सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 40/2014.
तक्रार दाखल दि.15-03-2014.
तक्रार निकाली दि.24-07-2015.
1. सौ.लता घमाजी आटपाडकर,
2. कु. मनाली घमाजी आटपाडकर,
3. कु. तनय घमाजी आटपाडकर,
नं.1 स्वतःकरीता व नं.2 व 3 करीता
अ.पा.क. आई
4. श्री. घमाजी बाबा आटपाडकर,
नं.4 स्वतःकरीता व नं.2 ते 4 करीता
सर्व रा. उमाजी नाईक चौक, रविवार पेठ,फलटण .... तक्रारदार
विरुध्द
1. माणिकराव पवार ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.,सरडे .,
मुख्य कार्यालय, माणिक कॉम्प्लेक्स, रविवार पेठ,
फलटण, ता.फलटण, जि.सातारा.
2. श्री. शिरीष माणिकराव पवार, चेअरमन
3. सौ. अलका शिरीष पवार,
नं.2 व 3 रा. लक्ष्मीनगर, रामालय अपार्टमेंटच्या पाठीमागे,
फलटण, ता. फलटण, जि.सातारा.
4. श्री. विठ्ठल सुभेदार पवार, व्हा.चेअरमन,
5. श्री. संतोष भिमराव आढाव, संचालक
6. श्री. अर्जुन सुखदेव घुले, संचालक
नं. 4 ते 6 रा. गुणवरे,ता.फलटण,जि.सातारा
7. श्री. श्रीपाद भास्कर ढब्बु,संचालक
रा. सरडे, ता. फलटण,जि.सातारा
8. श्री.सुनिल दत्तात्रय कोठावळे,संचालक,
रा. तळवडे, ता.फलटण,जि.सातारा
9. श्री. किरण जनार्दन टंकसाळे,संचालक,
रा.स्वामी विवेकानंदनगर,फलटण,जि.सातारा
10. श्री. राजेंद्र दिगंबर माने, संचालक,
रा. बुधवार पेठ, फलटण,ता.फलटण,जि.सातारा
11. श्री. विजयसिंह भाऊसो ना.निंबाळकर,संचालक
रा. वाठार, निं. ता.फलटण जि.सातारा.
12. श्री.चंद्रशेखर विठ्ठल पवार,संचालक,
13. श्री. अशोक केशवराव पवार,संचालक,
14 श्री. संतोष सिताराम पवार, व्यवस्थापक,
नं. 12 ते 14 रा.पवार गल्ली, फलटण,
ता.फलटण, जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.ए.एम.गायकवाड.
जाबदार 1 व 2 तर्फे– अँड.एस.एच.कदम.
जाबदार 1 व 2 विरुध्द (नो-से)
जाबदार 3 ते 14 विरुध्द (एकतर्फा)
-ः न्यायनिर्णय ः-
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या यानी पारित केला)
1. अर्जदार हे वर दिले पत्त्यावर रहात असून शेती हा त्यांचा व्यवसाय आहे. अर्जदारांचे हिंदू एकत्र कुटूंब आहे. जाबदार क्र. 1 ही संस्था महाराष्ट्र सहकार कायदा 1960 नुसार नोंदणी झालेली आहे. जाबदार क्र. 2 हे संस्थेचे चेअरमन असून जाबदार क्र. 3 हे सन 2007 मध्ये चेअरमन म्हणून कार्यरत होते व जाबदार क्र. 4 हे विद्यमान व्हाईस चेअरमन आहेत. जाबदार क्र. 5 ते 13 हे संस्थेचे संचालक असून जाबदार क्र 14 हे व्यवस्थापक आहेत.
