Maharashtra

Satara

CC/13/129

JAYASHRI CHANDRAKANT BOKE - Complainant(s)

Versus

MANIKRAO PAWAR GRAMIN BIGAR SHETI PAT SANSTHA - Opp.Party(s)

28 Aug 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                                                                            मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                              तक्रार क्र. 129/2013.

                                                                                                             तक्रार दाखल दि.19-7-2013.

                                                                                                            तक्रार निकाली दि. 28-8-2015. 

 

जयश्री चंद्रकांत बोके.

रा.समर्थविहार अपार्टमेंट, कसबा पेठ,

ब्राम्‍हण आळी, फलटण,

जि.सातारा.                                   ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

1. माणिकराव पवार ग्रा.बिगरशेती सह.पतसंस्‍था,

   सरडे, ता.फलटण, जि.सातारा.  

   रा.पवार बिल्डिंग, शिंपी आळी, फलटण, जि.सातारा.

     

2. शिरीष माणिकराव पवार,चेअरमन.

   रा.रामालय अपार्टमेंटमागे, गोळीबार मैदान,

   लक्ष्‍मीनगर, फलटण, जि.सातारा.               ....  जाबदार

 

                 तक्रारदारातर्फे अँड.प्रविण फौजदार. 

                      जाबदार- एकतर्फा आदेश. 

 

                       -ः न्‍यायनिर्णय ः-

 

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या यानी पारित केला)                       

1.         तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986च्‍या कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

2.         तक्रारदार क्र.1 या गृहिणी असून त्‍या शेती करतात.  तक्रारदारानी आपल्‍या संसारातून साठविलेले बचत करुन जमा झालेले व शेती व्‍यवसायातून जमा झालेले पैसे काही ठेवपावत्‍याद्वारे कौटुंबिक सोयीसाठी आपल्‍या स्‍वतःच्‍या नावावर जाबदार संस्‍थेत गुंतवले आहेत म्‍हणजेच तक्रारदार हे जाबदार पतसंस्‍थेचे ग्राहक आहेत.   जाबदार क्र.1 ही सहकार अधिनियम 1960 अंतर्गत स्‍थापन झालेली संस्‍था असून तिचा व्‍यवसाय हा ठेवी गोळा करणे, कर्जवाटप व कर्जवसुली करणे व यातून आपला नफा कमावणे असा आहे.  जाबदार क्र.2 हे या संस्‍थेचे चेअरमन आहेत व जाबदार क्र.1 संस्‍थेचा सर्व दैनंदिन कामकाज व कारभार हा संस्‍थेचे व्‍यवस्‍थापक पहातात.  तक्रारदारानी पैसे गुंतवतेवेळी जाबदारानी तक्रारदारास मागाल तेव्‍हा ठेवीचे पैसे परत करु असे मान्‍य केले होते. सदर सर्व ठेवीच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत. 

अ.क्र.

ठेवीदाराचे नाव

पावती क्र.

ठेव तारीख

देय तारीख

रक्‍कम रु.

1

जयश्री चंद्रकांत बोके

5638

21-7-2009

21-7-2013

19,000/-

2

जयश्री चंद्रकांत बोके

5639

21-7-2009

21-7-2013

19,000/-

3

जयश्री चंद्रकांत बोके

5640

21-7-2009

21-7-2013

19,000/-

4

जयश्री चंद्रकांत बोके

5641

21-7-2009

21-7-2013

19,000/-

5

जयश्री चंद्रकांत बोके

5642

21-7-2009

21-7-2013

19,000/-

6

जयश्री चंद्रकांत बोके

5643

21-7-2009

21-7-2013

19,000/-

7

जयश्री चंद्रकांत बोके

5644

21-7-2009

21-7-2013

19,000/-

8

जयश्री चंद्रकांत बोके

5645

21-7-2009

21-7-2013

19,000/-

9

जयश्री चंद्रकांत बोके

5646

21-7-2009

21-7-2013

19,000/-

10

जयश्री चंद्रकांत बोके

5647

21-7-2009

21-7-2013

19,000/-

11

जयश्री चंद्रकांत बोके

5648

21-7-2009

21-7-2013

19,000/-

12

जयश्री चंद्रकांत बोके

5649

21-7-2009

21-7-2013

19,000/-

13

जयश्री चंद्रकांत बोके

5650

21-7-2009

21-7-2013

19,000/-

14

जयश्री चंद्रकांत बोके

5651

21-7-2009

21-7-2013

19,000/-

15

जयश्री चंद्रकांत बोके

5652

21-7-2009

21-7-2013

19,000/-

16

जयश्री चंद्रकांत बोके

5653

21-7-2009

21-7-2013

19,000/-

   

