहर को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. मुंबई


 

    शाखा तासगांव, रा.वरचे गल्‍ली, तासगांव,


 

    ता.तासगांव जि. सांगली


 

३. श्री सर्जेराव जगन्‍नाथ खराडे,


 

    मनोहर को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. मुंबई


 

    शाखा तासगांव, रा.गौरगाव ता. तासगांव,


 

    ता.तासगांव जि. सांगली


 

४. श्री दत्‍ताजीराव धोंडीराम म्‍हेत्रे


 

    मनोहर को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. मुंबई


 

    शाखा तासगांव, रा.म्‍हेत्रे मळा, तासगांव,


 

    ता.तासगांव जि. सांगली


 

    श्रीमती दिपमाला अशोक खराडे,


 

    मनोहर को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. मुंबई


 

    शाखा तासगांव, रा., अकबर बिल्‍डींग,


 

    लाल बहादुर शास्‍त्री मार्ग, जुन्‍या पोष्‍टाजवळ,


 

    कुर्ला (पश्चिम), मुंबई – 0


 

    (वगळले) 


 

५. श्री संजय घनःशाम बजाज


 

    मनोहर को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. मुंबई


 

    शाखा सांगली, रा.घनःशाम रतनशी नगर,


 

    हॉटेल अक्षरमजवळ, सांगली


 

६. श्री संजय श्रीनारायण सारडा,


 

    मनोहर को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. मुंबई


 

    शाखा सांगली, रा.मेमरीज कलर लॅब,


 

    हरभट रोड, सांगली


 

७.  श्री संतोष विद्याधर कोल्‍हापूरे,


 

    मनोहर को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. मुंबई


 

    शाखा सांगली, रा.कोल्‍हापूरे अप्‍लायन्‍सेस, गाळा नं.,


 

    तरुण भारत स्‍टेडियम सांगली


 

८. श्री विजय विश्‍वनाथ सावळे


 

    मनोहर को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. मुंबई


 

    शाखा सांगली, रा.फौजदार मार्ग,


 

    इंडिया ट्रान्‍स्‍पोर्ट जवळ, सांगली


 

. अशोक देवकिसन मालू


 

    मनोहर को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. मुंबई


 

    शाखा सांगली, रा.वखार भाग, हळद भवन जवळ,


 

    सांगली


 

१०. श्रीमती दिपमाला अशोक खराडे


 

    रा.द्वारा , सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,


 

    एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प), मुंबई – ४०००७०


 

    सध्‍या रा. १२०४, सिध्‍दीविनायक टॉवर,


 

    डनकॉन-काजवे रोड, भागनारी हौसिंग सोसायटी,


 

    सायन चुनाभट्टी, मुंबई ४०००२२


 

११. श्री हिराजी मनोबा निंबाळकर


 

    रा.द्वारा , सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,


 

    एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प), मुंबई – ४०००७०


 

१२. श्री संतु रखमा सांगळे


 

    रा.द्वारा , सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,


 

    एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प), मुंबई – ४०००७०


 

    सध्‍या रा.शिवशक्‍ती को.ऑप. हौसिंग सोसायटी,


 

    निकोलीस गोंसालवीस चाळ, काजूपाडा,


 

    वॉर्ड काळाइन, कुर्ला मुंबई ४०००७०


 

१३. श्री गुलाबराव हं. पाटील


 

    रा.द्वारा , सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,


 

    एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प), मुंबई – ४०००७०


 

    सध्‍या रा.वेझेगांव, ता.फलटण जि. सातारा


 

१४. श्री रविंद्र गुलाबराव मोहिते,


 

    रा.द्वारा , सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,


 

    एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प), मुंबई – ४०००७०


 

१५. श्रीमती भारती दत्‍तात्रय पाटणकर


 

    रा.द्वारा , सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,


 

    एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प), मुंबई – ४०००७०


 

१६. सौ जोती अशोकराव खराडे


 

    रा.द्वारा , सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,


 

    एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प), मुंबई – ४०००७०


 

    सध्‍या रा. १२०४, सिध्‍दीविनायक टॉवर,


 

    डनकॉन-काजवे रोड, भागनारी हौसिंग सोसायटी,


 

    सायन चुनाभट्टी, मुंबई ४०००२२


 

१७. सौ विमल बाळासो बांगर


 

    रा.द्वारा , सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,


 

    एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प), मुंबई – ४०००७०


 

१८. श्री रंगनाथ बारकू पवार


 

    रा.द्वारा , सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,


 

    एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प), मुंबई – ४०००७०


 

१९. सौ पद्मावती बाळासो किल्‍लेदार


 

   रा.द्वारा , सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,


 

    एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प), मुंबई – ४०००७०


 

    सध्‍या रा.शिवशक्‍ती को.ऑप. हौसिंग सोसायटी,


 

    निकोलीस गोंसालवीस चाळ, काजूपाडा,


 

    वॉर्ड काळाइन, कुर्ला मुंबई ४०००७०


 

२०. सौ विनया मदन शिंदे


 

    रा.द्वारा , सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,


 

    एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प), मुंबई – ४०००७०


 