2. जाबदार क्र. 1 संस्थेचा व्यवसाय हा बँकींग स्वरुपाचा आहे. जाबदार पतसंस्थेमध्ये तक्रारदार क्र. 1 ते 4 यांनी त्यांचे नावे मुदत ठेवपावत्या ठेवलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे,-
3. अर्जदार नं. 2 कु.मनाली घमाजी आटपाडकर, अ.पा.क. आई सौ.लता घमाजी आटपाडकर हीचे नावे ठेवलेल्या ठेवपावत्यांचा तपशील,-
अ.क्र. | ठेवपावती क्रमांक | ठेव ठेवलेची तारीख | ठेव रक्कम | मुदत संपलेची तारीख |
1 | 573 | 07/11/2007 | 25,000/- | 07/05/2013 |
2 | 574 | 07/11/2007 | 25,000/- | 07/05/2013 |
3 | 575 | 07/11/2007 | 25,000/- | 07/05/2013 |
4 | 576 | 07/11/2007 | 25,000/- | 07/05/2013 |
5 | 577 | 07/11/2007 | 25,000/- | 07/05/2013 |
अर्जदार नं. 3 कु.तनय घमाजी आटपाडकर, अ.पा.क. आई सौ.लता घमाजी आटपाडकर हीचे नावे ठेवलेल्या ठेवपावत्यांचा तपशील,-
अ.क्र. | ठेवपावती क्रमांक | ठेव ठेवलेची तारीख | ठेव रक्कम | मुदत संपलेची तारीख |
1 | 578 | 07/11/2007 | 25,000/- | 07/05/2013 |
2 | 579 | 07/11/2007 | 25,000/- | 07/05/2013 |
3 | 580 | 07/11/2007 | 25,000/- | 07/05/2013 |
4 | 581 | 07/11/2007 | 25,000/- | 07/05/2013 |
5 | 582 | 07/11/2007 | 25,000/- | 07/05/2013 |
4. वर नमूद परिशिष्टाप्रमाणे जाबदारांकडे तक्रारदारांनी ठेवी ठेवलेल्या आहेत. सदर ठेवपावत्यांवर सन 2007 मध्ये संस्थेचे तात्कालीन चेअरमन-जाबदार क्र. 3 यांच्या सहया आहेत. तसेच त्यावेळेचे व्यवस्थापक म्हणून जाबदार क्र. 14 यांनी सहया करुन सदरच्या पावत्या तक्रारदारांच्या ताब्यात दिल्या. अशारितीने जाबदार क्र. 1 संस्थेशी व जाबदार क्र. 2 ते 14 यांचेशी तक्रारदार यांचे ग्राहक म्हणून नाते निर्माण झाले. मुदत ठेव पावत्यांच्या मुदती संपल्यानंतर तक्रारदाराने पावत्यांवरील रकमांची मागणी केली असता जाबदारांनी रक्कम आठ दिवसात देणेचे आश्वासन दिले. तक्रारदार हे आठ दिवसानंतर जाबदार क्र. 1 संस्थेत रक्कम घेणेसाठी गेले असता सदरची रक्कम देणेची टाळाटाळ करुन उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. त्यामुळे तक्रारदारानी जाबदार क्र. 2 ते 14 यांची भेट घेतली. त्यांचेकडूनही उडवाउडवीचीच उत्तरे मिळाली. तक्रारदार क्र. 1 व 4 यांनी तक्रारदार क्र. 2 व 3 यांचे वतीने जाबदार क्र. 1 ते 14 यांना रजि. नोटीस पाठवून पावतीवरील रकमा आठ दिवसांचे आत देण्याचे कळविले. परंतु ,नोटीस मिळूनही जाबदार क्र. 1 ते 14 यांनी रकमा दिल्या नाहीत, त्यामुळे तक्रारदारांना या मे. मंचामध्ये सदरचा अर्ज दाखल करावा लागला. तक्रारदारांना वेळेत पैसे मिळाले नाहीत त्यामुळे तक्रारदारांना मानसिक व शारिरीक त्रास झाला आहे. सदरचे कारण (Cause of action) हे मे. मंचाच्या स्थळसिमेत कसबे फलटण ता. फलटण जि. सातारा येथे घडले आहे. तक्रारदाराने मंचास खालीलप्रमाणे विनंती केली आहे.
अ. तक्रारदार यांना अर्ज कलम 3 मध्ये नमूद परिशिष्टाप्रमाणे दामदुप्पट ठेवींच्या रकमा व्याजासह मिळाव्यात व त्या वसूल होईपर्यंत संपूर्ण रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के व्याज देण्याचा जाबदार संस्था व वैयक्तिक पदाधिकारी यांना हुकूम व्हावा.
ब. अर्ज विनंती कलम 3 अ मध्ये नमूद रकमेवरील व्याज ठेवपावत्यावरील मुदत संपलेपासून रक्कम मिळेपर्यंत जाबदारांनी तक्रारदारास देण्यात यावी असा आदेश मे. कोर्टाने जाबदार क्र. 1 ते 14 यांना द्यावा.