     वरील सर्व ठेवपावत्‍यांच्‍या मुदती संपल्‍यानंतर तक्रारदार जाबदार संस्‍थेत आपले पैसे मागणेस गेले असता संस्‍थेच्‍या व्‍यवस्‍थापकाने संस्‍था आर्थिक अडचणीत असलेचे सांगत पैसे देणेस नकार दिला, त्‍यामुळे तक्रारदारास धक्‍का बसला व ते जाबदार क्र.2 याना जाब विचारणेस भेटले, मात्र त्‍यानी तक्रारदाराच्‍या बोलण्‍याकडे दुर्लक्ष केले.  सदर रक्‍कम मिळणेसाठी त्‍यानी जाबदारांकडे वारंवार हेलपाटे घातले, पत्रव्‍यवहार केले.  जाबदार क्र.2 यानी सध्‍या संस्‍था आर्थिक अडचणीत असल्‍याने आम्‍ही रोख पैसे देऊ शकत नाही म्‍हणून या रकमेची हमी म्‍हणून व झालेल्‍या मानसिक त्रासापोटी भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.3,90,310/-चे दोन पोस्‍ट डेटेड चेक देतो असे सांगून ते वटतील याची पूर्ण हमी दिली, तसेच ते जर वटले नाहीत तर मी स्‍वतः तुम्‍हांस तुमची सर्व रक्‍कम देईन मात्र त्‍याबदल्‍यात तुम्‍ही तुमच्‍या ठेवपावत्‍या त्‍यावर सहया करुन संस्‍थेत जमा केल्‍या पाहिजेत असे सांगितले व चेक जर वटला नाही तर आम्‍ही या पावत्‍या परत करु अशी खात्रीही दिली.  मात्र त्‍या खात्रीचा काहीही उपयोग झाला नाही व ते चेक तक्रारदाराने त्‍यांचे खात्‍यात भरल्‍यावर जाबदार संस्‍थेने पैसे न देणेची सूचना केल्‍यामुळे ते न वटता परत आले.  अशा रितीने जाबदारानी तक्रारदाराची फसवणूक केली.   तक्रारदारानी वारंवार जाबदारांकडे वरील पैसे मिळण्‍यासाठी लेखी व तोंडी मागणी केली मात्र जाबदारानी अद्याप त्‍यांचे पैसे परत केले नाहीत, तसेच त्‍यांच्‍या मूळ सहया केलेल्‍या ठेवपावत्‍याही परत केल्‍या नाहीत.    जाबदारांच्‍या या वर्तनामुळे तक्रारदारांची प्रचंड आर्थिक ओढाताण होत आहे.   त्‍यामुळे कंटाळून जाऊन तक्रारदारानी दि.3-7-2013 रोजी जाबदार क्र.1 व 2 याना अर्ज करुन आम्‍हांस मुलीच्‍या लग्‍नासाठी व औषधासाठी पैशांची गरज असल्‍याने आपण कबूल केलेली मानसिक त्रासापोटी देऊ केलेली व आम्‍हांस देय असलेली एकूण रु.3,90,310/- इतकी रक्‍कम 7 दिवसात परत करावी अन्‍यथा आम्‍ही कोर्ट कारवाई करु असा नोटीसवजा विनंती अर्ज केला व सदर अर्जाची प्रत त्‍यांनी सहा.निबधक फलटण यांचेकडेही देऊन जाबदार संस्‍थेस समज देऊन कारवाई करावी अशी विनंती केली मात्र त्‍यानी तशी समज देऊनही व सदर नोटीसची मुदत संपली तरी जाबदारानी तक्रारदारास पैसे दिले नाहीत व नोटीसीस उत्‍तरही दिले नाही.  जाबदारानी तक्रारदारास रक्‍कम अदा न केल्‍यानेच तक्रारदारास हा अर्ज या मे.मंचापुढे दाखल करणे भाग पडत आहे.  दि.3-7-2013 रोजी तक्रारदाराने जाबदार संस्‍थेस नोटीसवजा पैसे मागणी अर्ज करुनही त्‍यानी त्‍यावर कोणतीही कारवाई केली नाही तेव्‍हा प्रथमतः घडले व नंतर वारंवार आजतागायत घडतच आहे.  तक्रारदार व जाबदार या मे.मंचाचे स्‍थळसीमेतच रहातात व तक्रारीस कारणही या मे.मंचाचे स्‍थळसीमेत घडलेने हा तक्रारअर्ज चालवणेचे अधिकार या मे.मंचास आहेत.   सबब तक्रारदारानी मे.मंचाला खालीलप्रमाणे विनंती केली आहे-

मे.मंचाने जाबदार क्र.1 व 2 यांस ग्राहक म्‍हणून तक्रारदारास पुरवावयाच्‍या सेवेत कमतरता केलेबाबत दोषी मानून जाबदारानी तक्रारदाराना मानसिक त्रासापोटी देऊ केलेली सर्व रक्‍कम म्‍हणजेच रु.3,90,310/- एवढी तक्रारदारास परत करणेचा हुकूम मे.मंचाने जाबदारास करावा.  तक्रारदारास वरील रक्‍कम मिळेपर्यंत या रकमेवर द.सा.द.शे.10% दराने व्‍याज देणेचा हुकूम जाबदारास मे.मंचाने करावा. तक्रारदारास तक्रारअर्जासाठी आलेला सर्व खर्च जाबदारानी परत करणेचा हुकूम जाबदारांस व्‍हावा.