२१. श्री रविंद्र मारुती काशिद


 

    रा.द्वारा , सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,


 

    एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प), मुंबई – ४०००७०


 

२२. श्री मदन जगन्‍नाथ शिंदे


 

    रा.द्वारा , सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,


 

    एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प), मुंबई – ४०००७०                 ....... जाबदार


 

           


 

                              तक्रारदारतर्फे वकील – श्री के.व्‍ही.पाटील


 

                              जाबदार क्र.१ तर्फे वकील – श्री ए.आर.देशमुख                               जाबदार क्र.२ तर्फे वकील – श्री एस.एस.गुजर


 

                              जाबदार क्र.३ तर्फे वकील – श्री एम.एस.खराडे


 

                              जाबदार क्र.४ तर्फे वकील – श्री डी.एस.पाटील


 

                              जाबदार क्र.५ ते १९ व २१ आणि २२ – एकतर्फा


 

 


 

- नि का ल प त्र -


 

 


 

द्वारा मा.अध्‍यक्ष श्री ए.व्‍ही.देशपांडे


 

 


 

१.     प्रस्‍तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम १२ खाली दाखल केलेली असून त्‍याने दि.८/८२००२ रोजी दामदुप्‍पट ठेवपावती नं.८४६६ अन्‍वये, जाबदार क्र.१ या सोसायटीचा ठेवधारक सभासद या नात्‍याने, गुंतविलेली रक्‍कम रु.४०,०००/- ही मुदतीनंतर त्‍याच्‍या मागणीप्रमाणे जाबदारांनी न दिल्‍याने त्‍यास दूषित सेवा दिल्‍याचे कथन करुन सदर ठेवपावतीची मुदतीनंतर देय होणारी दामदुप्‍पट रक्‍कम रु.८०‍,०००/- व त्‍या रकमेवर तक्रार दाखल करेपर्यंत द.सा.द.शे.१३ टक्‍के दराने व्‍याज एकूण रु.९,१०८/- व त्‍यास झालेल्‍या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.१५,०००/- तसेच नोटीस खर्च रक्‍कम रु.१,०००/- अशी एकूण रु.१,०५,१०८/- व त्‍यावर तक्रार दाखल केले तारखेपासून प्रत्‍यक्ष रक्‍कम हाती पडेपर्यंत द.साद.शे. १३ टक्‍केप्रमाणे व्‍याज व प्रस्‍तुत तक्रारीचा संपूर्ण खर्च यांची मागणी केलेली आहे.


 

 


 

२.     मनोहर को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. मुंबई ही प्रधान शाखा असून त्‍याची एक शाखा तासगांव येथे आहे. वर नमूद केलेली दामदुप्‍पट ठेव पावती ही तासगांव येथील शाखेतून तक्रारदारास देण्‍यात आलेली आहे. सुरुवातीला तक्रारदाराने जाबदार क्र.१ ते १० यांना सदर सहकारी संस्‍थेच्‍या तासगांव शाखेचे संचालक म्‍हणून प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये जाबदार म्‍हणून सामील केलेले होते आणि नंतर तक्रारअर्जात दुरुस्‍ती करुन त्‍यात सद्य जाबदार क्र. १० ते २२ यांना मुंबई येथील प्रधान शाखेचे संचालक या नात्‍याने जाबदार म्‍हणून सामील केलेले आहे. जाबदार क्र.१ हे सदर सहकारी संस्‍थेच्‍या तासगांव शाखेचे शाखा व्‍यवस्‍थापक आहेत. प्रस्‍तुत प्रकरणात मूळ जाबदार क्र. ३ ते ९ व नवीन सामील केलेले जाबदार क्र.१० ते १९ व २१ आणि २२ हे नोटीस बजावून देखील हजर न झालेने त्‍यांचे विरुध्‍द तत्‍कालीन मंचाने एकतर्फा प्रकरण चालविण्‍याचे आदेश केल्‍याचे नि.१ वरुन दिसते.


 

 


 

३.     तक्रारदाराने आपल्‍या तक्रारअर्जातील कथनांच्‍या पुष्‍ठयर्थ नि.३ ला आपले शपथपत्र दाखल केले असून फेरिस्‍त नि.५ सोबत एकूण ५ कागदपत्रे दाखल केली आहेत. त्‍यात दि.८/८/२००२ ची दामदुप्‍पट ठेवपावती, जाबदारांना पाठविण्‍यात आलेली दि.२३/९/२००९ ची नोटीस, ती नोटीस पोस्‍टाने पाठविल्‍याबद्दल सर्टिफिकेट ऑफ पोस्‍टींग, तासगांव येथील शाखा व्‍यवस्‍थापक यांनी दिलेली दि.१/११/२००९ ची संचालक मंडळाची यादी, तसेच सांगली येथील सदर सहकारी संस्‍थेच्‍या शाखेच्‍या व्‍यवस्‍थापकांनी दिलेली संचालकांची यादी, यांच्‍या झेरॉक्‍सप्रती व तक्रारदाराने विठ्ठल संभाजी पाटील यांच्‍या हक्‍कात करुन दिलेले मूळ वटमुखत्‍यार पत्र यांचा समावेश आहे.


