सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ. सविता भोसले, अध्यक्षा
मा. श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य.
मा. सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 160/2014
तक्रार दाखल दि.09-10-2014
तक्रार निकाली दि.21-07-2015
1. श्री. अनिरुध्द अशोक फणसे,
2. सौ. माधुरी अनिरुध्द फणसे,
दोघे रा. कोयनानगर, ता.पाटण, जि.सातारा .... तक्रारदार.
विरुध्द
माणिकराव पवार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.,सरडे
शाखा जबरेश्वर, फलटण तर्फे
1. मॅनेजर, श्री. संतोष सिताराम पवार,
रा. पवार गल्ली, कसबा पेठ, फलटण,
ता. फलटण जि.सातारा
2. चेअरमन, सौ. अलका शिरीष पवार,
रा. लक्ष्मीनगर,फलटण,ता.फलटण,जि.सातारा
3. व्हाईस चेअरमन, श्री. विठ्ठल सुभेदार फडतरे,
रा. गुणवरे, ता.फलटण,जि.सातारा
4. संचालक,श्री. श्रीपाद भास्कर ढब्वू,
रा.सरडे,ता.फलटण जि.सातारा
5. संचालिका सौ. सुनंदा चंद्रशेखर पवार,
रा. पवार गल्ली, फलटण,ता.फलटण, जि.सातारा
6. संचालिका, सौ. मधुमती शैलेंद्र पवार,
रा. पवार गल्ली, फलटण,ता.फलटण, जि.सातारा
7. संचालक, श्री. सुनिल दत्तात्रय कोठावळे,
रा. पवार गल्ली, फलटण,ता.फलटण, जि.सातारा
8. संचालक, श्री. शिरीष माणिकराव पवार,
रा. लक्ष्मीनगर, फलटण,ता.फलटण, जि.सातारा
9. संचालक,श्री.अभिजित शिरिष पवार,
रा. लक्ष्मीनगर, फलटण,ता.फलटण, जि.सातारा
10.संचालिका, सौ.रोहिणी विजयसिंह ना.निंबाळकर,
रा.वाठार निंबाळकर,ता.फलटण,जि.सातारा
11. संचालक,श्री.संतोष भिमराव आढाव
रा.गुणवरे ता.फलटण, जि.सातारा
12. संचालक,श्री.किरण जनार्दन टंकसाळे
रा. स्वामी विवेकानंदनगर,फलटण,
ता.फलटण,जि.सातारा
13. संचालक, श्री.अर्जून सुखदेव घुले,
रा.गुणवरे,ता.फलटण,जि.सातारा
14. संचालिका, सौ.विजया अशोक पवार,
रा. पवार गल्ली,कसबा पेठ,फलटण,
ता.फलटण,जि.सातारा ... जाबदार.
....तक्रारदारतर्फे (अँड.व्ही.डी..कदम)
(अँड.ए.ए.राशिनकर)
....जाबदार क्र.1 ते 14 तर्फे (अँड.एस.एच.कदम)
-ः न्यायनिर्णय ः-
(मा.सौ.सविता भोसले, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला.)
1. प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन पुढीलप्रमाणे,
तक्रारदार हे कोयनानगर, ता.पाटण.जि.सातारा येथील रहिवाशी आहेत. त्यांनी जाबदार पतसंस्थेत मुलींच्या शिक्षणासाठी व विवाहाकरीता ठेवीच्या स्वरुपात खालील नमूद केलेप्रमाणे रक्कम गुंतविली होती व आहे.