 

3.       नि.3 कडे तक्रारदाराचा अँड.कदम याना तक्रारअर्ज चालवणेस परवानगीबाबतचा अर्ज, नि.4 कडे अँड.फौजदार यांचे वकीलपत्र दाखल करणेसाठी परवानगी अर्ज,  नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, नि.5 कडे अँड.फौजदार यांचे वकीलपत्र दाखल, नि.6 कडे तक्रारदारांची फेरिस्‍त, नि.6/1 ते नि.6/8 कडे ठेवपावत्‍यांच्‍या झेरॉक्‍स, नि.6/9 कडे तक्रारदाराचा सहकारमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य, मुंबई यांना जाबदारांकडून पैसे मिळत नसलेबाबत पाठविलेले पत्र, नि.6/10 कडे रु.1,95,000/-चा जाबदारानी तक्रारदारास दिलेल्‍या चेकची झेरॉक्‍स व बँक स्‍टेटमेंट, नि.6/11 कडे रु.1,95,310/-चा जाबदारानी तक्रारदारास दिलेल्‍या चेकची झेरॉक्‍स व बँक स्‍टेटमेंट, नि.6/12 कडे तक्रारदारास डॉ.बर्वे यांचे ट्रीटमेंटचे प्रिस्‍क्रीप्‍शन, नि.6/13 कडे तक्रारदारानी चेअरमन सहकार निबंधक फलटण यांना जाबदार पतसंस्‍थेतील पैसे मिळणेबाबतचे पाठविलेले पत्र,  नि.7 कडे तक्रारदाराची पत्‍तापुरसीस, नि.8 कडे मंचाने जाबदाराना पाठविलेल्‍या नोटीसा, नि.9 कडे जाबदार क्र.1 व 2 यांच्‍या नोटीसच्‍या पोहोचपावत्‍या, नि.10 कडे तक्रारदाराचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र इ.कागदपत्रे दाखल आहेत. 

 

4.       तक्रारदारांची तक्रार, त्‍यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुरावे, तसेच पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र यांचे अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.           मुद्दा                                          निष्‍कर्ष

 

 1.  तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार

     असे नाते आहे काय?                                        होय.

 2.  जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय?      होय.

 3.  जाबदार हे तक्रारदारांच्‍या रकमा देणे लागतात काय?                होय.

 4.  अंतिम आदेश काय?                                तक्रार अंशतः मंजूर. 

 

विवेचन-  मुद्दा क्र.1 ते 3-

 