 

 


 

४.     जाबदार क्र.१ याने आपली लेखी कैफियत नि.१६ ला दाखल केलेली असून तक्रारदारांचे सर्व कथन व मागणी अमान्‍य केलेली आहे. तक्रारदाराने तक्रारअर्जात वर्णन केलेली रक्‍कम दामदुप्‍पट मुदत ठेव योजनेत पावती क्र.८४६६ ने दि.८/८/२००२ रोजी जाबदार क्र. १ संस्‍थेत भरली होती ही बाब जाबदार क्र.१ ने मान्‍य केलेली आहे. तसेच मुदतीनंतर तक्रारदाराने सदर ठेवपावतीची रक्‍कम परत मिळणेची मागणी केली होती हेदेखील मान्‍य केले आहे. तथापि जाबदार क्र.१ चे वि‍शिष्‍ट कथन असे आहे की, महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये निर्माण झालेल्‍या विशिष्‍ट परिस्थितीमुळे सहकार क्षेत्रातील पतसंस्‍था तांत्रिक दृष्‍टया अडचणीत आलेल्‍या आहेत. त्‍यामुळे एकंदरीत सर्वच पतसंस्‍थामध्‍ये अचानक एकाच वेळी ठेवी काढून घेण्‍याचा सपाटा सुरु झालेला असल्‍याने सर्वच सहकारी संस्‍थांची आर्थिक तरलता अडचणीत आलेली असून संस्‍थेची इच्‍छा असूनही सर्वांचे समाधान होईल अशा ठेवी परत करणे अडचणीचे झालेले आहे. त्‍यामुळे प्रयत्‍नांची शर्थ करुनही व त्‍यांची इच्‍छा व तळमळ असूनही ठेव रकमा परत करणे अडचणीचे व दुरापास्‍त झालेले आहे. तथापि, थक ठेवी परत देण्‍याचे धोरण जाबदार यांनी युध्‍दपातळीवर अवलंबिलेले आहे. कर्जदारांकडून कर्जाची परतफेड न झाल्‍याने मुदतीत ठेवीदारांच्‍या रकमा परतफेड करणे अडचणीचे होऊ लागलेले आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारास कोणतीही दूषित सेवा जाबदार यांनी दिलेली नाही. तक्रारदारास तक्रार दाखल करण्‍याकरिता कोणतेही कारण घडलेले नाही.  जाबदार क्र.२ ते १० यांची मर्यादित स्‍वरुपाची जबाबदारी आहे. सहकारी कायद्यानुसार सभासदांनी खरेदी केलेल्‍या सहकारी संस्‍थेच्‍या समभागाच्‍या रकमेइतकीच सभासदांची जबाबदारी असते. त्‍यापेक्षा जादा कोणतीही जबाबदारी जाबदार क्र.२ ते १० यांची जाबदार क्र.१ करिता येऊ शकत नाही. जाबदार क्र. २ ते १० यांनी संस्‍थेचा कारभार स्‍वच्‍छपणे व प्रामाणिकपणे केलेला आहे. जाबदार क्र. २ ते १० यांची ठेवीच्‍या रकमेची परतफेड करण्‍याची कोणतीही व कसलीही जबाबदारी येत नाही. तरीदेखील जाबदार क्र.२ ते १० हे प्रयत्‍न करुन कर्जरकमा वसूल करुन ठेवपावत्‍यांच्‍या रकमा परत देण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहेत. यदाकदाचित तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्‍याच्‍या निर्णयास हे मंच आल्‍यास त्‍यांना मासिक रु.५,०००/-प्रमाणे हप्‍ता बांधून द्यावा अशी विनंती जाबदार क्र.१ ने केली आहे. अशा कथनांवरुन जाबदार क्र.१ याने प्रस्‍तुत तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती केली आहे.


 

 


 

.     जाबदार क्र.१ ने आपल्‍या लेखी कैफियतीच्‍या पुष्‍ठयर्थ नि.१७ ला आपले शपथपत्र दाखल केले आहे. 


 

 


 

