Maharashtra

Ahmednagar

CC/15/143

Babanrao Rannath Davakhar - Complainant(s)

Versus

Manipal Seeds(India)Pvt.Ltd. - Opp.Party(s)

Kakad

23 Jun 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/15/143
( Date of Filing : 17 Apr 2015 )
 
1. Babanrao Rannath Davakhar
Bhalwani,Tal Parner
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manipal Seeds(India)Pvt.Ltd.
Survey No.262,Aurangabad-Kannad Road,A/P Shivari,Tal Kannad,
Aurangabad
Maharashtra
2. Ganesh Krushi Seva Kendra,Prop.Jijabapu Sukhdeo Gulve
Sakur Phata,(Pimpal Depa),Tal Sangamner
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Kakad, Advocate
For the Opp. Party: R.B. Gandhi for Opp. 2, Advocate
Dated : 23 Jun 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – २३/०६/२०२०

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारदार हे शेतकरी शेतकरी असुन शेतीचा व्‍यवसाय करत आहे. तक्रारदाराने मौजे भाळवणी येथे त्‍याच्‍या मालकीच्‍या जमिन गट नं.६८५, ८५६, ६८७, ८५६/१, ८१८ पैकी हेक्‍टर यामध्‍ये सन २०१४ साली कांदा बसवंत ७८० या कांद्याची लागवड केली होती. तक्रारदाराने सामनेवाले क्र.२ यांच्‍या दुकानातुन दिनांक १०-०७-२०१४ रोजी कांदा बसवंत ७८० या जातीच्‍या कांद्याची बियाणे नग ३० प्रत्‍येकी ५०० ग्रॅम रक्‍कम रूपये ३३,७५०/- खरेदी केले होते. सदरचे कांद्याचे बियाणे तक्रारदाराने त्‍याच्‍या  मालकीच्‍या जमीनीमध्‍ये लावले होते. परंतु सदर बियाणे निष्‍कृष्‍ट दर्जाचे होते. त्‍यामुळे बियाणांची उगवण झालेली नाही, म्‍हणुन तक्रारदाराने दिनांक ११-०८-२०१४ रोजी पंचायत समितीकडे अर्ज दिला व त्‍या अनुषंगाने तालुका बियाणे तक्रार निवारण समिती यांनी दिनांक २२-०८-२०१४ रोजी अहवाल दिला. तालुका बियाणे तक्रार निवारण समिती यांनी तक्रारदाराचे शेताची पाहणी केली. त्‍यावेळी सामनेवाले कंपनीचे अधिकारी श्री.जिजाबापू गुळवे हे हजर होते. तालुका बियाणे तक्रार निवारण समिती यांचे अहवालानुसार फक्‍त १५-२० टक्‍के पर्यंत उगवण झाल्‍याचे आढळुन आले. सदर बाबीवरून बियाणांची उगवन कमी व साधारण होती. यावरून सदरचे कांद्याचे बियाणे अत्‍यंत निष्‍कृष्‍ट दर्जाचे होते. तक्रारदाराला एकुण नुकसान रक्‍कम रूपये १०,८८,२५०/- चे झाले. त्‍यामुळे तक्रारदाराने सामनेवाले क्र.१  व २ यांचेविरूध्‍द  नुकसान भरपाई करीता दिनांक ०९-०१-२०१५ रोजी रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविली होती. सामनेवाले क्र.१ यांच्‍या वकिलातर्फे दिनांक १७-०१-२०१५ रोजी व सामनेवाले क्र.२ यांनी त्‍यांच्‍या  वकिलामार्फत दिनांक २९-०१-२०१५ रोजी खोटे उत्‍तर पाठविले. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे मागणीची कोणतीही दखल घेतली नसल्‍याने व नुकसान भरपाई दिली नसल्‍याने सदर तक्रार मंचात दाखल केली आहे.

३.  तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, सामनेवाले यांनी रक्‍कम रूपये १०,८८,२५०/- नुकसान भरपाई तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळण्‍याचा आदेश व्‍हावा.

४.  तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली. सामनेवाले क्र.२ प्रकरणात हजर झाले व निशाणी क्रमांक १३ वर त्‍यांचा जबाब दाखल केला. सामनेवाले क्र.२ यांनी जबाबात असे कथन केले आहे की, तक्रारीत लावलेले आरोप खोटे असुन त्‍यांना नाकबुल आहे. सामनेवाले क्र.२ यांनी पुढे असे कथन केले आहे की, सामनेवाले क्र.२ यांनी विनोद कृषीधन, सिंदखेडा, स्‍टेशन रोड, धुळे यांच्‍याकडुन खरेदी केलेले होते व सदर बियाणे सिलबंद पिशवीत विकलेले होते. तक्रारदाराने सदर बियाण्‍यांचा वापर योग्‍यरितीने केलेला नाही व त्‍याची पेरणी योग्‍य रितीने केलेली नाही. त्‍यामुळे पेरणी करून बियाणांची उगवण कमी जास्‍त होते. त्‍यामुळे बियाणे खोल जाते, कमी अधिक पाणी देणे असे प्रकार संभवू शकतात. रोपवाटिकेमध्‍ये बियाणे फेकुन त्‍यावर थोडीसी माती टाकली जाते. जास्‍त माती पडल्‍याने बियाण्‍यांची उगवण क्षमता कमी होऊन.  अर्थात हा सर्व प्रकार तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडुन कांदा बसवंत ७८० हे बी घेतले. तक्रारदाराने त्‍याची पेरणी बरोबर केलेली नाही. कांदा पिकाची लागवड कांदा बियाणे शेतामध्‍ये बियाणे परेणी करून करण्‍याची शिफारस कृषी अधिकारी यांनी केली नाही. रोप वाटिकेमध्‍ये कांदा रोपे तयार करून पुर्नलागवड करण्‍याची शिफारस कृषी अधिकारी यांनी केलेली आहे. तक्रारदाराने त्‍याप्रमाणे लागवड न करता तक्रारदाराने चुकीच्‍या पध्‍दतीने लागवड केल्‍याचे कबुल केले आहे. सदर तक्रार खोट्या स्‍वरूपाची असल्‍याने तसेच तक्रारदाराने जरूरीचे पक्षकार म्‍हणून कृषीधन केंद्र, स्‍टेशनरोड, सिंदखेडा जि. धुळे यांना समाविष्‍ट केले नाही. म्‍हणुन सदर तक्रार या मंचात चालु शकत नाही. सदर तक्रार खोट्या स्‍वरूपाची असल्‍याने खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती करण्‍यात आली आहे.

