नि. ३७
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष : श्री.अनिल य.गोडसे
मा.सदस्या : श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र.३३८/१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १३/७/२०१०
तक्रार दाखल तारीख : १५/७/२०१०
निकाल तारीख : ११/८/२०११
-------------------------------------------
आप्पासो बाबूराव रुपनर
वय – ३३, व्यवसाय – व्यापार
रा.पंचशील नगर, सांगली ..... तक्रारदारú
विरुध्द
१. मनोहर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मुंबई
१५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,
एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प.), मुंबई – ४०००७०
२. मनोहर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मुंबई
शाखा सांगली, उमा नारायण कॉम्प्लेक्स,
हरभट रोड, सांगली
३. श्रीमती दिपमाला अशोकराव खराडे, चेअरमन
रा.१२०४, सिध्दीविनायक टॉवर, डूनकॉन काजवे रोड,
भागनारी हौसिंग सोसायटी, सायन चुनाभट्टी,
मुंबई – ४०००२२
४. श्री हिराजी मनोबा निंबाळकर, व्हा.चेअरमन
द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,
एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प.), मुंबई – ४०००७०
५. श्री संतु रखमा सांगळे, सचिव
शिवशक्ती को-ऑप. हौसिंग सोसायटी,
निकोलिस गोंसालविस चाळ, काजूपाडा पाईपलाईन रोड,
कुर्ला, मुंबई – ४०० ०७२
६. श्री गुलाबराव हं.पाटणकर,
द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,
एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प.), मुंबई – ४०००७०
७. श्री रविंद्र गुलाबराव मोहिते
द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,
एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प.), मुंबई – ४०००७०
८. श्रीमती भारती दत्तात्रय पाटणकर,
रा.१२०४, सिध्दीविनायक टॉवर, डूनकॉन काजवे रोड,
भागनारी हौसिंग सोसायटी, सायन चुनाभट्टी,
मुंबई – ४०००२२
९. सौ ज्योती अशोकराव खराडे
रा.१२०४, सिध्दीविनायक टॉवर, डूनकॉन काजवे रोड,
भागनारी हौसिंग सोसायटी, सायन चुनाभट्टी,
मुंबई – ४०००२२
१०. सौ विमल बाळासो बांगर
द्वारा बाळासो बांगर
द्वारा १५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,
एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प.), मुंबई – ४०००७०
११. श्री रंगनाथ बारकु पवार
१५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,
एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प.), मुंबई – ४०००७०
१२. सौ पद्मावती बाळासो किल्लेदार
द्वारा बाळासो दादा किल्लेदार, काजुपाडा,
कंजुत्रर सोसायटी, निकोलिस गोंसालविस चाळ,
कुर्ला, मुंबई – ४०० ०७२
१३. सौ विनया मदन शिंदे
१५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,
एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प.), मुंबई – ४०००७०
१४. श्री रविंद्र मारुती काशिद
द्वारा रेडसन को-ऑप. क्रेडिट सोसायटी,
१५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,
एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प.), मुंबई – ४०००७०
१५. श्री मदन जगन्नाथ शिंदे
१५६, सनी अपार्टमेंट, बेलग्रामी नाका,
एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प.), मुंबई – ४०००७०
१६. श्री संजय घन:शाम बजाज – चेअरमन सांगली शाखा
घनशाम, रतनशीनगर, हॉटेल अक्षरम जवळ, सांगली
१७. श्री संजय श्रीनारायण सारडा
मेमरील कलर लॅब, हरभट रोड,सांगली
१८. श्री अशोक देविकिसण मालू
वखार भाग, हळद भवन जवळ, सांगली
१९. संतोष विद्याधर कोल्हापूरे,
कोल्हापूरे अप्लायन्सेस, गाळा नं.१,
तरुण भारत स्टेडियम, सांगली
२०. विजय विश्वनाथ सावळे,
फौजदार गल्ली, इंडिया ट्रान्स्पोर्ट जवळ, सांगली .....जाबदार
तक्रारदारú तर्फेò : +ìb÷. डी.डी.मुळे, पी.के.जाधव
जाबदार क्र.१,३,५,८,९,१२,१६,१७,१८,१९: एकतर्फा
जाबदार क्र.४,६,७,१०,११,१३,१४,१५,२० : वगळले.