.     जाबदार क्र.२ याने आपली लेखी कैफियत नि.२९ ला दाखल केलेली असून तक्रारदाराचे संपूर्ण कथन अमान्‍य केलेले आहे. तसेच नि.२७ ला अर्ज दाखल करुन तो जाबदार क्र.१ या संस्‍थेचा संचालक नसल्‍याने त्‍यास प्रस्‍तुत प्रकरणातून Discharge/delete करावे अशी मागणी केलेली आहे. त्‍यावर तत्‍कालीन मंचाने सदर अर्जाबाबत अंतिमत: निर्णय घेण्‍यात येईल असा आदेश पारीत केला आहे. जाबदार क्र.२ याने आपल्‍या लेखी कैफियतीत असे कथन केलेले आहे की, तो जाबदार क्र.१ संस्‍थेचा कधीही संचालक नव्‍हता. सदर संस्‍थेच्‍या निवडणूकीत कधीही, उमेदवारी अर्ज देखील त्‍याने दाखल केलेला नव्‍हता. तक्रारदाराने त्‍यास विनाकारण या प्रकरणात जाबदार म्‍हणून सामील केलेले आहे. सबब तक्रार मिसजॉइंडर ऑफ पार्टीज या तत्‍वाने बाधीत होत आहे. म्‍हणून ती तक्रार त्‍याचेविरुध्‍द रद्द करण्‍यास पात्र आहे. सबब ती त्‍याचेविरुध्‍द रद्द करावी अशी विनंती केलेली आहे. जाबदार क्र.२ याचे पुढे म्‍हणणे असे आहे की, मनोहर को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई या संस्‍थेचे कामकाज मनोहर को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.मुंबई या संस्‍थेमार्फत चालते. मनोहर को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मुंबई, शाखा तासगांव असे स्‍वतंत्र संचालक मंडळ अस्त्तिवात नाही. सन २००८-२००९ ते २०१२-२०१३ पर्यंतच्‍या जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था, सांगली यांच्‍या सहीशिक्‍क्‍यानिशीची सदर संस्‍थेच्‍या संचालकांची यादी पाहता जाबदार क्र.२ हा जाबदार क्र.१ या संस्‍थेचा संचालक नाही हे स्‍पष्‍ट होते. सहाय‍क निबंधक, सहकारी संस्‍था, तासगांव यांनी ही संस्‍था मुंबईची असल्‍याने या संस्‍थेच्‍या संचालकांची यादी त्‍यांच्‍याकडे नसल्‍याबाबत पत्र दिलेले आहे. सबब जाबदार क्र.२ या संस्‍थेचा संचालक नसलेने प्रस्‍तुतची तक्रार त्‍याचेविरुध्‍द खारीज होणेस पात्र आहे. जाबदार क्र.२ याचे पुढे म्‍हणेणे असेही आहे की, अर्जदार व मनोहर को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मुंबई च्‍या तासगांव येथील शाखेचे व्‍यवस्‍थापक श्री पाटील यांनी संगनमत करुन दि.२०/४/२००९ चे, जाबदार क्र.२ हा सदर संस्‍थेचा संचालक असल्‍याबद्दलचे पत्र देवून व त्‍या पत्रावर मागील बाजूस लिपिक, सहायक निबंधक सहकारी संस्‍था यांची सही घेवून सदर यादी सहायक निबंधक, सहकारी संस्‍था, तासगांव यांनी दिलेचे भासवून, जाबदार क्र.२ या संस्‍थेचा संचालक आहे असे भासवून, मंचाची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. जाबदार क्र.१ संस्‍थेचे तासगांव येथील शाखा व्‍यवस्‍थापक यांनी जाबदार क्र.१ संस्‍थेचे जे कोणी साक्षीदार आहेत, त्‍यांना वाचविण्‍याकरिता खोटे व बनावट रेकॉर्ड तयार करुन दि.२०/४/२००९ चे बनावट पत्र तयार केलेले आहे. सबब जाबदार क्र.१ यांचे तासगांव येथील शाखा व्‍यवस्‍थापक यांच्‍या विरुध्‍द खोटे व बनावट रेकॉर्ड तयार केल्‍याचे आरोपावरुन फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. जाबदार क्र.२ हा जाबदार क्र.१ संस्‍थेचा संचालक नाही याची पूर्णपणे जाणीव व माहिती असताना त्‍यास मुद्दामहून व जाणीवपूर्वक त्रास देण्‍याचे हेतूने जाबदार क्र.२ विरुध्‍द दाखल केली असल्‍याने ती तक्रारदारावर रु.२५,०००/- भरपाई दाखल खर्च बसवून प्रस्‍तुत तक्रार त्‍याचेविरुध्‍द खारीज करावी अशी मागणी केलेली आहे.


 

 


 

७.     जाबदार क्र.२ याने आपल्‍या लेखी कैफियतीतील कथनांच्‍या पुष्‍ठयर्थ नि.३० ला शपथपत्र दाखल केलेले असून फेरिस्‍त नि.३१ सोबत जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था, सांगली यांनी दि.१०/२/२०१० रोजी दिलेली जाबदार क्र.१ संस्‍थेच्‍या सन २००८-०९ ते २०१२-१३ या कालावधीतील संचालक मंडळाच्‍या यादीची प्रत दाखल केलेली आहे.


 

 


 

८.     जाबदार क्र.३ यांनी नि.५५ ला आपली स्‍वतंत्र लेखी कैफियत दाखल करुन जाबदार क्र.२ च्‍या लेखी कैफियतीप्रमाणेच आपला बचाव घेतलेला असून तो जाबदार क्र.१ या संस्‍थेचा संचालक नाही व त्‍यास जाणूनबुजून खोटेपणाने प्रस्‍तुत प्रकरणात सामील केले असल्‍याने प्रस्‍तुत प्रकरण त्‍याविरुध्‍द तक्रारदारावर नुकसान भरपाई दाखल रु.२५,०००/- चा खर्च बसवून खारीज करावे अशी मागणी केलेली आहे. 