५.  सामनेवाले क्र.१ यांना नोटीस पाठविली असता सदर नोटीस घेण्‍यास नकार दिला. म्‍हणुन निशाणी क्रमांक १ वर सामनेवाले क्र.१ यांचेविरूध्‍द प्रकरण एकतर्फा चा‍लविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला.

६.  तक्रारदाराची दाखल तक्रार, दस्‍तऐवज, सामनेवालेने दाखल केलेला जबाब तक्रारदारातर्फे युक्तिवाद व सामनेवाले क्रमांक २ चा युक्तिवाद ऐकला असता मंचासमोर खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्‍यात येत आहे.

अ.क्र.

मुद्दे

निष्‍कर्ष

१.

तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ?

होय

२.

सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदाराप्रती  अनुचित व्‍यापारी प्रथेची अवलंबना केली आहे काय ?

होय

३.

आदेश काय ?

अंतीम आदेशाप्रमाणे

 

मुद्दा क्र.१ -    

७.  तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या मालकीच्‍या शेतजमीनीमध्‍ये सामनेवाले क्र.१ यांनी उत्‍पादीत केलेले कांदा बसवंत ७८० या जातीच्‍या कांद्याचे बियाणे सामनेवाले क्र.२ यांच्‍या दुकानातुन दिनांक १०-०७-२०१४ रोजी नग ३० प्रत्‍येकी ५०० ग्रॅम रक्‍कम रूपये ३३,७५०/- खरेदी केले होते. याबाबत कोणताही वाद नसल्‍याने तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ व २ यांचे ग्राहक आहेत, हे सिध्‍द होते. म्‍हणुन मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

मुद्दा क्र.२ –

८.   तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ कंपनीचे कांदा बसवंत ७८० या कांद्याचे बियाणेची लागवड त्‍याचे मालकीचे शेतात केली होती व ती लागवड केल्‍यानंतर त्‍याची उगवण १५ ते २० टक्‍के पर्यंत झाली होती, ही बाब तक्रारदाराने दाखल केलेल्‍या दिनांक २२-०८-२०१४ रोजीच्‍या तालुका बियाणे समितीच्‍या अहवालावरून सिध्‍द होते. सामनेवालेने त्‍याच्‍या जबाबात सदरचे कांद्याचे जी उगवण कमी प्रमाणात झाली होती याचे कारण वेगळे होऊ शकते, असे नमुद केले आहे. सदर बियाण्‍यांचे लागवणीमध्‍ये लागवड करतांना तक्रारदाराकडुन चुक झाली असेल व त्‍यात योग्‍य प्रकारे पाणी किंवा माती टाकलेली नसेल. त्‍यामुळे उगवण क्षमता कमी होवू शकते. परंतु सामनेवाले क्र.२ ने ही बाब सिध्‍द करण्‍याकरीता कोणताही पुरावा मंचात सादर केलेला नाही. याउलट सामनेवाले क्र.१ कंपनी ही बसवंत ७८० या कांद्याच्‍या बियाण्‍यांची उत्‍पादक असुनही प्रकरणात हजर झाली नाही व त्‍याबाबत त्‍यांची बाजु मांडलेली नाही. याचा अर्थ तक्रारदाराने तक्रारीत सामनेवाले क्रमांक १ व २ यांचेविरूध्‍द बियाणे संदर्भात लावलेले आरोप सिध्‍द  होत आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

मुद्दा क्र.३ -    

९.   मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरून तसेच तक्रारदाराला कांद्याची पेरणी करता आलेल्‍या एकुण खर्चाचा कोणताही पुरावा प्रकरणात सादर केलेला नसल्‍याने सदर बाब ग्राह्य धरून खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतीम आदेश

१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

२. सामनेवाले क्र.१ व २ यांनी वैयक्तिकपणे अथवा संयुक्तिकपणे तक्रारदाराने खरेदी केलेल्‍या बियाण्‍यांची किंमत रक्‍कम रूपये ३३,७५०/- (तेहतीस हजार सातशे पन्‍नास मात्र) द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याजासह दिनांक १६-०४-२०१५ पासून तक्रारदाराला द्यावी.  

३. सामनेवालेने तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये १०,०००/- (अक्षरी दहा हजार मात्र) व  सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार मात्र) द्यावा.

 

४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून ३० दिवसाच्‍या आत करावी.

५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत  करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.