जाबदार क्र.२ : म्हणणे नाही.
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार सोसायटीने मुदत ठेवी अन्वये गुंतविलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार मनोहर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मुंबई (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘सोसायटी’ असा केला जाईल) यांचेकडे रक्कम मुदतठेवी अंतर्गत गुंतविली होती. तक्रारदार यांच्या मुदत ठेवीची रक्कम मागणी करुनही जाबदार यांनी अदा केली नाही. सबब, आपल्याला रक्कम देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.३ अन्वये प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण ५ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.२ यांना नोटीसची बजावणी झालेनंतर ते याकामी हजर झाले परंतु त्यांनी आपले लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द नो से चा आदेश नि.१ वर करण्यात आला.
३. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र. १,३,५,८,९,१२,१६,१७,१८,१९ यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही तसेच त्यांनी आपले लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
४. जाबदार क्र. ४,६,७,१०,११,१३,१४,१५,२० यांना नि.३१ व नि.३४ वरील आदेशान्वये वगळणेत आले.
५. तक्रारदार यांचे विधिज्ञांनी कोणताही तोंडी युक्तिवाद करणेचा नाही असे नमूद केलेने प्रस्तुत प्रकरण निकालासाठी ठेवणेत आले. तक्रारदारांनी त्यांची रक्कम जाबदार सोसायटीमध्ये गुंतविल्याबाबतच्या ठेवपावत्यांच्या प्रती नि.३६ चे यादीने दाखल केल्या आहेत. सदरच्या ठेवपावत्या या तक्रारदार यांचेकडील मूळ पावतीवरुन तपासण्यात आल्या. तक्रारदार यांनी ठेवपावती क्र.१५६०७, १५६०८, १५६०९ अन्वये दि. १४/३/२००८ रोजी एकूण रु.४०,०००/- जाबदार यांचेकडे गुंतविल्याचे दिसून येते. सदर ठेवपावतींची मुदत ही दि.१४/९/२००८ पर्यंत आहे. मुदतीनंतर तक्रारदार यांना एकूण रक्कम रु.४१,४००/- मिळावयाची होती. पावतीची मुदत संपूनही जाबदार यांनी तक्रारदार यांना रक्कम अदा केली नाही. सदर पावत्यांसाठी जाबदार यांनी कोणतीही रक्कम अदा केली नाही असे तक्रारदार यांनी नि.३३ वर नमूद केले आहे. सदर ठेवपावत्यांवर व्याजाचा दर हा ७ टक्के दिसून येतो. त्यामुळे तक्रादार यांनी गुंतविलेली रक्कम, रक्कम गुंतविले तारखेपासून द.सा.द.शे. ७ टक्के दराने मंजूर करण्यात येत आहे.
६. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार संचालकांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो. रकमेची मागणी करुनही ती न देवून सोसायटीने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने ज्या सोसायटीमध्ये ठेव गुंतविलेली आहे, ती सोसायटीच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
७. तक्रारदार यांनी शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांना आपली रक्कम मिळण्यासाठी या न्यायमंचात धाव घ्यावी लागणे ही बाब निश्चितच तक्रारदारांना शारिरिक मानसिक त्रास देणारी आहे. त्यामुळे सदरची मागणी अंशत: मान्य करण्यात येत आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार क्र.१ व २ सोसायटी व सोसायटीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र. १५६०७, १५६०८ व १५६०९ वरील एकूण रक्कम रु.४०,०००/- दि.१४/३/२००८ पासून द.सा.द.शे. ७% दराने व्याजासह अदा करावी.
२. यातील जाबदार क्र.१ व २ सोसायटी व सोसायटीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- अदा करावेत.
३. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.२५/९/२०११ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: ११/०८/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११