 

 


 

९.     जाबदार क्र.३ याने आपल्‍या लेखी कैफियतीच्‍या पुष्‍ठयर्थ नि.५६ ला आपले शपथपत्र दाखल केलेले असून नि.५७ सोबत एकूण ३ कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्‍या कागदपत्रांमध्‍ये जाबदार क्र.१ या संस्‍थेच्‍या सन २००८-२००९ ते २०१२-१३ या कालावधीतील संचालकांची जाबदार क्र.१ या संस्‍थेच्‍या व्‍यवस्‍थापकाने उपनिबंधक, सहकारी संस्‍था, एल वॉर्ड, कोकण भवन, तिसरा माळा, नवी मुंबई यांना दिलेल्‍या संचालकांच्‍या यादीची प्रत, सहायक निबंधक सहकारी संस्‍था तासगांव यांनी जाबदार क्र.२,, ४ यांना दिलेल्‍या दि.१६/७/२०१० चे पत्राची प्रत तसेच दि.२७/७/२०१० चे पत्राची प्रत दाखल केलेली आहे. दि.१६/७/२०१० च्‍या पत्रातून असे दिसते की, मनोहर को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि.मुंबई यां संस्‍थेचे कार्यक्षेत्र महाराष्‍ट्र राज्‍य असून सदर संस्‍थेचे मुख्‍य कार्यालय, मुंबई येथे असून तासगांव येथे सदर संस्‍थेची शाखा आहे व त्‍या शाखेवर सभासदांनी व्‍यवस्‍थापक समितीवर निवडून दिलेल्‍या संचालकांची समिती कार्यरत नाही. परिणामी, सहायक निबंधक, सहकारी संस्‍था, तासगांव या कार्यालयाकडे संचालक मंडळाचे नावाची यादी उपलब्‍ध नाही असे नमूद केलेले आहे.


 

 


 

१०.    जाबदार क्र.४ याने आपली वेगळी कैफियत दाखल केलेली असून त्‍यात त्‍याने देखील जाबदार क्र.२ आणि ३ यांनी घेतल्‍याप्रमाणे बचाव घेतला आहे व तो सदर संस्‍थेचा संचालक नसल्‍याने तक्रारदारास काहीही सेवा देण्‍यास जबाबदार नसल्‍याने व त्‍यास प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये जाणुनबूजून गोवल्‍याने प्रस्‍तुत प्रकरण त्‍याविरुध्‍द रु.२५,०००/- ची नुकसान भरपाई दाखल कॉस्‍ट लावून खारीज करण्‍याची विनंती केलेली आहे. जाबदार क्र.४ यांनी आपले शप‍थपत्र दाखल केलेले असून त्‍याने देखील वर नमूद केलेली सन २००८-०९ ते २०१२-१३ या कालावधीची जाबदार क्र.१ या संस्‍थेच्‍या संचालक मंडळाच्‍या यादीची प्रत दाखल केलेली आहे.


 

 


 

११.    प्रस्‍तुत प्रकरणात कोणत्‍याही पक्षकाराने मौखिक पुरावा दिलेला नाही.


 

 


 

१२.    तक्रारदारतर्फे त्‍याच्‍या विद्वान वकीलांनी आपला लेखी युक्तिवाद नि.६३ ला दाखल केलेला असून जाबदार क्र.२ आणि ४ यांनी आपला लेखी युक्तिवाद नि.५९ ला दाखल केलेला आहे. त्‍याशिवाय देखील आम्‍ही उभय पक्षकारांच्‍या विद्वान वकीलांचे तोंडी युक्तिवाद ऐकून घेतलेले आहेत.   


 

 


 

१३.    प्रस्‍तुत प्रकरणात खालील मुद्दे आमच्‍या निर्णयाकरीता उपस्थित होतात.


 

 


 

                  मुद्दे                                        उत्‍तरे


 

 


 

१.                  तक्रारदार हा ग्राहक होतो काय ?                          होय.


 

 


 

२.                  जाबदारांनी त्‍यास दुषीत सेवा दिली आहे हे तक्रारदारांनी


 

  शाबित केले आहे काय ?                                             होय.


 

 


 

३.                  तक्रारदारास तक्रार अर्जात मागणी केलेल्‍या रकमा


 

             मिळण्‍याचा त्‍याला हक्‍क आहे काय ?                               होय.


 

 


 

४.                  अंतिम आदेश - खालीलप्रमाणे.


 

 


 

 


 

१४.    आमच्‍या वरील निष्‍कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.