क. तक्रारदार यांना जाबदार संस्था व संस्थेचे प्रत्येक पदाधिकारी यांचेकडून नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.1,00,000/-,मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- जाण्यायेण्याचा खर्च रक्कम रु. 10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- संस्था व संस्थेचे पदाधिकारी यांचेकडून देववावा.
ड. जाबदारांकडून तक्रारदारांची रक्कम वसूल न झालेस संस्थेचे पदाधिकारी, माजी पदाधिकारी, भविष्यात अस्तित्वात येणारे पदाधिकारी, यांचे स्थावर व जंगम मालमत्तेतून अर्जदारांची रक्कम वसूल होवून मिळावी.
येणेप्रमाणे तक्रारदारांचा तक्रार अर्ज असे.
5. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 3 ते 14 यांना नोटीसा लागू होवूनही ते मंचात हजर झालेले नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द मे. मंचाने दि. 5/8/2014 व दि.12/1/2015 रोजी एकतर्फा आदेश पारीत केलेला आहे. तसेच जाबदार क्र. 1 व 2 तर्फे अँड.एस.एच.कदम हजर होवूनही त्यांनी म्हणणे दाखल कले नाही. त्यामुळे जाबदार क्र. 1 व 2 विरुध्द मे. मंचाने दि. 5/8/2014 रोजीय नो-से चा आदेश पारीत केलेला आहे.
म्हणूनच प्रस्तुत कामात कोणाचेही म्हणणे दाखल झालेले नाही.
6. निशानी क्र. 3 कडे तक्रारदाराचा वकील नेमणेसाठी परवानगीचा अर्ज, नि. 1 कडे तक्रारदारांचा तक्रार अर्ज, नि. 2 कडे तक्रार अर्जासोबतचे अँफीडेव्हीट, नि. 4 कडे तक्रारदारतर्फे ए.एम.गायकवाड वकीलांचे वकीलपत्र, नि.5 कडे फेरिस्त, नि. 5/1 ते 5/6 कडे तक्रारदाराच्या मुदत ठेव पावत्यांच्या साक्षाकिंत प्रती, नि. 5/7 कडे तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेच्या मॅनेजरना दि.7/5/13 रोजी दामदुप्पट ठेव योजनेतील पैसे मिळणेबाबत केलेल्या अर्जाची जाबदार पतसंस्थेची पोहोच असलेली स्थळप्रत, नि. 5/8 कडे सहाय्यक निबंधक यांनी दिलेली जाबदार पतसंस्थेच्या संचालकांची यादी, 5/9 कडे अँड.राजेंद्र यादव यांनी जाबदारांना रजि.ए.डी.ने पाठवलेल्या नोटीसीची स्थळप्रत, नि.5/10 ते 5/12 कडे जाबदारांना पाठवलेल्या नोटीसच्या पोहोचपावत्या, नि. 5/13 कडे तक्रारदार क्र. 1 यांना तक्रारदार क्र. 2,3,4 यांनी दिलेल्या मुखत्यारपत्राची सत्यप्रत, नि. 5/14 कडे जाबदारांना मंचाकडून पाठवलेली दि.15/3/2014 ची नोटीस, नि. 6 कडे जाबदार क्र. 1 व 2 यांचेतर्फे अँड.एस.एच.कदम यांचे वकीलपत्र, नि. 7 कडे जाबदारांचा म्हणणे देणेसाठी मुदत अर्ज, अर्ज मंजूर, नि.8 कडे जाबदारांना पाठवलेल्या नोटीसांचा अहवाल दाखल, नि. 8/1 कडे जाबदार क्र. 9 चा इंटिमेशन टाकली, नि. 8/2 कडे जाबदार क्र. 4 चा सदर इसम घेत नाही, नि.8/3 कडे जाबदार क्र. 10 चा रिफ्यूज्ड, नि.8/4 कडे जाबदार क्र. 1 चा रिफ्यूज्ड, नि.8/5 कडे जाबदार क्र. 8 व नि.8/6 कडे जाबदार क्र. 13, नि.8/7 कडे जाबदार क्र. 14, नि. 8/8 कडे जाबदार क्र. 2, नि. 8/9 कडे जाबदार क्र. 3, नि. 8/10 कडे जाबदार क्र. 5, नि.8/11 कडे जाबदार क्र. 12, नि.8/12 कडे जाबदार क्र. 6, नि.8/13 कडे जाबदार क्र. 7, यांच्या सहीच्या नोटीसच्या पोहोच पावत्या आहेत. नि. 8 /ए कडे तक्रारदारांचा जाबदार क्र. 4 व 11 यांना फेरनोटीसीसाठी अर्ज, अर्ज मंजूर, नि.8/ब कडे मंचातर्फे काढलेल्या फेर नोटीसा, नि.8/सी कडे जाबदार क्र. 4 यांना पाठवलेल्या नोटीस इसम घेत नाही या शे-यासोबत पाकीट परत, नि. 