Complaint Case No. CC/21/212 | ( Date of Filing : 24 Nov 2021 ) |
| | 1. Dr.Shri.Trambak Fakirasa Gulhane | Shivaji nagar,Tukum,Chandrapur | CHANDRAPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Manipal Signa Helth Insurance Company Through Nagpur Divisional Manager | 148/3, 3 ra mala, Thapar Inclev Ramdaspeth,Maharajbag,Nagpur | Nagpur | MAHARASHTRA | 2. Bank of Maharashtra ,Branch Tukum Chandrapur | Tukum,Chandrapur | CHANDRAPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक ११/०१/२०२३) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५ सह ३८अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ता हा सेवानिवृत्त आहे. विरुध्द पक्ष क्रमांक १ ही विमा कंपनी असून त्यांचे विभागीय कार्यालय नागपूर येथे आहे. श्री शुक्ला हे विभागीय अधिकारी असून नागपूर विभागाअंतर्गत विरुध्द पक्ष क्रमांक १ च्या शाखेचे काम करतात. विरुध्द पक्ष क्रमांक २ ही राष्ट्रीयकृत बॅंक आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक २ यांच्याकडे ६०२१९२२४८९१ क्रमांकाचे बचत खाते उघडले आहे. तक्रारकर्ता यांच्याकडे ऑगस्ट २०१९ मध्ये विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचे अभिकर्ता श्री मोहुर्ले यांनी आरोग्य विमा पॉलिसीच्या वेगवेगळ्या प्लॅन विषयी माहिती दिली. तक्रारकर्त्याने अभिकर्ताच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ऑगस्ट २०१९-२०२० या एका वर्षाच्या कालावधीकरिता रुपये ९,८११/- वार्षिक प्रिमीयम देऊन आरोग्य विमा पॉलिसी विरुध्द पक्ष क्रमांक १ कडून काढली आणि तेव्हा तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्ष क्रमांक २ यांच्याकडे असलेल्या बचत खात्यातून विमा प्रिमीयमची रक्कम परस्पर विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्याकडे वळती झाली. परंतु तक्रारकर्त्यास त्या कालावधीकरिता विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्याकडे घेतलेल्या विमा पॉलिसीचे कोणतेही दस्तावेज मिळाले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने २०२१-२०२२ या कालावधीकरिता विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्याकडे आरोग्य विमा पॉलिसी घेण्याचे नाकारले. तक्रारकर्त्यास दिनांक १५/७/२०२१ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्या अधिकृत मोबाईल क्रमांकावरुन तक्रारकर्त्याच्या मोबाईल क्रमांकावर कॉल आला आणि २०१९-२०२० पर्यंतच्या घेतलेल्या आरोग्य विमा पॉलिसीचे नुतनीकरण करण्याचे तक्रारकर्त्यास सूचविले. त्यावेळी तक्रारकर्त्याने त्याला कोणतीही पॉलिसी घ्यावयाची नाही असे सांगितले. तक्रारकर्त्याने विभागीय अधिकारी श्री शुक्ला यांना सुध्दा त्यांच्या मोबाईलवर फोन करुन विमा पॉलिसी नुतनीकरणाचे कारण सांगून पॉलिसी बंद केल्याबाबतची माहिती दिली. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना तक्रारकर्त्याने पॉलिसी बंद केल्याची माहिती आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडून विमा पॉलिसीचे नुतनीकरण करण्यास नकार दिल्यानंतर सुध्दा विरुध्द पक्ष क्रमांक २ यांच्याशी संगनमत करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी विमा पॉलिसी क्रमांक १००२०००५४०८२/०१/०० तयार करुन तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचेकडे असलेल्या बचत खात्यातून दिनांक १२/८/२०२१ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक २ बॅंकेने तक्रारकर्त्यास कोणतीही सूचना न देता परस्पर विमा प्रिमियमची रक्कम रुपये ९८११/- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्या खात्यात वळती केली. सदर बाब तक्रारकर्ता जेव्हा दिनांक २३/८/२०२१ रोजी पासबुक मध्ये नोंद करण्याकरिता गेले असता त्यांना विरुध्द पक्षाचे बेकायदेशीर कृत्याबद्दल माहित झाले. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक २३/८/२०२१ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक २ यांच्याकडे अर्ज करुन रुपये ९,८११/- परत करण्याची विनंती केली. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी दिनांक ६/१०/२०२१ रोजी तक्रारकर्त्याच्या खात्यातून रुपये ४,९०५/- जमा केले. सदर बाब सुध्दा तक्रारकर्त्याने जेव्हा विरुध्द पक्ष क्रमांक २ यांच्याकडे दिनांक ७/१०/२०२१ रोजी पासबुकमध्ये नोंद करण्याकरिता आले असता त्यांच्या लक्षात आली त्यामुळे तक्रारकर्त्याने पुन्हा दिनांक ७/१०/२०२१ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक २ यांच्याकडे अर्ज करुन उर्वरित रक्कम परत करण्याची विनंती केली. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना उपरोक्त पॉलिसीचे नुतनीकरण करावयाचे नाही याबाबत सूचविले होते. तरी सुध्दा त्यांनी बेकायदेशीरपणे तक्रारकर्त्याच्या खात्यातील रक्कम वळती केली. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास उपरोक्त रक्कम परत न केल्याने तक्रारकर्त्याने दिनांक २०/१०/२०२१ रोजी वकीला मार्फत विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ ला नोटीस पाठविली. नोटीस प्राप्त होऊनसुध्दा त्यांनी त्याची पुर्तता केली नाही.विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास कोणतीही विमा पॉलिसी रक्कम परत न करुन न्युनतापूर्ण सेवा दिल्याने तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांविरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली की, विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिक वा संयुक्तपणे तक्रारकर्त्यास विमा प्रिमीयमची रक्कम रुपये ४,९०५/- व त्यावर दिनांक १२/८/२०२१ पासून १२ टक्के व्याजासह रक्कम तसेच झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्कम रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- देण्याचे आदेशीत व्हावे, अशी प्रार्थना केली.
- तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचा तक्रारीशी काहीही संबंध नसल्याने त्यांना आयोगामार्फत नोटीस काढण्यात आली नाही.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ हजर होऊन त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल करुन त्यामध्ये तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील कथन अमान्य करुन पुढे नमूद केले की, विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी बॅक ऑफ महाराष्ट्र यांच्या नावाने मास्टर पॉलिसी होल्डर म्हणून पॉलिसी काढण्यात आल्यामुळे त्यांना पॉलिसी जारी केली आणि याशिवाय तक्रारकर्त्याचे, विरुध्द पक्ष क्रमांक १ यांच्याकडे नोंदविलेल्या मोबाईल क्रमांक ९१९४२२८३६१५५ आणि ईमेल आय डी वर सुध्दा दिनांक २/११/२०२० रोजी लिंक पाठवली व त्यासोबतच नोंदणी फॉर्मची प्रत पाठवून तक्रारकर्त्यास विमा पॉलिसी ही फ्रीलुक कालावधीमध्ये रद्द व पुनर्रविलोकन करण्याची संधी दिली होती. विरुध्द पक्ष क्रमांक १ हा अभिकर्त्याने केलेल्या कामाबद्दल जबाबदार नाही. तक्रारकर्त्याने दिनांक २४/८/२०२१ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना पाठविलेले पञ हे त्यांना दिनांक १/१०/२०२१ रोजी प्राप्त झाले. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष यांच्याकडे दिनांक २४/८/२०२१ रोजी पॉलिसी रद्द करण्याकरिता आला नव्हता. तक्रारकर्त्याने विमा पॉलिसी रद्द करण्याचे पञ विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना प्राप्त झाल्यापासून कार्यवाही सुरु केली आणि त्यानंतर तक्रारकर्त्यास विमा पॉलिसीच्या प्रिमीयमची ५० टक्के रक्कम रुपये ४,९०५/- दिनांक ६/१०/२०२१ रोजी यु.टी.आर. क्रमांक एन.एफ.टी. १२७९००१६६जीएन०००४७ व्दारे तक्रारकर्त्याचे खात्यात जमा केली. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी आय.आर.डी.ए.आय. च्या तसेच विमा कराराच्या अटी व शर्तीनुसारच तक्रारकर्त्यास रक्कम दिली. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्याच्या खात्यात रक्कम जमा करुन कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नाही तसेच न्युनतापूर्ण सेवा दिली नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, शपथपञ आणि तक्रारीतील कथन, दस्तावेज आणि शपथपञ यालाच लेखी युक्तिवाद समजण्यात यावे अशी पुरसीस दाखल, विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचे लेखी उत्तर, दस्तावेज आणि लेखी उत्तर आणि दस्तावेच यालाच शपथपञ आणि लेखी युक्तिवाद सजमण्यात यावे अश्या अनुक्रमे दिनांक १७/११/२०२२ आणि १०/०१/२०२३ रोजी पुरसीस दाखल तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद आणि परस्पर विरोधी कथनावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे १. विरुध्द पक्ष क्र. १ यांनी तक्रारकर्त्याप्रति नाही न्युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ २. आदेश कायॽ अंतिम आदेशाप्रमाणे कारणमीमांसा मुद्दा क्रमांक १ बाबतः- - तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे, ही बाब निर्विवाद आहे. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याने आरोग्य विमा पॉलिसी रद्द केल्यानंतर विरुध्द पक्षाने विमा पॉलिसीच्या प्रिमीयमची रक्कम रुपये ९,८११/- पूर्ण परत न करता अर्धीच रक्कम परत केली याबाबत उभयपक्षात वाद आहे. तक्रारीत दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याकडून ऑगस्ट २०२०-२०२१ या एका वर्षाच्या कालावधीकरिता आरोग्य विमा पॉलिसी घेतली होती. सदर विमा पॉलिसी ही मास्टर पॉलिसी असून बॅक ऑफ महाराष्ट्र च्या नावाने होती. तक्रारकर्त्याचे बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये ६०२१९२२४८९१ क्रमांकाचे बचत खाते आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष विमा कंपनीकडून आरोग्य विमा पॉलिसी घेण्याकरिता बॅंक ऑफ महाराष्ट्रला भरुन दिलेल्या नोंदणी फॉर्म मध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्र कडे असलेल्या ६०२१९२२४८९१ खात्यामधून आरोग्य विमा पॉलिसीच्या प्रिमीयमची रक्कम रुपये ९,८११/-कपात करण्याचे अधिकार दिलेले होते. तक्रारकर्त्याचे बॅंक ऑफ महाराष्ट्र कडे असलेल्या बचत खात्यातून बॅंक ऑफ महाराष्ट्र ला दिलेल्या अधिकारान्वये त्यांनी विमा पॉलिसीच्या वार्षिक प्रिमीयम करिता रक्कम रुपये ९,८११/- विरुध्द पक्ष विमा कंपनीकडे जमा/वळती करण्यात आली. तक्रारकर्त्यास पुढील कालावधीकरिता आरोग्य विमा पॉलिसी नको होती. त्याचे बॅंक ऑफ महाराष्ट्र कडे असलेल्या खात्यातून दिनांक १२/८/२०२१ रोजी रुपये ९८११/- वार्षिक प्रिमियमचे विरुध्द पक्षाकडे जमा करण्यात आले. परंतु तक्रारकर्त्यास सदर पॉलिसी नको असल्याने त्यांनी दिनांक २४/८/२०२१ रोजी पॉलिसीच्या पुढील कालावधीकरिता तक्रारकर्त्याचे खात्यातून वळती केलेली विमा प्रिमीयमची रक्कम रुपये ९,८११/- परत त्याच्या खात्यामध्ये जमा करण्याकरिता बॅंक ऑफ महाराष्ट्र कडे अर्ज केला. विरुध्द पक्ष/विमा कंपनीने तक्रारकर्त्याचे पञ प्राप्त झाल्यानंतर विमा पॉलिसीच्या क्लॉज २३ मध्ये नमूद प्रिमियम परत करण्याच्या अटी व शर्तीनुसार तक्रारकर्त्यास विमा प्रिमीयम भरलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम रुपये ४,९०५.५१/- यु.टी.आर. क्रमांक १२७९००१६६GN०००४७ एन.एफ.टी. व्दारे दिनांक ६/१०/२०२१ रोजी तक्रारकर्त्याच्या बॅंक ऑफ महाराष्ट्र कडे असलेल्या बचत खात्यात जमा केली. विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याने भरुन दिलेला नोंदणी फॉर्म, विमा प्रिमीयमचे प्रमाणपञ तसेच अटी व शर्ती प्रकरणात दाखल केलेले आहे. परंतु तक्रारकर्त्याने पुढील कालावधीकरिता विरुध्द पक्ष विमा कंपनीला उपरोक्त आरोग्य विमा पॉलिसी रद्द करण्याबाबत दिनांक २४/८/२०२१ रोजी विरुध्द पक्ष विमा कंपनीला कळविले नाही. विमा पॉलिसीचा करार हा विमा कंपनी व तक्रारकर्ता यांच्यामध्ये झालेला आहे. त्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्ती या दोघांनाही बंधनकारक असतात. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास त्याचे पञ प्राप्त झाल्यापासून पॉलिसीच्या क्लॉज २३ मध्ये नमूद अटी व शर्तीनुसार ५० टक्के रक्कम रुपये ४९०५.५१/- त्याचे खात्यात जमा करुन विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिली नाही, या निष्कर्षाप्रत आयोग आले आहे. सबब खालिलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र. २१२/२०२१ खारीज करण्यात येते.
- उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
| |