 

 


 

 


 

कारणे


 

 


 

 


 

मुद्दा क्र.१ ते ३


 

 


 

१५.    प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार हा ग्राहक होतो ही बाब कोणीही अमान्‍य केलेली नाही. तसेच तक्रारदाराने जाबदार या सहकारी संस्‍थेच्‍या तासगांव शाखेमध्‍ये दामदुप्‍पट ठेव पावती क्र. ८४६६ ने दि.८/८/२००२ रोजी रक्‍कम रु.४०,०००/- गुंतविली आहे ही बाब देखील कोणत्‍याही जाबदारांनी अमान्‍य केलेली नाही. तद्वतच सदर ठेव पावतीच्‍या मुदतीनंतर तक्रारदार त्‍यास देय असणा-या रकमेची मागणी करण्‍यास संस्‍थेकडे आला होता ही बाब देखील कोणत्‍याही जाबदाराने अमान्‍य केलेली नाही. तक्रारदाराने सदर मुदत ठेव पावतीची प्रत प्रस्‍तुत प्रकरणात नि.५ सोबत अनुक्रम १ ला दाखल केलेली आहे. तिचे अवलोकन करता असे दिसते की, दि.८/८/२००२ रोजी तक्रारदाराने रक्‍कम रु.४०,०००/- एकूण ६६ महिने मुदतीकरिता द.सा.द.शे.१३ टक्‍के या व्‍याजदराने जाबदार क्र.१ या संस्‍थेमध्‍ये जमा केली होती व मुदतीअंती म्‍हणजे दि.८/२/२००८ रोजी त्‍यास रक्‍कम रु.८०,०००/- देण्‍यास जाबदार क्र.१ संस्‍था जबाबदार होती. त्‍यामुळे तक्रारदार व जाबदार क्र.१ सहकारी संस्‍था यामध्‍ये ग्राहक व सेवा देणार असे नाते होते व आहे ही बाब जाबदारांनी अमान्‍य केलेली नाही. सबब मुद्दा क्र.१ चे उत्‍तर हे होकारार्थीच द्यावे लागेल आणि तसे ते आम्‍ही दिलेले आहे.


 

 


 

१६.    दि.८/२/२००८ नंतर तक्रारदाराने त्‍यास देय असणा-या रकमेची मागणी जाबदाराकंडून केली असता त्‍यास अद्यापपावेतो जाबदारांनी रक्‍कम दिलेली नाही असे शपथेवर कथन तक्रारदाराने आपल्‍या शपथपत्रात केलेले आहे. जाबदार क्र.१ याने जरी आपल्‍या लेखी कैफियतीमध्‍ये तक्रारदाराने रकमेची मागणी केली हे नाकारलेले असले तरी इतर जाबदार क्र.२ ते ४ यांनी आपापल्‍या लेखी कैफियतीमध्‍ये ही गोष्‍ट अमान्‍य केलेली नाही. तक्रारदाराने नि.५ या फेरिस्‍तसोबत आपल्‍या दि.२३/९/२००९ च्‍या नोटीसीची स्‍थळप्रत दाखल केलेली आहे. त्‍या नोटीसअन्‍वये तक्रारदाराने जाबदारांकडून वर नमूद केलेल्‍या मुदत ठेवीची मुदतीनंतर देय  असणा-या रकमेची मागणी केल्‍याचे दिसते. त्‍या नोटीसमध्‍ये दामदुप्‍पट ठेव पावतीवरील व्‍याजासह होणारी रक्‍कम रु.८०,०००/- व त्‍यावर दि.१/१/२००८ पासून रक्‍कम प्रत्‍यक्ष देईपर्यंत प्रचलित दराने देय होणारे व्‍याज याची मागणी केल्‍याचे दिसते. सदर नोटीस मूळ जाबदार क्र.१ ते १० यांना यु.पी.सी ने पाठविल्‍याचे दिसते. तक्रारदाराची सदर नोटीस मिळाली नसल्‍याचे कथन कोणाही जाबदाराने केलेले नाही. तक्रारदाराच्‍या शपथेवरुन हे सिध्‍द होते की,सदर नोटीस मिळूनदेखील त्‍यातील मागणीप्रमाणे जाबदारांनी त्‍यास व्‍याजासह रकमा दिलेल्‍या नाहीत. जाबदार क्र.१ याने आपल्‍या लेखी कैफियतीमध्‍ये तक्रारदाराच्‍या मागणीप्रमाणे त्‍यास रकमा का देता येत नाहीत याची काही कारणे दिलेली आहेत. त्‍या कारणांचा सदर तक्रारीशी किंवा तक्रारदाराशी किंवा तक्रारदारास देय असणा-या रकमांशी काहीही संबंध नाही. ठेवपावतीप्रमाणे जेव्‍हा जाबदार क्र.१ या संस्‍थेने तक्रारदाराकडून काही रकमा स्‍वीकारल्‍या, तेव्‍हा मुदतीअंती त्‍या ठेव पावतीत नमूद केलेली रक्‍कम व्‍याजासहीत देण्‍याची जबाबदारी कायद्याने जाबदार क्र.१ संस्‍थेवर येते. जाबदार संस्‍थेस तक्रारदारास रकमा न देण्‍याची कोणतीही कारणे असोत, ती कायद्यापुढे प्रस्‍तुत नाहीत. तक्रारदारास देय असणारी रक्‍कम जाबदारांनी अद्याप दिलेली नाहीत हे स्‍वयंस्‍पष्‍ट आहे. त्‍यामुळे तक्रारदारास जाबदारांनी दूषित सेवा दिलेली आहे हे आपोआपच सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.२ चे उत्‍तर देखील होकारार्थी देण्‍यास पात्र आहे आणि तसे ते आम्‍ही दिलेले आहे.