9 कडे जाबदार क्र. 11 यांना जाहीर समन्ससाठी मंचाकडून पाठवलेला मसूदा, नि. 10 कडे जाबदार क्र. 11 यांना जाहीर समन्स काढण्यासाठी परवानगी अर्ज ,अर्ज मंजूर. नि. 11 कडे जाहीर समन्सचा पेपर दाखल करण्यासाठी परवानगी अर्ज, अर्ज मंजूर. नि. 12 कडे जीहीर समन्स काढलेले वर्तमानपत्र/पेपर दाखल, नि. 13 कडे तक्रारदाराचे सरतपासाचे अँफीडेव्हीट, नि.14 कडे कागदयादीने मुळ ठेवपावत्या मंचात दाखल, नि.14/14 कडे जाबदारांना पाठवलेल्या नोटीसच्या पोहोचपावत्या व परत आलेली पाकीटे इ. कागद तक्रारदारांनी मंचात दाखल केलेले आहेत.
7. तक्रारदारांचा तक्रार अर्ज व त्यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदारांचे दरम्यान ग्राहक व सेवादेणार
असे नाते आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदारांस द्यावयाच्या
सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
3. जाबदार हे तक्रारदारांच्या रकमा देणेस
जबाबदार आहेत काय? होय.
4. अंतिम आदेश काय? तक्रार अर्ज अंशतः मंजूर.
विवेचन-
8. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदारांनी जाबदार पतसंस्थेमध्ये स्वतःचे व आपल्या कुटूंबातील इतरांच्या नावे जाबदार पतसंस्थेमध्ये मुदत ठेवी ठेवल्या आहेत. त्यामुळे तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते निर्माण झाले आहे. तक्रारदाराने मुदत ठेवींच्या मुदती संपल्यानंतर जाबदार पतसंस्थेमध्ये मुदत ठेवींच्या रकमेची वारंवार मागणी केली परंतु, जाबदार हे तक्रारदारांना रकमा देवू शकले नाहीत व रकमा देणेस टाळाटाळ करु लागले म्हणून शेवटी तक्रारदारांना मे. मंचात तक्रार दाखल करणे भाग पडले. तक्रारदारांच्या रकमा जाबदारांनी मुदत संपलेनंतरही देवू शकले नाहीत त्यामुळे जाबदारांकडून तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी निर्माण झाली. जाबदारांनी तक्रारदारांना वेळेत रकमा दिल्या नाहीत त्यामुळे त्यांना शारिरीक व मानसिक त्रास झाला या सर्वास जाबदारच जबाबदार आहेत. या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. येथे आम्ही Co-operative Corporate Veil चा आधार घेत आहोत व तक्रारदारांच्या रकमा त्यांना परत न केलेमुळे तक्रारदारास झालेल्या आर्थिक व शारिरीक त्रासास जाबदार क्र. 1 ते 13 यांना वैयक्तिक व संयुक्तिकपणे आणि जाबदार क्र. 14 यांना फक्त संयुक्तिकपणे जबाबदार धरीत आहोत. जाबदार क्र. 14 हे व्यवस्थापक म्हणजेच जाबदार पतसंस्थेचे नोकर या वर्गाखाली येत असल्याने त्यांना वैयक्तिक जबाबदार धरणे न्यायोचित ठरणार नाही असे मे. मंचाचे मत आहे. म्हणून जाबदार क्र. 14 यांना फक्त संयुक्तिकपणे जबाबदार धरीत आहोत.
9. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतात.
-ः आदेश ः-
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2. तक्रारदार याना खाते क्र. 573 वरील रक्कम रु.25,000/- व त्यावर दि.7-11-2007 पासून आदेश पारित तारखेपर्यंत मुदत ठेव पावतीवरील नमूद केले व्याजदराप्रमाणे व्याजासह होणारी एकूण रक्कम जाबदार 1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र. 14 यांनी संयुक्तिरित्या अदा करावी.