5.        मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.  प्रस्‍तुत कामी तक्रारदार या गृहिणी असून त्‍या शेती करतात.  त्‍यांनी शेतीतून जमा झालेले पैसे ठेवपावत्‍याद्वारे स्‍वतःचे नावावर जाबदार पतसंस्‍थेत गुंतविलेले आहेत, त्‍यामुळे त्‍या जाबदार पतसंस्‍थेच्‍या ग्राहक ठरतात.  जाबदार पतसंस्‍था ही सहकार अधिनियम अंतर्गत स्‍थापन झालेली संस्‍था आहे. तसेच जाबदार पतसंस्‍थेने रकमा ठेवून घेतल्‍या आहेत व त्‍यावर ती व्‍याज देणार असलेने जाबदार पतसंस्‍था ही त्‍यांना-(ग्राहकाना) सेवा पुरवठा देणारी संस्‍था ठरते.  तक्रारदारानी 16 ठेवपावत्‍यांद्वारे जाबदार पतसंस्‍थेत पैसे गुंतवले आहेत. ते पैसे मुदत संपलेनंतर व्‍याजासह परत करु असे जाबदारानी मान्‍य केले होते.  सदर ठेवीच्‍या मुदती संपल्‍या परंतु जाबदारानी तक्रारदारास वारंवार पैसे मागूनही आजपावेतो पैसे परत केलेले नाहीत.  शेवटी दि.28-2-13 रोजी तक्रारदारानी जाबदार क्र.1 व 2 याना आत्‍मदहनाचा इशारा दिला, त्‍याचा परिणाम म्‍हणून जाबदारानी तक्रारदारांची भेट घेतली व संस्‍था आर्थिक अडचणीत असलेने आम्‍ही  रोख पैसे देऊ शकत नाही व तुमच्‍या रकमेची हमी व मानसिक त्रासापोटी भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.3,90,310/-चे दोन पोस्‍टडेटेड चेक देतो.  ते वटतील याची हमी देतो व ते वटले नाहीत तर मी स्‍वतः तुमची सर्व रक्‍कम देईन परंतु त्‍याबदली तुम्‍ही तुमच्‍या ठेवपावत्‍या सहया करुन संस्‍थेत जमा करणेबाबत सांगितले व चेक वटले नाहीत तर तुमच्‍या पावत्‍या तुम्‍हाला परत करु अशीही खात्री दिली परंतु संस्‍थेने स्‍टॉप पेमेंट केलेने दोन्‍ही चेक न वटता परत आले.  जाबदारानी तक्रारदारांचे पैसे मुदतठेव रुपाने ठेवून घेतले त्‍यावर व्‍याजही दिले नाही व मूळ पैसेही परत केले नाहीत.  याउपर तक्रारदारांच्‍या ठेवपावत्‍याही स्‍वतःकडे ठेवून घेतल्‍या.  येथे जाबदारानी ग्राहकास द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी निर्माण झालेचे स्‍पष्‍ट दिसून येते व यास जाबदार पतसंस्‍थाच जबाबदार आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  जाबदारानी तक्रारदारांच्‍या रकमा मुदती संपून गेल्‍या तरी परत केल्‍या नसल्‍यामुळेच त्‍यांचेकडून त्‍यांच्‍या-(जाबदारांच्‍या) कर्तव्‍यात कसूर झाली आहे व ग्राहकाला त्‍यांचेकडून दयावयाच्‍या सेवेत त्रुटी निर्माण झालेली आहे.  आजपावेतो जाबदारांनी तक्रारदारांची रक्‍कम सव्‍याज परत केलेली नाही, ती त्‍यांनी त्‍यांना सव्‍याज परत केली पाहिजे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.

       जाबदारांचे अशा वर्तनाने तक्रारदाराचे मनस्‍वास्‍थ बिघडले आहे, तसेच तक्रारदारांची आर्थिक स्थितीही ढासळलेली आहे.  ग्राहकाना योग्‍य सेवा पुरवणेची जबाबदारी जाबदार क्र.1 व 2 यांची होती ती ते पुरवू शकले नाहीत.  म्‍हणून आम्‍ही येथे  Co-operate corporate veil चा आधार घेऊन या सर्व गोष्‍टींना जाबदार क्र.1 व 2 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरीत आहोत.  येथे आम्‍ही मे. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या रिट पिटीशन नंबर 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र या न्‍यायनिवाडयाचा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे.

 

6.       सदर कामी जाबदार क्र.1 व 2 यांना नोटीसा मिळालेल्‍या असूनही ते मंचात हजर झालेले नाहीत किंवा त्‍यांनी म्‍हणणेही दिलेले नाही त्‍यामुळे दि.6-9-13 रोजी त्‍यांचेविरुध्‍द मे.मंचाने एकतर्फा आदेश पारित केलेले आहेत.  म्‍हणून सदर कामी जाबदारातर्फे म्‍हणणे दाखल नाही.  

7.          सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-

                           आदेश  

1.  तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.

 

2.  जाबदार श्रीमंत मालोजीराजे सह.बँक लि. वरील रक्‍कम रु.1,95,000/- या रकमेवर दि.25-4-2013 पासून आदेश पारित तारखेपर्यंत द.सा.द.शे.10% प्रमाणे व्‍याजासह होणारी एकूण रक्‍कम तक्रारदार यांना जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावी. 

 

3.      जाबदार श्रीमंत मालोजीराजे सह.बँक लि. वरील रक्‍कम रु.1,95,310/- या रकमेवर दि.15-5-2013 पासून आदेश पारित तारखेपर्यंत द.सा.द.शे.10% प्रमाणे व्‍याजासह होणारी एकूण रक्‍कम तक्रारदार यांना जाबदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावी. 

 

4.      वरील आदेशाचे पालन जाबदार क्र. 1 व 2 यांनी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसांचे आत करावयाचे आहे तसे न केलेस आदेश पारित तारखेपासून जाबदाराचे हाती रक्‍कम पडेपर्यंत झालेल्‍या एकूण रकमेवर द.सा.द.शे.6% ने व्‍याज अदा करावे लागेल.

 

5.   जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्‍वये दाद मागू शकतील. 

 

6.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला. 

 

7.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

 

 

ठिकाण- सातारा.

दि. 28 –8-2015.

 

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.