 

 


 

१७.    ज्‍याअर्थी वर नमूद केलेल्‍या मुद्दा क्र.२ चे उत्‍तर होकारार्थी आले आहे, त्‍याअर्थी तक्रारदारास त्‍याने मागणी केलेली ठेवपावतीची मुदतीअंतीची देय रक्‍कम मिळण्‍यास तो पात्र आहे. तक्रारदाराने सदर रकमेवर रक्‍कम देय झाले तारखेपासून तक्रार दाखल करण्‍याच्‍या तारखेपर्यंत द.सा.द.शे.१३ टक्‍के दराने रक्‍कम रु.९,१०८/- या रकमेची व्‍याजाची मागणी केलेली आहे. तसेच त्‍यास झालेल्‍या मानसिक व शारिरिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.१५,०००/- ची मागणी केली आहे. प्रस्‍तुत प्रकरणातील एकूण परिस्थिती पाहता तक्रारदारास या संपूर्ण रकमा मिळणेस तो पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. तक्रारदारास नोटीस खर्च व तक्रारीचा खर्च म्‍हणून त्‍याने मागितल्‍याप्रमाणे रक्‍कम रु.१,०००/- मिळण्‍यास देखील तो पात्र आहे. सबब आम्‍ही वर नमूद केलेल्‍या मुद्दा क्र.३ चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे.


 

 


 

मुद्दा क्र.४ 


 

 


 

१८.    या संपूर्ण प्रकरणात मुख्‍य मुद्दा हा उपस्थित होतो की, मूळ जाबदार क्र.२ ते ९, (मूळ जाबदार क्र.५ दिपमाला खराडे यांना नि.५ वरील आदेशान्‍वये वगळलेले असलेने व त्‍यानंतर जाबदारांच्‍या क्रमांकात बदल झालेने ) हे तक्रारदारास रकमा देण्‍यास जबाबदार आहेत काय ?


 

 


 