3. तक्रारदार याना खाते क्र. 574 वरील रक्कम रु.25,000/- व त्यावर दि.7-11-2007 पासून आदेश पारित तारखेपर्यंत मुदत ठेव पावतीवरील नमूद केले व्याजदराप्रमाणे व्याजासह होणारी एकूण रक्कम जाबदार 1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र. 14 यांनी संयुक्तिरित्या अदा करावी.
4. तक्रारदार याना खाते क्र. 575 वरील रक्कम रु.25,000/- व त्यावर दि.7-11-2007 पासून आदेश पारित तारखेपर्यंत मुदत ठेव पावतीवरील नमूद केले व्याजदराप्रमाणे व्याजासह होणारी एकूण रक्कम जाबदार 1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र. 14 यांनी संयुक्तिरित्या अदा करावी.
5. तक्रारदार याना खाते क्र. 576 वरील रक्कम रु.25,000/- व त्यावर दि.7-11-2007 पासून आदेश पारित तारखेपर्यंत मुदत ठेव पावतीवरील नमूद केले व्याजदराप्रमाणे व्याजासह होणारी एकूण रक्कम जाबदार 1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र. 14 यांनी संयुक्तिरित्या अदा करावी.
6. तक्रारदार याना खाते क्र. 577 वरील रक्कम रु.25,000/- व त्यावर दि.7-11-2007 पासून आदेश पारित तारखेपर्यंत मुदत ठेव पावतीवरील नमूद केले व्याजदराप्रमाणे व्याजासह होणारी एकूण रक्कम जाबदार 1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र. 14 यांनी संयुक्तिरित्या अदा करावी.
7. तक्रारदार याना खाते क्र. 578 वरील रक्कम रु.25,000/- व त्यावर दि.7-11-2007 पासून आदेश पारित तारखेपर्यंत मुदत ठेव पावतीवरील नमूद केले व्याजदराप्रमाणे व्याजासह होणारी एकूण रक्कम जाबदार 1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र. 14 यांनी संयुक्तिरित्या अदा करावी.
8. तक्रारदार याना खाते क्र. 579 वरील रक्कम रु.25,000/- व त्यावर दि.7-11-2007 पासून आदेश पारित तारखेपर्यंत मुदत ठेव पावतीवरील नमूद केले व्याजदराप्रमाणे व्याजासह होणारी एकूण रक्कम जाबदार 1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र. 14 यांनी संयुक्तिरित्या अदा करावी.
9. तक्रारदार याना खाते क्र. 580 वरील रक्कम रु.25,000/- व त्यावर दि.7-11-2007 पासून आदेश पारित तारखेपर्यंत मुदत ठेव पावतीवरील नमूद केले व्याजदराप्रमाणे व्याजासह होणारी एकूण रक्कम जाबदार 1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र. 14 यांनी संयुक्तिरित्या अदा करावी.
10. तक्रारदार याना खाते क्र. 581 वरील रक्कम रु.25,000/- व त्यावर दि.7-11-2007 पासून आदेश पारित तारखेपर्यंत मुदत ठेव पावतीवरील नमूद केले व्याजदराप्रमाणे व्याजासह होणारी एकूण रक्कम जाबदार 1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र. 14 यांनी संयुक्तिरित्या अदा करावी.
11. तक्रारदार याना खाते क्र. 582 वरील रक्कम रु.25,000/- व त्यावर दि.7-11-2007 पासून आदेश पारित तारखेपर्यंत मुदत ठेव पावतीवरील नमूद केले व्याजदराप्रमाणे व्याजासह होणारी एकूण रक्कम जाबदार 1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र. 14 यांनी संयुक्तिरित्या अदा करावी.
12. वरील कलम 1 ते 11 मधील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसांचे आत न केलेस एकूण सव्याज होणा-या रकमेवर तक्रारदाराचे हाती रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्क्याने व्याजासह रक्कम अदा करावी.
13. तक्रारदाराना जाबदार 1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र. 14 यांनी संयुक्तिरित्या मानसिक शारिरीक त्रासापोटी रु.10,000/-, जाणेयेणेचा खर्च रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- तक्रारदाराना अदा करावेत.
14. वरील आदेशाचे पालन जाबदारांनी विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द कलम 25 व 27 अन्वये पुढील कार्यवाही करु शकतील.
15. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
16. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सांगली.
दि.24-07-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.