अ.क्र | ठेवीदाराचे नांव | ठेव ठेवलेली रक्कम | ठेवपावती नंबर | ठेव ठेवलेचा दिनांक | ठेवीची मुदत संपलेली दिनांक |
1 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5263 | 26/06/2009 | 26.06.2012 |
2 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5264 | 26/06/2009 | 26.06.2012 |
3 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5265 | 26/06/2009 | 26.06.2012 |
4 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5266 | 26/06/2009 | 26.06.2012 |
5 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5267 | 26/06/2009 | 26.06.2012 |
6 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5268 | 26/06/2009 | 26.06.2012 |
7 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5269 | 26/06/2009 | 26.06.2012 |
8 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5270 | 26/06/2009 | 26.06.2012 |
9 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5271 | 26/06/2009 | 26.06.2012 |
10 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5272 | 26/06/2009 | 26.06.2012 |
11 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5273 | 26/06/2009 | 26.06.2012 |
12 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5274 | 26/06/2009 | 26.06.2012 |
13 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5275 | 26/06/2009 | 26.06.2012 |
14 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5276 | 26/06/2009 | 26.06.2012 |
15 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5277 | 26/06/2009 | 26.06.2012 |
16 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 15,000/- | 5278 | 26/06/2009 | 26.06.2012 |
वरीलप्रमाणे एकूण रु.3,00,000/- (रुपये तीन लाख फक्त) तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेत मुदतठेव योजनेत ठेव म्हणून गुंतविले होते व आहेत. नमूद सर्व ठेवपावत्यांची मुदत संपलेनंतर तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे वरचेवर सदर ठेवीच्या रकमेची व्याजासह मागणी केली आहे व ठेवीची रक्कम तक्रारदार यांना परत दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे अतोनात नुकसान होवून तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला आहे. दि.26/12/2012 रोजी तक्रारदाराने जाबदाराला रक्कम मागणीची नोटीस पाठविली परंतु सदरचे नोटीस जाबदाराने जाणीवपूर्वक घेतली नाही व तक्रारदाराचे ठेवीच्या रकमा परत देणेची कोणतीही तजवीज केली नाही अगर नोटीसला उत्तर दिलेले नाही. तक्रारदार यांना त्यांचे मुलींच्या शिक्षणासाठी व विवाहासाठी सदर ठेवीची रक्कम अत्यंत आवश्यक असूनही जाबदाराने प्रस्तुत रक्कम अद्याप जाबदार यांनी तक्रारदाराला परत केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांना जाबदाराने सदोष सेवा पुरविली आहे. सबब तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून प्रस्तुत ठेवीची सर्व रक्कम वसुल होवून मिळणेसाठी सदरचा तक्रार अर्ज मे मंचात दाखल केलेला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुतकामी जाबदार यांचेकडून रक्कम रु.3,00,000/- ठेवीची एकूण रक्कम व त्या ठेवपावत्यांवरील नमूद व्याजासह सर्व जाबदार यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वसुल होवून मिळावी, तसेच प्रस्तुत रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष वसूल होवून मिळेपर्यंत द.सा.द.शे. 14 टक्के व्याज जाबदारांकडून मिळावे, तक्रारदाराला झाले मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/- जाबदारांकडून वसूल होवून मिळावा अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी तक्रार अर्जाचे पृष्ठयर्थ नि. 2 व 3 कडे प्रतिज्ञापत्रे, नि.6 चे कागदयादीसोबत नि.6/1 ते 6/16 कडे ठेवपावत्यांच्या झेरॉक्स प्रती, नि.6/17 कडे तक्रारदाराने जाबदार यांना रजि.पोष्टाने पाठवलेले पत्र, नि.6/18 कडे तक्रारदाराने जाबदाराला रजि.पोस्टाने पाठवलेले परत आलेले पत्र/ नोटीस, नि.10 कडे जाहीर नोटीस मसुदा, नि.13 चे कागदयादीसोबत जाहीर नोटीस प्रसिध्द झालेचा दै.तरुण भारत चा अंक, नि.14 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.16 कडे लेखी युक्तीवाद, नि.18 चे कागदयादीसोबत नि. 16/1 ते 18/8 कडे मुळ ठेवपावत्यां वगैरे कागदपत्रे मे.मंचात दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी, जाबदार क्र. 1 ते 14 हे मे. मंचात हजर झाले आहेत मात्र त्यांनी प्रस्तुत प्रकरणात त्यांचे म्हणणे/कैफियत दाखल केलेली नाही. सबब सदर जाबदार क्र. 1 ते 14 यांचेविरुध्द ‘म्हणणे नाही’ असा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे. जाबदार यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही किंवा स्वतःच्या बचावासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा मे. मंचात दाखल केलेला नाही.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थी पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ.नं. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक व
सेवापुरवठादारअसे नाते आहे काय ? होय
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सवा
पुरविली आहे काय ? होय
3. अंतिम आदेश काय ? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.-कारण तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेत मुदतठेव स्वरुपात खालील कोष्टकात नमूद केलेप्रमाणे रक्कम ठेवपावत्यांमध्ये गुंतविली होती व आहे.