१९.    तक्रारदाराच्‍या तक्रारअर्जातील मूळ कथनानुसार मूळ जाबदार क्र.२ ते १० हे जाबदार क्र.१ संस्‍थेच्‍या तासगांव येथील शाखेचे संचालक आहेत/होते. सबब ते त्‍यास रकमा देण्‍यास जबाबदार आहेत, करिता त्‍यास प्रस्‍तुत प्रकरणात आवश्‍यक पक्षकार म्‍हणून सामील केलेले आहे. तथापि तक्रार प्रलंबित असताना तक्रारदाराने त्‍यात दुरुस्‍ती करुन नव्‍याने सामील करण्‍यात आलेले जाबदार क्र.१० ते २२ यांना सदर सहकारी संस्‍थेचे संचालक म्‍हणून सामील केलेले आहे. हे वर नमूद करण्‍यात आलेले आहे की, तक्रारदाराने तक्रार दाखल करीत असताना जाबदार क्र.१ या संस्‍थेच्‍या तत्‍कालीन संचालक मंडळाची यादी जी तासगांव येथील शाखा व्‍यवस्‍थापकाने त्‍यास दिलेली होती, ती दाखल केलेली असून त्‍यासोबत सदर संस्‍थेच्‍या सांगली येथील शाखेच्‍या शाखा व्‍यवस्‍थापकाने जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था सांगली यांना दिलेल्‍या संचालक मंडळाचे यादीची प्रत दाखल केलेली आहे. त्‍यानुसार मूळ जाबदार क्र.१ ते १० यांना प्रस्‍तुत प्रकरणात जाबदार म्‍हणून सामील करण्‍यात आल्‍याचे दिसते. सदरच्‍या याद्या या जिल्‍हा उपनिबंधक,सहकारी संस्‍था किंवा निबंधक, सहकारी संस्‍था यांच्‍या कार्यालयाकडून आलेल्‍या दिसत नाहीत.  याउलट जाबदार क्र.२, ३ आणि ४ यांनी आपापल्‍या फेरिस्‍तसोबत संचालक मंडळांच्‍या याद्या दाखल केलेल्‍या आहेत. या याद्या जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था, सांगली यांनी दिल्‍याचे दिसते. त्‍यानुसार जाबदार क्र.१० ते २२ यांना प्रस्‍तुत प्रकरणात सामील करुन घेण्‍यात आल्‍याचे दिसते. जाबदार क्र.२ यांने आपल्‍या लेखी कैफियतीत तासगांव येथील शाखा व्‍यवस्‍थापकांवर काही आरोप केलेले आहेत व त्‍यात जाबदार क्र.२ यास जाणुनबूजून व खोटेपणाने तो जाबदार क्र.१ सहकारी संस्‍थेचा संचालक असल्‍याचे कळविल्‍याचा आरोप केलेला आहे. या मंचाच्‍या मताप्रमाणे त्‍या बाबीचा/आरोपांचा विचार करण्‍याची आवश्‍यकता नाही. ती बाब सहकारी कायद्यातील सक्षम अधिका-यांच्‍या अखत्‍यारीतील गोष्‍ट आहे. मूळ जाबदार क्र.२ ते १० यांना त्‍यासंबंधी काही आरोप करायचे असतील तर ते त्‍यांनी अवश्‍य सहकारी कायद्याखालील सक्षम अधिका-यांकडे करावेत. परंतु एक गोष्‍ट प्रामुख्‍याने दिसून येते की, सहकारी कायद्यानुसार कुठल्‍याही सहकारी संस्‍थेच्‍या शाखांकरिता वेगळे आणि स्‍वतंत्र असे संचालक मंडळ असूच शकत नाही. नोंदणीकृत सहकारी संस्‍था ही, कायद्याने अस्तित्‍वात आणलेली एक कायदेशीर व्‍यक्‍ती असते. त्‍यावर सहकारी कायद्याच्‍या प्रावधानानुसार एकच संचालक मंडळ कामकाज करु शकते. हे जरुर आहे की, अशी सहकारी संस्‍था जर वेगवेगळया शाखांतून काम करीत असेल तर त्‍या त्‍या शाखांच्‍या व्‍यवस्‍थापनाकरिता काही व्‍यवस्‍था करु शकेल. एखादे व्‍यवस्‍थापक मंडळ देखील अस्तित्‍वात आणू शकेल. पण असे व्‍यवस्‍थापक मंडळ हे काही संचालक होऊ शकत नाही किंवा संपूर्ण सहकारी संस्‍थेचे ते प्रतिनिधीत्‍व करु शकत नाही. तक्रारदाराने जमा केलेली रक्‍कम ही जाबदार क्र.१ सहकारी संस्‍थेने स्‍वीकारली होती आणि मुदतीनंतर ती रक्‍कम तक्रारदारास देण्‍याची जबाबदारी देखील कायद्याने जाबदार क्र.१ संस्‍थेची होती. पर्यायाने त्‍या संस्‍थेच्‍या संचालक मंडळाची होती. जोपर्यंत अशा सहकारी संस्‍थेच्‍या एखाद्या व्‍यवस्‍थापनातील सदस्‍याची वैयक्तिक जबाबदारी निर्माण होत नाही, तोपर्यंत अशा संस्‍थेच्‍या शाखांमध्‍ये कार्यरत असणा-या आणि व्‍यवस्‍थापन बघणा-या व्‍यक्‍ती किंवा मंडळाला जबाबदार धरता येत नाही व ती जबाबदारी सहकारी संस्‍थेची आणि पर्यायाने तिच्‍या संचालक मंडळाचीच असते. यादृष्‍टीने पाहता तक्रारदारास देय असणा-या रकमा देण्‍याची जबाबदारी जाबदार क्र.२ ते ९ यांचेवर टाकता येत नाही,सबब त्‍यांना या प्रकरणातून वगळावे लागेल. तक्रारदारास वर नमूद केलेल्‍या संपूर्ण रकमा देण्‍याची जबाबदारी ही जाबदार क्र.१ आणि जाबदार क्र.१० ते २२ यांचेवर वैयक्तिक व संयुक्‍तरित्‍या येते. प्रस्‍तुत प्रकरणात सहकारी संस्‍था कायद्याच्‍या कलम ८८ चा विचार करण्‍याची गरज नाही असे या मंचाचे नम्र मत आहे. सबब तक्रारदाराची प्रस्‍तुत तक्रार ही जाबदार क्र.१ व जाबदार क्र.१० ते २२ यांचेविरुध्‍द मंजूर करावी लागेल असे या मंचाचे मत आहे. सबब आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.


 

 


 

आदेश


 

१.                  प्रस्‍तुत तक्रार खर्चासह मंजूर करण्‍यात येते.


 

 


 

२.                  जाबदार क्र.१ आणि जाबदार क्र.१० ते २२ हयांनी वैयक्तिक व संयुक्‍तरित्‍या तक्रारदारास रक्‍कम रु.१,०५,१०८/- प्रस्‍तुत आदेशाच्‍या तारखेपासून ४५ दिवसांचे आत दयावेत.


 

 


 

३.                  सदर मुदतीत रकमा न दिल्‍यास वर नमूद रकमेवर जाबदार क्र.१ आणि जाबदार क्र.१० ते २२ हयांनी वैयक्तिक व संयुक्‍तरित्‍या द.सा.द.शे.९ टक्‍के दराने व्‍याज दयावे.


 

 


 

४.                  प्रस्‍तुत तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.१,०००/- जाबदार क्र.१ आणि जाबदार क्र.१० ते २२ हयांनी वैयक्तिक व संयुक्‍तरित्‍या तक्रारदारास द्यावी.


 

 


 

५.                  वरील सर्व रकमा हया आदेशाच्‍या तारखेपासून ४५ दिवसांत तक्रारदारास दयाव्‍यात, अन्‍यथा, तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या कलम २५ अथवा २७ खालील तरतुदींनुसार दाद मागू शकतील.


 

 


 

सांगली


 

दि. १३/०८/२०१३


 

 


 

 


 

 


 

( सौ मनिषा कुलकर्णी )                           ( ए.व्‍ही. देशपांडे )


 

            सदस्‍या                                        अध्‍यक्ष
 
 
[ A.V. Deshpande]
PRESIDENT
 
[ Smt.M.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.