जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर ग्राहक तक्रार क्र. १२४/२०१९ नोंदणी दिनांक : १९/०९/२०१९ निर्णय दिनांक : १०/०२/२०२२ निर्णय कालावधी: वर्ष,म.दि. अर्जदार/तक्रारकर्ता सुरेखा मुनीन्द्र देठे, वय-४३ वर्षे, धंदा- घरकाम राह. महाराणा प्रताप वार्ड, बल्लारपूर, तह. जिल्हा चंद्रपूर :: वि रु ध्द :: गैरअर्जदार गैरअर्जदार/विरुध्द पक्ष १. मनी मंञा फायनान्सीअल मार्फत गोमती मनोहर पाचभाई व्दारा, आनंद सुपर बाजार, सम्राट कॉम्प्लेक्स, नागराज कॅफे समोर, आसीफाबाद रोड, राजुरा ४४२९०५ तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर 2. मनी मंञा फायनान्सीअल मार्फत राकेश रामचंद्र वरपटकर, मिताली फोटो स्टुडीओ जवळ, पंचशील वार्ड, इंदीरा नगर परिषद, प्राथमिकं शाळेजवळ, गडचांदुर रोड, राजुरा ४४२९०५ तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर अर्जदार तर्फे वकील : प्रतिनिधी श्री खोब्रागडे गैरअर्जदार क्र. १ तर्फे वकील : एकतर्फा गैरअर्जदार क्र. २ तर्फे वकीलः अधिवक्ता रविन्द्र टिपले गणपुर्ती १. श्री अतुल डी. आळशी, मा. अध्यक्ष २. सौ किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्या ३. सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, श्रीमती किर्ती वैद्य (गाडगीळ) मा. सदस्या,) (पारीत दिनांक १०/०२/२०२२) 1. अर्जदाराची प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अंन्वये दाखल केलेली आहे. सदर तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे आहे. अर्जदार हा बल्लारपूर येथील रहिवासी असून गैरअर्जदार हे निवासी प्लॉट खरेदी विक्री करतात. तक्रारदाराने विरुद्ध पक्ष १ कडून निवासी उपयोगी प्लॉट चा व्यवहार केल्याने केल्याने तक्रार दार हे विरुद्ध पक्षाचे ग्राहक आहेत. तक्रारदाराने विरुद्ध पक्ष २ च्या माध्यमातून माध्यमातून मौजा मोरवा सर्वे नंबर ३०६/१,३०६/२ यातील प्लॉट नंबर १ एकूण क्षेत्रफळ २८५७ स्केअर फूट प्लॉट विक्रीची किमत ३५०/- स्केअर फूट प्रमाणे विक्री ची एकूण किमत १०,००,०००/- रुपये असे ठरले. याबाबतचे विसार पत्र दिनांक २७.१०.१२ रोजी ५,००,०००/-रुपये देऊन बुक केला. यावेळी विरुद्ध पक्ष २ हे सुद्धा उपस्थित होते त्यावेळी ही विरुद्ध पक्ष १ ह्यांनी तक्रारतक्रारकर्त्याला सांगितले की लेआउट चे स्कीमचे संबंधीचे नकाशे मंजूर करायला शासकीय कार्यालयात दाखल केलेले आहेत त्याची मंजुरी मिळताच विरुद्ध पक्ष अर्जदाराला सदर प्लॉटची विक्री करून देणार होते उपरोक्त विक्रीत करारपत्र झाल्यानंतर एका वर्षानंतर लेआऊट ला परवानगी मिळाली सदर परवानगी मिळाल्यानंतर तक्रारदार ह्यांनी विरुद्ध पक्ष यांना विक्री करून देण्यासाठी विचाराले होते परंतु विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदाराच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले .सबब तक्रारदार ह्यांनी दिनक २७.१०.२०१४ रोजी कायदेशीर नोटीस पाठवली व त्यात सदर पलोट ची विक्री करून द्यावी अन्यथा घेतलेली रक्कम व्याजासकट परत करावी असे विरुद्ध पक्ष ह्या कळविले. परंतु त्यावर काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे तक्रारदाराने सदर तक्रार जिल्हा ग्राहक मंचात दाखल केलेले आहे. विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदाराला उपरोक्त नमूद प्लॉटची विक्री करून न दिल्यामुळे वादाचे कारण सतत घडत असून चालू आहे. तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करून मागणी केली आहे की दोन्ही विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदारांना प्लॉट विक्री करून द्यावी अथवा प्लॉट विक्री संबंधाने घेतलेली रक्कम यांनी ५,००,०००/- रुपये २७/१०/२०१२ पासून १५ टक्के व्याजासह संयुक्त किवा वेगवेगळे पणे तक्रारदाराला देण्याचे आदेश व्हावेत असे शारीरिक-मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई तक्रारदाराला देण्याचे आदेश व्हावेत. 2. तक्रारदाराची तक्रार स्वीकृत करून विरुद्ध पक्ष एक व दोन यांना नोटीस काढण्यात आले 3. विरुद्ध पक्ष १ ह्यांना नोटीस प्राप्त होऊन सुद्धा प्रकरणात उपस्थित न राहिल्यामुळे दिनांक १४/११/२०१९ रोजी त्याचे विरुद्ध एकतर्फा आदेश पारित करण्यात आले 4. विरुद्ध पक्ष २ यांनी त्यांचे उत्तर दाखल करीत तक्रारदाराने तक्रारीत केलेले मुद्दे खोडून काढत विशेष कथनात नमूद केले की,त्याचा मनी मंञा फायनान्सीअल या कंपनीशी तसेच तक्रारीत नमूद प्लॉट च्या करारनाम्यातील व्यवहाराशी काहीही संबध नाही. त्याची दिनांक २७/१०/२०१२ रोजी केलेल्या विक्रीच्या करारनाम्यावर असलेली सही साक्षीदार म्हणून जी सही आहे ती सही सुद्धा त्याची नाही. तक्रारदाराने खोटे व बनावट दस्तावेज तयार करून त्याचे विरुद्ध सदर खोटा बनावट पुरावा विद्यमान कोर्टात दाखल केलेला आहे. विरुद्ध पक्ष दोन यांनी तक्रारदाराकडून कोणत्याही प्रकारचे रक्कम स्वीकारले नाही करिता सदर विरुद्ध पक्ष यांच्याविरुद्ध ताकार खारीज करण्यात यावी. 5. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र व दस्तऐवज व विरूध्दपक्ष हयांचे लेखीबयान,लेखीयुक्तिवाद अनुषंगाने उभयपक्षाने केलेल्या युक्तीवादावरून आयोगाच्या निर्णयास्तव मुद्दे व निष्कर्ष व त्यावील कारणमीमांसा खालीलप्रमाणे आहे. |