अ.क्र | ठेवीदाराचे नांव | ठेव ठेवलेली रक्कम | ठेवपावती नंबर | ठेव ठेवलेचा दिनांक | ठेवीची मुदत संपलेली दिनांक |
1 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5263 | 26/06/2009 | 26.06.2012 |
2 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5264 | 26/06/2009 | 26.06.2012 |
3 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5265 | 26/06/2009 | 26.06.2012 |
4 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5266 | 26/06/2009 | 26.06.2012 |
5 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5267 | 26/06/2009 | 26.06.2012 |
6 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5268 | 26/06/2009 | 26.06.2012 |
7 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5269 | 26/06/2009 | 26.06.2012 |
8 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5270 | 26/06/2009 | 26.06.2012 |
9 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5271 | 26/06/2009 | 26.06.2012 |
10 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5272 | 26/06/2009 | 26.06.2012 |
11 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5273 | 26/06/2009 | 26.06.2012 |
12 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5274 | 26/06/2009 | 26.06.2012 |
13 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5275 | 26/06/2009 | 26.06.2012 |
14 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5276 | 26/06/2009 | 26.06.2012 |
15 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5277 | 26/06/2009 | 26.06.2012 |
16 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 15,000/- | 5278 | 26/06/2009 | 26.06.2012 |
सर्व मुळ ठेवपावत्या तक्रारदाराने नि.18 चे कागदयादीसोबत नि.18/1 ते नि.18/8 कडे दाखल केलेल्या आहेत. यावरुन तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा पुरवठादार असे नाते आहे हे स्पष्ट होते. प्रस्तुत सर्व ठेवपावत्यांची मुदत संपलेनंतर तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे वारंवार प्रस्तुत ठेवीच्या रकमेची व्याजासह मागणी केली तरीही जाबदाराने जाणूनबुजून नोटीस स्विकारली नाही व तक्रारदाराचे मागणीला कोणतही दाद दिलेली नाही. तक्रारदाराचे ठेवीची रक्कम जाबदार यांनी व्याजासह परत अदा केलेली नसलेने तक्रारदार यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. याकामी तक्रारदाराने जाबदाराला वकीलामार्फत पाठविले नोटीस तक्रारदाराने नि. 6 चे कागदयादीसोबत नि.6/17 व 6/18 कडे दाखल केली आहे. प्रस्तुत कामी जाबदार यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविणेचे निर्विवादपणे स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रस्तुत कामी तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेत वर नमूद कोष्टकात नमूद केले सर्व ठेवपावत्यांची त्या ठेवपावत्यांवर नमूद व्याजासह होणारी सर्व रक्कम तक्रारदार यांना देणेसाठी जाबदार क्र. 1 ते 14 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकपणे जबाबदार धरणे Co-Operative Corporate Veil नुसार न्यायोचित होणार आहे. प्रस्तुत कामी आम्ही मे. उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडील रिटपिटीशन नं. 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्टेट ऑफ महाराष्ट्र या न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडत्वाचा आधार घेतला आहे. सबब तक्रारदार यांचे वर नमूद कोष्टकातील ठेवपावत्यांच्या ठेवीची त्या ठेवपावतीवर नमूद व्याजासह रक्कम जाबदार क्र. 1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदाराला अदा करणे योग्य व न्याय होणार आहे. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आ दे श
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदार यांच्या खालील नमूद कोष्टकातील ठेवपावत्यांची सर्व रक्कम ठेवपावतीवरील नमूद व्याजासह तक्रारदार यांना अदा करणेसाठी जाबदार क्र. 1 ते 14 यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार धरणेत येते.
अ.क्र | ठेवीदाराचे नांव | ठेव ठेवलेली रक्कम | ठेवपावती नंबर | ठेव ठेवलेचा दिनांक | ठेवीची मुदत संपलेली दिनांक |
1 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5263 | 26/06/2009 | 26.06.2012 |
2 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5264 | 26/06/2009 | 26.06.2012 |
3 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5265 | 26/06/2009 | 26.06.2012 |
4 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5266 | 26/06/2009 | 26.06.2012 |
5 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5267 | 26/06/2009 | 26.06.2012 |
6 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5268 | 26/06/2009 | 26.06.2012 |
7 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5269 | 26/06/2009 | 26.06.2012 |
8 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5270 | 26/06/2009 | 26.06.2012 |
9 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5271 | 26/06/2009 | 26.06.2012 |
10 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5272 | 26/06/2009 | 26.06.2012 |
11 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5273 | 26/06/2009 | 26.06.2012 |
12 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5274 | 26/06/2009 | 26.06.2012 |
13 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5275 | 26/06/2009 | 26.06.2012 |
14 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5276 | 26/06/2009 | 26.06.2012 |
15 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 19,000/- | 5277 | 26/06/2009 | 26.06.2012 |
16 | श्री.अनिरुध्द अशोक फणसे सौ.माधुरी अनिरुध्द फणसे | 15,000/- | 5278 | 26/06/2009 | 26.06.2012 |
3. जाबदार क्र. 1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वर नमूद कोष्टकातील सर्व ठेवीच्या रकमा प्रस्तुत ठेवपावतीवरील नमूद व्याजासह तक्रारदारास अदा कराव्यात.
4. प्रस्तुत ठेवीच्या व्याजासह रकमेवर ठेवीची मुदत संपलेतारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने होणारी सर्व रक्कम जाबदार क्र. 1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना अदा करावी.
5. तक्रारदारास झाले मानसिक त्रास व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून जाबदार क्र. 1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना रक्कम रु. 10,000/- अदा करावेत.
6. वरील सर्व आदेशांची पूर्तता आदेश पारीत झाले तारखेपासून 45 दिवसात करावी.
7. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता जाबदार यांनी न केलेस तक्रारदार यांना जाबदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 नुसार कारवाई करणेची मुभा राहील.
8. आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
9. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि.21-07-2015
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.